IND vs ENG 5th T20I Live Score Updates : भारताने इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका आधीच जिंकली आहे. भारतीय संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील शेवटचा सामना रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होत आहे. टीम इंडियाने ही मालिका आधीच जिंकली आहे. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नेहमीच उपयुक्त ठरली असून त्यावर मोठी धावसंख्याही पाहायला मिळते. हे स्टेडियम धावांच्या बाबतीत अनेक मोठ्या टी-२० विक्रमांचा साक्षीदार आहे. या स्टेडियमवर २०१२ मध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले होते, ज्यात इंग्लंडच्या संघाने बाजी मारली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

IND vs ENG 5th T20I Live Score Updates : टीम इंडियाने २०१७ पासून इंग्लंडविरुद्ध सलग पाच टी-२० मालिका जिंकली आहे. ज्यामध्ये २०१७, २०१८, २०२१, २०२२ आणि २०२५ मधील मालिकांचा समावेश आहे.

19:16 (IST) 2 Feb 2025

IND vs ENG Live : टीम इंडियाला पहिला धक्का, सॅमसन बाद

टीम इंडियाला पहिला धक्का, सॅमसन बाद

टीम इंडियाला पहिला धक्का बसला. संजू सॅमसन 16 धावा करून बाद झाला. मार्क वुडने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आता टिळक वर्मा फलंदाजीला आले आहेत. अभिषेक शर्मा 5 धावा करून खेळत आहे. भारताने 2 षटकात 1 गडी गमावून 21 धावा केल्या आहेत.

19:10 (IST) 2 Feb 2025

IND vs ENG Live : टीम इंडियाची वादळी सुरुवात, सॅमसनने आर्चरची केली धुलाई

टीम इंडियाची वादळी सुरुवात, सॅमसनने आर्चरची केली धुलाई

टीम इंडियाने आक्रमक सुरुवात केली आहे. संजू सॅमसनने पहिल्या षटकात जोफ्रा आर्चरला दोन षटकार आणि एक चौकार मारला. त्यामुळे भारताची धावसंख्या बिनबाद १४ धावा आहे. अभिषेक शर्माने अजून खाते उघडले नाही.

18:57 (IST) 2 Feb 2025
IND vs ENG Live : नाणेफेकीनंतर जोस बटलर काय म्हणाला?

नाणेफेकीनंतर जोस बटलर काय म्हणाला?

आम्ही काही वेळा चांगले क्रिकेट खेळलो. पण आम्हाला ते अधिक चांगल्या प्रकारे खेळायला हवे होते. खेळातील खास क्षणांचा आनंद घेण्याची गरज आहे. संघात चांगला उत्साह आहे, हे एक चांगले ठिकाण आहे जिथे खूप प्रेक्षक आहेत. त्याचबरोबर खेळपट्टी देखील उत्तम आहे. या सामन्यासाठी मार्क वूड संघात परतला आहे. दोन्ही संघ उच्च दर्जाचे आहेत. आमच्या संघात चार इम्पॅक्ट सब खेळाडू आहेत.

18:38 (IST) 2 Feb 2025
IND vs ENG Live : पाचव्या सामन्यासाठी कशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन?

पाचव्या सामन्यासाठी कशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन?

भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप साल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड

18:35 (IST) 2 Feb 2025
IND vs ENG Live : इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली

इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली

इंग्लंडने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने एका बदलासह या सामन्यात प्रवेश केला आहे. अर्शदीप सिंगच्या जागी मोहम्मद शमीचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच वेळी, मार्क वुड इंग्लंडच्या प्लेइंग 11 मध्ये परतला आहे. साकिब महमूदच्या जागी त्याला संधी मिळाली आहे.

18:16 (IST) 2 Feb 2025
IND vs ENG Live : हर्षितबाबत संघ व्यवस्थापन काय निर्णय घेणार?

हर्षितबाबत संघ व्यवस्थापन काय निर्णय घेणार?

शिवमचा कनक्शन सबस्टिट्यूट म्हणून मैदानात उतरलेला हर्षित राणा पदार्पणातच छाप पाडण्यात यशस्वी ठरला. भारताने आतापर्यंत दोन विशेषज्ञ वेगवान गोलंदाजांसह या मालिकेत प्रवेश केला आहे. हार्दिक प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल यात शंका नाही, पण संघ हर्षित आणि अर्शदीप सिंग यापैकी एकालाच संधी देऊ शकतो. अर्शदीप हा इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाचा भाग आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन अर्शदीपला विश्रांती देऊ शकते आणि हर्षितला संधी देऊ शकते.

