ओव्हल येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लड कसोटीतील चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद ७७ धावा केल्या असून त्यांना विजयासाठी आणखी २९१ धावांची आवश्यकता आहे. मुंबईकर अष्टपैलू शार्दूल ठाकूर (६० धावा) आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत (५०) यांनी रचलेल्या बहुमूल्य शतकी भागीदारीमुळे चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडला ३६८ धावांचे लक्ष्य दिले. मात्र इंग्लंडच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात करून भारताला चोख प्रत्युत्तर दिल्यामुळे अखेरच्या दिवशी कोणता संघ बाजी मारतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या सामन्याचे तिन्ही निकाल शक्य असून इंग्लंडने सामना जिंकला तर ते मालिकेमध्ये आघाडी घेतील. भारताने सामना जिंकला तर मालिकेतील विजयाचं पारडं २-१ ने जड होईल. तर सामना अनिर्णित राहिल्यास पाचवा कसोटी सामना निर्णायक ठरेल. सध्याची सामन्याची स्थिती पाहता भारताचं पारडं जड वाटत असलं तरी इंग्लंडने यापूर्वी एवढी मोठी धावसंख्या करण्याचा पराक्रम केल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांनाही तशी चिंताच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा