IND vs ENG 5th Test Score Updates, 5th July 2022 : पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना १ जुलैपासून बर्मिंगहॅममधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवरती खेळवला गेला. यजमान इंग्लंडने हा सामना सात गडी राखून जिंकला. आज पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ११९ धावांची तर भारताला सात बळींची आवश्यकता होती. भारताने दुसऱ्या डावात सर्वबाद २४५ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताकडे ३७७ धावांची आघाडी आली होती. मात्र, इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करत विजय मिळवला. पाचवा सामना इंग्लंडने जिंकल्यामुळे मालिका २-२ अशी बरोबरी सुटली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ऋषभ पंतच्या १४६ धावा आणि रविंद्र जडेजाच्या नाबाद ८३ धावांच्या बळावर पहिल्या दिवसअखेर भारतीय संघाने सात बाद ३३८ धावांपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर रविंद्र जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक पूर्ण केले. भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद ४१६ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या यजमान इंग्लंडला सर्वबाद २८४ धावांपर्यंत मजल मारता आली. आपल्या पहिल्या डावात इंग्लंडची फलंदाजी सपशेल ढेपाळली होती मात्र, जॉनी बेअरस्टोच्या शतकी खेळीमुळे त्यांना फॉलोऑन टाळण्यात यश आले.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडची फलंदाजी सुरू झाल्यानंतर पावसाने तीनदा व्यत्यय आणला होता. त्यामुळे दिवसभरातील बहुतेक खेळ होऊ शकल नाही. दरम्यान, भारतीय गोलंदाजांच्या टिच्चून माऱ्यासमोर इंग्लंडचे फलंदाज जास्त काळ तग धरू शकले नाही. सामन्याचा दुसरा दिवस भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नावे राहिला. बुमराहने फलंदाजी करताना कसोटीतील एकाच षटकात सर्वाधिक धावा फटकावण्याचा विश्वविक्रम केला. त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकामध्ये ३५ धावा मिळवल्या. शिवाय, गोलंदाजी करताना बुमराहने तीन गडी बाद केले.
त्यापूर्वी, पहिल्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र, भारतीय डावाची सुरुवात फारच वाईट झाली. भारताचे पहिले पाच फलंदाज १०० धावांच्या आतच तंबूत परतले होते. अशा स्थितीमध्ये उपकर्णधार ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजाने संयमी खेळी करत डाव सावरला. दोघांनी सहाव्या गड्यासाठी २२२ धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा रविंद्र जडेजा ८३ धावांवर तर मोहम्मद शामी खातेही न खोलता नाबाद होते.
ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजाने १०० धावांची भागीदारी पूर्ण केली आहे. पहिले पाच फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर या दोघांनी भारतीय डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला आहे.
सुरुवातीला ठेपाळलेल्या फलंदाजीनंतर भारतीय डाव सावरला आहे. उपकर्णधार ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजाच्या संयमी भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे.
एजबस्टन येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी चहापानासाठी विश्रांती घेण्यात आली आहे. चहापानापर्यंत भारताच्या ४४ षटकांमध्ये पाच बाद १७४ धावा झाल्या आहेत.
भारतीय फलंदाजी ठेपाळली असताना उपकर्णधार ऋषभ पंतने संयमी खेळी करत अर्धशतक पूर्ण केले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०वे अर्धशतक ठरले.
उपकर्णधार ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघांनी भारताचा धावफलक दीडशेपार नेला आहे. पंत ३९ तर जडेजा २६ धावांवर खेळत आहेत.
पहिले पाच फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. ३५ षटकांमध्ये भारताने पाच बाद १३० धावांपर्यंत मजल मारली आहे.
भारतीय संंघाचे शतक धावफलकावर लागले आहे. पाच गड्यांच्या बदल्यात भारताने २८.२ षटकांमध्ये शंभरी गाठली. सध्या उपकर्णधार ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा मैदानावर आहेत.
जेम्स अँडरसनने भारतीय संघाला आणखी एक धक्का दिला. अँडरसनच्या गोलंदाजीवर सॅम बिलिंग्जने श्रेयस अय्यरचा अप्रतिम झेल टिपला. श्रेयसने ११ चेंडूत १५ धावा केल्या. भारतीय संघाची अवस्था पाच बाद ९८ अशी झाली आहे.
एजबस्टन येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजी ठेपाळली आहे. भारताचे ८१ धावांवर ४ गडी बाद झाले आहेत. सलामीवीर पुजारा, गिल पाठोपाठ हनुमा विहारी आणि विराट कोहलीदेखील झटपट बाद झाले.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. तो अवघ्या ११ धावा करून बाद झाला. मॅथ्यू पॉट्सने त्याला त्रिफळाचित केले.
