India vs Ireland, 2nd Match Updates: भारताने आयर्लंडचा 33 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका जिंकली. भारतीय संघाने टी-२० मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना १८५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ केवळ १५२ धावा करू शकला आणि सामना गमावला.

Live Updates

IND vs IRE 2nd T20 Score Today भारत विरुद्ध आयर्लंड दुसरी टी-२० लाइव्ह अपडेट्स:

23:05 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20 : भारताने जसप्रीत बुमराहच्या नेतृत्त्वाखाली जिंकली पहिली मालिका, दुसऱ्या सामन्यात आयर्लंडवर ३३ धावांनी विजय

भारताने आयर्लंडचा 33 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका जिंकली. भारतीय संघाने टी-२० मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना १८५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ केवळ १५२ धावा करू शकला आणि सामना गमावला.

https://twitter.com/BCCI/status/1693314284439425259?s=20

22:51 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: आयर्लंडला 12 चेंडूत 51 धावांची गरज आहे.

आयर्लंडला विजयासाठी शेवटच्या 12 चेंडूत 51 धावा कराव्या लागतील. आयर्लंडची धावसंख्या 18 षटकांत 7 बाद 141 धावा. आयर्लंडकडून मार्क एडेअर आणि क्रेग यंग क्रीजवर आहेत.

https://twitter.com/BCCI/status/1693311069660516844?s=20

22:41 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: जसप्रीत बुमराहने बॅरी मॅकार्थीला केले बाद

भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने आयर्लंडच्या डावातील 17वा चेंडू टाकला. या षटकात जसप्रीत बुमराहने बॅरी मॅकार्थीला बाद केले. अशाप्रकारे आयर्लंडला सातवा धक्का बसला. 17 षटकांनंतर आयर्लंडची धावसंख्या 7 बाद 128 आहे. आयर्लंडला विजयासाठी शेवटच्या 18 चेंडूत 58 धावा कराव्या लागतील.

https://twitter.com/BCCI/status/1693307806429127024?s=20

22:38 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: अर्शदीप सिंगने अँड्र्यू बालबिर्नीला केले बाद

आयर्लंडला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने अँड्र्यू बालबर्नीला बाद केले आहे. अँड्र्यू बालबर्नीने 51 चेंडूत 72 धावांची शानदार खेळी केली. आयर्लंडची धावसंख्या 16 षटकांत 6 बाद 124 अशी आहे. यजमानांना विजयासाठी शेवटच्या 24 चेंडूत 62 धावांची गरज आहे.

https://twitter.com/BCCI/status/1693307806429127024?s=20

22:36 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: आयर्लंडला पाचवा धक्का बसला

आयर्लंडला पाचवा धक्का बसला आहे. वास्तविक, जॉर्ज डॉकरेल धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. जॉर्ज डॉकरेलने 11 चेंडूत 13 धावा केल्या. आता आयर्लंडची धावसंख्या 5 विकेटवर 115 धावा आहे.

https://twitter.com/BCCI/status/1693307806429127024?s=20

22:30 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: आयर्लंडने 100 धावांचा टप्पा ओलांडला

आयर्लंडची धावसंख्या 14 षटकांत 4 बाद 102 अशी आहे. सलामीवीर अँड्र्यू बालबर्नीने पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. अँड्र्यू बालबर्नी 44 चेंडूत 55 धावा करून खेळत आहे. जॉर्ज डॉकरेल 10 चेंडूत 12 धावा करून क्रीजवर आहे. आयर्लंडला 36 चेंडूत 86 धावा हव्या आहेत. अर्धशतक झळकावल्यानंतर खेळणाऱ्या अँड्र्यू बालबर्नीवर आयर्लंडच्या चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

https://twitter.com/BCCI/status/1693306240431259965?s=20

22:18 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: जसप्रीत बुमराहच्या षटकात 4 धावा झाल्या

12 षटकांनंतर आयर्लंडची धावसंख्या 4 बाद 81 अशी आहे. जसप्रीत बुमराहने 12व्या षटकात 4 धावा दिल्या. आता आयर्लंडला विजयासाठी 48 चेंडूत 102 धावा कराव्या लागतील.

https://twitter.com/BCCI/status/1693303773521940643?s=20

22:15 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: शिवम दुबे महागडे षटक

