लखनऊ : एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत अपराजित असलेल्या भारतीय संघासमोर रविवारी इंग्लंडचे आव्हान असेल. पाचपैकी पाच सामने जिंकलेला भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर, पाचपैकी केवळ एक सामना जिंकलेला इंग्लंडचा संघ नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे हा सामना जिंकून अग्रस्थान पुन्हा मिळवण्याचे भारताचे, तर स्पर्धेतील आव्हान कायम राखण्याचे इंग्लंडचे लक्ष्य असेल. हा सामना लखनऊच्या एकाना स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इंग्लंडच्या संघाने चार वर्षांपूर्वी मायदेशात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. यंदाच्या स्पर्धेत मात्र इंग्लंडने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. इंग्लंडला केवळ बांगलादेशला नमवण्यात यश आले आहे, तर त्यांनी न्यूझीलंड, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेकडून हार पत्करली आहे. त्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. त्यातच आता त्यांना यंदाच्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केलेल्या भारतीय संघाविरुद्ध खेळावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी अधिकच वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या केशव महाराजने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिली अशी ओळ की.. भारतीय झाले फॅन्स, पाहा
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाचही सामने जिंकले आहे. मायदेशात भारताला नमवणे नेहमीच अवघड असते, पण या स्पर्धेतील कामगिरीचे वैशिष्टय़ म्हणजे भारतीय संघ डावाच्या सुरुवातीपासून आक्रमक शैलीत खेळताना दिसत आहे. विशेषत: कर्णधार रोहितने प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर दडपण आणण्याची जबाबदारी घेतली आहे. भारताने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड या संघांना पराभूत केले आहे. आता इंग्लंडविरुद्ध ही लय कायम राखण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. भारतीय संघ या सामन्यातही अष्टपैलू हार्दिक पंडय़ाविनाच खेळेल. दक्षिण आफ्रिकेने शुक्रवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानला नमवले आणि सरस निव्वळ धावगतीमुळे गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले. आता हे स्थान परत मिळवण्यासाठी भारतीय संघ उत्सुक असेल.
भारत
’एकाना स्टेडियमची खेळपट्टी फिरकीला अनुकूल मानली जाते. त्यामुळे भारतीय संघ रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्यासह रविचंद्रन अश्विनला खेळवण्याचा विचार करू शकेल.
’अश्विनला संधी द्यायची झाल्यास भारताला मोहम्मद शमी आणि सिराज यांच्यापैकी एकाला संघाबाहेर करावे लागू शकेल. शमीने गेल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पाच गडी बाद केले होते.
’अष्टपैलू हार्दिक पंडय़ा या सामन्यालाही मुकणार असल्याने सूर्यकुमार यादवचे संघातील स्थान कायम राहण्याची शक्यता आहे. भारताच्या फलंदाजीची भिस्त कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्यावर असेल.
इंग्लंड
’इंग्लंडच्या संघात सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता असलेल्या फलंदाजांची संख्या मोठी आहे. मात्र, यापैकी एकालाही अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही.
’कर्णधार जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, जो रुट, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रूक या नावांमुळे कागदावर इंग्लंडचा संघ मजबूत दिसतो. परंतु त्यांना परिस्थिती आणि खेळपट्टय़ांशी जुळवून घेता आलेले नाही. असे असले तरी भारताला त्यांच्यापासून सावध राहावे लागेल.
’एकाना स्टेडियमच्या खेळपट्टीवर ऑफ-स्पिनर मोईन अली आणि लेग-स्पिनर आदिल रशीद या फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची ठरू शकेल. वेगवान गोलंदाज मार्क वूड आणि ख्रिस वोक्स यांनी कामगिरी उंचावणे गरजेचे आहे.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.
इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार/यष्टिरक्षक), डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो, जो रूट, लियाम लिव्हिंगस्टोन, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, मोईन अली, आदिल रशीद, सॅम करन, डेव्हिड विली, मार्क वूड, ख्रिस वोक्स, गस अॅटकिन्सन, ब्रायडन कार्स.
वेळ : दु. २ वाजता ल्लथेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, २, १ हिंदी, हॉटस्टार अॅप