India vs England 3rd T20I Match Highlights : इंग्लंडने तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा २६ धावांनी पराभव करत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. बुधवारी राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पाहुण्यांनी २० षटकांत नऊ गडी गमावून १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला निर्धारित षटकांत नऊ गडी गमावून केवळ १४५ धावा करता आल्या. अशाप्रकारे या मालिकेतील पहिला सामना जिंकण्यात इंग्लंडला यश आले.
IND vs ENG 3rd T20I Highlights : दोन्ही संघांतील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे तर दोन्ही संघांत आतापर्यंत एकूण २७ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने १५ टी-२० जिंकले आहेत, तर इंग्लिश संघाने १२ जिंकले आहेत.
IND vs ENG Live : टीम इंडियाची हुकली हॅट्ट्रिक! राजकोटमध्ये इंग्लंडने मिळवला विजय
भारताविरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर इंग्लंड संघाने तिसऱ्या सामन्यात शानदार पुनरागमन करत 26 धावांनी विजय मिळवला. या मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अर्शदीप सिंगच्या जागी मोहम्मद शमीचा टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला होत. या सामन्यासाठी इंग्लंडने आधीच त्यांची प्लेइंग 11 जाहीर केली होती.
या सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमावून 171 धावा केल्या, ज्यामध्ये बेन डकेटने सर्वाधिक 51 धावा केल्या तर लियाम लिव्हिंगस्टनने 43 धावा केल्या. भारताकडून गोलंदाजीत वरुण चक्रवर्तीने 5 तर हार्दिक पंड्याने 2 विकेट्स घेतल्या.आता दोन्ही संघ शुक्रवारी (३१ जानेवारी) पुण्यात पुन्हा एकदा आमनेसामने येतील ज्यामध्ये टीम इंडिया या मालिकेत अभेद्य आघाडी घेण्याचे लक्ष्य ठेवणार आहे.
इंग्लंडने तिसऱ्या T20 सामन्यात भारताचा 26 धावांनी पराभव केला. या मालिकेत इंग्लंडने चांगले पुनरागमन केले आहे. तरीही तो 2-1 ने मागे आहे.
https://twitter.com/englandcricket/status/1884284790565642566
IND vs ENG Live : भारताची आठवी विकेट मोहम्मद शमीच्या रूपाने पडली
भारताची आठवी विकेट मोहम्मद शमीच्या रूपाने पडली. एका षटकाराच्या मदतीने तो 7 धावा करून बाद झाला. ओव्हरटनने शमीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताने 19 षटकांत 8 विकेट गमावून 140 धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी 32 धावांची गरज आहे.
भारताला सातवा धक्का, हार्दिक पंड्या 40 धावा करुन बाद
भारताची सातवी विकेट हार्दिक पंड्याच्या रूपाने पडली. 35 चेंडूत 40 धावा करून तो बाद झाला. पंड्याने 2 षटकार आणि 1 चौकार लगावला.
IND vs ENG Live : टीम इंडियाने गमावली सहावी विकेट्स
टीम इंडियाने गमावली सहावी विकेट्स
इंग्लंडसमोर 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला 123 धावांवर सहावा धक्का अक्षर पटेलच्या रूपाने बसला जो 15 धावांवर जोफ्रा आर्चरचा बळी ठरला.
IND vs ENG Live : टीम इंडियाला शेवटच्या 5 षटकात विजयासाठी 72 धावांची गरज
टीम इंडियाला शेवटच्या 5 षटकात विजयासाठी 72 धावांची गरज
https://twitter.com/CricFollow56/status/1884278988690055539
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात विजयासाठी भारतीय संघाला आता शेवटच्या 5 षटकांत आणखी 72 धावा करायच्या आहेत. 15 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीम इंडियाने 5 विकेट गमावून 100 धावा केल्या आहेत. हार्दिक पंड्या 22 आणि अक्षर पटेल 5 धावांसह फलंदाजी करत आहेत.