शिवम दुबेने आयर्लंडच्या डावातील 12वे षटक टाकले. या षटकात आयर्लंडच्या फलंदाजांनी 2 षटकारांसह 14 धावा केल्या. 11 षटकांनंतर आयर्लंडची धावसंख्या 4 बाद 76 अशी आहे.

https://twitter.com/BCCI/status/1693301890816319879?s=20

22:10 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: रवी बिश्नोईने कर्टिस कॅम्फरला केले बाद

कर्टिस कॅम्फरला बाद करून रवी बिश्नोईने आयर्लंडला मोठा धक्का दिला आहे. अशाप्रकारे यजमान संघाचा चौथा फलंदाज पॅव्हेलियनमध्ये गेला आहे. आता आयर्लंडची धावसंख्या 10.2 षटकांत 4 बाद 64 अशी आहे. कर्टिस कॅम्फरच्या जागी जॉर्ज डॉकरेल फलंदाजीला आला आहे.

https://twitter.com/BCCI/status/1693301341685461492?s=20

22:05 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: 9 षटकांनंतर आयर्लंडची धावसंख्या 3 बाद 57

आयर्लंडची धावसंख्या 9 षटकांनंतर 3 बाद 57 धावा. इथून आयर्लंडला 66 चेंडूत 129 धावांची गरज आहे.

https://twitter.com/BCCI/status/1693298993391092123?s=20

22:01 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: अँड्र्यू बालबर्नी आणि कर्टिस कॅम्फर गियर बदलला

8 षटकांनंतर आयर्लंडची धावसंख्या 3 बाद 53 अशी आहे. आयर्लंडकडून अँड्र्यू बालबर्नी आणि कर्टिस कॅम्फर क्रीजवर आहेत. त्याचवेळी, आतापर्यंत भारतासाठी प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या आहेत. तर रवी बिश्नोईला 1 यश मिळाले आहे.

https://twitter.com/BCCI/status/1693298993391092123?s=20

21:51 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: रवी विश्णोईच्या गुगलीवर हॅरी टेक्टरची दांडी गुल! आयर्लंडला बसला तिसरा झटका

28 धावांच्या स्कोअरवर आयर्लंडची तिसरी विकेट पडली. रवी बिश्नोईने हॅरी टेक्टरला क्लीन बोल्ड केले. टेक्टरने सात चेंडूंत सात धावा केल्या. कर्टिस कॅम्फर आता अँड्र्यू बालबिर्नीसोबत क्रीजवर आहे. सहा षटकांनंतर आयर्लंडची धावसंख्या तीन बाद ३१ धावा.

https://twitter.com/BCCI/status/1693294655289385178?s=20

21:43 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: प्रसिद्ध कृष्णाने आयर्लंड संघाला दिला पहिला झटका, कर्णधार पॉल स्टर्लिंगला भोपळाही फोडू शकला नाही

पॉल स्टर्लिंगनंतर प्रसिद्ध कृष्णाने लॉर्कन टकरला आपला बळी बनवले. अशाप्रकारे आयर्लंडला दुसरा धक्का बसला. आता आयर्लंडची धावसंख्या 4 षटकांत 2 बाद 22 अशी आहे. आयर्लंडकडून अँड्र्यू बालबर्नी आणि हॅरी टेक्टर क्रीजवर आहेत.

https://twitter.com/2611Anshu/status/1693294275688280177?s=20

21:40 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: प्रसिद्ध कृष्णाने आयर्लंड संघाला दिला पहिला झटका, कर्णधार पॉल स्टर्लिंगला भोपळाही फोडू शकला नाही

प्रसिद्ध कृष्णाने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. प्रसिद्ध कृष्णाने कॅप्टन पॉल स्टर्लिंगला बाद केले. आयर्लंडची धावसंख्या 1 गडी बाद 19 धावा.

https://twitter.com/BCCI/status/1693292931090882968?s=20

21:34 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: अर्शदीपचे षटक ठरले महागडे

आयर्लंडची धावसंख्या 2 षटकांनंतर 18 धावा. या षटकात आयर्लंडच्या फलंदाजांनी 10 धावा केल्या. अँड्र्यू बालबर्नी 10 चेंडूत 12 धावा करून खेळत आहे. कर्णधार पॉल स्टर्लिंगच्या बॅटमधून धावा निघालेल्या नाहीत.

https://twitter.com/BCCI/status/1693291647986233782?s=20

21:27 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: क्रीजवर आयर्लंडचे सलामीवीर अँड्र्यू बालबर्नी आणि पॉल स्टर्लिंग

