India vs Netherlands ICC Cricket World Cup 2023 Highlights: आज बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा ४५ वा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव केला. त्याचबरोबर या विश्वचषकात सलग ९ सामने जिंकत टीम इंडियाने इतिहास रचला आहे. या विश्वचषकात भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे. टीम इंडियाचा पहिला सेमीफायनल १५ नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडशी होणार आहे.

Live Updates

CWC 2023 India vs Netherlands Highlights in Marathi: आज बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा ४५ वा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव सलग नववा विजय नोंदवला.

21:39 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: भारताने नेदरलँड्सचा १६० धावांनी केला पराभव

भारताने नेदरलँडचा 160 धावांनी पराभव केला आहे. डच संघासमोर 411 धावांचे लक्ष्य होते, परंतु संपूर्ण संघ 47.5 षटकात 250 धावांवरच मर्यादित राहिला. नेदरलँडचा शेवटचा फलंदाज भारतीय कर्णधार रोहित शर्माने बाद केला. तत्पूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने 50 षटकांत 4 गडी गमावून 410 धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी शतके झळकावली. भारताच्या 410 धावांना प्रत्युत्तर देताना नेदरलँडचा संघ 47.5 षटकात 250 धावांवर सर्वबाद झाला. नेदरलँडसाठी तेजा निदामनुरूने 39 चेंडूत सर्वाधिक 54 धावा केल्या. बरातकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाने २-२ बळी घेतले. याशिवाय विराट कोहली आणि रोहित शर्माला प्रत्येकी 1 यश मिळाले.

21:29 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: जसप्रीत बुमराहला मिळाली दुसरी विकेट्स

जसप्रीत बुमराहने नेदरलँड्सला नववा धक्का दिला. जसप्रीत बुमराहने आर्यन दत्तला बाद केले. आता नेदरलँडची धावसंख्या 47 षटकात 9 विकेट गमावत 243 धावा आहे.

21:17 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: रवींद्र जडेजाने नेदरलँड्स संघाला दिलाआठवा धक्का

रवींद्र जडेजाने व्हॅन डर मर्वेला बाद केले. व्हॅन डर मर्वेने 8 चेंडूत 16 धावांची खेळी खेळली. आता नेदरलँडची धावसंख्या 46 षटकात 8 विकेट गमावत 226 धावा आहे. नेदरलँड्सला विजयासाठी शेवटच्या 36 चेंडूत 185 धावा कराव्या लागतील.

21:14 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: कुलदीप यादवने नेदरलँड्सला दिला सातवा झटका

नेदरलँडला सातवा धक्का बसला आहे. कुलदीप यादवने व्हॅन बीकला बाद केले. अशाप्रकारे कुलदीप यादवला दुसरी विकेट मिळाली. आता नेदरलँडची धावसंख्या 7 विकेटवर 208 धावा आहे.

21:09 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: नेदरलँड्सने ६ गडी गमावून केल्या १९० धावा केल्या

नेदरलँड्सची धावसंख्या 40 षटकांत 6 बाद 190 धावा. म्हणजेच डच संघाला विजयासाठी शेवटच्या 10 षटकांत 221 धावांची गरज आहे. सध्या तेजा निदामनुरु आणि लोगन व्हॅन विक क्रीजवर आहेत.

20:59 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: नेदरलँड्सला बसला सहावा धक्का, मोहम्मद सिराजने एंगलब्रँडला केले बोल्ड

नेदरलँडचा पाचवा फलंदाज बाद झाला आहे. जसप्रीत बुमराहने बेस डी लीडेला बाद केले. बेस डी लीडेने 21 चेंडूत 12 धावा केल्या. आता नेदरलँडची धावसंख्या 32 षटकात 5 विकेट गमावत 144 धावा आहे.

20:39 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: नेदरलँड्सला बसला पाचवा धक्का, जसप्रीत बुमराहने बेस डी लीडेला केले बाद

नेदरलँडचा पाचवा फलंदाज बाद झाला आहे. जसप्रीत बुमराहने बेस डी लीडेला बाद केले. बेस डी लीडेने 21 चेंडूत 12 धावा केल्या. आता नेदरलँडची धावसंख्या 32 षटकात 5 विकेट गमावत 144 धावा आहे.

20:09 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: विराट कोहलीने नेदरलँड्सला दिला चौथा धक्का, स्कॉट एडवर्ड्सला केले झेलबाद

नेदरलँडची चौथी विकेट 111 धावांवर पडली. विराट कोहलीने विरोधी संघाच्या कर्णधाराला बाद केले. स्कॉट एडवर्ड्स 30 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. विराटने त्याला लोकेश राहुलकडे विकेटच्या मागे झेलबाद केले.

19:56 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: रोहित शर्माने चाहत्यांना दिली दिवाळीची खास, भेट विराट कोहलीला दिली गोलंदाजीची संधी

या सामन्यात कुलदीप यादवचा चेंडू पकडण्याच्या प्रयत्नात मोहम्मद सिराज जखमी झाला. अशा स्थितीत उर्वरित सहा षटके टाकण्यासाठी विराट कोहलीने चेंडू हाती घेतला. हे दृश्य बंगळुरूच्या चाहत्यांमध्ये उत्साहाने भरले होते.

19:53 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: स्कॉट एडवर्ड्स आणि एंगलब्रंटने सावरला नेदरलँड्सचा डाव

क्रीजवर स्कॉट एडवर्ड्स आणि एंगलब्रंट

नेदरलँडची धावसंख्या 22 षटकांत 3 बाद 91 धावा. डच संघासाठी स्कॉट एडवर्ड्स आणि एंगलब्रँड क्रीजवर आहेत. स्कॉट एडवर्ड्सने 22 चेंडूत 11 धावा केल्या. तर एंगलब्रँड 33 चेंडूत 12 धावा करून खेळत आहे. दोघांमध्ये 45 चेंडूत 21 धावांची भागीदारी झाली.

19:30 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: रवींद्र जडेजाने मॅक्स ओएडला केले क्लीन बोल्ड

रवींद्र जडेजाने नेदरलँडला तिसरा धक्का दिला. मॅक्स औडेला रवींद्र जडेजाने बाद केले. मॅक्स ओएडने 42 चेंडूत 30 धावा केल्या. नेदरलँडची धावसंख्या 15.1 षटकात 3 गडी बाद 72 धावा.

19:17 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: कुलदीप यादवने नेदरलँड्सला दिला दुसरा धक्का!

मॅक्स ओ’डॉड आणि कॉलिन अकरमन ही जोडी फोडण्यात कुलदीप यादवला यश आले आहे. अकरमन ३२ चेंडूत ३५ धावा करून एलबीडब्ल्यू परतला. आता नेदरलँड्स संघाने १३ षटकानंतर २ बाद ६६ धावा केल्या आहेत.

19:00 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: कॉलिन अकरमन आणि मॅक्स ओएडने बदलले गीअर्स

संथ सुरुवातीनंतर नेदरलँडची फलंदाजी झटपट धावा करत आहे. नेदरलँडची धावसंख्या 8 षटकांनंतर 1 गडी बाद 50 धावा. कॉलिन अकरमन 18 चेंडूत 27 धावा करून खेळत आहे. तर मॅक्स ओएडने 25 चेंडूत 15 धावा केल्या आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये 42 चेंडूत 46 धावांची भागीदारी झाली आहे.

18:49 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: नेदरलँड्स संघाची संथ सुरुवात

नेदरलँडची धावसंख्या 5 षटकांनंतर 1 गडी बाद 17 धावा. सध्या कॉलिन अकरमन आणि मॅक्स ओएड क्रीजवर आहेत. मॅक्स ओएडने 21 चेंडूत 12 धावा केल्या. तर कॉलिन अकरमन 4 चेंडूत 1 धाव घेऊन खेळत आहे. भारताकडून मोहम्मद सिराजला 1 यश मिळाले आहे.

18:29 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: नेदरलँड्सला पहिला धक्का! मोहम्मद सिराजने बरेसीला केले झेलबाद

नेदरलँडचे सलामीवीर वेस्ली बरेसी आणि मॅक्स ओएड यांनी पहिल्या षटकात 5 धावा जोडल्या. त्याचवेळी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारतासाठी पहिले षटक टाकले. त्यानंतर दुसऱ्या षटकांत मोहम्मज सिराजने वेस्ली बरेसीला 4 धावांवर झेलबाद केले.

17:51 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: श्रेयस-राहुलच्या वादळी शतकाच्या जोरावर टीम इंडियाने उभारला धावांचा डोंगर, नेदरलँड्सला दिले ४११ धावांचे लक्ष्य

टीम इंडियाने बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रथम खेळून 410 धावांची मोठी धावसंख्या उभारली. भारताकडून श्रेयस अय्यर (नाबाद 128) आणि केएल राहुल (102) यांनी शतके झळकावली. विश्वचषकात भारताची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. याआधी शुबमन गिल 51, रोहित शर्मा 61आणि विराट कोहलीने 51अर्धशतके झळकावली होती. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच, भारताच्या शीर्ष 5 खेळाडूंनी 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. केएल राहुलने अवघ्या 62 चेंडूत शतक झळकावले. राहुल आता भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे.

17:44 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: श्रेयस अय्यर पाठोपाठ के.एल.राहुलनेही झळकावले विश्वचषकातील पहिले शतक

श्रेयस अय्यर पाठोपाठ केएल राहुलनेही विश्वचषकातील आपले पहिले शतक झळकावले. केएल राहुलने ६२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

17:29 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: श्रेयस अय्यरने विश्वचषकात झळकावले पहिले शतक

श्रेयस अय्यरने 84 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने विश्वचषकातील पहिले शतक झळकावले. तर केएल राहुलही 51चेंडूत 70 धावांवर खेळत आहे. 46 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 346 धावा आहे.

