Ind vs Eng : भारताविरुद्धच्या अंतिम कसोटीत आज इंग्लंडने संयमी खेळ करत तिसऱ्या दिवसअखेर २ बाद ११४ धावा केल्या. भारताची गोलंदाजी म्हणावी तितकी प्रभावी होऊ शकली नाही. त्यातच सलामीवीर कुक आणि कर्णधार रूट या जोडीने आपला अनुभव पणाला लावत सुंदर खेळी केली. त्यामुळे दिवसअखेर इंग्लंडकडे १५४ धावांची आघाडी झाली असून सामन्यातील आणखी दोन दिवसाचा खेळ बाकी आहे.
या सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या डावाला संथ सुरूवात केली. भारताला ४३ षटकांच्या खेळात इंग्लंडचे केवळ २ गडी बाद करता आले. सलामीवीर जेनिंग्स १० धावांवर बाद झाला, तर नव्या चेंडूवर मोईन अली २० धावा करून तंबूत परतला. शमी आणि जडेजाने १-१ बळी टिपला.
त्याआधी भारताचा पहिला डाव २९२ धावांत आटोपला. ६ बाद १७४ या धावसंख्येवरुन आज जडेजा-हनुमा विहारीने पुढे डावाला सुरुवात केली. हनुमा विहारीने पदार्पणाच्या कसोटीत अर्धशतक झळकावले. त्याने ५६ धावा केल्या. पहिल्या सत्रात इंग्लंडला केवळ १ गडी बाद करता आला. दुसऱ्या सत्रात रवींद्र जडेजाने आपले अर्धशतक पूर्ण केले. पण इशांत शर्मा (४) अाणि मोहम्मद शमी (१) झटपट बाद झाले. अखेर बुमराहच्या साथीने जडेजाने काही काळ फलंदाजी केली. पण बुमराह धावबाद झाला आणि भारताचा डाव संपुष्टात आला. जडेजाने सर्वाधिक नाबाद ८६ धावा केल्या.
तत्पूर्वी कर्णधार काल झालेल्या खेळात कर्णधार विराट कोहलीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला अर्धशतकाने हुलकावणी दिली. त्याने सर्वाधिक ४९ धावा केल्या. शेवटच्या सत्रात इंग्लंडच्या गोलंदाजांनी ‘कमबॅक’ करत झटपट बळी टिपले. अँडरसन, स्टोक्स आणि अली यांनी २-२ तर ब्रॉड, करन आणि रशीदने १-१ बळी टिपला.
भारताविरुद्धच्या अंतिम कसोटीत आज इंग्लंडने संयमी खेळ करत तिसऱ्या दिवसअखेर २ बाद ११४ धावा केल्या. भारताची गोलंदाजी म्हणावी तितकी प्रभावी होऊ शकली नाही. त्यातच सलामीवीर कुक आणि कर्णधार रूट या जोडीने आपला अनुभव पणाला लावत सुंदर खेळी केली. त्यामुळे दिवसअखेर इंग्लंडकडे १५४ धावांची आघाडी झाली असून सामन्यातील आणखी दोन दिवसाचा खेळ बाकी आहे.
इंग्लंडची शतकी मजल, कूक-रूट अनुभवी जोडी मैदानात
पहिल्या धक्क्यानंतर कुक आणि मोईन अली यांच्यात भागीदारी होऊ लागली होती. त्यामुळे भारताने नव्या चेंडूचा पर्याय निवडला आणि नवा चेंडू घेतल्यावर लगेच मोईन अली त्रिफळाचित झाला. जडेजाच्या चेंडूवर त्याला माघारी परतावे लागले.
संथ आणि संयमी खेळी करत इंग्लंडचा डाव चहापानानंतर पुढे सरकत होता. पण अखेर मोहम्मद शमीच्या चेंडूवर सलामीवीर जेनिंग्स बाद झाला. खेळपट्टीच्या अर्ध्यावर टाकलेला चेंडू कसा येईल हे ओळखण्यात जेनिंग्स पूर्णपणे फसला आणि त्याने चेंडू न खेळण्याचा निर्णय घेतला. पण चेंडू आत वळला आणि चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला.
