India vs England ICC Cricket World Cup 2023 Highlights Match Updates: भारत आणि इंग्लंड यांच्यातील विश्वचषकाच्या २९व्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला चारीमुंड्या चीत करत २० वर्षाच्या पराभवाचा बदला घेतला. याविजयाने भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहचला असून गतविजेते हे बाहेर पडले आहेत. भारताने तब्बल १०० धावांनी इंग्लिश संघाचा पराभव केला. मुस्कारो आप लखनऊ मे हो! असे म्हणत भारतीय संघाने पाहुण्यांचा चांगलाच समाचार घेतला. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटूंनी इंग्लिश फलंदाजांची पळताभुई थोडी झाली.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने इंग्लंडला २३० धावांचे लक्ष्य दिले होते. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत नऊ विकेट्स गमावून २२९ धावा केल्या होत्या. भारतीय संघ असा एकमेव संघ आहे जो या विश्वचषकात आतापर्यंत ऑलआऊट झालेला नाही. भारतीय संघाची विजयी घौडदौड पुढे सुरूच आहे. भारताकडून रोहित शर्माने कर्णधारपदाची खेळी खेळली आणि ८७ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने ४९ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
भारताचा डाव
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने ४० धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या. शुबमन गिल नऊ धावा करून बाद झाला, विराट कोहली खाते न उघडता बाद झाला आणि श्रेयस अय्यर चार धावा करून बाद झाला. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोहलीला खातेही उघडता आले नाही. त्याचवेळी श्रेयस पुन्हा एकदा शॉर्ट बॉलवर बाद झाला. यानंतर रोहितने के.एल. राहुलबरोबर चौथ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. राहुल ५८ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने ३९ धावा करून बाद झाला. दरम्यान, रोहितने वन डे कारकिर्दीतील ५४ वे अर्धशतक पूर्ण केले. त्याने ६६ चेंडूत पन्नास धावा केल्या. यानंतर रोहितने सूर्यकुमारसोबत पाचव्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. शतकापासून १३ धावा दूर, आदिल रशीदच्या चेंडूवर रोहित लिव्हिंगस्टोनकरवी झेलबाद झाला. त्याने १०१ चेंडूत ८७ धावांच्या खेळीत १० चौकार आणि तीन षटकार ठोकले. रवींद्र जडेजा आठ धावा करून बाद झाला.
शेवटच्या काही षटकात सूर्याने चांगले फटके मारले आणि भारताची धावसंख्या २००च्या पुढे नेली. तो ४७ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४९ धावा करून बाद झाला. शमी एक धाव काढून बाद झाला. त्याचवेळी जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी नवव्या विकेटसाठी २१ धावांची भागीदारी केली. शेवटच्या चेंडूवर बुमराह धावबाद झाला. त्याला २५ चेंडूत १६ धावा करता आल्या. कुलदीप नऊ धावा करून नाबाद राहिला. इंग्लंडकडून विलीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. त्याला ख्रिस वोक्स आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत मदत केली. मार्क वुडला एक विकेट मिळाली.
CWC 2023 India vs England Highlights Score Updates in Marathi: भारत वि इंग्लंड लेटेस्ट स्कोअर अपडेट्स
एकदिवसीय विश्वचषकाच्या २९व्या सामन्यात भारताने गतविजेत्या इंग्लंडचा १०० धावांनी पराभव केला. लखनौच्या एकना स्टेडियमवर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने ५० षटकांत नऊ गडी गमावून २२९ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव ३४.५ षटकांत १२९ धावांत गारद झाला. टीम इंडियाने या स्पर्धेत सलग सहावा विजय मिळवला. त्याचबरोबर इंग्लंडचा सहा सामन्यांमधला हा पाचवा पराभव आहे. भारतीय संघ आता उपांत्य फेरी गाठण्याच्या जवळ आहे. त्याचवेळी इंग्लंडचा संघ स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे.
मोहम्मद शमीने इंग्लंडला नववा धक्का दिला. त्याने आदिल रशीदला क्लीन बोल्ड केले. ३४व्या षटकातील सहाव्या चेंडूवर रशीद बाद झाला. त्याने २० चेंडूत १३ धावा केल्या. मोहम्मद शमीला या सामन्यात चौथे यश मिळाले. भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे.
इंग्लंड १२२-९
कुलदीप यादवने इंग्लंडला आठवा धक्का दिला. ३०व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने लियाम लिव्हिंगस्टोनला (LBW) पायचीत केले. लिव्हिंगस्टोनने ४६ चेंडूत २७ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर आता इंग्लंडचा संघ पराभवाच्या उंबरठ्यावर उभा राहिला आहे. तो शेवटचा मुख्य फलंदाज होता. आता मार्क वुड डेव्हिड विलीसोबत क्रीजवर आहे. या सामन्यात कुलदीपला दुसरे यश मिळाले. यापूर्वी त्याने जोस बटलरला बाद केले होते.
