इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी डीआरएसवरून कर्णधार विराट कोहली, यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्या तू तू मै मै पाहायला मिळाली. ऋषभ पंतचं म्हणणं होतं की डीआरएस नको, पण विराटने ऐनवेळी हात वर करून डीआरएस घेतला आणि डीआरएस वाया घालवाला. सिराजने सलग दोन चेंडूवर दोन गडी बाद केल्याने त्याचा आत्मविश्वास दुणावला होता. मात्र रॉरी बर्न्स आणि कर्णधार जो रूट इंग्लंडचा डाव सावरण्यासाठी प्रयत्न सुरु केला. यावेळी संघाच्या धावसंख्या ३९ असताना जो रुटच्या पायावर चेंडू आदळला. यानंतर सिराजने पायचीतसाठी जोरदार अपील केली. मात्र पंचांनी बाद नसल्याचं सांगितलं.

मोहम्मद सिराजचा आत्मविश्वास पाहता कर्णधार कोहलीने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. मात्र यष्टीरक्षक ऋषभ पंतने त्याला डीआरएस घेऊन नको असं सांगितलं. मात्र सिराजने डीआरएससाठी आग्रह धरला. तरी ऋषभ पंत तसं करू नको असं वारंवार सांगत होता. त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून विराटने डीआरएस घेतला. यामुळे काही काळ मैदानात संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळालं. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी डीआरएसमध्ये जो रुट नाबाद असल्याचं सांगितलं. विराट कोहलीने एक नाही, तर जो रूटसाटी महत्त्वाचे दोन रिव्ह्यू वाया घालवले.

डीआरएसवरून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विराट कोहलीला धारेवर धरलं आहे. माजी क्रिकेटपटू वसीम जाफरनेही मजेशीर ट्वीट करून डीआरएसचा फुल फॉर्म लिहिला आहे. डीआरएस म्हणजेच डोन्ट रिव्ह्यू सिराज असं ट्वीट त्याने केलं आहे.

दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने ३ गडी गमवून ११९ धावा केल्या आहेत. अजून भारताकडे २४५ धावांची आघाडी आहे. मोहम्मद सिराज दोन आणि मोहम्मद शमीने १ गडी बाद केला. तर इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा यांना एकही गडी बाद करता आला नाही. मोहम्मद सिराजने भेदक गोलंदाजी करत दोन गडी लागोपाठ बाद केले. इंग्लंडची धावसंख्या २३ असताना डोम सिबलीला बाद केलं. त्यानंतर आलेल्या हसीब हमीदला खातंही खोलू दिलं नाही. त्याचा त्रिफळा उडवला. इंग्लंड रॉरी बर्न्सनं ४९ धावांची खेळी केली. मात्र त्याचं अर्धशतक एका धावेनं हुकलं. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. जो रुद ४८ धावांवर तर जॉनी बेअरस्टो ६ धावांवर मैदानात खेळत आहेत.

Story img Loader