IND vs ENG Live : भारताला पाचवा धक्का बसला
भारताला पाचवा धक्का बसला
https://twitter.com/S0HAIB_7/status/1884275630642192853
ओव्हरटनने भारताला पाचवा धक्का दिला. त्याने वॉशिंग्टन सुंदरला बटलरकरवी झेलबाद केले. त्याला केवळ सहा धावा करता आल्या. अक्षर पटेल आता सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. संघाला विजयासाठी 46 चेंडूत 87 धावांची गरज आहे.
IND vs ENG Live : भारताला विजयासाठी 94 धावांची गरज
भारताला विजयासाठी 94 धावांची गरज आहे
भारताला विजयासाठी 60 चेंडूत 94 धावांची गरज आहे. संघाने 10 षटकांत 4 गडी गमावून 78 धावा केल्या आहेत. हार्दिक पंड्या 9 धावा करून खेळत आहे. वॉशिंग्टन सुंदर 2 धावा करून खेळत आहे.
टीम इंडियाला चौथा झटका, तिलक वर्मा आऊट
https://twitter.com/ashwinravi99/status/1884270527080194228
टीम इंडियाची चौथी विकेट पडली. तिलक वर्मा १८ धावा करून बाद झाला. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. आदिल रशीदने तिलकला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताने 8 षटकात 4 गडी गमावून 68 धावा केल्या आहेत.
IND vs ENG Live : भारताला मोठा झटका, सूर्यकुमार यादव १४ धावा करून बाद
भारताला मोठा झटका, सूर्यकुमार यादव १४ धावा करून बाद
भारताची तिसरी विकेट सूर्यकुमार यादवच्या रूपाने पडली. तो 14 धावा करून बाद झाला. मार्क वुडने सूर्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताने 5.1 षटकात 3 गडी गमावून 48 धावा केल्या आहेत.
IND vs ENG Live : भारताला बसला दुसरा धक्का, अभिषेक शर्मा २४ धावा करून बाद
भारताला दुसरा धक्का, अभिषेक बाद
https://twitter.com/MukeshYada77406/status/1884265149202325713
भारताची दुसरी विकेट अभिषेक शर्माच्या रूपाने पडली. 14 चेंडूत 24 धावा करून तो बाद झाला. अभिषेक 5 चौकार मारून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला ब्रायंड कारने बाद केले. टीम इंडियाने 3.4 षटकात 2 गडी गमावून 31 धावा केल्या आहेत.
भारताच्या डावातील तिसऱ्या षटकात जोफ्रा आर्चरने भारताला पहिला धक्का दिला. आर्चरने दुसऱ्या चेंडूवर शॉर्ट बॉल टाकत सॅमसनला झेलबाद केले. सॅमसन ३ धावा करत झेलबाद झाला. तर भारताने १ बाद २३ धावा केल्या आहेत.
IND vs ENG Live : भारताच्या डावाला सुरूवात
इंग्लंडने दिलेल्या १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी संजू-अभिषेकची जोडी मैदानात उतरली आहे. अभिषेकने दुसऱ्या मार्क वूडच्या षटकात दोन चौकार लगावत चांगली सुरूवात करून दिली.
IND vs ENG Live : इंग्लंडने भारताला 172 धावांचे लक्ष्य दिले
इंग्लंडने भारताला 172 धावांचे लक्ष्य दिले
भारताविरुद्धच्या या सामन्यात इंग्लंडने 20 षटकांत नऊ गडी गमावून 171 धावा केल्या. बेन डकेटने 51, जोस बटलरने 24 आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 43 धावा केल्या. तर भारताकडून वरुण चक्रवर्तीने पाच तर हार्दिक पांड्याने दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
IND vs ENG Live : इंग्लंडने १९ षटकांत केल्या १६२ धावा
इंग्लंडने 19 षटकांत 162 धावा केल्या
इंग्लंडने 19 षटकांत 9 गडी गमावून 162 धावा केल्या आहेत. मार्क वुड 5 धावा करून खेळत आहे. आदिल रशीद 8 धावा करून खेळत आहे. भारताकडून वरुण चक्रवर्तीने 5 आणि हार्दिक पंड्याने 2 विकेट्स घेतल्या आहेत.
