India vs New Zealand 1st T20 Highlights Match Score: वेलिंग्टनमध्ये मुसळधार पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी२० रद्द करण्यात आला आहे. पावसामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही, त्यामुळे पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. स्थानिक हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पुढील चार-पाच तास पाऊस थांबण्याची शक्यता नाही. मात्र, कट ऑफ वेळेपूर्वीच हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार कट ऑफ वेळ ही २.१७ सांगण्यात आली होती. तत्पूर्वी नाणेफेक सकाळी ११.३० वाजता होणार होती, ती होऊ शकली नाही. हा सामना दुपारी १२ वाजता सुरू होणार होता, पण तोही होऊ शकला नाही. आता भारत आणि न्यूझीलंडचे संघ २० नोव्हेंबरला मालिकेतील दुसऱ्या टी२० सामन्यात आमनेसामने येतील. हा सामना माऊंट मौनगानुई येथे होणार आहे.
वेलिंग्टनमधील पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. विशेष म्हणजे स्काय स्टेडिमयवरील फक्त खेळपट्टी झाकण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या पहिल्या टी२० सामन्यावर पाणी फिरण्याची भीती निर्माण झाली होती आणि ती खरी ठरली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वेलिंग्टन येथील स्काय स्टेडीयमवर खेळवण्यात येणारा पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.
टी२० विश्वचषक उपांत्य फेरीतील पराभवानंतर, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली युवा भारतीय संघ शुक्रवारपासून वेलिंग्टन येथे सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत छाप पाडण्यासाठी उत्सुक होता मात्र पावसामुळे ही उत्सुकता आणखी पुढे ढकलली गेली आहे. भारतीय संघाने गेल्या दोन वर्षांत टी२० फॉरमॅटमध्ये दोन विश्वचषक खेळले आहेत, पण चुकांमधून धडा घेतलेला नाही. २०२१ साली युएई मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत संघ पहिल्या फेरीतच बाहेर पडला होता. आता ऑस्ट्रेलियात झालेल्या टी२० विश्वचषकात उपांत्य फेरीत दहा गडी राखून पराभूत होऊन जेतेपद पटकावण्यापासून संघ वंचित राहिला. त्यामुळे २०२४ साली वेस्ट इंडीजमध्ये होणाऱ्या पुढील टी२० विश्वकरंडकाची तयारी या लढतीपासूनच सुरू होणार होती मात्र आता अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेत भारताचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाचा यावेळी कस लागणार हे निश्चित.
India vs New Zealand 1st T20I Highlights Updates: भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला टी२० सामना लाईव्ह हायलाइट्स
भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. वेलिंग्टनमधील स्काय मैदानावर मुसळधार पावसाने खूप पाणी साचले आहे. त्यामुळे सामनाधिकारी, पंच आणि दोन्ही संघांच्या कर्णधारांनी या सर्वांनी सहमतीने निर्णय घेत सामना रद्द करण्याचे ठरवले.
https://twitter.com/ICC/status/1593514759323881472?t=n5PcU6R7YfY4d55jrF6V2A&s=08
भारत-न्यूझीलंड सामना वेलिंग्टनमध्ये होत आहे. मात्र सध्या पावसाने खोडा घातला असल्याने भारतीय संघाचे खेळाडू इनडोर खेळ खेळताना दिसत आहेत. फुटबॉल, व्हॉलीबॉल यांसारख्या खेळांची मजा लुटताना चहल अँड कंपनी दिसत आहेत.
https://twitter.com/BLACKCAPS/status/1593475155590008833?s=20&t=FXyfiv3LMflmAnZ3DPIPWQ
न्यूझीलंडच्या वेलिंग्टनमध्ये पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून मैदानावरील काढलेले कव्हर पुन्हा खेळपट्टीवर झाकण्यात आले आहेत. संपूर्ण मैदान कव्हर्सने आच्छादित करण्यात आले आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार जर २.१७ मिनिटापर्यंत पाऊस सुरूच राहिला तर सामना रद्द करण्यात्त येईल अशी माहिती देण्यात आली आहे.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1593494997919465472?t=o6e1wtqTMp8jE7xqnqjq3Q&s=08
भारत-न्यूझीलंड पहिल्या टी२० सामन्यात पाऊस थांबला असून मैदानावरील परिस्थिती दोन्ही पंच आणि कर्णधार पाहत आहेत. खेळपट्टीवरील कव्हर हटवण्याचे काम सुरु आहे. पण मैदानावर पाणी साचले आहे. म्हणून नाणेफेकीस उशीर होऊ शकतो.
https://twitter.com/BCCI/status/1593484202674356224?s=20&t=5gxpMIGcovTQ_e2zEYcRkA
भारत-न्यूझीलंड संघांमधील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथे खेळला जाईल. मात्र, विजयी सुरुवात करण्याची इच्छा असलेल्या दोन्ही संघांच्या इराद्यावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. सध्या वेलिंग्टनमध्ये पाऊस सुरु आहे. त्यामुळे सामना सुरु होण्यास थोडा उशीर होऊ शकतो.
न्यूझीलंडमध्ये अनेकदा मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळत असले तरी वेलिंग्टनची खेळपट्टी थोडी वेगळी आहे. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या केवळ १६२ धावांची आहे. येथे मागील ७ सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ५ वेळा विजय मिळवला आहे. बहुतांश प्रसंगी हा विजय मोठ्या धावांच्या फरकाने मिळाला आहे. म्हणजेच या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणे फायदेशीर ठरू शकते, असे म्हणता येईल.
भारत-न्यूझीलंड टी२० सामन्याआधी भारतीय संघाची तयारी पूर्ण झाली आहे असे प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी सांगितले. न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी टीम इंडिया पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे.
https://twitter.com/VVSLaxman281/status/1593441216091521024?t=LVhK2ihO0Wn1V3246qFkEA&s=08
टीम इंडिया वेलिंग्टनच्या ऐतिहासिक स्काय स्टेडीयममध्ये दाखल झाली असून तिथे काही खेळाडूंनी सराव देखील केला. भारतीय संघात आज कोणाला संधी मिळणार याची सर्वांना उत्सुकता आहे. यावेळी कार्यवाहक प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण खेळाडूंना मार्गदर्शन करत आहेत.
https://twitter.com/BCCI/status/1593469049635151872?s=20&t=qpgmSw386XooAz6en0tAPQ
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा टीम इंडिया न्यूझीलंडशी आज भिडणार आहे. पहिला टी२० सामना आज वेलिंग्टन येथे होणार आहे.
https://twitter.com/BCCI/status/1593453950153506816?s=20&t=qpgmSw386XooAz6en0tAPQ
India vs New Zealand 1st T20I Highlights Updates: भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला टी२० सामना अपडेट्स
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली युवा भारतीय संघ शुक्रवारपासून वेलिंग्टन येथे सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत छाप पाडण्यासाठी उत्सुक असेल.