आयर्लंडचे सलामीवीर अँड्र्यू बालबर्नी आणि पॉल स्टर्लिंग क्रीजवर आहेत. त्याचवेळी कर्णधार जसप्रीत बुमराह भारतासाठी पहिले षटक टाकले. 186 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडने 8 धावा केल्या आहेत.

https://twitter.com/BCCI/status/1693286239435358587?s=20

21:17 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: शेवटच्या षटकात रिंकू सिंग आणि शिवम दुबेची वादळी खेळी, भारताचे आयर्लंडसमोर १८६ धावांचे लक्ष्य

भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट गमावत 185 धावा केल्या. अशाप्रकारे आयर्लंडसमोर विजयासाठी 186 धावांचे लक्ष्य आहे. भारतीय फलंदाज रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांनी शेवटच्या 2 षटकात 42 धावा केल्या. रिंकू सिंगने 21 चेंडूत 38 धावा केल्या. त्याचबरोबर शिवम दुबे 16 चेंडूत 22 धावा करून नाबाद परतला. तत्पूर्वी, ऋतुराज गायकवाडने 43 चेंडूत 58 धावांची खेळी केली. तर संजू सॅमसनने 26 चेंडूत 40 धावांचे योगदान दिले. आयर्लंडकडून बॅरी मॅकार्थीने सर्वाधिक 2 बळी घेतले. मार्क अडायर, क्रेग यंग आणि बेंजामिन व्हाईट यांना 1-1 विकेट घेतली.

https://twitter.com/BCCI/status/1693288464106622994?s=20

21:13 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: १९ व्या षटकांत रिंकू सिंगने केला कहर! कुटल्या तब्बल २२ धावा

डावाच्या 19व्या षटकात भारतीय फलंदाजांनी 22 धावा केल्या. या षटकात रिंकू सिंगने 2 षटकार आणि 1 चौकार लगावला. मात्र, 19 षटकांनंतर भारताची धावसंख्या 4 बाद 165 अशी आहे.

https://twitter.com/BCCI/status/1693286239435358587?s=20

21:00 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: आयर्लंडच्या गोलंदाजांनी धावांवर लावला अंकुश

भारताची धावसंख्या 18 षटकांत 4 बाद 144 अशी आहे. रिंकू सिंग आणि शिवम दुबे क्रीझवर धावा करण्यासाठी झुंजत आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये 17 चेंडूत 16 धावांची भागीदारी झाली आहे.

https://twitter.com/BCCI/status/1693283958392496147?s=20

20:53 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: टीम इंडियाची मोठ्या धावसंख्येवर नजर

भारताची धावसंख्या 17 षटकांत 4 बाद 137 अशी आहे. यावेळी रिंकू सिंग आणि शिवम दुबे खेळत आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये पाचव्या विकेटसाठी 11 चेंडूत 8 धावांची भागीदारी झाली आहे.

https://twitter.com/BCCI/status/1693279665522344221?s=20

20:47 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20 : टीम इंडियाला बसला सर्वात मोठा धक्का! अर्धशतकवीर ऋतुराज गायकवाड झाला बाद

बॅरी मॅकार्थीने टीम इंडियाला चौथा धक्का दिला. बॅरी मॅकार्थीने सलामीवीर ऋतुराज गायकवाडला बाद केले. अशा प्रकारे बॅरी मॅकार्थीला आणखी एक विकेट मिळाली. ऋतुराज गायकवाडच्या जागी शिवम दुबे फलंदाजीसाठी आला आहे. भारताची धावसंख्या 4 विकेटवर 130 धावा.

https://twitter.com/BCCI/status/1693279505618436098?s=20

20:45 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20 : ऋतुराज गायकवाडने झळकावले टी-२० मधील दुसरे अर्धशतक

भारताची धावसंख्या 15 षटकांनंतर 3 बाद 129 धावा. त्याचबरोबर सलामीवीर ऋतुराज गायकवाडने पन्नास धावांचा आकडा पार केला आहे. ऋतुराज गायकवाड 42 चेंडूत 58 धावा करून खेळत आहे. त्याच वेळी, रिंकू सिंग 9 चेंडूत धावा काढून क्रीजवर आहे. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी 16 चेंडूत 24 धावांची भागीदारी झाली.

https://twitter.com/BCCI/status/1693279505618436098?s=20

20:34 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20 : टीम इंडियाला मोठा झटका! संजू सॅमसनचे हुकले अर्धशतक

