IND vs ENG 5th Test Score Updates, 5th July 2022 : पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना १ जुलैपासून बर्मिंगहॅममधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवरती खेळवला गेला. यजमान इंग्लंडने हा सामना सात गडी राखून जिंकला. आज पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ११९ धावांची तर भारताला सात बळींची आवश्यकता होती. भारताने दुसऱ्या डावात सर्वबाद २४५ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताकडे ३७७ धावांची आघाडी आली होती. मात्र, इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करत विजय मिळवला. पाचवा सामना इंग्लंडने जिंकल्यामुळे मालिका २-२ अशी बरोबरी सुटली आहे.

ऋषभ पंतच्या १४६ धावा आणि रविंद्र जडेजाच्या नाबाद ८३ धावांच्या बळावर पहिल्या दिवसअखेर भारतीय संघाने सात बाद ३३८ धावांपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर रविंद्र जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक पूर्ण केले. भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद ४१६ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या यजमान इंग्लंडला सर्वबाद २८४ धावांपर्यंत मजल मारता आली. आपल्या पहिल्या डावात इंग्लंडची फलंदाजी सपशेल ढेपाळली होती मात्र, जॉनी बेअरस्टोच्या शतकी खेळीमुळे त्यांना फॉलोऑन टाळण्यात यश आले.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडची फलंदाजी सुरू झाल्यानंतर पावसाने तीनदा व्यत्यय आणला होता. त्यामुळे दिवसभरातील बहुतेक खेळ होऊ शकल नाही. दरम्यान, भारतीय गोलंदाजांच्या टिच्चून माऱ्यासमोर इंग्लंडचे फलंदाज जास्त काळ तग धरू शकले नाही. सामन्याचा दुसरा दिवस भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नावे राहिला. बुमराहने फलंदाजी करताना कसोटीतील एकाच षटकात सर्वाधिक धावा फटकावण्याचा विश्वविक्रम केला. त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकामध्ये ३५ धावा मिळवल्या. शिवाय, गोलंदाजी करताना बुमराहने तीन गडी बाद केले.

त्यापूर्वी, पहिल्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र, भारतीय डावाची सुरुवात फारच वाईट झाली. भारताचे पहिले पाच फलंदाज १०० धावांच्या आतच तंबूत परतले होते. अशा स्थितीमध्ये उपकर्णधार ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजाने संयमी खेळी करत डाव सावरला. दोघांनी सहाव्या गड्यासाठी २२२ धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा रविंद्र जडेजा ८३ धावांवर तर मोहम्मद शामी खातेही न खोलता नाबाद होते.

Live Updates
16:26 (IST) 5 Jul 2022
रूट-बेअरस्टोची २५० धावांची भागीदारी

रूट-बेअरस्टो जोडीने चौथ्या गड्यासाठी २५० धावांची भागीदारी केली.

16:25 (IST) 5 Jul 2022
जॉनी बेअरस्टोचे सलग चौथ्या सामन्यात शतक

जॉनी बेअरस्टोने सलग चौथ्या सामन्यात शतक झळकावले आहे. त्याने १३८ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले.

16:11 (IST) 5 Jul 2022
इंग्लंड विजयाच्या उंबरठ्यावर

एजबस्टन कसोटी जिंकण्यासाठी इंग्लंडला ५० पेक्षा कमी धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे पाच सामन्यांची मालिका बरोबरीत सुटण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

15:47 (IST) 5 Jul 2022
जो रूटचे शतक पूर्ण

इंग्लंडचा फलंदाज जो रूटने १३६ चेंडूत शतक पूर्ण केले. यावर्षातील त्याचे हे पाचवे कसोटी शतक ठरले आहे.

15:19 (IST) 5 Jul 2022
इंग्लंडला विजयासाठी १००पेक्षा कमी धावांची आवश्यकता

इंग्लंडला विजयासाठी १००पेक्षा कमी धावांची आवश्यकता आहे. जॉनी बेअरस्टो ८४ आणि जो रूट ८२ धावांवर खेळत आहेत.

15:00 (IST) 5 Jul 2022
पाचव्या निर्णायक दिवसाचा खेळ सुरू

एजबस्टनमध्ये पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. जो रूट आणि जॉनी बेअरस्टो इंग्लंडचा डाव पुढे नेण्यासाठी सज्ज झाले आहेत.

14:51 (IST) 5 Jul 2022
23:04 (IST) 4 Jul 2022
रूट-बेअरस्टोची १५० धावांची भागीदारी

जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी चौथ्या गड्यासाठी १९७ चेंडूंमध्ये १५० धावांची भागीदारी केली. चौथ्या दिवसअखेर रूट ७६ तर बेअरस्टो ७२ धावांवर नाबाद आहेत.

22:42 (IST) 4 Jul 2022
जॉनी बेअरस्टोचे अर्धशतक

जॉनी बेअरस्टोने ७५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या डावात त्याने शतकी खेळी केली होती.

22:30 (IST) 4 Jul 2022
५० षटकांमध्ये इंग्लंड तीन बाद २१७

५० षटकांमध्ये इंग्लंड तीन बाद २१७ धावांपर्यंत मजल मारली आहे. जॉनी बेअरस्टो अर्धशतकाच्या जवळ आला आहे.

22:11 (IST) 4 Jul 2022
इंग्लंडचा धावफलक दोनशेपार

दुसऱ्या डावामध्ये ४५.५ षटकांमध्ये इंग्लंडच्या २०० धावा झाल्या. जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी डावाला आकार दिला.

22:09 (IST) 4 Jul 2022
जो रूटचे अर्धशतक

इंग्लंडचा इन-फॉर्म फलंदाज जो रूटने अर्धशतक पूर्ण केले. त्याने ७१ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या. इंग्लंडने तीन बाद १९७ धावांपर्यंत मजल मारली आहे.

21:32 (IST) 4 Jul 2022
जॉनी बेअरस्टोला जीवदान

धडाकेबाज फलंदाज जॉनी बेअरस्टोला जीवदान मिळाले. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर हनुमा विहारीने त्याचा झेल सोडला.

21:20 (IST) 4 Jul 2022
३५ षटकांमध्ये इंग्लंडच्या तीन बाद १३८ धावा

३५ षटकांमध्ये इंग्लंडच्या तीन बाद १३८ धावा झाल्या आहेत. जो रूट आणि जॉनी बेअरस्टो डाव पुढे नेण्याच्या प्रयत्नात आहेत.

20:40 (IST) 4 Jul 2022
अॅलेक्स लीसच्या रुपात इंग्लंडला तिसरा धक्का

इंग्लंडचा सलामीवीर अॅलेक्स लीस धावबाद झाला आहे. त्याने ५६ धावा केल्या.

20:33 (IST) 4 Jul 2022
बुमराहचा इंग्लंडला दुसरा धक्का

भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराने इंग्लंडला दुसरा धक्का दिला आहे. त्याच्या गोलंदाजीवर ओली पोप खातेही न खोलता माघारी गेला. इंग्लंडला अजूनही विजयासाठी २७१ धावांची गरज आहे.

20:31 (IST) 4 Jul 2022
चहापाणानंतर खेळ पुन्हा सुरू

चहापाणानंतर खेळ पुन्हा सुरू झाला आहे. इंग्लंडचे अॅलेक्स लीस आणि ओली पोप मैदानावरती आहेत.

20:12 (IST) 4 Jul 2022
चहापाणासाठी घेण्यात आला ब्रेक

एजबस्टन कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या खेळादरम्यान चहापाणासाठी ब्रेक घेण्यात आला आहे. इंग्लंडने २३ षटकांमध्ये एक बाद १०७ धावा केल्या आहेत.

