India vs New Zealand 2nd T20 Highlights Match Score: भारताने न्यूझीलंडवर ६५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताच्या या विजयाचा शिल्पकार सूर्यकुमार यादव ठरला. त्याला सामनीवीर म्हणून गौरवण्यात आले. यासह भारताने या मालिकेत १-०ने विजयी आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा अक्षरश: घाम काढला. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने धडाकेबाज शतकी खेळी करत टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारून दिली. धावांचा पाठलाग करताना १८.५ षटकात न्यूझीलंड केवळ १२६ धावाच करू शकली.
भारताने न्यूझीलंडसमोर १९२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात काही खास नव्हती. भारताची पहिली विकेट ३६ धावांवर पडली, जेव्हा ऋषभ पंत १३ चेंडूत ६ धावा करून बाद झाला. यानंतर ईशान किशनने वेगवान धावा करत भारताची धावसंख्या ५० च्या पुढे नेली, पण तोही ३१ चेंडूत ३६ धावा करून बाद झाला. या सामन्यात पावसामुळे २७ मिनिटांचा खेळ वाया गेला, मात्र षटकांच्या संख्येत कोणतीही घट झाली नाही. एका टोकाला, सूर्यकुमार यादवने जबाबदारी स्वीकारली आणि वेगवान धावा केल्या, पण दुसऱ्या टोकाला विकेट पडत राहिल्या. श्रेयस अय्यरला नऊ चेंडूत १३ धावा केल्यावर विकेट पडली. भारताचा कर्णधार हार्दिक पांड्या १३ चेंडूत १३ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या दीपक हुडा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना खातेही उघडता आले नाही. अखेरीस, सूर्यकुमार यादवने ५१ चेंडूत १११ धावांची वादळी खेळी केली. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार आणि ७ षटकार मारले. त्याच्या शतकी खेळीमुळे भारताने सहा गडी गमावून १९१ धावा केल्या.
टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दोन्ही संघ हरले होते. अशा परिस्थितीत त्या स्पर्धेच्या आठवणी विसरून संघांना नव्याने सुरुवात करायची आहे. भारतीय संघाची जबाबदारी कर्णधार हार्दिक पांड्यावर असेल. मिशन २०२४ टी२० विश्वचषकासाठी तो महत्त्वाचा मानला जात आहे. भारतीय संघ सध्या संक्रमणाच्या टप्प्यात आहे. अशा स्थितीत तो टी२० मध्ये कर्णधारपदाचा दावा करू इच्छितो. याशिवाय युवा खेळाडूही संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतील.
India vs New Zealand 2nd T20I Highlights Updates: भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी२० सामना हायलाइट्स अपडेट्स
अॅडम मिल्नेला ६ धावांवर बाद करत दीपक हुड्डाने यासामन्यात ४ बळी घेतले. भारताने दुसरा टी२० सामना तब्बल ६५ धावांनी जिंकला.
न्यूझीलंड १२६-१०
https://twitter.com/ICC/status/1594277766496673794?t=CoDLnWDm-uk0qzocZDvabQ&s=08
ईश सोधीला दीपक हुड्डाने यष्टीचीत केले. तो अवघी १ धाव काढून बाद झाला. तर त्यापाठोपाठ आलेला टीम साऊथी देखील भोपळाही न फोडता बाद झाला.
न्यूझीलंड १२५-९
न्यूझीलंड संघाची एकमेव आशा मावळली. कर्णधार केन विलियम्सन ६१ धावा करून बाद झाला. मोहम्मद सिराजने त्याला त्रिफळाचीत केले.
न्यूझीलंड १२४-७
https://twitter.com/BCCI/status/1594275699757846528?s=20&t=F8CToFrtdn5zAwGB16qUng
मोहम्मद सिराजच्या चेंडूवर षटकार मारत केन विलियम्सनने अर्धशतक पूर्ण केले.
न्यूझीलंड ११७-६
स्वतःच्याच चेंडूवर झेल घेत मोहम्मद सिराजने मिचेल सँटनरला अवघ्या २ धावांवर बाद केले.
