India vs Ireland 2nd T20 Playing 11 : भारतीय टी २० संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर गेला आहे. भारत आणि यजमान संघात दोन सामन्यांची टी २० मालिका खेळवली जाणार आहे. यातील दुसरा सामना आज डबलिनमधील ‘द व्हिलेज स्टेडियम’वर (मालाहाइड) होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ९ वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघातील काही खेळाडू सध्या इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे बहुतेक नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला संघ आर्यलंडमध्ये दाखल झालेला आहे. आयपीएल विजेता कर्णधार हार्दिक पंड्याकडे भारतीय टी २० संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या संघाने रविवारी (२६ जून) झालेला पहिला सामना सात गडी राखून जिंकला. या सामन्यात पाऊस अडथळा ठरला होता त्यामुळे दोन्ही डावांमध्ये प्रत्येकी १२ षटकांचा खेळ घेण्यात आला. आयर्लंडने दिलेले १०९ धावांचे लक्ष्य भारताने १६ चेंडू शिल्लक असतानाच पूर्ण केले होते. पहिला सामना जिंकल्याने दोन सामन्यांच्या मालिकेत भारताला १-० अशी आघाडी मिळालेली आहे. आज होणारा दुसऱ्या आणि शेवटचा सामना जिंकून मालिका आपल्या खिश्यात घालण्यास भारतीय संघ उत्सुक असेल. तर, यजमान हा सामना जिंकून मालिका बरोबरी सोडण्याचा प्रयत्न करतील.

पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे फलंदाजी करू शकला नव्हता. आजच्या सामन्यातही तो खेळेल की नाही याबाबत शाश्वती नाही. त्यामुळे त्याच्या जागी राहुल त्रिपाठीला पदार्पणाची संधी मिळू शकते. याशिवाय आवेश खानच्या जागी अर्शदीप सिंगलाही संधी मिळू शकते. असे झाले तर अर्शदीपच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीलाही सुरुवात होईल.

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत चार टी-२० सामने झाले असून सर्व सामन्यांमध्ये भारताला विजय मिळाला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. ‘द व्हिलेज स्टेडियम’वर साधारणपणे १८० ते १८५ धावसंख्या अपेक्षित आहे. भारताने यामैदानावर २००पेक्षा जास्त धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला होता.

दरम्यान, पहल्या सामन्याप्रमाणे आजच्या सामन्यावरही हवामानाचा परिणाम होऊ शकतो. हवेमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असेल. तर, दिवसभरात एक किंवा दोनदा पावसाच्या सरीही कोसळू शकतात. सामना सुरू होण्याच्यावेळी पावसाने व्यत्यय आणला तर आजही षटकांची संख्या कमी झालेली दिसू शकते.

संभाव्य भारतीय संघ – ईशान किशन, राहुल त्रिपाठी/संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, हार्दिक पंड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, युझवेंद्र चहल.

आयर्लंड संभाव्य संघ – पॉल स्टर्लिंग, अँड्रयू बालबर्नी (कर्णधार), गॅरेथ डेलानी, हॅरी टेक्टर, लोर्कन टकर (यष्टिरक्षक), जॉर्ज डॉकरेल, अँडी मॅकब्राईन, मार्क अडायर, क्रेग यंग, जोशुआ लिटील, कोनोर ओल्फर्ट