भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. दुसऱ्या दिवशी भारताची फलंदाजी निष्फळ ठरली. फक्त ८८ धावांवर ७ गडी बाद झाले. पहिल्या डावात जेम्स अँडरसननं ५ गडी बाद केले. रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना तंबूचा रस्ता दाखवला. जेम्स अँडरसननं ३१ वेळा पाच गडी बाद केले आहेत. जेम्स अँडरसननं एकूण २९ षटकं टाकली. त्यात त्याने ७ षटकं निर्धाव टाकली. तर ५ गडी बाद करत ६२ धावा दिल्या.

दुसरीकडे अँडरसनने पाच गडी बाद करत आणखी एक विक्रम प्रस्थापित केला आहे. एका मैदानात सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. अँडरसननं आतापर्यंत लॉर्ड्स मैदानावर भारताविरुद्ध ३३ गडी बाद केले आहेत. यापूर्वी भारताविरुद्ध सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या मुथैया मुरलीधरनच्या नावावर होता. मुरलीधरनने कोलंबोतील एसएससी मैदानात २९ भारतीय खेळाडू बाद केले आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने नाथन लॉयननं एडिलेड ओवल मैदानात २६ गडीआणि पाकिस्तानच्या इमरान खानने  कराचीतील नॅशनल स्टेडियम मैदानात २४ गडी बाद केले आहेत. जेम्स अँडरसने आतापर्यंत १६४ सामने खेळला आहे. त्यात त्याने ३५ हजाराहून अधिक चेंडू टाकले आहेत. यात त्याने १६ हजार ५८४ धावा दिल्या आहेत. तर ६२६ गडी बाद केले. त्याने दोन्ही कसोटीतील दोन्ही डावात ३१ वेळा ५ गडी, तर ३ वेळा १० गडी बाद केले आहेत.

जेम्स अँडरसननं लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात आणखी एक विक्रम प्रस्थापित केला आहे. कसोटी सामन्यात ३५ हजाराहून अधिक चेंडू टाकण्याचा विक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला वेगवान गोलंदाज असून चौथा गोलंदाज आहे. अँडरसनपूर्वी अशी कामगिरी तीन फिरकीपटूंच्या नावावर आहे. श्रीलंकेच्या मुथैया मुरलीधरनने ४४,०३९, भारताच्या अनिल कुंबलेने ४०,८५० चेंडू, तर ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नने ४०,७०५ चेंडू टाकले आहेत.

Story img Loader