इंग्लंड १०२-८
डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने भारताला सातवे यश मिळवून दिले. त्याने २९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ख्रिस वोक्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. २० चेंडूत १० धावा केल्यानंतर वोक्स यष्टीचीत झाला. त्याला पुढे येऊन मोठा फटका मारायचा होता, पण चेंडू बॅटवर बरोबरीने आला नाही. चेंडू यष्टीरक्षक के.एल. राहुलकडे गेला आणि त्याने कोणतीही चूक न करता वोक्सला यष्टीचीत केले.
इंग्लंड ९५-७
मोहम्मद शमीने भारताला सहावे यश मिळवून दिले. त्याने २४व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोईन अलीला बाद केले. मोईनने यष्टिरक्षक केएल राहुलकडे झेल दिला. त्याने ३१ चेंडूत १५ धावा केल्या. मोईन बाद झाल्यानंतर ख्रिस वोक्स लियाम लिव्हिंगस्टोनला साथ देण्यासाठी खेळपट्टीवर आला आहे.
इंग्लंड ८१-६
भारताविरुद्ध इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. कुलदीप यादवने टीम इंडियाला पाचवे यश मिळवून दिले. त्याने १६व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला क्लीन बोल्ड केले. बटलर २३ चेंडूत १० धावा करून तंबूत परतला. तो बाद झाल्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन खेळपट्टीवर आला आहे. मोईन अली दुसऱ्या बाजूला खेळत आहे.
इंग्लंड ५५-५
मोहम्मद शमीने जॉनी बेअरस्टोला बाद करून संघाला चौथे यश मिळवून दिले. या सामन्यातील त्याची ही दुसरी विकेट आहे. शमीने १०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बेअरस्टोला क्लीन बोल्ड केले. इंग्लंडच्या सलामीवीराने २३ चेंडूत १४ धावा केल्या होत्या. तो बाद झाल्यानंतर मोईन अली खेळपट्टीवर आला. दुसऱ्या बाजूला कर्णधार जोस बटलर उभा आहे.
इंग्लंड ४१-४
या सामन्यातच काय पूर्ण विश्वचषकात बेन स्टोक्सची बॅट चाललीच नाही. त्याला १० चेंडूत खातेही उघडता आले नाही आणि तो मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. इंग्लंडने आता तीन विकेट्स गमावल्या आहेत. त्यांनी आठ षटकात ३३ धावा केल्या आहेत. कर्णधार जोस बटलर जॉनी बेअरस्टोला साथ देण्यासाठी खेळपट्टीवर आला आहे.
इंग्लंड ३९-३
जसप्रीत बुमराहने भारताला दुहेरी यश मिळवून दिले. त्याने पाचव्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर डेव्हिड मलान आणि जो रूटला बाद केले. मलान १७ चेंडूत १६ धावा करून क्लीन बोल्ड झाला. त्याच्यानंतर जो रूट फलंदाजीला आलेल्या पहिल्याच चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. रूटने रिव्ह्यू घेतला, पण निर्णय भारताच्या बाजूने आला. इंग्लंडची धावसंख्या पाच षटकांत दोन बाद ३० धावा आहे. जॉनी बेअरस्टोसोबत बेन स्टोक्स क्रीजवर आहे.
इंग्लंड ३३-२
भारताने इंग्लंडला २३० धावांचे लक्ष्य दिले आहे. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत नऊ विकेट्स गमावून २२९ धावा केल्या. भारताने ठेवलेल्या या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली आहे. डेव्हिड मलान आणि जॉनी बेअरस्टो यांनी दोन षटकार बुमराह आणि सिराजला षटकात मोठे फटके खेळले.
इंग्लंड १८-०
विश्वचषकाचा २९वा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या दमदार फलंदाजीमुळे भारताने गतविजेत्यांसमोर २३० धावांचे माफक लक्ष्य ठेवले आहे. रोहितने १०१ चेंडूत ८७ धावा केल्या आणि सूर्यकुमार यादवने ४७ चेंडूत ४९ धावा केल्या.
भारत २२९-९
https://twitter.com/StarSportsIndia/status/1718607398875861284
रोहित शर्मा बाद होताच टीम इंडियाच्या एकापाठोपाठ एक विकेट्स पडल्या. एका बाजूला सूर्यकुमार यादव खेळपट्टीवर टिकून आहे. मात्र, दुसऱ्या बाजूने आता एकही फलंदाज शिल्लक नाही जो त्याला धावा करण्यासाठी साथ देऊ शकतो. त्यामुळे उरलेल्या षटकात टीम इंडिया किती धावा करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भारत १८३-७
भारताला ४१व्या षटकात १८२ धावांवर सहावा धक्का बसला. आदिल रशीदने रवींद्र जडेजाला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला १३ चेंडूत आठ धावा करता आल्या. ४१ षटकांनंतर भारताची धावसंख्या सहा गडी गमावून १८३ धावा आहे. सध्या मोहम्मद शमी सूर्यकुमार यादवला पाठिंबा देण्यासाठी आला आहे.
