India vs England ICC Cricket World Cup 2023 Match Updates: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा २९ ऑक्टोबर रोजी एकाना क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध सामन्यात कर्णधार म्हणून १००व्यांदा संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. एक शानदार फलंदाज असण्याबरोबरचं भारतीय संघाचा कर्णधार म्हणून हिटमॅनचा विक्रमही शानदार आहे. रोहित शर्माचा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये त्याच्या कर्णधारपदाखाली ७०% पेक्षा जास्त टीम इंडियाने विजयाचा विक्रम आहे.

सध्या सुरू असलेल्या आयसीसी विश्वचषकात भारताचा इंग्लंडविरुद्ध सामना होत असताना रोहित शर्मा १००व्यांदा टीम इंडियाचा कर्णधार म्हणून सामन्यात उतरणार आहे. खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅट म्हणजेच जर टी२० बद्दल बोलायचे तर, रोहित शर्माने एकूण ५१ वेळा संघाचे नेतृत्व केले आहे. यापैकी हिटमॅनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ३९ सामने जिंकले असून १२ सामने गमावले आहेत. त्यांचा टी२० मध्ये विजयाचा विक्रम ७६.४७% आहे.

Rohit Sharma to miss first Test against Australia Jasprit Bumrah to captain in Perth Devdutt Padikkal will be added in Team
IND vs AUS: रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून बाहेर, BCCIला दिली माहिती; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूला संघात स्थान मिळणार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
IND vs AUS Sourav Ganguly Says Rohit Sharma should be playing the Perth Test
IND vs AUS : ‘… तर रोहित पुन्हा कधीही ऑस्ट्रेलियाला जाणार नाही’, सौरव गांगुलीचे हिटमॅनबद्दल मोठं वक्तव्य
Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा

भारतीय संघाने एकाना येथे जरी खूप सामने खेळले नसले तरी जे काही खेळले आहेत त्यात कर्णधार म्हणून रोहितचे या स्टेडियमशी खास नाते निर्माण झाले आहे. शेवटचा जेव्हा या मैदानात सामना झाला होता तेव्हा त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० सामन्यात अप्रतिम शतक झळकावले होते. या लखनऊमधील मैदानावर आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारा एकमेव भारतीय संघाचा खेळाडू हिटमॅन आज या मैदानावर आणखी एक शतक करू शकतो.

हेही वाचा: IND vs ENG WC Live Score: विजयी षटकार मारण्यासाठी रोहित ब्रिगेड सज्ज! टीम इंडिया करणार इंग्लंडशी दोन हात

सध्याचा कसोटी कर्णधार रोहित शर्माने एकूण ९ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ५ विजय, २ पराभव आणि २ सामने अनिर्णीत राखण्यात यश मिळवले आहे. रोहित शर्माची वन डेतील कामगिरीही तितकीच चमकदार आहे. त्याने ३८ वेळा मेन इन ब्लूचे नेतृत्व केले असून त्यात २८ वेळा जिंकले आहे आणि ९ सामने हरले आहेत तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. अशा प्रकारे, रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाची विजयाची सरासरी ७३.६८% आहे.

लखनऊच्या मैदानाचा काय इतिहास?

लखनऊमध्ये हा विश्वचषकातील चौथा सामना असेल. आतापर्यंत येथे तीन सामने खेळले गेले आहेत. लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ तीनपैकी दोन सामने जिंकतो. आतापर्यंत ४७ विकेट्स पडल्या आहेत. त्यापैकी २६ विकेट्स वेगवान गोलंदाजांनी घेतल्या आहेत. त्याचबरोबर १५ विकेट्स फिरकी गोलंदाजांच्याही गेल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करेल, असे मानले जात आहे.

हेही वाचा: IND vs ENG WC Live Score: मागील विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ करणार इंग्लंडशी दोन हात, थोड्याच वेळात होणार नाणेफेक

टीम इंडिया २० वर्षांनंतर इंग्लंडला हरवण्याचा प्रयत्न करणार आहे

भारताने १९८३, १९९९ आणि २००३ मध्ये विश्वचषक जिंकला आहे. तर, इंग्लंडने १९७५, १९८७, १९९२ आणि २०१९ मध्ये विजय मिळवला आहे. २०११ मध्ये दोन्ही संघांमधील सामना बरोबरीत सुटला होता. अशा परिस्थितीत टीम इंडियाला २० वर्षांनंतर पुन्हा एकदा एकदिवसीय विश्वचषकात इंग्लंडला हरवायचे आहे.