India vs Ireland, 1st T20 Match Updates: भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना भारताने डकवर्थ लुईस पद्धतीने दोन धावांनी जिंकला आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने सात विकेट गमावत १३९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने ६.५ षटकांत दोन गडी गमावून ४७ धावा केल्या. यानंतर पावसामुळे खेळ होऊ शकला नाही आणि भारताने डकवर्थ लुईस पद्धतीने दोन धावांनी विजय मिळवला.
आयर्लंडकडून बॅरी मॅकार्थीने शानदार फलंदाजी केली. त्याने नाबाद ५१ धावा केल्या. कर्टिस कॅम्फरने ३९ धावांचे योगदान दिले. या दोघांशिवाय केवळ पॉल स्टर्लिंग आणि मार्क अॅडायर यांना दुहेरी आकडा पार करता आला. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी अर्शदीपला एक विकेट मिळाली. मात्र, अर्शदीप त्याच्या अखेरच्या षटकात चांगलाच महागात पडला. भारताकडून यशस्वीने २४ धावा केल्या. तिलक वर्मा खाते उघडू शकला नाही. नाहीत आणि संजू एक आणि ऋतुराज गायकवाड १९ धावांवर नाबाद राहिले.
India VS Ireland 1st T20 Match Updates भारत विरुद्ध आयर्लंड पहिला टी-२० अपडेट्स
टीम इंडियाने डीएलएस पद्धतीने हा सामना २ धावांनी जिंकला आहे. या सामन्यात टीम इंडियाने फक्त ६ षटके खेळली. त्यानंतर पावसाने संपूर्ण खेळ वाया गेला.
पावसामुळे खेळ थांबला आहे. १४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ६.५ षटकांत दोन गडी गमावून ४७ धावा केल्या आहेत. डकवर्थ-लुईस नियमानुसार, भारत निर्धारित स्कोअरच्या दोन धावांनी पुढे आहे आणि आता पावसामुळे खेळ रद्द झाल्यास टीम इंडिया जिंकेल.
डब्लिनमध्ये पावसामुळे खेळ थांबवावा लागला आहे. पावसामुळे खेळ थांबेपर्यंत टीम इंडियाने ६.५ षटकात २ बाद ४७ धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. सध्या ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन क्रीजवर आहेत. आता भारतीय संघाला विजयासाठी ९३ धावांची गरज आहे.
क्रेग यंगने सातव्या षटकात टीम इंडियाच्या २ खेळाडूंना बाद केले. या गोलंदाजाने प्रथम यशस्वी जैस्वालला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, त्यानंतर पहिल्याच चेंडूवर तिलक वर्माला आपला बळी बनवले. भारताची धावसंख्या ६.५ षटकांनंतर २ बाद ४७ धावा आहे.
भारताची धावसंख्या ५ षटकांनंतर बिनबाद 33 धावा. टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर क्रीजवर आहेत. आता भारतीय संघाला विजयासाठी १०७ धावांची गरज आहे.
१४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी सुरू झाली आहे. ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल यांनी डावाला सुरुवात केली आहे. दोघेही चांगले खेळत आहेत आणि चांगली फलंदाजी करत आहेत. तीन षटकांनंतर भारताची धावसंख्या बिनबाद १६ अशी आहे.
भारतीय संघाची धावसंख्या २ षटकांनंतर १३ धावा. यावेळी ऋतुराज गायकवाड ४ चेंडूत ३ धावा करून खेळत आहे. त्याचबरोबर यशस्वी जैस्वाल ९ चेंडूत १० धावा करून नाबाद आहे. त्याचवेळी आयर्लंडचे गोलंदाज पहिल्या विकेटच्या शोधात आहेत.
आयर्लंडच्या १३९ धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड क्रीझवर आहेत. पहिल्या षटकानंतर भारताची धावसंख्या बिनबाद १० धावा आहे.
आयर्लंडने भारतासमोर विजयासाठी १४० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आयर्लंडने २० षटकांत ७ विकेट गमावत १३९ धावा केल्या. अशाप्रकारे टीम इंडियाला पहिला टी-२० सामना जिंकण्यासाठी १४० धावांचे लक्ष्य मिळाले आहे. तत्पूर्वी, भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या आयर्लंडची सुरुवात खराब झाली.
या संघाने पहिल्याच षटकात ३ विकेट गमावल्या. त्याचवेळी, यानंतरही विकेट्स पडण्याची प्रक्रिया सुरूच राहिली, पण बॅरी मॅकग्राथी आणि कर्टिस कॅम्फर यांच्यात सातव्या विकेटसाठी पन्नासहून अधिक धावांची भागीदारीने संघाची धावसंख्या १३९ धावांपर्यंत पोहोचवली. बॅरी मॅकग्राथीने ३३ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या, तर कर्टिस कॅम्पफरने ३३ चेंडूत ३९ धावांचे योगदान दिले. भारताकडून कर्णधार जसप्रीत बुमराहशिवाय प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोईने २-२ बळी घेतले. त्याचबरोबर अर्शदीप सिंगने १ विकेट आपल्या नावावर केली.
अर्शदीप सिंगने टीम इंडियाला मोठे यश मिळवून दिले आहे. वास्तविक, या वेगवान गोलंदाजाने शानदार फलंदाजी करणाऱ्या कर्टिस कॅम्पफरला बाद केले. कर्टिस कॅम्पफरने ३३ चेंडूत ३९ धावांचे योगदान दिले. त्याचवेळी बॅरी मॅकग्रा आणि कर्टिस कॅम्पफर यांच्यात सातव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी झाली. आता आयर्लंडची धावसंख्या १९ षटकांत ७ बाद ११९ अशी आहे.
