IND vs NED Match Chinnaswamy Stadium Pitch Report in Marathi: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेत सलग आठ सामने जिंकल्यानंतर टीम इंडिया रॉबिन राऊंडच्या शेवटच्या सामन्यात नेदरलँड्सचा सामना करणार आहे. या विश्वचषकात भारताने आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली असून कोणताही संघ त्यांना पराभूत करु शकलेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघाला आठवडाभराची विश्रांती मिळाली होती. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरु येथे खेळला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एम. चिन्नास्वामी खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल –

नेदरलँड्स संघात लोगान व्हॅन बीक, बास डी लीडे आणि पॉल व्हॅन मीकरेन सारखे काही चांगले गोलंदाज आहेत. पण चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग मानली जाते. आयसीसीने बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियममधील तीन खेळपट्ट्यांची निवड केली होती. तिन्ही खेळपट्ट्या लाल मातीने बनवलेल्या आहेत. या खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला मदत मिळते.

या मैदानाला फलंदाजांचे नंदनवन म्हटले जाते. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने या मैदानावर ३६७ धावा केल्या आहेत. इंग्लंड १५६ धावांवर ऑलआऊट झाले. येथील ३० एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २७३ आहे. येथे चार सामन्यांमध्ये दोनदा प्रथम फलंदाजी करणारा आणि दोनदा धावांचा पाठलाग करणारा संघ विजेता ठरला आहे.

हेही वाचा – AUS vs BAN: मिचेल मार्शच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा उडवला धुव्वा, ८ गडी राखून नोंदवला दणदणीत विजय

सामन्यात पावसाची शक्यता नाही –

बंगळुरूमधील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये पावसाचा धोका होता, मात्र भारत-नेदरलँड्स सामन्यात असे होणार नाही. दिवसाच्या सुरुवातीला तापमान २८ अंशांपर्यंत तर रात्रीचे तापमान २१ ते २३ अंशांच्या दरम्यान राहू शकते.

नेदरलँड आणि भारत हेड टू हेड आकडेवारी –

भारत आणि नेदरलँड यांच्यात आतापर्यंत फक्त दोन एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. हे दोन्ही सामने विश्वचषकात खेळले गेले. भारताने दोन्ही सामने एकतर्फी जिंकले होते. २००३ च्या विश्वचषकात पहिला सामना खेळला गेला आणि भारताने ६८ धावांनी सामना जिंकला. तर २०११ च्या विश्वचषकात भारताने ५ गडी राखून विजय मिळवला होता.

हेही वाचा – ENG vs PAK, World Cup 2023: शाहीन आफ्रिदीने मोडला इम्रान खानचा विक्रम, पाकिस्तानसाठी विश्वचषकात केला खास पराक्रम

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

नेदरलँड्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओ’डॉड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/यष्टीरक्षक), बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs netherlands match at m chinnaswamy stadium bangalore find pitch and weather report vbm
Show comments