17:56 (IST) 2 Feb 2025

IND vs ENG Live : पाचव्या सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

पाचव्या सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे/रमनदीप सिंग/ध्रुव जुरेल, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग/हर्षित राणा.

इंग्लंड : फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, गस ऍटकिन्सन, आदिल रशीद, साकिब महमूद.

17:41 (IST) 2 Feb 2025
IND vs ENG Live : सूर्यकुमार यादवला इतिहास घडवण्याची संधी

सूर्यकुमार यादवला इतिहास घडवण्याची संधी

सूर्यकुमार यादवने आतापर्यंत 82 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 146 षटकार मारले आहेत. अशा परिस्थितीत, जर त्याने इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या T20 सामन्यात आणखी चार षटकार मारले, तर तो पूर्ण सदस्य संघातील 100 पेक्षा कमी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 150 षटकारांचा आकडा गाठणारा सर्वात वेगवान खेळाडू बनेल. सध्या हा विक्रम न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टिलच्या नावावर आहे, ज्याने 105 सामन्यांमध्ये 150 टी-20 आंतरराष्ट्रीय षटकार पूर्ण केले आहेत. भारतीय संघाच्या या विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर त्यात रोहित शर्माचे नाव आहे, ज्याने 119 सामन्यात 150 T20 आंतरराष्ट्रीय षटकार पूर्ण केले होते.

17:17 (IST) 2 Feb 2025

IND vs ENG Live : वानखेडे झालेत अनेक मोठे विक्रम

वानखेडे झालेत अनेक मोठे विक्रम

वानखेडे स्टेडियम धावांच्या बाबतीत अनेक मोठ्या टी-20 विक्रमांचे साक्षीदार आहे. 2019 सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत मध्य प्रदेशने मेघालयविरुद्ध 244/4 धावा करून या मैदानावर सर्वोच्च धावसंख्या केली. प्रत्युत्तरात मेघालयला केवळ 159/9 धावा करता आल्या, त्यात मध्य प्रदेशने 85 धावांनी विजय मिळवला. रोहित शर्मा वानखेडेवर T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे, त्याने 85 सामन्यांमध्ये 2,445 धावा केल्या आहेत. रोहितने आता T20I मधून निवृत्ती घेतली असली तरी. विकेट्सच्या बाबतीत लसिथ मलिंगा 43 सामन्यात 68 बळी घेऊन आघाडीवर आहे. वानखेडेवर सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणारा इंग्लंडने 2016 च्या T20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला होता.

17:03 (IST) 2 Feb 2025

IND vs ENG 5th T20I Live : वानखेडेवरील शेवटच्या सामन्यात इ्ंग्लंडने मारली होती बाजी

वानखेडेवरील शेवटच्या सामन्यात इ्ंग्लंडने मारली होती बाजी

वानखेडे स्टेडियवर २०१२ मध्ये इंग्लंड आणि भारत टी-२० सामन्या शेवटचे आमनेसामने आले होते. ज्यात इंग्लंडच्या संघाने बाजी मारली होती. त्या दोन्ही संघांतील आज एक फलंदाज या सामन्यात खेळताना दिसणार आहे. तो म्हणजे इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर

16:57 (IST) 2 Feb 2025

IND vs ENG 5th T20I Live : वानखेडेची खेळपट्टी कशी आहे?

वानखेडेची खेळपट्टी कशी आहे?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा टी-२० सामना सांयकाळी सातपासून वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नेहमीच उपयुक्त ठरली असून त्यावर मोठी धावसंख्याही पाहायला मिळते. खेळपट्टी देखील गोलंदाजांना भरपूर उसळी देते जी मधल्या षटकांमध्ये पॉवर हिटर्सना थांबवण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरू शकते. मैदानात छोट्या चौकारांमुळे फलंदाजांना चौकार आणि षटकार मारण्याची भरपूर संधी मिळते. तर गोलंदाजांनाही पाचव्या टी-२० सामन्यात बाऊन्सचा फायदा घेता येईल.

Live cricket score India vs England T20I :दोन्ही संघांतील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे तर दोन्ही संघांत आतापर्यंत एकूण २८ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने १६ टी-२० जिंकले आहेत, तर इंग्लिश संघाने १२ जिंकले आहेत.