Asia Cup 2022 India vs Hong Kong: संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या आशिया कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून जोरदार सुरुवात केली आहे. आता ३१ ऑगस्टला टीम इंडिया हाँगकाँगशी आमने सामने येणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिय येथे भारत विरुद्ध हॉंगकॉंग सामना पार पडणार आहे. हा सामना भारतीय संघाला महत्त्वाचा असणार आहे कारण या सामन्यात विजयी झाल्यास टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

(Viral Video: कॉन्फिडन्स असावा तर असा! विजयी षटकार मारण्याआधी पांड्याने केलं असं काही की…)

पाकिस्तान विरुद्ध भारताच्या या विजयात रोहित शर्माचे वैयक्तिक योगदान साधारण होते. रोहितने १८ चेंडूत केवळ १२ धावा केल्या पण तरीही T20 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ३४९९ धावांसह रोहित दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.हॉंगकॉंग विरुद्धच्या येत्या सामन्यात टीम इंडिया विजयी झाल्यास रोहितच्या नावे नवा विक्रम नोंदवला जाणार आहे.

Asia Cup 2022: एकीकडे भारत-पाक सामना रंगत असताना तिकडे कोहली-रोहित.. ‘तो’ क्षण झाला कॅमेऱ्यात कैद

पाकिस्तान विरुद्धच्या विजयासह रोहित शर्माने आशिया चषक स्पर्धेत सलग सहा विजय मिळवले आहेत. आशिया कप सामन्यातील कर्णधार म्हणून प्राप्त केलेले ६ विजय हे सर्वाधिक असून हा विक्रम एमएस धोनी आणि मोईन खान यांच्या नावे आहे. जर हाँगकाँग विरुद्धचा सामना भारताने जिंकला तर सात विजयांसह रोहित शर्मा या यादीत प्रथम क्रमांकावर येईल. रोहितसाठी हा एक महत्त्वाचा विक्रम असेल. २०१८ मध्ये अफगाणिस्तान विरुद्धचा बरोबरीचा ससामन्याचा अपवाद वगळल्यास रोहितच्या नेतृत्वाखाली भारत अपराजित राहिला.

(Video: “बाबर आझम कसा कर्णधार झाला कळेना”.. IND vs PAK नंतर शोएब अख्तरची टीका; रोहित शर्मालाही सुनावले)

हाँगकाँग विरुद्धचा सामना जिंकून भारतीय संघ आशिया चषक २०२२ च्या ग्रुप-ए मध्ये अव्वल स्थान कायम ठेवू शकेल. यावेळी प्लेइंग ११ च्या संघात रोहित शर्मा काही बदल करणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Story img Loader