Ind vs Eng : इंग्लंडविरुद्धच्या अंतिम कसोटीत सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर भारताने ३ बाद ५८ धावांपर्यंत मजल मारली. धवन, पुजारा आणि कोहली झटपट बाद झाल्यामुळे सुरुवातीला भारताने २ धावात ३ बळी गमावले होते. मात्र त्यानंतर लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणे या जोडीने भारताला सावरले आणि दिवस संपेपर्यंत खेळपट्टीवर तग धरला. त्याआधी इंग्लंडने दुसरा डाव ८ बाद ४२३ धावांवर घोषित केला. अनुभवी कुकने १४७ तर कर्णधार रूटने १२५ धावा केल्या. आता सामन्याच्या एका दिवसाच्या शिल्लक राहिलेल्या खेळात भारताला विजयासाठी ४०६ धावांची तर इंग्लंडला ७ बळींची गरज आहे.
भारताच्या दुसऱ्या डावाची सुरूवात खराब झाली. शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा एकाच षटकात पायचीत झाले. अँडरसनने दोनही बळी टिपले. नंतर कर्णधार विराट कोहलीदेखील शून्यावर बाद झाला. पण त्यानंतर लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणे या जोडीने भारताला अर्धशतकी मजल मारून दिली. त्याआधी इंग्लंडने दुसरा डाव ८ बाद ४२३ धावांवर घोषित केला आणि भारतापुढे ४६४ धावांचे लक्ष्य ठेवले. आजच्या पहिल्या सत्रात भारताच्या गोलंदाजांना एकही गडी बाद करता आला नाही. अनुभवी कुक आणि कर्णधार रूट यांनी शतके झळकावत २५९ धावांची भागीदारी केली. कूकने १४७ तर कर्णधार रूटने १२५ धावा केल्या. सलग दोन चेंडूंवर या दोंघांना नवोदित हनुमा विहिरीने बाद केले. त्याच्यानंतर बेअरस्टो (१८) आणि बटलर (०) देखील झटपट बाद झाले. त्यानंतर बेन स्टोक्सने ३६ चेंडूत ३७ धावांची झंझावाती खेळी केली. पण तोदेखील मोठा फटका खेळताना बाद झाला. अखेर करन बाद झाल्यानंतर इंग्लंडने डाव घोषित केला. भारताकडून जडेजा-विहारी यांनी ३-३ तर शमीने २ गडी बाद केले.
दरम्यान, अनुभवी अॅलिस्टर कूक हा आपला आंतरराष्ट्रीय सामना खेळत असल्यामुळे हा सामना जिंकून आपल्या माजी कर्णधाराला विजयी निरोप देण्याच्या दृष्टीने इंग्लंडचा संघ सामना खेळत आहे. तर आधीच मालिका गमावल्यामुळे सामना जिंकून किमान दौऱ्याचा शेवट गोड करता यावा, यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील आहे.
अखेरच्या सामन्यात भारत लाज राखणार? दिवसअखेर ३ बाद ५८
सलामीवीर शिखर धवन आणि पाठोपाठ पुजारा पायचीत झाल्यामुळे भारताचे दोन गडी लवकर तंबूत परतले होते. त्यामुळे मालिकेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधार कोहलीकडून चांगल्या खेळाची अपेक्षा होती. मात्र कर्णधार कोहली झेलबाद झाला. त्यामुळे २ धावांत भारताचे ३ गडी तंबूत परतले.
भारताच्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. १ धाव काढून धवन पायचीत झाला. पाठोपाठ चेतेश्वर पुजारा शून्यावर पायचीत झाला. त्यामुळे भारताची अवस्था २ बाद १ धाव अशी झाली. दोनही बळी अँडरसनने टिपले.
इंग्लंडने दुसरा डाव ८ बाद ४२३ धावांवर घोषित केला असून भारतापुढे ४६४ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. डावात अनुभवी कुक आणि कर्णधार रूट यांनी शतके झळकावत २५९ धावांची भागीदारी केली. कूकने १४७ तर कर्णधार रूटने १२५ धावा केल्या.
मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बेन स्टोक्स बाद झाला. स्टोक्सने ३६ चेंडूत ३७ धावांची झंझावाती खेळी केली. अखेर जडेजाने त्याला लगाम लावत इंग्लंडचा सातवा गडी माघारी पाठवला.
इंग्लंडने आतापर्यंत दुसऱ्या डावात चहापानापर्यंत ६ बाद ३६४ धावांपर्यंत मजल मारली असून त्यांच्याकडे ४०४ धावांची भक्कम आघाडी आहे. अनुभवी कुक आणि कर्णधार रूट यांनी शतके झळकावत २५९ धावांची भागीदारी केली. कूकने १४७ तर कर्णधार रूटने १२५ धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला भक्कम आघाडी मिळाली आहे.
पहिल्या डावातील शतकवीर जोस बटलर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. बॅटच्या कडेला लागून चेंडूत हवेत उडाला आणि शमीने अचूकपणे तो झेल टिपला. जडेजाने अत्यंत धूर्तपणे टाकलेल्या चेंडूवर बटलर बाद झाला.
कूक-रूट जोडीने भक्कम आघाडी मिळवून दिल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या जॉनी बेअरस्टोने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. पण मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचित झाला. शमीला डावातील दुसरा बळी मिळाला.
कर्णधार जो रूट बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर आपला शेवटचा सामना खेळणारा अलिस्टर कूकदेखील बाद झाला. १४७ धावांची धडाकेबाज खेळी करणारा कूक यष्टिरक्षकाकडे झेल देऊन माघारी परतला. हनुमा विहारीने दोन चेंडूत दोन बळी टिपले.
कर्णधार जो रूट हा हवेत फटका मारण्याच्या नादात बाद झाला. डीप मिड विकेटला असलेल्या क्षेत्ररक्षकाने सुंदर झेल टिपला. २५९ धावांची भागीदारी करणारी जोडी फोडण्यात हनुमा विहारीला यश आले. त्याचा कारकिर्दितील हा पहिला बळी ठरला.
कूक-रूट जोडीची शतके, इंग्लडची आघाडी ३५०पार
अनुभवी कूक पाठोपाठ कर्णधार जो रूट यानेही शानदार शतक झळकावले. त्याच्या शतकी खेळीत ११ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. या दोघांच्या भागीदारीमुळे इंग्लंडला ३००हून अधिक धावांची आघाडी मिळाली आहे.
इंग्लंडने दुसऱ्या डावात उपहारापर्यंत इंग्लंड २ बाद २४३ अशी मजल मारली असून त्यांच्याकडे २८३ धावांची भक्कम आघाडी आहे. दुसऱ्या डावात अनुभवी कुकने शतक झळकावले आहे. तर कर्णधार रूट शतकाच्या जवळ आहे. भारताच्या गोलंदाजांना या सत्रात एकही गडी बाद करता आलेला नाही.
अंतिम डावात कूकचे शतक, इंग्लंड भक्कम आघाडीकडे
आपला शेवटचा सामना खेळणाऱ्या अॅलिस्टर कूकने आणखी एक विक्रम केला. आपल्या शेवटच्या डावात त्याने उत्तम खेळी करत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत पाचव्या क्रमांकाचा फलंदाज होण्याचा मान मिळवला. या यादीत सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग, जॅक कॅलिस आणि राहुल द्रविड यांच्यानंतर कूकने स्थान मिळवले आहे. त्याने कुमार संगकाराचा विक्रम मोडीत काढला आहे.
अनुभवी कूकने अर्धशतक केल्यानंतर कर्णधार रुटनेही आपली लय कायम राखली आहे आणि अर्धशतक पूर्ण केले आहे. या दोघांच्या भक्कम भागीदारीमुळे आता इंग्लंडच्या आघाडीने २०० धावांचा टप्पा पार केला आहे.
भारताविरुद्धच्या अंतिम कसोटीत आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या अॅलिस्टर कूकने दुसऱ्या डावही अर्धशतक झळकावले आहे. पहिल्या डावात कूकने ७१ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती.
अनुभवी अॅलिस्टर कूक मैदानात, ICCकडून शुभेच्छा