संजू सॅमसनच्या रूपाने भारतीय संघाला तिसरा धक्का बसला आहे. संजू सॅमसनने 26 चेंडूत 40 धावा केल्या. त्याचबरोबर आता संजू सॅमसनच्या जागी रिंकू सिंग फलंदाजीला आला आहे. भारताची धावसंख्या 13 षटकांनंतर 3 बाद 108 धावा आहे.

https://twitter.com/impateljay01/status/1693276632725996008?s=20

20:26 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: संजू सॅमसनने बदलले गियर, टीम इंडियाची धावसंख्या १०० धावांच्या पार

जोशुआ लिटलच्या तिसऱ्या षटकात संजू सॅमसनने 18 धावा दिल्या. संजू सॅमसनने या षटकात 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याचवेळी भारताची धावसंख्या 11 षटकांनंतर 2 बाद 99 धावा आहे. संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड यांनी तिसऱ्या विकेटसाठी 41 चेंडूत 65 धावांची भागीदारी केली.

https://twitter.com/BCCI/status/1693274123492110618?s=20

20:21 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन क्रीजवर सेट

भारताची धावसंख्या 10 षटकांनंतर 2 बाद 81 धावा आहे. ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 35 चेंडूत 47 धावांची भागीदारी केली.

https://twitter.com/BCCI/status/1693274123492110618?s=20

20:15 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: भारताची धावसंख्या 9 षटकांनंतर 2 बाद 75 अशी आहे.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची धावसंख्या 9 षटकांनंतर 2 बाद 72 अशी आहे. ऋतुराज गायकवाड 28 चेंडूत 38 धावा करून खेळत आहे. तर संजू सॅमसन 13 चेंडूत 14 धावा करून क्रीजवर आहे. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 29 चेंडूत 38 धावांची भागीदारी झाली.

https://twitter.com/BCCI/status/1693272352321318981?s=20

20:10 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: भारताने पन्नास धावांचा आकडा केला पार

भारताची धावसंख्या 7 षटकांनंतर 2 बाद 55 धावा आहे. ऋतुराज गायकवाड 20 चेंडूत 25 धावा करून खेळत आहे. तर संजू सॅमसन 10 चेंडूत 11 धावा करून क्रीजवर आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 18 चेंडूत 22 धावांची भागीदारी झाली आहे.

https://twitter.com/BCCI/status/1693270659177296209?s=20

20:03 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: पावरप्ले समाप्त! भारतीय संघाला बसले दोन धक्के

34 धावांवर भारताची दुसरी विकेट पडली. तिलक वर्मा दोन चेंडूत एक धाव काढून बाद झाला आहे. बॅरी मॅकार्थीने त्याला जॉर्ज डॉकरेलकरवी झेलबाद केले. मागील सामन्यात खाते उघडण्यात अपयशी ठरलेला तिलक या सामन्यातही लवकर बाद झाला. आता ऋतुराज गायकवाडसोबत संजू सॅमसन क्रीझवर आहे. सहा षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन बाद 47 धावा आहे.

https://twitter.com/BCCI/status/1693269034756665608?s=20

20:00 (IST) 20 Aug 2023

बॅरी मॅकार्थीने टीम इंडियाला मोठा धक्का दिला आहे. तिलक वर्माला बॅरी मॅकार्थीने बाद केले. तिलक वर्माने २ चेंडूत १ धावा काढल्या. या प्रकाराने भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे. टिळक वर्माच्या जागी संजू सॅमसन फलंदाजीला आला आहे. भारताची धावसंख्या ४.३ षटकांनंतर २ बाद ३६ अशी आहे.

https://twitter.com/BCCI/status/1693267155155136963?s=20

19:56 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: तिलक वर्मा 1 धावा काढून बाद

यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला तिवक वर्मा 1 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. वर्मा गेल्या सामन्यातही गोल्डन डकचा बळी ठरला होता. भारताला दुसरा धक्का 34 धावांवर बसला.

https://twitter.com/BCCI/status/1693267155155136963?s=20

 India VS Ireland 2nd t20live scorecard updates

IND vs IRE 2nd T20 Live Score Today भारत विरुद्ध आयर्लंड दुसरी टी-२० लाइव्ह अपडेट्स

IND vs IRE 2nd T20 Live Match Score: भारत आणि आयर्लंड यांच्यात आज तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-२० सामना डब्लिनमध्ये रंगणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होईल.