IND vs ENG Live : भारताने इंग्लंडला दिला नववा धक्का, पांड्याने लिव्हिंग्स्टनला बाद केले
भारताने इंग्लंडला दिला नववा धक्का, पांड्याने लिव्हिंग्स्टनला बाद केले
हार्दिक पंड्याने या सामन्यातील दुसरी विकेट घेतली. त्याने भारताला मोठे यश मिळवून दिले आहे. पंड्याने लिव्हिंगस्टनला बाद केले. लिव्हिंगस्टन 24 चेंडूत 43 धावा करून बाद झाला.इंग्लंडने 17.1 षटकात 9 गडी गमावून 147 धावा केल्या आहेत.
वरुण चक्रवर्तीचे विकेट्सचे पंचक, इंग्लंडची अवस्था बिकट
https://twitter.com/playtasticankit/status/1884254813640352158 वरुण चक्रवर्तीने राजकोट टी-20 सामन्यात पाचवी विकेट घेतली. इंग्लंडच्या डावातील 16व्या षटकात त्याने 2 बळी घेतले. चौथ्या चेंडूवर वरुणने कार्सला बाद केले. यानंतर जोफ्रा आर्चर बाद झाला. इंग्लंडने 16 षटकांत 8 गडी गमावून 127 धावा केल्या आहेत. लिव्हिंगस्टन 24 धावा करून खेळत आहे. आता आदिल रशीद फलंदाजीला आला.
IND vs ENG Live : चक्रवर्तीने लागोपाठ घेतल्या दोन विकेट्स
चक्रवर्तीने लागोपाठ दोन विकेट्स घेतल्या
वरुण चक्रवर्तीने सलग दुसरी विकेट घेतली. त्याने 14व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर जेमी स्मिथला बाद केले. यानंतर पुढच्याच चेंडूवर ओव्हरटनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. इंग्लंडने 13.4 षटकांत 6 गडी गमावून 115 धावा केल्या आहेत.
IND vs ENG Live : इंग्लंडची चौथी विकेट पडली, बिश्नोईची विकेट घेतली
इंग्लंडची चौथी विकेट पडली, बिश्नोईची विकेट घेतली
इंग्लंडला चौथा धक्का बसला आहे. हॅरी ब्रूक 8 धावा करून बाद झाला. रवी बिश्नोईने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. लिव्हिंगस्टन 14 धावा करून संघाकडून खेळत आहे. इंग्लंडने 12.4 षटकांत 4 गडी गमावून 108 धावा केल्या आहेत.
अक्षर पटेलने भारताला तिसरी विकेट मिळवून दिली
https://twitter.com/mohitso39392499/status/1884246269197181406
भारताने इंग्लंडला तिसरा धक्का दिला. अक्षर पटेलला मोठे यश मिळाले आहे. बेन डकेट अर्धशतकानंतर बाद झाला. तो 28 चेंडूत 51 धावा करून बाद झाला. इंग्लंडने 10 षटकांत 3 गडी गमावून 87 धावा केल्या आहेत. हॅरी ब्रूक 2 धावा करून खेळत आहे.
वरुणने टीम इंडियाला मिळवून दिली मोठी विकेट
https://twitter.com/ysnKiran_77/status/1884244409308618940
वरुण चक्रवर्तीने भारताला मोठी विकेट मिळवून दिली. जोस बटलर 22 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद घोषित केले होते. पण भारताने डीआरएस घेतला. यामध्ये त्याला बाद घोषित करण्यात आले. इंग्लंडने 9 षटकांत 2 गडी गमावून 83 धावा केल्या आहेत. बेन डकेट 49 धावा करून खेळत आहे.
https://twitter.com/mohitso39392499/status/1884245879412183205
IND vs ENG Live : जोस बटलरने भारतात घडवला इतिहास! मोहम्मद नबीला मागे टाकत केला खास पराक्रम
जोस बटलरने तिसऱ्या टी-२० सामन्यात १८ धावा करताच नवा इतिहास लिहिला आहे. तो भारतीय भूमीवर T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम अफगाणिस्तानचा अनुभवी खेळाडू मोहम्मद नबीच्या नावावर होता, ज्याने 25 टी-20 सामन्यांमध्ये 25.27 च्या सरासरीने आणि 164.49 च्या स्ट्राईक रेटने 556 धावा केल्या होत्या. आता हा विक्रम जोस बटलरच्या नावावर आहे.