भारत १८३ -६
भारताला ३७व्या षटकात १६४ धावांवर पाचवा धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा १०१ चेंडूत १० चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ८७ धावा करून बाद झाला. त्याला आदिल रशीदने लिव्हिंगस्टोनच्या हाती झेलबाद केले. रोहितने सूर्यकुमारबरोबर पाचव्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. ३७ षटकांनंतर भारताची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात १६५ धावा आहे. सध्या रवींद्र जडेजा आणि सूर्यकुमार यादव खेळपट्टीवर आहेत.
भारत १७१-५
https://twitter.com/45Fan_Prathmesh/status/1718589299028050407
भारताची चौथी विकेट १३१ धावांवर पडली. लोकेश राहुल ५८ चेंडूत ३९ धावा करून बाद झाला. डेव्हिड विलीने त्याला जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद केले. इंग्लंडला अर्धशतकी भागीदारी तोडण्यात यश आले. भारताच्या दृष्टीने सूर्यकुमार यादवला रोहितची साथ देणे याठिकाणी आवश्यक आहे.
भारत १३१-४
आतापर्यंत रोहित शर्मा आणि के.एल. राहुलमध्ये चौथ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी झाली आहे. रोहित ७६ चेंडूत ६७ धावा तर के.एल. राहुल ५४ चेंडूत ३८ धावा करून खेळत आहे. २८ षटकांनंतर भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ११८ धावा आहे. टीम इंडियाला किमान जर २५० धावांच्या पेक्षा जास्त लक्ष्य इंग्लंडपुढे ठेवायचे असेल तर या दोघांचे खेळपट्टीवर टिकून राहणे आवश्यक आहे.
भारत १२२-३
भारताच्या डावातील २० षटके संपली आहेत. त्यात त्यांनी तीन गड्यांच्या मोबदल्यात ७४ धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्माने एक बाजू सांभाळून धरत शानदार अर्धशतक झळकावले. दुसरीकडे के.एल. राहुल २९ धावांवर नाबाद खेळत आहे. रोहितने त्याचे ५४वे अर्धशतक झळकावले.
भारत १००-३
१६व्या षटकात रोहित शर्माला जीवदान मिळाले. या षटकात मार्क वुड गोलंदाजी करत होता. पाचवा चेंडू सरळ जाऊन रोहितच्या पॅडला लागला. मैदानी पंच एड्रियन होल्डस्टॉकने बाद घोषित केले. यावर रोहितने निर्णय पुनरावलोकन प्रणाली (डीआरएस) वापरली. डीआरएस रिप्लेमध्ये चेंडू लेग स्टंप चुकत असल्याचे दिसून आले. त्यामुळे रोहित शर्मा बाद होता होता वाचलाे. पुढच्याच चेंडूवर म्हणजेच १६व्या षटकात रोहितने सहाव्या चेंडूवर चौकार मारून बदला घेतला. १९षटकांनंतर भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ७१ धावा आहे. सध्या कर्णधार रोहित शर्मा ५० चेंडूत ३९ धावा करून क्रीजवर आहे तर केएल राहुलने ५ धावा केल्या आहेत.
भारत ७१-३
१२व्या षटकात ४० धावांवर भारताला तिसरा धक्का बसला. श्रेयस अय्यर १६ चेंडूत चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तो मार्क वूडच्या हाती ख्रिस वोक्सकरवी झेलबाद झाला. शॉर्ट बॉलवर श्रेयस पुन्हा एकदा बाद झाला. ही त्याची कमजोरी आहे आणि या स्पर्धेत तो या चेंडूवर सलग तीनवेळा बाद झाला आहे. शॉर्ट बॉलवर मोठा फटका मारण्याच्या नादात श्रेयसची विकेट गेली. १२ षटकांनंतर भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ४० धावा आहे. रोहितला पाठिंबा देण्यासाठी के.एल. राहुल आला आहे.
भारत ४२-३
पॉवरप्लेमध्ये म्हणजे पहिली १० षटके इंग्लंडने शानदार गोलंदाजी केली. त्यात त्यांनी केवळ ३५ धावा देत दोन विकेट्स घेतल्या. ख्रिस वोक्सने शुबमन गिलला (९) त्रिफळाचीत केले, तर डेव्हिड विलीने विराट कोहलीला (०) स्टोक्सकरवी झेलबाद केले. सध्या रोहित शर्मा ३० चेंडूत २४ धावा करून खेळपट्टीवर आहे.
