India vs Nepal Possible playing XI of both the teams: आशिया चषक स्पर्धेतील पाचवा सामना भारत आणि नेपाळ यांच्यात कँडी येथील पल्लेकेल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. अ गटातील हा सामना भारतासाठी ‘करो या मरो’ असा आहे. कारण पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध एका गुणावर समाधान मानावे लागले होते. कँडीमध्ये पावसामुळे पाकिस्तानचा डाव पूर्ण होऊ शकला नाही. सामना रद्द घोषित करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. नेपाळ संघाची कमान रोहित पौडेलकडे असेल जो भारतीय आव्हानाला सामोरे जाईल.

भारताने या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला आणि पावसाने प्रभावित झालेल्या सामन्याचा निकाल लागला नाही. सध्या टीम इंडियाकडे एक गुण आहे, अशा स्थितीत भारतीय संघ नेपाळला हरवून 2 गुण मिळवून सुपर फोरमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल. पाकिस्तान संघाने यापूर्वीच सुपर फोरमध्ये स्थान मिळवले आहे.

Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Prithviraj Chavan campaign in Karad, Prithviraj Chavan,
सत्ता आल्यावर कराड जिल्हा करणार – पृथ्वीराज चव्हाण
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Team India Performance in Border Gavaskar Trophy played at Australia
Team India : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी खूपच निराशाजनक, तब्बल ‘इतक्या’ वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पत्करावा लागलाय पराभव

मोहम्मद शमी बुमराहची घेऊ शकतो जागा –

नेपाळविरुद्ध भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल होऊ शकतो. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वैयक्तिक कारणांमुळे मुंबईत परतला असून अशी शक्यता वर्तवली जात आहे की, मोहम्मद शमीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्यायला हवी. याशिवाय भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये अन्य कोणताही बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे.

हेही वाचा – IND vs PAK: पाकिस्तानचे माजी पीएम शाहबाज शरीफने ट्विट करून भारतीय फलंदाजांची उडवली खिल्ली, जाणून घ्या काय म्हणाले?

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताची टॉप ऑर्डर फलंदाजी पूर्णपणे कोलमडली होती. त्यामुळे हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. मात्र, नेपाळच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांना फारसा त्रास होईल, असे वाटत नाही. रोहित शर्मा आणि शुबमन गिल भारतासाठी डावाची सुरुवात करतील आणि या सामन्यात दोघांनाही आपला फॉर्म परत मिळवण्याची चांगली संधी असेल. त्याचबरोबर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर देखील आपला हात आजमावू शकतात. जेणेकरुन सुपर फोरच्या सामन्यात सर्व काही ठीक होईल.

इशान किशन पुन्हा एकदा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो, ज्याने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८२ धावा केल्या होत्या. तसेच हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर फिनिशरची भूमिका बजावू शकतो. संघात फिरकी अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजा असेल, तर शार्दुल ठाकूरला वेगवान गोलंदाज म्हणून संघात ठेवता येईल. कुलदीप यादव हा संघाचा फिरकी गोलंदाज असेल, तर शमी आणि सिराज हे वेगवान गोलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये असू शकतात.

हेही वाचा – IND vs PAK: इशान किशनने मोडला विराट कोहलीचा मोठा विक्रम, अजिंक्य रहाणेलाही टाकले मागे

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

हेही वाचा – Virat Kohli Sand Art: पाकिस्तानी चाहत्याने वाळूवर साकारली किंग कोहलीची प्रतिमा, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

नेपाळची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

कुशल भुरटेल, आसिफ शेख (यष्टीरक्षक), रोहित पौडेल (कर्णधार), आरिफ शेख, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग आयरे, गुलसन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी.