IND vs ENG 5th Test Score Updates, 5th July 2022 : पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना १ जुलैपासून बर्मिंगहॅममधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवरती खेळवला गेला. यजमान इंग्लंडने हा सामना सात गडी राखून जिंकला. आज पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ११९ धावांची तर भारताला सात बळींची आवश्यकता होती. भारताने दुसऱ्या डावात सर्वबाद २४५ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताकडे ३७७ धावांची आघाडी आली होती. मात्र, इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करत विजय मिळवला. पाचवा सामना इंग्लंडने जिंकल्यामुळे मालिका २-२ अशी बरोबरी सुटली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ऋषभ पंतच्या १४६ धावा आणि रविंद्र जडेजाच्या नाबाद ८३ धावांच्या बळावर पहिल्या दिवसअखेर भारतीय संघाने सात बाद ३३८ धावांपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर रविंद्र जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक पूर्ण केले. भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद ४१६ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या यजमान इंग्लंडला सर्वबाद २८४ धावांपर्यंत मजल मारता आली. आपल्या पहिल्या डावात इंग्लंडची फलंदाजी सपशेल ढेपाळली होती मात्र, जॉनी बेअरस्टोच्या शतकी खेळीमुळे त्यांना फॉलोऑन टाळण्यात यश आले.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडची फलंदाजी सुरू झाल्यानंतर पावसाने तीनदा व्यत्यय आणला होता. त्यामुळे दिवसभरातील बहुतेक खेळ होऊ शकल नाही. दरम्यान, भारतीय गोलंदाजांच्या टिच्चून माऱ्यासमोर इंग्लंडचे फलंदाज जास्त काळ तग धरू शकले नाही. सामन्याचा दुसरा दिवस भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नावे राहिला. बुमराहने फलंदाजी करताना कसोटीतील एकाच षटकात सर्वाधिक धावा फटकावण्याचा विश्वविक्रम केला. त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकामध्ये ३५ धावा मिळवल्या. शिवाय, गोलंदाजी करताना बुमराहने तीन गडी बाद केले.

त्यापूर्वी, पहिल्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र, भारतीय डावाची सुरुवात फारच वाईट झाली. भारताचे पहिले पाच फलंदाज १०० धावांच्या आतच तंबूत परतले होते. अशा स्थितीमध्ये उपकर्णधार ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजाने संयमी खेळी करत डाव सावरला. दोघांनी सहाव्या गड्यासाठी २२२ धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा रविंद्र जडेजा ८३ धावांवर तर मोहम्मद शामी खातेही न खोलता नाबाद होते.

Live Updates
15:00 (IST) 3 Jul 2022
एजबस्टनमध्ये तिसऱ्या दिसवसाचा खेळ सुरू झाला

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. इंग्लंड आपल्या पहिल्या डावातील फलंदाजी करत आहे. जॉनी बेअरस्टो आणि कर्णधार बेन स्टोक्स ही जोडी मैदानात उतरली आहे.

23:24 (IST) 2 Jul 2022
जॅक लिच शून्यावर बाद

मोहम्मद शामीने जॅक लिचला शून्यावर बाद केले. यष्टीरक्षक ऋषभ पंतने लिचचा झेल टिपला. इंग्लंडची अवस्था पाच बाद ८३ अशी झाली आहे.

23:22 (IST) 2 Jul 2022
२५ षटकांमध्ये इंग्लंड चार बाद ८३ धावा

भारतीय गोलंदाजांच्या टिच्चून माऱ्यासमोर इंग्लंडच्या पहिल्या चार फलंदाजांनी माना टाकल्या. २५ षटकांमध्ये इंग्लंड चार बाद ८३ धावा करू शकला आहे.

23:18 (IST) 2 Jul 2022
जॅक लिचला जीवनदान

इंग्लंडचा फलंदाज जॅक लिचला जीवनदान मिळाले. मोहम्मद शामीच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने त्याचा झेल सोडला.

23:07 (IST) 2 Jul 2022
मोहम्मद सिराजने जो रूटला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता

मोहम्मद सिराजने इन-फॉर्म जो रूटला बाद करून मोठा अडथळा दूर केला आहे. जो रूट सिराजच्या चेंडूवर ऋषभ पंतकरवी बाद झाला. त्याने ६७ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या.

https://platform.twitter.com/widgets.js

22:51 (IST) 2 Jul 2022
२० षटकांमध्ये इंग्लंड तीन बाद ७७

सलामीचे तिन्ही फलंदाज झटपट बाद झाल्याने संकटात सापडलेला यजमान संघ हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करत आहे. पहिल्या २० षटकांमध्ये इंग्लंडच्या तीन बाद ७७ धावा झाल्या.

22:43 (IST) 2 Jul 2022
१८ षटकांमध्ये इंग्लंडच्या तीन बाद ७६ धावा

पावसाच्या अडथळ्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला आहे. १८ षटकांमध्ये इंग्लंडने तीन बाद ७६ धावांपर्यंत मजल मारली. जॉनी बेअरस्टो आणि जो रूट डावाला आकार देण्याच्या प्रयत्नात आहेत.

22:31 (IST) 2 Jul 2022
पावसाचा व्यत्यय दूर झाल्यानंतर पुन्हा खेळ सुरू

एजबस्टन कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा बहुतांशी खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. सध्या तिसऱ्या सत्राचा खेळ सुरू करण्यात आला आहे.

20:13 (IST) 2 Jul 2022
इंग्लंडची इन-फॉर्म जोडी मैदानात

सुरुवातीचे तीन फलंदाज बाद झाल्याने जॉनी बेअरस्टो आणि जो रूट सध्या मैदानात आहेत. इंग्लंडची इन-फॉर्म जोडी फोडण्याचे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर आहे.

20:06 (IST) 2 Jul 2022
बुमराहचा यजमानांना तिसरा धक्का

भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराह सध्या जबरदस्त कामगिरी करत आहे. त्याने यजमानांना तिसरा धक्का दिला. च्याच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरने ओली पोपचा अप्रतिम झेल टिपला. पोप १० धावा करून बाद झाला.

20:00 (IST) 2 Jul 2022
दहा षटकांमध्ये इंग्लंडच्या दोन बाद ४२ धावा

दहा षटकांमध्ये इंग्लंडच्या दोन बाद ४२ धावा झाल्या आहेत. जो रूट ८ तर ओली पोप १० धावांवर खेळत आहेत.

19:45 (IST) 2 Jul 2022
खेळाला पुन्हा सुरुवात

एजबस्टनमध्ये पाऊस पडल्याने दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सत्रातील बहुतेक खेळ पाण्यात गेला. पाऊस थांबल्यानंतर आता खेळ पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

18:04 (IST) 2 Jul 2022
एजबस्टनमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात

एजबस्टन कसोटीतील दुसऱ्या दिवशी दुसऱ्यांदा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. इंग्लंडच्या दोन बाद ३१ धावा झाल्या आहेत.

17:52 (IST) 2 Jul 2022
जसप्रित बुमराहला मिळाला दुसरा बळी

भारतीय संघाचा कर्णधार जसप्रित बुमराहने इंग्लंडला दुसरा झटका दिला आहे. त्याने झॅक क्रॉलीला शुबमन गिलकरवी बाद केले.

17:31 (IST) 2 Jul 2022
थोड्याच वेळात होणार खेळ सुरू

एजबस्टनमध्ये पाऊस थांबला असून थोड्याच वेळात खेळ पुन्हा सुरू होणार आहे. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रामध्ये पाऊस आल्याने खेळ थांबवण्यात आला होता.

16:30 (IST) 2 Jul 2022
एजबस्टनमध्ये पावसाला सुरुवात

एजबस्टनमध्ये पावसाला सुरुवात झाल्यामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. इंग्लंडच्या १ बाद १६ धावा झाल्या आहेत.

16:27 (IST) 2 Jul 2022
इंग्लंडला पहिला झटका

भारतीय कर्णधार जसप्रित बुमराहने इंग्लंडला पहिला झटका दिला आहे. इंग्लंडचा सलामीवीर अॅलेक्स लीस सहा धावा करून त्रिफळाचित झाला.

16:13 (IST) 2 Jul 2022
इंग्लंडच्या डावाला सुरुवात

भारताने पहिल्या डावात दिलेले ४१७ धावांचे आव्हान पार करण्यासाठी यजमान इंग्लंडचा संघ मैदानात उतरला आहे. अॅलेक्स लीस आणि झॅक क्रॉली सलामीला आले आहेत.

15:58 (IST) 2 Jul 2022
स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात मिळवल्या ३५ धावा

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी मिळून स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात ३५ धावा ठोकल्या. ब्रॉडची हे षटक कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक ठरले.

15:53 (IST) 2 Jul 2022
भारताच्या ४०० धावा पूर्ण

ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजाच्या शतकांच्या जोरावर भारतीय संघाने ४०० धावा पूर्ण केल्या. कर्णधार जसप्रित बुमराह आणि मोहम्मद सिराज मैदानावर उपस्थित आहेत.

15:45 (IST) 2 Jul 2022
जेम्स अँडरसनेने दूर केला जडेजाचा अडसर

रविंद्र जडेजा शतकी खेळी करून बाद झाला. त्याने १९४ चेंडूत १०४ धावा केल्या. जेम्स अँडरसनने त्याला त्रिफळाचित केले.

15:32 (IST) 2 Jul 2022
भारताचा आठवा गडी बाद

मोहम्मद शामीच्या रुपात भारताचा आठवा गडी बाद झाला. स्टुअर्ट ब्रॉडने जॅक लीच करवी शमीला माघारी धाडले.

15:29 (IST) 2 Jul 2022
रविंद्र जडेजाचे शतक पूर्ण

भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने शतक पूर्ण केले. त्याने १८३ चेंडूंमध्ये १०० धावा पूर्ण केल्या.

15:02 (IST) 2 Jul 2022
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू

एजबस्टन कसोटीतील दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शामी मैदानावरती उतरले आहेत.

23:05 (IST) 1 Jul 2022
भारताचा सातवा गडी बाद

ऋषभ पंत पाठोपाठ भारताचा सातवा गडी बाद झाला. शार्दुल ठाकूर एक धाव करून बाद झाला. ६८ षटकांनंतर भारत सात बाद ३२३ धावांवर पोहचला आहे.

23:02 (IST) 1 Jul 2022
पंत-जडेजाने केली तेंडुलकर-अझरुद्दीनची बरोबरी

१९९७ मध्ये तेंडुलकर आणि अझरुद्दीन जोडीने परदेशात सहाव्या गड्यासाठी २२२ धावांची भागीदारी केली होती.

22:57 (IST) 1 Jul 2022
ऋषभ पंत १४६ धावांवर बाद

ऋषभ पंत १४६ धावांवर बाद झाला आह. जो रुटने त्याला बाद केले.

22:46 (IST) 1 Jul 2022
भारतीय संघाच्या ३०० धावा पूर्ण

ऋषभ पंतचे शतक आणि रविंद्र जडेच्या अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघाच्या ३०० धावा पूर्ण झाल्या.

22:11 (IST) 1 Jul 2022
रविंद्र जडेजाचे अर्धशतक

रविंद्र जडेजाने ऋषभ पंतला खंबीर साथ देत अर्धशतक पूर्ण केले. त्याने १०९ चेंडूमध्ये ५० धावा पूर्ण केल्या.

22:08 (IST) 1 Jul 2022
ऋषभ पंतचे ८९ चेंडूत शतक

भारतीय संघाचा उपकर्णधार ऋषभ पंतचे ८९ चेंडूत शतक पूर्ण केले. यामध्ये १५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.