5TH Test. WICKET! 24.2: Virat Kohli 11(19) b Matty Potts, India 71/4 https://t.co/LL20D1K7si #engvind
— BCCI (@BCCI) July 1, 2022
संघाची धावसंख्या ६४ असताना भारताचा तिसरा फलंदाज माघारी परतला आहे. मॅथ्यू पॉट्सच्या गोलंदाजीवर हनुमा विहारी पायचित झाला. उपकर्णधार ऋषभ पंत मैदानावर आला आहे.
एजबस्टनमध्ये सुरू झालेल्या पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ काही काळासाठी थांबवण्यात आला होता. मात्र, आता पाऊस थांबल्यामुळे भारताच्या फलंदाजीला पुन्हा सुरुवात झाली आहे. विराट कोहली आणि हनुमा विहारी मैदानावर परतले आहेत.
एजबस्टनमध्ये पाऊस थांबला असला तरी कव्हर अद्याप बाजूला केलेले नाहीत. पंचांनी मैदानाची पहाणी सुरू केली आहे.
भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या कसोटी सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. २१व्या षटकादरम्यान पावसाला सुरुवात झाल्याने खेळ थांबवण्यात आला.
UPDATE – It has started to rain here at the Edgbaston Stadium.#engvind
— BCCI (@BCCI) July 1, 2022
एजबस्टन कसोटीतील पहिल्या डावात भारतीय संघाचे अर्धशतक पूर्ण झाले. २० षटकांमध्ये दोन गड्यांच्या बदल्यात भारताच्या ५३ धावा झाल्या. माजी कर्णधार विराट कोहली आणि हनुमा विहारी मैदानावर उपस्थित आहेत.
भारताचा दुसरा सलामीवीर चेतेश्वर पुजारा माघारी परतला आहे. जेम्स अँडरसनने झॅक क्रॉली करवी पुजाराला बाद केले. पुजाराने ४६ चेंडूत १३ धावा केल्या.
एजबस्टन कसोटीमध्ये पहिल्या डावातील १५ षटकांमध्ये भारताच्या ४३ धावा झाल्या. चेतेश्वर पुजारा १३ आणि हनुमा विहारी ६ धावांवर खेळत आहेत.
पहिल्या दहा षटकांमध्ये भारताने एक बाद ३१ धावांपर्यंत मजल मारली आहे. शुबमन गिल बाद झाल्यांतर चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी डावाला आकार देण्याचा प्रयत्न करत आहेत.
सलामीवीर शुबमन गिल बाद झाल्यानंतर हनुमा विहारी फलंदाजीसाठी मैदानात आला आहे. विहारी आपल्या तंत्रशुद्ध खेळीसाठी ओळखला जातो.
सलामीवीर शुबमन गिलच्या रुपात भारताचा पहिला गडी बाद झाला. जेम्स अँडरसनने झॅक क्रॉली करवी गिलला माघारी धाडले. गिलने २४ चेंडूत १७ धावा केल्या.
5TH Test. WICKET! 6.2: Shubman Gill 17(24) ct Zak Crawley b James Anderson, India 27/1 https://t.co/LL20D1K7si #engvind
— BCCI (@BCCI) July 1, 2022
भारताचे सलामीवीर शुबमन गील आणि चेतेश्वर पुजारा यांनी सावध सुरुवात केली आहे. पहिल्या पाच षटकांनंतर भारताने बिनबाद १८ धावा केल्या आहेत. पुजारा ४ तर गिल ९ धावांवर खेळत आहेत.
भारताचे सलामीवर शुबमन गील आणि चेतेश्वर पुजारा डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. त्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू मैदानात उपस्थित आहेत.
भारतीय संघ – जसप्रीत बुमराह (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंडचा संघ – झॅक क्रॉली, अॅलेक्स लीस, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), सॅम बिलिंग्स (यष्टीरक्षक), मॅथ्यू पॉट्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, जेम्स अँडरसन.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून पाहुण्यांना फलंदाजीसाठी निमंत्रण दिले आहे. त्यामुळे एजबस्टन कसोटीमध्ये भारताला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे.
England have won the toss and elect to bowl first in the 5th Test.
— BCCI (@BCCI) July 1, 2022
Live – https://t.co/xOyMtKJzWm #engvind pic.twitter.com/HtE6IhjcHq