India vs England ICC Cricket World Cup 2023 Highlights Match Updates: भारत आणि इंग्लंड यांच्यातील विश्वचषकाच्या २९व्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला चारीमुंड्या चीत करत २० वर्षाच्या पराभवाचा बदला घेतला. याविजयाने भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहचला असून गतविजेते हे बाहेर पडले आहेत. भारताने तब्बल १०० धावांनी इंग्लिश संघाचा पराभव केला. मुस्कारो आप लखनऊ मे हो! असे म्हणत भारतीय संघाने पाहुण्यांचा चांगलाच समाचार घेतला. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटूंनी इंग्लिश फलंदाजांची पळताभुई थोडी झाली.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने इंग्लंडला २३० धावांचे लक्ष्य दिले होते. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत नऊ विकेट्स गमावून २२९ धावा केल्या होत्या. भारतीय संघ असा एकमेव संघ आहे जो या विश्वचषकात आतापर्यंत ऑलआऊट झालेला नाही. भारतीय संघाची विजयी घौडदौड पुढे सुरूच आहे. भारताकडून रोहित शर्माने कर्णधारपदाची खेळी खेळली आणि ८७ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने ४९ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
भारताचा डाव
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने ४० धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या. शुबमन गिल नऊ धावा करून बाद झाला, विराट कोहली खाते न उघडता बाद झाला आणि श्रेयस अय्यर चार धावा करून बाद झाला. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोहलीला खातेही उघडता आले नाही. त्याचवेळी श्रेयस पुन्हा एकदा शॉर्ट बॉलवर बाद झाला. यानंतर रोहितने के.एल. राहुलबरोबर चौथ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. राहुल ५८ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने ३९ धावा करून बाद झाला. दरम्यान, रोहितने वन डे कारकिर्दीतील ५४ वे अर्धशतक पूर्ण केले. त्याने ६६ चेंडूत पन्नास धावा केल्या. यानंतर रोहितने सूर्यकुमारसोबत पाचव्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. शतकापासून १३ धावा दूर, आदिल रशीदच्या चेंडूवर रोहित लिव्हिंगस्टोनकरवी झेलबाद झाला. त्याने १०१ चेंडूत ८७ धावांच्या खेळीत १० चौकार आणि तीन षटकार ठोकले. रवींद्र जडेजा आठ धावा करून बाद झाला.
शेवटच्या काही षटकात सूर्याने चांगले फटके मारले आणि भारताची धावसंख्या २००च्या पुढे नेली. तो ४७ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४९ धावा करून बाद झाला. शमी एक धाव काढून बाद झाला. त्याचवेळी जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी नवव्या विकेटसाठी २१ धावांची भागीदारी केली. शेवटच्या चेंडूवर बुमराह धावबाद झाला. त्याला २५ चेंडूत १६ धावा करता आल्या. कुलदीप नऊ धावा करून नाबाद राहिला. इंग्लंडकडून विलीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. त्याला ख्रिस वोक्स आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत मदत केली. मार्क वुडला एक विकेट मिळाली.
CWC 2023 India vs England Highlights Score Updates in Marathi: भारत वि इंग्लंड लेटेस्ट स्कोअर अपडेट्स
भारताने १९८३, १९९९ आणि २००३ मध्ये विश्वचषक जिंकला आहे. तर, इंग्लंडने १९७५, १९८७, १९९२ आणि २०१९ मध्ये विजय मिळवला आहे. २०११ मध्ये दोन्ही संघांमधील सामना बरोबरीत सुटला होता. अशा परिस्थितीत टीम इंडियाला २० वर्षांनंतर पुन्हा एकदा एकदिवसीय विश्वचषकात इंग्लंडला हरवायचे आहे.
KL Rahul is back to a ground that has given him life lessons & bittersweet memories ?️
— BCCI (@BCCI) October 28, 2023
On Sunday, he wants to make memories that he'll remember only for the good ??
Muskuraiye, KL Rahul Lucknow mein hai ?
WATCH ?? – By @28anand #TeamIndia | #CWC23 | #INDvENG
लखनऊची खेळपट्टी गेले वर्षभर वादात सापडली आहे. जानेवारीत भारत-न्यूझीलंड सामन्यानंतर खेळपट्टीच्या दुरवस्थेमुळे पिच क्युरेटरला हटवण्यात आले होते. खेळपट्टीवर असमान उसळी आणि वळण होते, ज्यावर फलंदाजांना प्रत्येक धाव काढणे देखील कठीण होते. आयपीएल २०२३ मध्येही ही खेळपट्टी सर्वांसाठी आश्चर्याचीच राहिली. संपूर्ण आयपीएलमधील ही सर्वात खराब खेळपट्टी मानली जात होती. त्यानंतर विश्वचषकासाठी येथे नव्या खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या.
या विश्वचषकात येथे तीन सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये फिरकीपटू खूप प्रभावी दिसले आहेत. मात्र, येथील वेगवान गोलंदाजांसाठी आजचा दिवस ठरू शकतो. कारण आज दोन्ही संघ या मैदानाच्या वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर खेळताना दिसणार आहेत.
आज हा सामना लाल मातीने बनवलेल्या खेळपट्टीवर खेळवला जाणार आहे. या मातीपासून बनवलेल्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना चेंडूची अतिरिक्त गती आणि उसळीमुळे अधिक मदत मिळू शकते. तसेच, खेळपट्टीवर गवत देखील दिसत आहे, जे वेगवान गोलंदाजांना अधिक मदत करते.
या मैदानावर खेळल्या गेलेल्या मागील तीन सामन्यांमध्ये फिरकीपटूंनी केवळ ४.७९च्या इकॉनॉमी रेटने धावा केल्या, तर वेगवान गोलंदाजांनी प्रति षटकात सरासरी ५.६३ धावा दिल्या. विकेट्स घेण्याच्या बाबतीत फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाज जवळपास समान आहेत. इतर मैदानांच्या तुलनेत येथे गोलंदाजांनी जास्त धावा केल्या आहेत. या तीन सामन्यांमध्ये फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. आजच्या सामन्यात खेळपट्टी वेगळी असली तरी फलंदाजांना गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करावा लागू शकतो.
लखनऊमध्ये दुपारी सामना सुरू होईल. Accuweather नुसार, त्या काळात तापमान ३२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पावसाची अजिबात शक्यता नाही. त्याच वेळी, रात्रीचे तापमान कमी होईल आणि ते १८ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. संध्याकाळी दवाचा परिणाम सामन्यावर दिसून येईल. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो. दव पडल्यावर गोलंदाजांना गोलंदाजी करताना अडचणी येतात आणि फलंदाजी सोपी होते.
पाऊस पडला तर काय होईल?
लखनऊमधील सामन्यादरम्यान पावसाची अजिबात शक्यता नाही, परंतु जर हवामान बदलले आणि पाऊस पडला तर दोन्ही संघांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. पावसामुळे सामना रद्द झाल्यास आम्हाला प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागेल. विश्वचषक स्पर्धेतील साखळी फेरीच्या सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस नाही.
भारतीय भूमीवर दोन्ही संघांच्या विक्रमांबद्दल बोलायचे झाले तर ५१ पैकी ३३ सामने भारताच्या नावावर आहेत. तर, इंग्लंडने १७ सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला.
भारत आणि इंग्लंड यांच्यात एकूण १०६ एकदिवसीय सामने झाले आहेत. यामध्ये भारताने ५७, तर इंग्लंडने ४४ जिंकले आहेत. दोन सामने अनिर्णित राहिले आणि तीन सामन्यांचा निकाल लागला नाही.
वर्ल्डकपमध्ये भारत आणि इंग्लंड दोन्ही संघांची आकडेवारी
एकूण सामने – ८
भारताने जिंकलेले सामने – ३
इंग्लंडने जिंकलेले सामने – ४
अनिर्णीत सामना – १
Hosts take on the defending champions ?
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 29, 2023
Who takes home the points in Lucknow?#CWC23 | #INDvENG pic.twitter.com/RhCYCojwCU
विश्वचषकाचा २९वा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. लखनऊ येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. भारताच्या नजरा सलग सहाव्या विजयाकडे लागल्यास इंग्लंडचा संघ पराभवाचा सिलसिला तोडण्याचा प्रयत्न करेल. गुणतालिकेत भारताचे पाच सामन्यांतून १० गुण आहेत. त्याचबरोबर इंग्लंडनेही तेवढेच सामने खेळले असून त्यांच्या खात्यात केवळ दोन गुण आहेत. आणखी एक पराभव झाल्यास ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल.
Can England make the semis? ?
— ICC (@ICC) October 29, 2023
Is India guaranteed a spot in the final four? ?#CWC23 State of Play ?https://t.co/favsNyo2cn

टीम इंडियाने या स्पर्धेत सलग सहावा विजय मिळवला. त्याचबरोबर इंग्लंडचा सहा सामन्यांमधला हा पाचवा पराभव आहे. भारतीय संघ आता उपांत्य फेरी गाठण्याच्या जवळ आहे. त्याचवेळी इंग्लंडचा संघ स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे.