भारत अ संघात निवड झालेल्या अर्जुन तेंडुलकरने लंडनमध्ये टीम इंडियासोबत सराव केला आहे. ३ जुलैपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दौऱ्यासाठी भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. तर अर्जुन तेंडुलकरही सध्या लंडनमध्येच सराव करत आहे, यावेळी अर्जुनने भारतीय संघासोबत काहीकाळासाठी सराव केला असून, रवी शास्त्री यांनीही अर्जुनला त्याच्या आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी मोलाचा सल्ला दिला आहे. या दोघांच्याही भेटीचे फोटो बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर टाकले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवी शास्त्री यांच्यासोबत गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनीही अर्जुनला गोलंदाजीविषयी सल्ला दिला. याआधीही अर्जुनने मुंबईच्या वानखेडे मैदानात टीम इंडियाच्या सरावात भाग घेऊन विराट कोहलीला नेट्समध्ये गोलंदाजी केली होती. इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध २ टी-२० सामने खेळणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs england arjun tendulkar trains with indian team receives ravi shastris advice