न्यूझीलंड ९९-६
https://twitter.com/BCCI/status/1594272669612257285?s=20&t=bbfxWAmWchHVXQBdFIzzIw
शेवटच्या पाच षटकात न्यूझीलंडला धावगती वाढवण्याची गरज आहे. न्यूझीलंडला ३० चेंडूत ९४ धावांची आवश्यकता आहे. कर्णधार केन विलियम्सनवर संघाला सामना जिंकवून देण्याची जबाबदारी आहे.
न्यूझीलंड ९८-५
https://twitter.com/BLACKCAPS/status/1594271839832137730?t=Wa0_PHcV9ayweNeWHlJzVw&s=08
टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज टिकू शकले नाहीत. युजवेंद्र चहलने जिमी नीशमला किशन करवी झेलबाद केले. त्याला भोपळाही फोडता आला नाही.
न्यूझीलंड ८९-५
https://twitter.com/BCCI/status/1594269614347005954?s=20&t=HHLWD0m470lxuS9b0qQfYA
भारतीय संघाची दमदार गोलंदाजीपुढे न्यूझीलंडचे फलंदाज निष्प्रभ ठरत आहेत. दीपक हुड्डाने डॅरिल मिशेलला १० धावांवर बाद केले.
न्यूझीलंड ८८-४
https://twitter.com/BCCI/status/1594268471776272385?s=20&t=ZSPVH9V13C0a-WzHAZsEOg
न्यूझीलंडला ४८ चेंडूत १०७ धावांची गरज आहे. तर टीम इंडियाला पाय रोवून उभा असलेल्या विलियम्सनला बाद करणे गरजेचे आहे.
न्यूझीलंड ८५-३
न्यूझीलंडला तिसरा धक्का बसला असून ग्लेन फिलिप्स १२ धावा करून बाद झाला. त्याला युजवेंद्र चहलने त्रिफळाचीत केले.
न्यूझीलंड ६९-३
न्यूझीलंडचा डावखुरा घातक गोलंदाज डेव्हॉन कॉनवे २५ धावा करून बाद झाला. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने त्याला अर्शदीपकरवी झेलबाद केले.
न्यूझीलंड ५६-२
https://twitter.com/BCCI/status/1594262530158796800?s=20&t=w2V6bFYddkg0VMdw4wFnfw
न्यूझीलंडच्या खराब सुरुवातीनंतर कर्णधार केन विलियम्सन आणि डेव्हॉन कॉनवे या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला.
न्यूझीलंड ५४-१
टीम इंडियाने ठेवलेल्या १९२ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची खराब सुरुवात झाली. पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने सलामीवीर फिन ऍलन भोपळाही न फोडता माघारी पाठवले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कसून गोलंदाजी करत मोठे फटके मारू दिले नाहीत.
न्यूझीलंड ३२-१
https://twitter.com/BLACKCAPS/status/1594259599460544512?t=tkdLM_u_7Uei_Y0_keYa_Q&s=08
न्यूझीलंडला मोठे फटके मारताना अडचण येत आहे. भारतीय संघाने आतापर्यंतच्या या सामन्यात कसून गोलंदाजी केली आहे. पॉवर प्लेच्या चार षटकात चौकार-षटकार मारता आले नाहीत.
न्यूझीलंड १६-१
टीम इंडियाने १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाला शून्यावर पहिला धक्का बसला. सलामीवीर फिन ऍलन भोपळाही न फोडता माघारी परतला.
न्यूझीलंड ०-१
सूर्यकुमार यादवच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने यजमान न्यूझीलंडसमोर १९२ धावांचे आव्हान ठेवले आहे.
भारत १९१-६
https://twitter.com/ICC/status/1594249494836568065?t=HItEm4CWG_X8JvIdpHp1nw&s=08
एका बाजूला सूर्यकुमार फलंदाजी करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र हार्दिक पांड्या, दीपक हुड्डा आणि वॉशिंग्टन सुंदर बाद झाले. टीम साउथीने हॅटट्रिक घेतली.
भारत १९०-६
https://twitter.com/FlashCric/status/1594249317241737218?t=IqsZUiOQje1QceI0Qgu2ew&s=08
टीम इंडियाचा न्यूझीलंड दौऱ्यावरील कर्णधार हार्दिक पांड्या १३ धावा करून बाद झाला.