20:05 (IST) 4 Jul 2022
सलामीवीर झॅक क्रॉलीचे अर्धशतक हुकले

भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने इंग्लंची सलामीची जोडी फोडली. त्याने झॅक क्रॉलीला त्रिफळाचित केले. त्यामुळे क्रॉलीचे अर्धशतक हुकले. त्याने ७६ चेंडूत ४६ धावा केल्या.

19:41 (IST) 4 Jul 2022
दुसऱ्या डावात इंग्लंडची दमदार सुरुवात

विजयासाठी ३७८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडची दमदार सुरुवात झाली आहे. सलामीवीर अॅलेक्स लीस आणि झॅक क्रॉली यांनी फटकेबाजी सुरू केली आहे.

19:34 (IST) 4 Jul 2022
सलामीवीर अ‌ॅलेक्स लीसचे अर्धशतक

इंग्लंडचा सलामीवीर अ‌ॅलेक्स लीसने झटपट अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४४ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या. हे त्याच्या कारकिर्दीतील दुसरे कसोटी अर्धशतक ठरले. इंग्लंडला विजयासाठी अजून ३०४ धावांची आवश्यकता आहे.

19:07 (IST) 4 Jul 2022
१० षटकांमध्ये इंग्लंडच्या बिनबाद ५३ धावा

इंग्लंडच्या सलामीवीरांना मैदानात जम बसवला आहे. दुसऱ्या डावातील पहिल्या १० षटकांमध्ये इंग्लंडच्या बिनबाद ५३ धावा झाल्या.

18:44 (IST) 4 Jul 2022
पाच षटकांमध्ये इंग्लंडच्या २६ धावा

विजयासाठी ३७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडने पहिल्या पाच षटकांमध्ये बिनबाद २६ धावा केल्या आहेत.

18:22 (IST) 4 Jul 2022
इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला सुरुवात

भारताने विजयासाठी दिलेले ३७८ धावांचे लक्ष पार करण्यासाठी यजमानांचा संघ मैदानात उतरला आहे. सलामीवर अॅलेक्स लीस आणि झॅक क्रॉली मैदानावर आले आहेत.

18:16 (IST) 4 Jul 2022
२४५ धावांवर आटोपला भारताचा डाव

एजबस्टन कसोटीतील दुसऱ्या डावात भारताने सर्वबाद २४५ धावा केल्या आहेत. कर्णधार जसप्रीत बुमराहच्या रुपात भारताचा दहावा गडी बाद झाला.

18:04 (IST) 4 Jul 2022
रविंद्र जडेजाच्या रुपात भारताचा नववा गडी माघारी

रविंद्र जडेजा खेळपट्टीवर जम बसवत असल्याचे दिसताच कर्णधार बेन स्टोक्सने त्याला त्रिफळाचित केले आहे. जडेजा २३ धावा करून बाद झाला

17:44 (IST) 4 Jul 2022
भारताचा आठवा गडी बाद

मोहम्मह शामी १३ धावा करून माघारी परतला आहे. भारताकडे ३६२ धावांची आघाडी झाली आहे.

17:41 (IST) 4 Jul 2022
जेवणाच्या सुट्टीनंतर पुन्हा खेळाला सुरुवात

दुपारच्या जेवणानंतर भारताचा दुसरा डाव पुन्हा सुरू झाला आहे. रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शामी भारतीय डाव पुढे नेत आहेत.

17:03 (IST) 4 Jul 2022
एजबस्टनमध्ये दुपारच्या जेवणासाठी सुट्टी

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी दुपारच्या जेवणासाठी सुट्टी घेण्यात आली आहे. भारताने सात बाद २२९ धावा केल्या असून ३६१ धावांची आघाडी मिळवली आहे.

16:45 (IST) 4 Jul 2022
भारताचा सातवा गडी बाद

शार्दुल ठाकूरच्या रुपात भारताने आपला सातवा गडी गमावला आहे. पॉट्सच्या गोलंदाजीवर ओली पोपने त्याचा झेल टिपला. दुसऱ्या डावात भारताची धावसंख्या सात बाद २०७ इतकी झाली आहे.

Story img Loader