भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना रद्द करण्यात आलाय. भारतीय चमूमधील सपोर्टींग स्टाफपैकी काही जणांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मँचेस्टरमध्ये आजपासून सुरु होणारा कसोटी सामना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) रद्द केल्याची घोषणा केलीय. हा सामना सध्या रद्द करुन नंतर खेळवण्याचं निश्चित करण्यात आलंय. बीसीसीआय आणि ईसीबी हा सामना कधी खेळवायचा याचा विचार करत आहे. मात्र त्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. या मालिकेमध्ये भारताने २-१ ची आघाडी घेतली असून पाचवा सामना रद्द झाल्याने अनेक भारतीय चाहते भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांना ट्रोल करत आहेत. काहींनी तर थेट रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीला अटक करण्याचीही मागणी केलीय.
नक्की वाचा >> “IPL साठी विराट असं करणं शक्यच नाही”; सामना रद्द झाल्यानंतर त्या एका शब्दामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डावर संतापले भारतीय चाहते
लंडनमध्ये गेल्या आठवडय़ात पुस्तक प्रकाशनाच्या सार्वजनिक कार्यक्रमाला रवी शास्त्री आणि विराट कोहलीने आपल्या काही सहकाऱ्यांसोबत हजेरी लावली होती. समोर आलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमाला बरीच गर्दी झाली होती. यावेळेस रवी शास्त्री, विराट कोहली आणि अन्य भारतीय खेळाडूंने मास्कही घातलं नव्हतं. या कार्यक्रमाला बाहेरुनही अनेकजण आले होते. त्यानंतर ओव्हल कसोटीदरम्यान रवी शास्त्री यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. लंडनमधील हॉटेलमध्ये झालेल्या शास्त्री यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या सार्वजनिक कार्यक्रमाला कोहलीसह या मार्गदर्शकांनी उपस्थिती होती.
नक्की वाचा >> Ind vs Eng Manchester Test: …तर एकही संघ मैदानात न उतरताच इंग्लंड विजयी होणार?; मालिका २-२ च्या बरोबरीत सुटणार?
मिळालेल्या माहितीनुसार, परवानगी न घेताच कार्यक्रमाला हजेरी लावल्याबद्दल ‘बीसीसीआय’ने शास्त्री आणि कोहली यांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. या कार्यक्रमाची छायाचित्रेसुद्धा ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्यांकडे आहेत. ‘आयसीसी’ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा संपल्यानंतर इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी सुरू होण्यास अवधी असताना ऋषभ पंतला करोनाची लागण झाली होती. त्यावेळी ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी भारतीय संघातील खेळाडूंना सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी न लावण्याचे निर्देश दिले होते. असं असतानाही रवी शास्त्री संघ सहकाऱ्यांसोबत सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर रवि शास्त्रींसोबत असणारे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्या चाचणीचे अहवालसुद्धा सकारात्मक आले आहेत, तर त्यांच्या संपर्कातील नितीन पटेल यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोहलीची चाचणी मात्र नकारात्मक आली आहे. मात्र सोमवारी भारतीय क्रिकेट संघाचे साहाय्यक फिजिओ योगेश परमार यांची करोना चाचणी सकारात्मक आल्यामुळे खेळाडूंनाही करोना संसर्गाचा धोका असल्याचं सांगत कसोटी रद्द करावी लागली आहे. त्यामुळेच आता रद्द झालेल्या कसोटीसाठी अनेकजण शास्त्री आणि कोहली यांना दोषी ठरवताना दिसत आहेत.
१) या दोघांना अटक करा
Arrest Shastri and Kohli for this crime!!! pic.twitter.com/2ofB8C8pgu
— Eminent Socialist (@wnnabesocial) September 10, 2021
२) भारतीय चाहते रवी शास्त्रींच्या कामगिरीनंतर
#ManchesterTest
Indian fans to Ravi Shastri and Kohli for going to that book launch event: pic.twitter.com/FjTi1TA7oO— Rajneesh Chaudhary (@Rajneesh_16) September 10, 2021
३) कारवाई केली पाहिजे
Kohli and Shastri should be sacked for breaching the Covid Protocol for for book launch and inturn robbing the fans of a great series finale. pic.twitter.com/NVZk8qGJdB
— Maarwadi (@Marwadi99) September 10, 2021
नक्की वाचा >> Ind vs Eng Manchester Test: शेवटच्या कसोटीऐवजी भारतीय खेळाडूंना, BCCI ला IPL ची अधिक चिंता?
४) पंतवर टीका मग यांचा बचाव का?
People bashed Pant because he attended Euros which was a crowded event ( There were no restrictions) But same people are defending Shastri since morning by saying there were no regulations how is this Shastri’s fault
— Prithvi (@Puneite_) September 10, 2021
५) दंड लावा आणि हकला
@BCCI should be finned and fired Ravi shastri asap. He and some members of the team were roaming around as if they were on vacation.
We want no excuse at all. #ManchesterTest pic.twitter.com/yEvFoXfvVV— JSK (@theUnethical1) September 10, 2021
६) तुटून पडले
People to ravi shastri pic.twitter.com/9OMsrXLusL
— Bleed yellove (@Prana30060168) September 10, 2021
७) बातमी समजल्यावर
#5thTest of #ENGvsIND #ManchesterTest cancelled due to Covid
Ravi Shastri right now:- pic.twitter.com/ee3HvkGqG2
— Shubham Jha (@ShubhamJha_) September 10, 2021
८) बीसीसीआयने विचारलं पाहिजे
Ravi Shastri-Virat Kohli should be questioned harshly by @BCCI with the book launch in UK when ECB didn’t acquire clearance.
Its clearly a breach. Shastri and other support staff were found COVID +ve later
Such carelessness on official tour#shastri #kohli #ManchesterTest pic.twitter.com/DOqs0Ahtiq
— Wickets11 (@Wickets112) September 10, 2021
९) अश्विन संतापला असणार
5th test match cancelled.
Ashwin to Kohli & Shastri: pic.twitter.com/qPBzMcd2qV
— Keh Ke Peheno (@coolfunnytshirt) September 10, 2021
१०) सामना रद्द झाल्यानंतर
Ravi Shastri from isolation #ManchesterTest #RaviShastri pic.twitter.com/hEGMjril6i
— Jeetu Meena (@snaker__jk) September 10, 2021
११) इथे तर पार्टी सुरुय…
१२) आता त्यांना पुस्तक वाचता येईल
बीसीसीआय आणि ईसीबीच्या अधिकाऱ्यांनी पाचव्या कसोटीसंदर्भात गुरुवारी आणि शुक्रवारी सविस्तर चर्चा करुन सर्व शक्यता पडताळून पाहिल्या. दोन्हीकडील अधिकाऱ्यांमध्ये सामन्याच्या आयोजनासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर सामन्याला अगदी काही तास शिल्लक असताना केलेल्या चर्चेनंतर करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो या भीतीने सामना रद्द करण्यात आलाय. यासाठी दोन्ही क्रिकेट मंडळांकडून क्रिकेट चाहते आणि सामन्याशी संबंधित इतर सहकाऱ्यांची माफीही मागण्यात आलीय. भारतीय संघामधील सदस्य करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने करोनाबाधितांची संख्या वाढण्याची भीती असल्याने सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला जात आहे असं ईसीबीने स्पष्ट केलंय. भारतीय संघ मैदानामध्ये उतरु शकत नाही असा उल्लेखही ईसीबीच्या अधिकृत पत्रकामध्ये आहे. तसेच सामना रद्द झाला असला तरी मालिका बरोबरीमध्ये सुटणार की भारताकडे चषक दिला जाणार याची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.