भारत १९०-४
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात सूर्यकुमार यादवने धावांचा पाऊस पाडत तुफानी शतक झळकावले. त्याने केवळ ४९ चेंडूत शतक पूर्ण केले.
भारत १८६-३
https://twitter.com/FlashCric/status/1594246737644130304?t=S28G6nhfuFvyFvWLMRSkIQ&s=08
२०२२ या वर्षात आतापर्यंतच्या खेळीत सूर्यकुमार यादवने त्याने १०० चौकार मारले.
भारत १४६-३
https://twitter.com/PrimeVideoIN/status/1594244640815087617?t=v1xmz7tyz_NFZ5qRuVNBjw&s=08
भारताचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने शानदार अर्धशतक ठोकले. त्याने ३२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. अजूनही तो खेळपट्टीवर टिकून आहे.
भारत १२२-३
https://twitter.com/FlashCric/status/1594242814506061824?t=GqvbjBJpGSHc15KOOl2-1A&s=08
श्रेयस अय्यर १३ धावा करून हिट-विकेट बाद झाला. ऑनसाइडला फटका मारताना त्याचा उजवा पाय यष्टीला लागला.
भारत १०८-३
https://twitter.com/FlashCric/status/1594240120286515200?t=Oygknytu9bRtoEfNa2L3XA&s=08
श्रेयस अय्यर आणि सूर्याकुमार यादव यांनी चौकार- षटकारांची आतिषबाजी करत भारताची धावसंख्या वेगाने पुढे घेऊन जात आहेत. ईश सोधीच्या एकाच षटकात १५ धावा कुटल्या.
भारत ९७-२
https://twitter.com/FlashCric/status/1594238734702370816?t=u4YbBqG0LZRd4fhwNXUF0Q&s=08
टीम इंडियाच्या पहिल्या १० षटकात सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली. आता सध्या श्रेयस अय्यर- सूर्यकुमार यादव खेळत आहेत.
भारत ७५-२
https://twitter.com/ICC/status/1594237493473210368?t=-lGNVBLi3Z2Vhdio0wUbrw&s=08
सलामीवीर ईशान किशनने ३१ चेंडूत ३६ धावा केल्या. त्याला ईश सोधीने झेलबाद केले.
भारत ६९-२
https://twitter.com/BCCI/status/1594235672264839168?s=20&t=EB54kW4aUNcZ3bRPS2i6FQ
ईशान किशन ईश सोधीच्या गोलंदाजीवर पायचीत होताना वाचला. त्याने रिव्ह्यू घेतला होता.
भारत ५९-१
https://twitter.com/FlashCric/status/1594233598038921218?t=YTnhO_nwB--lepjXFASheg&s=08
माउंट मांउगानुईमध्ये पावसाने विश्रांती घेतली असून सामना पुन्हा सुरु झाला आहे.
भारत ५१-१
https://twitter.com/FlashCric/status/1594231538744324098?t=7_j6SR4Ur_ZWB7s9IvEI8Q&s=08
भारत-न्यूझीलंड सामन्यात पावसाचा पुन्हा व्यत्यय आल्याने खेळ थांबविण्यात आला आहे.
भारत ५०-१
सलामीवीर ईशान किशन आणि ऋषभ पंत चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात पंत बाद झाला. पण पॉवर प्ले मध्ये किशनने शानदार फटकेबाजी केली. तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे.
भारत ५०-१
दुसऱ्या टी२० सामन्यात सलामीवीर ईशान किशन आणि ऋषभ पंत यांनी चांगली सुरुवात केली होती मात्र सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली. पंतने १३ चेंडूत ६ धावा केल्या. त्याला लॉकी फर्ग्युसनने झेलबाद केले.
भारत ३६-१
https://twitter.com/BCCI/status/1594223674566971392?s=20&t=o0cC_-h5e-fWYBF5KoZMjQ
India vs New Zealand 2nd T20I Highlights Updates: भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी२० सामना हायलाइट्स अपडेट्स
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (२० नोव्हेंबर) होणार आहे. माउंट मांउगानुई येथे दोन्ही संघ आमनेसामने येतील.