अर्शदीप सिंगने घातक कर्टिस कॅम्फरला क्लीन बोल्ड करत भारताचा मोठा अडसर दूर गेला, कर्टिस कॅम्फर ३३ चेंडूत ३९ धावा काढून बाद झाला.
आयर्लंडची धावसंख्या १७ षटकांत ६ बाद ११४ अशी आहे. बॅरी मॅकग्रा २३ चेंडूत ३१ धावांवर खेळत आहे. कर्टिस कॅम्फर २८ चेंडूत ३७ धावा करून क्रीजवर आहे. बॅरी मॅकग्रा आणि कर्टिस कॅम्फर यांच्यात सातव्या विकेटसाठी ३६ चेंडूत ५१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली आहे.
१५ षटकांनंतर आयर्लंडची धावसंख्या ६ बाद ८६ अशी आहे. बॅरी मॅकग्रा आणि कर्टिस कॅम्फर यांनी सातव्या विकेटसाठी २७ चेंडूत २७ धावांची भागीदारी केली. बॅरी मॅकग्रा १७ चेंडूत १६ धावांवर खेळत आहे. कर्टिस कॅम्फर २२ चेंडूत २५ धावा करून क्रीजवर आहे.
आयर्लंडची धावसंख्या १३ षटकांत ६ बाद ७२ अशी आहे. रवी बिश्नोईने १३व्या षटकात ९ धावा दिल्या. आयर्लंडकडून बॅरी मॅकग्रा आणि कर्टिस कॅम्फर क्रीजवर आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये सातव्या विकेटसाठी १८ चेंडूत १५ धावांची भागीदारी झाली.
भारतीय फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईने आयर्लंडला सहावा धक्का दिला आहे. रवी बिश्नोईने मार्क अडायरला बाद केले. मार्क अडायरने १६ चेंडूत १६ धावांचे योगदान दिले. आता आयर्लंडची धावसंख्या ११ षटकांत ६ बाद ५९ अशी आहे.
भारतीय संघाकडून शिवम दुबेने नववे षटक टाकले. या षटकात आयर्लंडच्या फलंदाजांनी ६ धावा केल्या. आयर्लंडची धावसंख्या ९ षटकांनंतर ५ गडी बाद ५० धावा झाली आहे.
प्रसिद्ध कृष्णाने पदार्पणाच्या सामन्यातच कर्णधार जसप्रीत बुमराहला बरोबरीची साथ दिली आहे. त्याने दोन विकेट घेत पहिला सामना संस्मरणीय बनवला आहे. जॉर्ज डॉकरेल अवघ्या १ धाव करून ऋतुराज गायकवाडकडच्या हाती झेलबाद झाला.
आयर्लंड संघाची टॉप ऑर्डर कोलमडली आहे. भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजाने ३ बळी घेतले, तर फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईने कर्णधार पॉल स्टर्लिंगला येताच एक उत्कृष्ट गुगली टाकून क्लीन बोल्ड केले.
भारताकडून पदार्पण करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णालाही त्याची पहिली टी-२० आंतरराष्ट्रीय विकेट मिळाली. त्याने हॅरी टेक्टर अवघ्या ९ धावांवर तिलक वर्माच्या हाती झेलबाद झाला.
सुरुवातीच्या दोन धक्क्यांनंतर आयर्लंडचा डाव कर्णधार पॉल स्टर्लिंगने सांभाळला आहे. ४ षटकांनंतर आता संघाची धावसंख्या २ बाद २१ धावा आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली आहे. पहिल्याच षटकात भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने दोन विकेट घेत आयर्लंडला बॅकफूटवर आणले आहे. ३२७ दिवसांनंतर पुनरागमन करणाऱ्या बुमराहने अँड्र्यू बालबर्नीला प्रथम क्लीन बोल्ड केले. बालबर्नीने दोन चेंडूत चार धावा केल्या. डावाच्या पहिल्या चेंडूवर त्याने चौकार मारला, पण पुढच्याच चेंडूवर त्याला बुमराहने क्लीन बोल्ड केले. त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर बुमराहने लॉरन टकरला झेलबादबाद केले.
जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्याच षटकात आयर्लंडला दुसरा धक्का दिला आहे. अँड्र्यू बालबर्नीनंतर फलंदाजीला आलेला लॉर्कन टकर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.
भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने सामन्याच्या दुसऱ्या चेंडूवर आयर्लंडला पहिला धक्का दिला आहे. बुमराहच्या गोलंदाजीवर अँड्र्यू बालबर्नी ४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
जसप्रीत बुमराह हा टी-२० मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरणार आहे. या फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व करणारा बुमराह हा ११वा खेळाडू ठरला आहे. वीरेंद्र सेहवागने प्रथम टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व केले होते.
आयर्लंड: पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट.
भारत: ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह (कर्णधार), रवी बिश्नोई.
आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रिंकू सिंग आणि प्रसिद्ध कृष्णाला पदार्पणाची कॅप मिळाली.
रिंकू सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा यांना आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात पदार्पण कॅप देण्यात आली आहे. हे दोन्ही खेळाडू टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहेत. या दौऱ्यासाठी रिंकू सिंगची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड झाली होती.
भारतीय वेळेनुसार हा सामना सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल. सामन्याची नाणेफेक संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारताचा युवा संघ आपली ताकद दाखवेल. या सामन्याला पावसाचा अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सामना सुरु होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
आयर्लंड संघ: अँड्र्यू बालबर्नी, पॉल स्टर्लिंग (कर्णधार), लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, गॅरेथ डेलेनी, कर्टिस कॅम्पर, जॉर्ज डॉकरेल, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट, फिओन हँड, क्रेग यंग, थिओ व्हॅनगार्ड वोएर्कोम, रॉस अडायर.