IND vs ENG Live : पॉवरप्लेनंतर इंग्लंडची धावसंख्या एक बाद 52 धावा
पॉवरप्लेनंतर इंग्लंडची धावसंख्या एक बाद 52 धावा
https://twitter.com/Abdullahs_56/status/1884240968871993574
सात धावांच्या स्कोअरवर पहिली विकेट गमावल्यानंतर इंग्लंडने चांगले पुनरागमन केले आणि पॉवरप्लेमध्ये 50+ धावा केल्या. पहिल्या सहा षटकांनंतर संघाची धावसंख्या 52/1 आहे. बेन डकेट 39 धावा करून क्रीजवर आहे आणि जोस बटलर 8 धावांवर आहे.
बेन डकेटची आक्रमक फलंदाजी
https://twitter.com/RobinHood69812/status/1884236729936404842
इंग्लंड संघाचा सलामीचा फलंदाज बेन डकेट तिसऱ्या T20 सामन्यात आक्रमक फलंदाजी करताना दिसत आहे. त्याने चौथ्या षटकांत सलग तीन चौकार मारत हार्दिक पंड्याची धुलाई केली आहे. इंग्लंडने चार षटकांचा खेळ संपल्यानंतर एक विकेट गमावून ३४ धावा केल्या आहेत. बेन डकेट 9 चेंडूत 24 धावा केल्यानंतर फलंदाजी करत आहे, तर बटलरनेही 5 धावा केल्या आहेत.
इंग्लंडची सुरुवात खराब झाली
https://twitter.com/MaiGogoHu/status/1884239278928216172
इंग्लंडची सुरुवात खराब झाली. पण बेन डकेट धावा काढण्याचा प्रयत्न करत आहे. तो एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 12 धावा केल्यानंतर खेळत आहे. जोस बटलर 4 धावा करून खेळत आहे.
इंग्लंडने 3 षटकात 1 गडी गमावून 21 धावा केल्या आहेत.
हार्दिक पंड्याने भारताला मिळवून दिली पहिली विकेट -
https://twitter.com/RobinHood69812/status/1884236729936404842
भारताने दुसरे षटक हार्दिक पांड्याकडे सोपवले. पंड्याने येताच शानदा गोलंदाजी केली. त्याने फिलिप सॉल्टला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सॉल्ट अवघ्या 5 धावा करून बाद झाला. अभिषेक शर्माने सॉल्टचा झेल घेतला.इंग्लंडने 1.3 षटकात 1 गडी गमावून 7 धावा केल्या आहेत.
भारताने पहिली ओव्हर शमीकडे सोपवली
https://twitter.com/ICtian83/status/1884236423601217571
फिल सॉल्ट आणि बेन डकेट इंग्लंडकडून सलामीला आले आहेत. टीम इंडियाने पहिली ओव्हर मोहम्मद शमीकडे सोपवली होती. या ओव्हर्समध्ये शमीने अवघ्या सहा धावा दिल्या
India vs England Live Updates : मोहम्मद शमीचे ४३५ दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन
मोहम्मद शमीचे ४३५ दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन -
https://twitter.com/BCCI/status/1884226893739876442
तिसऱ्या T20 सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल करण्यात आला आहे, ज्यामध्ये 435 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या अर्शदीप सिंगच्या जागी मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला आहे.
पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
भारत: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ध्रुव जुरेल, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती.
https://twitter.com/BCCI/status/1884227052800483428
इंग्लंड: बेन डकेट, फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड.
IND vs ENG Live : भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली
भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली
https://twitter.com/BCCI/status/1884226893739876442
तिसऱ्या T20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून इंग्लंडविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करत कर्णधार सूर्यकुमार यादवने अर्शदीप सिंगला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला असून त्याच्या जागी अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.