भारताचा डाव २९२ धावांत आटोपल्यानंतर इंग्लंडने चहापानापर्यंत बिनबाद २० धावा केल्या आहेत. आपल्या कारकिर्दीत शेवटच्या डावात फलंदाजी करणारा अलिस्टर कुक आणि किटन जेनिंग्स दोंघेही भारतीय गोलंदाजीला बाचकत खेळत आहेत. त्यामुळे इंग्लंडच्या ९ षटकात केवळ २० धावा झाल्या आहेत.
भारताचा पहिला डाव २९२ धावांत आटोपला. त्यामुळे इंग्लंडकडे ४० धावांची आघाडी आहे. जडेजाने सर्वाधिक नाबाद ८६ धावा केल्या. तर हनुमा विहारीने पदार्पणाच्या कसोटीत अर्धशतक (५६) झळकावले. अँडरसन, स्टोक्स आणि अली यांनी २-२ तर ब्रॉड, करन आणि रशीदने १-१ बळी टिपला.
गोलंदाज मोहम्मद शमी बाद झाला आणि भारताला ९वा धक्का बसला. शमी जडेजाला साथ देईल अशी अपेक्षा होती. पण तो १ धाव काढून माघारी परतला.
इशांत शर्मा बादझाल्यानंतर जडेजाने मात्र आपली शैली बदलली नाही. त्याने सुंदर फटका खेळत आपले अर्धशतक पूर्ण केले. तसेच भारतालाही २५०ची धावसंख्या गाठून दिली.
इशांत शर्माच्या रूपात भारताने आठवा गडी गमावला. मोईन अलीनेच हा देखील बळी टिपला. इशांतलाही त्याने यष्टिरक्षकाकरवी झेलबाद केले. इशांतची बाद होण्याची पद्धत हे जणू काही हनुमाच्या बाद होण्याच्या पद्धतीचा रिप्ले असल्याचेच वाटले.
आज ६ बाद १७४ या धावसंख्येवरुन पुढे डावाला सुरुवात केलेल्या भारताने उपहारापर्यंत ७ बाद २४० धावांपर्यंत मजल मारली आहे. आता भारत केवळ ९२ धावांनी पिछाडीवर असून रवींद्र जडेजा अर्धशतकाजवळ (४१) आहे. त्याआधी आज खेळ सुरु झाल्यावर भारताच्या हनुमा विहिरीने पदार्पणाच्या कसोटीत अर्धशतक झळकावले.
कसोटी पदार्पणातच अर्धशतक झळकावणारा हनुमा विहारी अखेर ५६ धावांवर बाद झाला. फिरकीपटू मोईन अलीने त्याला झेलबाद केले. बचावात्मक फटका खेळताना यष्टिरक्षकाने त्याचा झेल टिपला. पंचांनी बाद दिल्यावर यावेळीही त्याने DRSचा आधार घेतला होता. मात्र यावेळी रिव्ह्यूमध्येही त्याने बाद ठरवण्यात आले.
भारताकडून कसोटीत पदार्पण करणाऱ्या हनुमा विहारी याने पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटीत अर्धशतक झळकावले आहे. शूनयावर असताना त्याला पंचांनी बाद ठरवले होते. पण DRS रिव्ह्यूमध्ये त्याला जीवदान मिळाले. या संधीचे सोने करत त्याने अर्धशतकी खेळी साकारली.
हरभजने ट्विट करत भारताला दिल्या शुभेच्छा
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर रवींद्र जडेजाच्या बॅटमधून आजच्या दिवसातील पहिला चौकार भारताला मिळाला. ब्रॉडच्या चेंडूवर त्याने चौकार लगावला. त्यानंतर पुढे आणखी एक चौकार लगावत त्याने भारताला द्विशतकी धावसंख्या गाठून दिली.
इंग्लंडविरूद्ध पाचव्या कसोटीत आज तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असून भारताची मदार आता तळाच्या फलंदाजांवर आहे. भारताने दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद १७४ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे भारताला दुसऱ्या दिवसअखेर १५८ धावांनी पिछाडीवर रहावे लागले होते.