भारत ३५-२
आज, एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या २९व्या सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होत आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. भारताला दुसरा मोठा झटका बसला आहे. विराट कोहली भोपळाही न फोडता तंबूत परतला आहे. त्याला डेव्हिड विलीने बाद केले. त्यामुळे आता सर्व मदार कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या दोघांवर असणार आहे.
भारत २७-२
चौथ्या षटकात २६ धावांवर भारताला पहिला धक्का बसला. इनस्विंग बॉलवर ख्रिस वोक्सने शुबमन गिलला क्लीन बोल्ड केले. शुबमनला १३ चेंडूत ९ धावा करता आल्या. त्यात त्याने एक चौकार मारला. विराट कोहली आता कर्णधार रोहितला डाव सावरण्यासाठी मदत करायला आला आहे.
भारत २७-१
विलीचे पहिले षटक मेडन होते आणि त्याने विलीच्या दुसऱ्या षटकात त्याची भरपाई केली. या षटकात भारताने रोहितच्या दोन षटकार आणि एक चौकारासह १८ धावा केल्या. शुबमन गिलने दुसऱ्याच षटकात ख्रिस वोक्सच्या चेंडूवर चौकार मारून टीम इंडियाचे खाते उघडले.
भारत २२-०
भारतीय संघाचे सर्व खेळाडू आजच्या सामन्यात डाव्या हाताला काळी पट्टी घालून खेळणार आहेत. काही दिवसांपूर्वी भारताचे माजी दिग्गज खेळाडू फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून आज टीम इंडियाच्या खेळाडूंनी आज हाताला काळी पट्टी बांधली आहे.
केवळ दोनदा गतविजेत्यांना बाद फेरी गाठण्यात अपयश आले आहे. १९९२ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि १९९९ मध्ये श्रीलंकेला बाद फेरी गाठण्यात यश आले नव्हते. जर आजचा सामना इंग्लंडने गमावला तर ते स्पर्धेतून बाहेर पडणार हे निश्चित आहे. बटलरने प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.
https://twitter.com/BCCI/status/1718539655602385390
इंग्लंड: जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार/ यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड.
इंग्लंडने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माने भारतीय संघात कोणताही बदल केला नाही. दुसरीकडे जोस बटलरने देखील इंग्लंडच्या संघात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव या दोघांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
https://twitter.com/IFootcric68275/status/1718539946997522895
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा २९ ऑक्टोबर रोजी एकाना क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात कर्णधार म्हणून १०० एकदिवसीय सामने पूर्ण करणार आहे. रोहितने आतापर्यंत ९९ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून इंग्लंडविरुद्धचा हा सामना त्याच्या कर्णधारपदाचा १००वा सामना असेल. एक शानदार फलंदाज असण्यासोबतच भारतीय संघाचा कर्णधार म्हणून हिटमॅनचा विक्रमही प्रभावी आहे. रोहित शर्माचा खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ७०% पेक्षा जास्त विजयाचा विक्रम आहे.
लखनऊमध्ये हा विश्वचषकातील चौथा सामना असेल. आतापर्यंत येथे तीन सामने खेळले गेले आहेत. लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ तीनपैकी दोन सामने जिंकतो. आतापर्यंत ४७ विकेट्स पडल्या आहेत. त्यापैकी २६ विकेट्स वेगवान गोलंदाजांनी घेतल्या आहेत. त्याचबरोबर १५ विकेट्स फिरकी गोलंदाजांच्याही गेल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करेल, असे मानले जात आहे.
या विश्वचषकात भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा पराभव केला आहे. विजयाची मालिका कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया लखनऊमध्ये सज्ज झाली आहे.
दुसरीकडे, जर इंग्लंडबद्दल बोलायचे झाले तर गतविजेत्या संघाची अवस्था वाईट आहे. त्यांचा एकही फलंदाज फॉर्मात नाही. गोलंदाजही लयीत नाहीत. इंग्लंडचा संघ गेल्या काही सामन्यांमधून दोन-तीन बदलांसह येत आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. त्यानंतर बांगलादेशला हरवून त्याने पुनरागमन केले, मात्र त्यानंतर पराभवाची मालिका सुरू झाली. अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेनेही पराभूत केले होते.
CWC 2023 India vs England Highlights Score Updates in Marathi: भारत वि इंग्लंड लेटेस्ट स्कोअर अपडेट्स
टीम इंडियाने या स्पर्धेत सलग सहावा विजय मिळवला. त्याचबरोबर इंग्लंडचा सहा सामन्यांमधला हा पाचवा पराभव आहे. भारतीय संघ आता उपांत्य फेरी गाठण्याच्या जवळ आहे. त्याचवेळी इंग्लंडचा संघ स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे.