India vs Netherlands ICC Cricket World Cup 2023 Highlights: आज बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा ४५ वा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव केला. त्याचबरोबर या विश्वचषकात सलग ९ सामने जिंकत टीम इंडियाने इतिहास रचला आहे. या विश्वचषकात भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे. टीम इंडियाचा पहिला सेमीफायनल १५ नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडशी होणार आहे.

Live Updates

CWC 2023 India vs Netherlands Highlights in Marathi: आज बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा ४५ वा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव सलग नववा विजय नोंदवला.

13:42 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

नेदरलँड्स: वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडौड, कॉलिन एकरमन, सिब्रांड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), बास डी लीडे, तेजा एनदामानुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

13:39 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: भारताने नेदरलँड्सविरुद्ध नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने कोणताही बदल न करता या सामन्यात प्रवेश केला आहे.

13:14 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: भारतीय गोलंदाजांना सामोरे जाण्याचे नेदरलँडसमोर आव्हान

या स्पर्धेत बुमराह (15 विकेट), सिराज (10), शमी (16), जडेजा (14), कुलदीप (12) यांच्या गोलंदाजीने सर्वाधिक प्रभावित केले आहे. दोन विजय मिळविणाऱ्या नेदरलँड्ससमोर या गोलंदाजी आक्रमणाला सामोरे जाण्याचे आव्हान असेल. नेदरलँडकडे लोगान व्हॅन बीक, बास डी लीडे आणि पॉल व्हॅन मीकरेनसारखे चांगले गोलंदाज आहेत. भारतीय वंशाचा तेजा निदामनुरू आणि कर्णधार स्कॉट एडवर्ड्स फलंदाजीत चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.

12:37 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: विराट कोहलीकडे ५०वे शतक झळकावत सचिनचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी

विराटला येथे शतक झळकावण्याची सुवर्णसंधी आहे. कारण तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. या विश्वचषकात त्याने दोन शतकांच्या मदतीने 543 धावा केल्या आहेत. त्याला चिन्नास्वामी स्टेडियमचा प्रत्येक इंच ना इंच माहीत आहे. तो आयपीएलमध्ये RCB कडून खेळत असल्याने त्याला येथे जबरदस्त पाठिंबा मिळेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावून विराटने सचिनच्या वनडेतील सर्वोच्च 49 शतकांची बरोबरी केली होती. आता ५०वे शतक झळकावत सचिनचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

12:00 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाची दिवाळी पार्टी

विजयरथावर स्वार झालेल्या टीम इंडियाचा शेवटचा साखळी सामना आज नेदरलँडशी होत आहे. साखळी फेरीतील हा शेवटचा म्हणजेच ४५वा सामना आहे. या शेवटच्या साखळी सामन्यापूर्वी भारतीय संघाने दिवाळी उत्साहात साजरी केली. दिवाळीच्या संध्याकाळी संपूर्ण टीम आपल्या कुटुंबसोबत एकत्र दिसली. ही पार्टी बंगळुरूमध्येच आयोजित करण्यात आली होती, कारण टीम इंडिया नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यासाठी बेंगळुरूमध्ये उपस्थित आहे. या पार्टीचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

11:36 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: एम. चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल

नेदरलँड्स संघात लोगान व्हॅन बीक, बास डी लीडे आणि पॉल व्हॅन मीकरेन सारखे काही चांगले गोलंदाज आहेत. पण चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग मानली जाते. आयसीसीने बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियममधील तीन खेळपट्ट्यांची निवड केली होती. तिन्ही खेळपट्ट्या लाल मातीने बनवलेल्या आहेत. या खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला मदत मिळते.

या मैदानाला फलंदाजांचे नंदनवन म्हटले जाते. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने या मैदानावर ३६७ धावा केल्या आहेत. इंग्लंड १५६ धावांवर ऑलआऊट झाले. येथील ३० एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २७३ आहे. येथे चार सामन्यांमध्ये दोनदा प्रथम फलंदाजी करणारा आणि दोनदा धावांचा पाठलाग करणारा संघ विजेता ठरला आहे.

11:17 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: बंगळुरुमधील हवामानाचा अंदाज

हवामान अंदाज

Accuweather नुसार, सामन्यादरम्यान बंगळुरुमध्ये अंशतः सूर्यप्रकाश आणि आल्हाददायक हवामान असेल. पावसाची शक्यता केवळ तीन टक्के असून, त्यामुळे पावसामुळे खेळ खराब होण्याची शक्यता मावळली आहे. आकाश ढगाळ राहण्याची शक्यता १८टक्के आहे. याशिवाय तापमान १६ते २८अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

10:58 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: दोन्ही संघात दुपारी दीड वाजता होणार नाणेफेक

आज बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा ४५ वा सामना होत आहे. या सामन्यात भारत आणि नेदरलँड्स आमनेसामने आहेत. या सामन्याला दुपारी दोन वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी दोन्ही संघात दुपारी दीड वाजता नाणेफेक पार पडेल.

10:55 (IST) 12 Nov 2023
IND vs NED: नेदरलँड आणि भारत हेड टू हेड आकडेवारी

भारत आणि नेदरलँड यांच्यात आतापर्यंत फक्त दोन एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. हे दोन्ही सामने विश्वचषकात खेळले गेले. भारताने दोन्ही सामने एकतर्फी जिंकले होते. २००३ च्या विश्वचषकात पहिला सामना खेळला गेला आणि भारताने ६८ धावांनी सामना जिंकला. तर २०११ च्या विश्वचषकात भारताने ५ गडी राखून विजय मिळवला होता.

CWC 2023 India vs Netherlands Highlights in Marathi: विजयाची घोडदौड सुरू ठेवत भारतीय संघाने विश्वचषक २०२३ च्या अखेरच्या साखळी सामन्यात नेदरलँड्सचा पराभव केला. या स्पर्धेतील भारताचा हा सलग नववा विजय ठरला..