IND vs ENG 5th Test Score Updates, 5th July 2022 : पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना १ जुलैपासून बर्मिंगहॅममधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवरती खेळवला गेला. यजमान इंग्लंडने हा सामना सात गडी राखून जिंकला. आज पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ११९ धावांची तर भारताला सात बळींची आवश्यकता होती. भारताने दुसऱ्या डावात सर्वबाद २४५ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताकडे ३७७ धावांची आघाडी आली होती. मात्र, इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करत विजय मिळवला. पाचवा सामना इंग्लंडने जिंकल्यामुळे मालिका २-२ अशी बरोबरी सुटली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ऋषभ पंतच्या १४६ धावा आणि रविंद्र जडेजाच्या नाबाद ८३ धावांच्या बळावर पहिल्या दिवसअखेर भारतीय संघाने सात बाद ३३८ धावांपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर रविंद्र जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक पूर्ण केले. भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद ४१६ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या यजमान इंग्लंडला सर्वबाद २८४ धावांपर्यंत मजल मारता आली. आपल्या पहिल्या डावात इंग्लंडची फलंदाजी सपशेल ढेपाळली होती मात्र, जॉनी बेअरस्टोच्या शतकी खेळीमुळे त्यांना फॉलोऑन टाळण्यात यश आले.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडची फलंदाजी सुरू झाल्यानंतर पावसाने तीनदा व्यत्यय आणला होता. त्यामुळे दिवसभरातील बहुतेक खेळ होऊ शकल नाही. दरम्यान, भारतीय गोलंदाजांच्या टिच्चून माऱ्यासमोर इंग्लंडचे फलंदाज जास्त काळ तग धरू शकले नाही. सामन्याचा दुसरा दिवस भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नावे राहिला. बुमराहने फलंदाजी करताना कसोटीतील एकाच षटकात सर्वाधिक धावा फटकावण्याचा विश्वविक्रम केला. त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकामध्ये ३५ धावा मिळवल्या. शिवाय, गोलंदाजी करताना बुमराहने तीन गडी बाद केले.

त्यापूर्वी, पहिल्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र, भारतीय डावाची सुरुवात फारच वाईट झाली. भारताचे पहिले पाच फलंदाज १०० धावांच्या आतच तंबूत परतले होते. अशा स्थितीमध्ये उपकर्णधार ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजाने संयमी खेळी करत डाव सावरला. दोघांनी सहाव्या गड्यासाठी २२२ धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा रविंद्र जडेजा ८३ धावांवर तर मोहम्मद शामी खातेही न खोलता नाबाद होते.

Live Updates
16:15 (IST) 4 Jul 2022
ऋषभ पंत अर्धशतक करून बाद

भारतीय संघाचा उपकर्णधार ऋषभ पंत दुसऱ्या डावात अर्धशतक करून बाद झाला. त्याने ८६ चेंडूत ५७ धावा केल्या.

16:01 (IST) 4 Jul 2022
भारताचा पाचवा गडी माघारी

श्रेयस अय्यरच्या रुपात भारताचा पाचवा गडी तंबूत परतला आहे. मॅथ्यू पॉट्सच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. अय्यरने २६ चेंडूत १९ धावा केल्या. भारताची धावसंख्या पाच बाद १९० झाली आहे.

15:55 (IST) 4 Jul 2022
ऋषभ पंतचे अर्धशतक पूर्ण

भारतीय संघाचा उपकर्णधार ऋषभ पंतने दुसऱ्या डावातही चमकदार कामगिरी सुरू ठेवली आहे. त्याने ७६ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या डावात त्याने १४६ धावांची अप्रतिम खेळी केली होती.

15:29 (IST) 4 Jul 2022
चेतेश्वर पुजारा माघारी

भारतीय सलामीवीर चेतेश्वर पुजारा ६६ धावांवर बाद झाला आहे. भारताची धावसंख्या चार बाद १५३ अशी आहे.

14:59 (IST) 4 Jul 2022
चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात

भारत विरुद्ध इंग्लंड एजबस्टन कसोटीतील चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत भारतीय डाव पुढे नेण्यासाठी सज्ज आहेत.