17:15 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: टीम इंडियाने रचला इतिहास! पहिल्या चार फलंदाजांनंतर केएल राहुलने झळकावले अर्धशतक

रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यानंतर केएल राहुलनेही अर्धशतक झळकावले आहे. भारताच्या टॉप-5 खेळाडूंनी पहिल्यांदाच एका सामन्यात अर्धशतकं झळकावली आहेत. 43 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 312 धावा आहे.

17:10 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: राहुल-श्रेयसची शानदार भागीदारी

लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्यात चांगली भागीदारी झाली आहे. दोन्ही फलंदाज चांगल्या गतीने धावा करत असून टीम इंडिया मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे. 40 षटकांनंतर भारताची धावसंख्या 284/3 आहे. आता भारत शेवटच्या 10 षटकांत झटपट धावा काढण्याचा प्रयत्न करेल.

16:08 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: विराट कोहलीचे अर्धशतक

विराट कोहलीने ५३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारताची धावसंख्या २०० धावांच्या जवळ पोहोचली आहे. या सामन्यात भारताच्या आघाडीच्या तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली आहेत. टीम इंडिया मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे.

16:03 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: भारताची धावसंख्या १५० धावांच्या पार

भारताच्या धावसंख्येने दोन विकेट गमावून १५० धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर क्रीजवर आहेत. दोघेही चांगल्या गतीने धावा काढत आहेत. २२ षटकांनंतर भारताची धावसंख्या १५८/२ आहे.

15:40 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: रोहित शर्मा बाद

१२९ धावांवर भारताला दुसरा धक्का बसला. रोहित शर्मा ५४ चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६१ धावा करून बाद झाला. त्याला बरेसीच्या हाती बास डी लीडेने झेलबाद केले. तत्पूर्वी, शुबमन गिल ५१ धावा करून बाद झाला. १८ षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात १३० धावा आहे. सध्या श्रेयस अय्यर आणि विराट कोहली क्रीजवर आहेत.

भारत १३०-२

15:39 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: रोहित शर्माचे अर्धशतक

रोहित शर्माने ४४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने शानदार खेळी केली आहे. विराटसोबत त्याची चांगली भागीदारी आहे. भारताची धावसंख्या १२० धावांच्या पुढे गेली आहे.

भारत १२१-१

15:38 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: भारताची पहिली विकेट पडली

भारताची पहिली विकेट १०० धावांवर पडली. शुबमन गिल ३२ चेंडूत ५१ धावा करून बाद झाला. एका मीकेरेनने त्याला निदामनुरुकडे झेलबाद केले. गिलने आपल्या खेळीत तीन चौकार आणि चार षटकार मारले. आता विराट कोहली रोहित शर्मासोबत क्रीजवर आहे. १३ षटकांनंतर भारताची धावसंख्या १०४/१ आहे.

भारत १०४-१

15:37 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: भारताची धावसंख्या शंभरी पार

भारताची धावसंख्या एकही न गमावता १०० धावांवर पोहोचली आहे. रोहित आणि गिल वेगाने धावा करत आहेत. गिलने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. तर, रोहित त्याच्या जवळ आहे.

भारत १०२-०

15:37 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: शुबमन गिलचे अर्धशतक

शुबमन गिलने ३० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने तुफानी फलंदाजी करत भारताची धावसंख्या १०० धावांच्या जवळ नेली आहे.

भारत १००-०

15:36 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: पॉवरप्लेमध्ये भारताने ९१ धावा केल्या

भारताने प्रथम फलंदाजी करत आक्रमक सुरुवात केली. पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाने एकही विकेट न गमावता ९१ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि शुबमन गिल हे दोघेही अर्धशतकांच्या जवळ आहेत.

भारत ९१-०

15:28 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: भारताची धावसंख्या ५० धावा पार

भारताच्या धावसंख्येने कोणतेही नुकसान न करता ५० धावा पार केल्या आहेत. रोहितबरोबर गिलही वेगाने धावा करत आहे. या दोघांनी सहा षटकांत भारताची धावसंख्या ५० धावांच्या पुढे नेली.

भारत ५०-०

14:09 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: रोहित शर्मा आणि शुबमन गिलकडून टीम इंडियाच्या डावाला शानदार सुरुवात

नेदरलँडसाठी फिरकीपटू आर्यन दत्तने पहिले षटक टाकले. या षटकात भारतीय कर्णधाराने दोन चौकार मारले. एका षटकानंतर टीम इंडियाची धावसंख्या एकही न गमावता 11 धावा आहे.

CWC 2023 India vs Netherlands Highlights in Marathi: विजयाची घोडदौड सुरू ठेवत भारतीय संघाने विश्वचषक २०२३ च्या अखेरच्या साखळी सामन्यात नेदरलँड्सचा पराभव केला. या स्पर्धेतील भारताचा हा सलग नववा विजय ठरला..