India vs Ireland, 2nd Match Updates: भारताने आयर्लंडचा 33 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका जिंकली. भारतीय संघाने टी-२० मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना १८५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ केवळ १५२ धावा करू शकला आणि सामना गमावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

IND vs IRE 2nd T20 Score Today भारत विरुद्ध आयर्लंड दुसरी टी-२० लाइव्ह अपडेट्स:

19:55 (IST) 20 Aug 2023

ययशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला टिळक वर्मा 1 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. वर्मा गेल्या सामन्यात गोल्डन डकचा बळी ठरला होता. भारताला दुसरा धक्का 34 धावांवर बसला.शस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला टिळक वर्मा 1 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. वर्मा गेल्या सामन्यात गोल्डन डकचा बळी ठरला होता. भारताला दुसरा धक्का 34 धावांवर बसला.यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला टिळक वर्मा 1 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. वर्मा गेल्या सामन्यात गोल्डन डकचा बळी ठरला होता. भारताला दुसरा धक्का 34 धावांवर बसला.

19:53 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: यशस्वी जैस्वाल पॅव्हेलियनमध्ये परतला

भारतीय संघाला चौथ्या षटकात पहिला धक्का बसला. क्रेग यंगने यशस्वी जैस्वालला आपला बळी बनवले. यशस्वी जैस्वालने 11 चेंडूत 18 धावांची खेळी केली. त्याचवेळी आता तिलक वर्मा फलंदाजीसाठी आला आहे. भारताची धावसंख्या 4 षटकांनंतर 1 बाद 34 अशी आहे.

19:44 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: भारताची वेगवान सुरुवात, यशस्‍वी आणि ऋतुराजची आक्रमक सुरुवात

यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड ही सलामीची जोडी मैदानात आली, पहिले षटक सावधपणे खेळले आणि दुसऱ्याच षटकात धडाकेबाज सुरुवात केली. यशस्वीने दुसऱ्या षटकात जोस लिटिकला १७ धावा दिल्या.

19:42 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: मार्क अडायरने टाकले पहिले षटक

आयर्लंडसाठी मार्क अडायरने पहिले षटक टाकले. या षटकात भारतीय फलंदाजांनी २ धावा केल्या. अशाप्रकारे भारताची धावसंख्या पहिल्या षटकानंतर २ धावा आहे. भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड हे सलामीवीर म्हणून मैदानात उतरले आहेत.

19:34 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: टीम इंडियाच्या डावाला सुरुवात

भारताचे दोन्ही सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड हे क्रीझवर उतरले आहेत. त्याचवेळी मार्क एडेअर आयर्लंडसाठी पहिले षटक टाकत आहे. तत्पूर्वी, आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

19:12 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: आयर्लंडची प्लेइंग इलेव्हन

अँड्र्यू बालबर्नी, पॉल स्टर्लिंग (कर्णधार), लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्पर, जॉर्ज डॉकरेल, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, ​​जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट

19:11 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: भारताची प्लेइंग इलेव्हन

ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), टिळक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह (कर्णधार), रवी बिश्नोई.

19:09 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: आयर्लंडने जिंकली नाणेफेक

आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ कोणताही बदल न करता मैदानात उतरले आहेत. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करेल.

18:59 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: सर्वांच्या नजरा बुमराह आणि तिलक वर्मा यांच्यावर असणार

पहिल्या टी-२० मधून सुमारे ११ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहने घातक पदार्पण केले. बुमराहने पहिल्याच षटकात दोन बळी घेतले होते. पुन्हा बुमराह प्रथमच या फॉरमॅटमध्ये संघाचे कर्णधाप सांभाळत आहे. अशा परिस्थितीत तो आजचा मालिका जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. त्याचबरोबर तिलक वर्माच्या कामगिरीवरही लक्ष्य असेल.