23:30 (IST) 3 Jul 2022
चेतेश्वर पुजाराचे अर्धशतक

भारताचा सलामीवीर चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले. त्याने १३९ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले.

22:42 (IST) 3 Jul 2022
३५ षटकांमध्ये भारताच्या तीन बाद ९१ धावा

दुसऱ्या डावातील ३५ षटकांमध्ये भारताच्या तीन बाद धावा झाल्या आहेत. ऋषभ पंत १० तर चेतेश्वर पुजारा ३९ धावांवर खेळत आहेत.

22:12 (IST) 3 Jul 2022
विराट कोहली पुन्हा स्वस्तात माघारी

भारताचा माजी कर्णधार जम बसवत असल्याचे दिसताच बेन स्टोक्सने जो रूट करवी त्याला माघारी धाडले. कोहलीने ४० चेंडूत २० धावा केल्या. ३० षटकांमध्ये भारताच्या तीन बाद ७५ धावा झाल्या आहेत.

21:49 (IST) 3 Jul 2022
भारताकडे २०० पेक्षा जास्त धावांची आघाडी

एजबस्टन कसोटीमध्ये दुसऱ्या डावात भारताकडे २००पेक्षा जास्त धावांची आघाडी झाली आहे. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा मैदानात जम बसवण्याचा प्रयत्न करत आहेत.

21:13 (IST) 3 Jul 2022
भारताचे अर्धशतक पूर्ण

एजबस्टन कसोटीतील दुसऱ्या डावात भारताचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. माजी कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा मैदानावर उपस्थित आहेत.

21:09 (IST) 3 Jul 2022
हनुमा विहारीच्या रूपात भारताला दुसरा झटका

स्टुअर्ट ब्रॉडने हनुमा विहारीला बाद करून भारताला दुसरा झटका दिला. विहारीने ४४ चेंडूंमध्ये ११ धावा केल्या. विहारी बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानात आला आहे.

20:33 (IST) 3 Jul 2022
चहापानापर्यंत भारताच्या १ बाद ३७ धावा

एजबस्टन कसोटीत तिसऱ्या दिवशी चहापानापर्यंत भारताने १ बाद ३७ धावा केल्या आहेत. भारताला १६९ धावांची आघाडी मिळाली आहे.

20:21 (IST) 3 Jul 2022
१० षटकांनंतर भारताच्या १ बाद २७ धावा

दुसऱ्या डावातील सुरुवातीच्या १० षटकांमध्ये भारताच्या १ बाद धावा झाल्या आहेत. पुजारा १५ आणि हनुमा विहारी २ धावांवर खेळत आहेत.

19:46 (IST) 3 Jul 2022
भारताला विजयाची संधी!

कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करून १०० पेक्षा जास्त धावांची आघाडी मिळाल्यानंतर भारतीय संघाचा एकदाही पराभव झालेला नाही.

19:39 (IST) 3 Jul 2022
सलामीवीर शुबमन गिल स्वस्तात माघारी

भारताचा सलामीवीर शुबमन गिल दुसऱ्या डावातही अपयशी ठरला आहे. जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर क्रॉलीकडे झेल फेकून तो बाद झाला.

19:38 (IST) 3 Jul 2022
भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात

१३२ धावांची आघाडी घेऊन भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. सलामीवीर शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजार मैदानात आले आहेत.

19:10 (IST) 3 Jul 2022
इंग्लंडचा नववा गडी बाद

मोहम्मद सिराजने इंग्लंडला नववा झटका दिला आहे. सॅम बिलिंग्ज ३६ धावा करून माघारी परतला. यजमानांची अवस्था नऊ बाद २६७ झाली आहे.

18:52 (IST) 3 Jul 2022
इंग्लंडचा आठवा गडी तंबूत

स्टुअर्ट ब्रॉडच्या रुपात इंग्लंडचा आठवा गडी तंबूत परतला आहे. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने ब्रॉडचा झेल टिपला. इंग्लंडची अवस्था आठ बाद २४८ अशी झाली आहे. अजूनही ते १६८ धावांनी पिछाडीवर आहेत.

18:42 (IST) 3 Jul 2022
विराटने टिपला बेअरस्टोचा झेल

इंग्लंडचा शतकवीर जॉनी बेअरस्टो बाद झाला असून विराट कोहलीने त्याचा अप्रतिम झेल टिपला. बेअरस्टोने १४० चेंडूंचा सामना करून १०६ धावा केल्या. इंग्लंडची अवस्था सात बाद २४१ अशी झाली आहे.

18:25 (IST) 3 Jul 2022
इंग्लंडच्या डावातील ५० षटके पूर्ण

इंग्लंडच्या डावातील ५० षटके पूर्ण झाली आहेत. ५० षटकांमध्ये यजमानांनी सहा बाद २३५ धावांपर्यंत मजल मारली आहे.

18:12 (IST) 3 Jul 2022
जॉनी बेअरस्टोचे शानदार शतक

इंग्लंडचा इन-फॉर्म फलंदाज जॉनी बेअरस्टोने संकटाच्या काळात डाव सावरला आहे. त्याने ११९ चेंडूंचा सामना करून शानदार शतक झळकावले. हे त्याचे सलग तिसरे कसोटी शतक ठरले.

17:59 (IST) 3 Jul 2022
जेवणाच्या सुट्टीनंतर पुन्हा खेळाला सुरुवात

पावसाच्या व्यत्ययामुळे वेळेपूर्वीच जेवणासाठी सुट्टी घेण्यात आली होती. त्यानंतर आता खेळ पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

16:47 (IST) 3 Jul 2022
सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा व्यत्यय

भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरू असलेल्या एजबस्टन कसोटी सामन्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा व्यत्यय आला आहे. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. इंग्लंड सहा बाद २०० धावांपर्यंत पोहचला आहे.

16:28 (IST) 3 Jul 2022
४१ षटकांनंतर बदलला चेंडू

४१ षटकांनंतर चेंडू बदलण्यात आला आहे. इंग्लंड सहा बाद १७८ धावांपर्यंत पोहचला आहे.

16:00 (IST) 3 Jul 2022
इंग्लंडला मोठा झटका

इंग्लंडच्या संघाला मोठा झटका बसला असून कर्णधार बेन स्टोक्स २५ धावा करून बाद झाला. शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर बुमराहने त्याचा झेल टिपला.

15:58 (IST) 3 Jul 2022
जॉनी बेअरस्टोचे अर्धशतक

जॉनी बेअरस्टोने आपली शानदार कामगिरी सुरू ठेवली असून भारताविरुद्ध त्याने अर्धशतक केले.

15:43 (IST) 3 Jul 2022
बेन स्टोक्सला जीवदान

मोहम्मद शामीच्या गोलंदाजीवर बेन स्टोक्सला जीवदान मिळाले. क्षेत्ररक्षण करत असलेल्या शार्दुल ठाकूरला स्टोक्सचा झेल टिपला आला नाही.

15:41 (IST) 3 Jul 2022
३५ षटकांमध्ये इंग्लंड पाच बाद १३०

३५ षटकांमध्ये इंग्लंडने १३० धावांपर्यंत मजल मारली आहे. अजूनही ते २८६ धावांनी पिछाडीवर आहेत.

15:35 (IST) 3 Jul 2022
स्टोक्स आणि बेअरस्टो डाव सावरण्याच्या प्रयत्नात

जॉनी बेअरस्टो आणि कर्णधार बेन स्टोक्स ही जोडी डाव सावरण्याचा प्रयत्नात आहे. दोघांनी मिळून मोहम्मद शामीच्या षटकामध्ये दोष चौकारांसह ११ धावा जमवल्या.

15:15 (IST) 3 Jul 2022
३० षटकांनंतर इंग्लंड पाच बाद ९५

पहिल्या ३० षटकांनंतर इंग्लंडचा संघ पाच बाद ९५ धावसंख्येवर पोहचला आहे. जॉनी बेअरस्टो १२ आणि कर्णधार बेन स्टोक्स १० धावांवर खेळत आहेत.