18:41 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: भारताने पहिला सामना डकवर्थ लुईस पद्धतीने जिंकला होता

भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना डकवर्थ लुईस पद्धतीने जिंकला होता. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने १३९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने २ बाद ४७ धावा केल्या होत्या आणि पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत टीम इंडियाने डकवर्थ लुईस नियमानुसार दोन धावांनी विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराह सामनावीर ठरला.

18:31 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: सामन्याची नाणेफेक सातला होणार

भारतीय वेळेनुसार हा सामना सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल. सामन्याची नाणेफेक संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारताचा युवा संघ पुन्हा एकदा आपली ताकद दाखवेल.

18:24 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: दुसऱ्या सामन्यातील खेळपट्टीचा अहवाल

डब्लिनमधील द व्हिलेजची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असली तरी पहिल्या टी-२०मध्ये भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. येथे अनेकदा २०० हून अधिक धावा झाल्या आहेत. या खेळपट्टीवर पुन्हा एकदा मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. मात्र, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

18:21 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ

भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मुकेश कुमार, आवेश खान, जितेश शर्मा, प्रसिद्ध कृष्णा , शाहबाज अहमद.

18:18 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: टी-२० मालिकेसाठी आयर्लंड संघ

आयर्लंड संघ: अँड्र्यू बालबर्नी, पॉल स्टर्लिंग (कर्णधार), लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, गॅरेथ डेलेनी, कर्टिस कॅम्पर, जॉर्ज डॉकरेल, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट, फिओन हँड, क्रेग यंग, ​​थिओ व्हॅनगार्ड वोएर्कोम, रॉस अडायर.

18:12 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: आयर्लंड संघाची पॉल स्टर्लिंगवर मोठी जबाबदारी

भारतीय संघाला आव्हान देण्यासाठी यजमान आयर्लंडला फलंदाजीत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. पॉल स्टर्लिंग व्यतिरिक्त अँड्र्यू बालबर्नी, जोशुआ लिटल, क्रेग यंग आणि जॉर्ज डॉकरेल यांना पुढे जाऊन जबाबदारी घ्यावी लागेल. भारताने आतापर्यंत आयर्लंडविरुद्ध सहा टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि त्या सर्व जिंकल्या आहेत. भारताविरुद्ध त्याला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही.

18:01 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

आयर्लंड: पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबिर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, ​​जोश लिटल, बेंजामिन व्हाइट.

भारत: ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह (कर्णधार), अर्शदीप सिंग/आवेश खान.

17:58 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: भारत आणि आयर्लंडमधील दुसऱ्या टी-२० सामन्यात पाऊस पडेल का?

डब्लिनच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी तीन वाजता सामना सुरू होईल. चाहत्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे की, दुसऱ्या टी-२० दरम्यान हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना संपूर्ण सामना बघायला मिळू शकतो. Accuweather नुसार, दुपारी ३ ते ७ वाजेपर्यंत डब्लिनमधील हवामान पूर्णपणे स्वच्छ असेल. पावसाची अजिबात शक्यता नाही.

17:50 (IST) 20 Aug 2023
IND vs IRE 2nd T20: टीम इंडिया तिसऱ्यांदा मालिका जिंकण्यासाठी उतरणार मैदानात

टीम इंडियाने आयर्लंडला याआधी दोनवेळा त्यांच्या भूमीवर मालिकेत पराभूत केले आहे. २०१८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आणि २०२२ मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली होती. यावेळीही भारताने मालिका जिंकल्यास आयर्लंडमध्ये मालिका विजयाची हॅटट्रिक होईल. बुमराहच्या नेतृत्वाखाली पहिली मालिका जिंकण्याची संधी आहे. टी-२० फॉरमॅटचा नियमित कर्णधार हार्दिकच्या जागी त्याला कमान सोपवण्यात आली आहे.

IND vs IRE 2nd T20 Live Score Today भारत विरुद्ध आयर्लंड दुसरी टी-२० लाइव्ह अपडेट्स

IND vs IRE 2nd T20 Live Match Score: भारत आणि आयर्लंड यांच्यात आज तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-२० सामना डब्लिनमध्ये रंगणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होईल.