India vs New Zealand 2nd T20 Highlights Match Score: भारताने न्यूझीलंडवर ६५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताच्या या विजयाचा शिल्पकार सूर्यकुमार यादव ठरला. त्याला सामनीवीर म्हणून गौरवण्यात आले. यासह भारताने या मालिकेत १-०ने विजयी आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा अक्षरश: घाम काढला. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने धडाकेबाज शतकी खेळी करत टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारून दिली. धावांचा पाठलाग करताना १८.५ षटकात न्यूझीलंड केवळ १२६ धावाच करू शकली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारताने न्यूझीलंडसमोर १९२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात काही खास नव्हती. भारताची पहिली विकेट ३६ धावांवर पडली, जेव्हा ऋषभ पंत १३ चेंडूत ६ धावा करून बाद झाला. यानंतर ईशान किशनने वेगवान धावा करत भारताची धावसंख्या ५० च्या पुढे नेली, पण तोही ३१ चेंडूत ३६ धावा करून बाद झाला. या सामन्यात पावसामुळे २७ मिनिटांचा खेळ वाया गेला, मात्र षटकांच्या संख्येत कोणतीही घट झाली नाही. एका टोकाला, सूर्यकुमार यादवने जबाबदारी स्वीकारली आणि वेगवान धावा केल्या, पण दुसऱ्या टोकाला विकेट पडत राहिल्या. श्रेयस अय्यरला नऊ चेंडूत १३ धावा केल्यावर विकेट पडली. भारताचा कर्णधार हार्दिक पांड्या १३ चेंडूत १३ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या दीपक हुडा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना खातेही उघडता आले नाही. अखेरीस, सूर्यकुमार यादवने ५१ चेंडूत १११ धावांची वादळी खेळी केली. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार आणि ७ षटकार मारले. त्याच्या शतकी खेळीमुळे भारताने सहा गडी गमावून १९१ धावा केल्या.

टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दोन्ही संघ हरले होते. अशा परिस्थितीत त्या स्पर्धेच्या आठवणी विसरून संघांना नव्याने सुरुवात करायची आहे. भारतीय संघाची जबाबदारी कर्णधार हार्दिक पांड्यावर असेल. मिशन २०२४ टी२० विश्वचषकासाठी तो महत्त्वाचा मानला जात आहे. भारतीय संघ सध्या संक्रमणाच्या टप्प्यात आहे. अशा स्थितीत तो टी२० मध्ये कर्णधारपदाचा दावा करू इच्छितो. याशिवाय युवा खेळाडूही संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतील.

Live Updates

India vs New Zealand 2nd T20I Highlights Updates: भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी२० सामना हायलाइट्स अपडेट्स

12:25 (IST) 20 Nov 2022
IND vs NZ: ईशान किशन थोडक्यात बचावला

ईशान किशन आऊटसाइड लेगला धाव काढण्याच्या नादात थोडक्यात बचावला.

भारत ३४-०

12:21 (IST) 20 Nov 2022
IND vs NZ: ईशान किशनने लॉकी फर्ग्युसनला मारला शानदार षटकार

भारतीय डावाच्या चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर ईशान किशनने लॉकी फर्ग्युसनला शानदार षटकार मारला.

भारत २९-०

12:16 (IST) 20 Nov 2022
IND vs NZ: पहिल्या दोन षटकात भारतीय सलामीवीरांची चांगली सुरुवात

टीम इंडियाचे सलामीवीर ईशान किशन आणि ॠषभ पंत यांनी चांगली सुरुवात केली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी वाईड चेंडू टाकत भारताच्या धावसंख्येत अधिकची भर घातली.

भारत १८-०

12:05 (IST) 20 Nov 2022
IND vs NZ: भारताचे सलामीवीर आले खेळपट्टीवर

सलामीवीर म्हणून टीम इंडियाने ईशान किशन आणि ॠषभ पंत यांना संधी देण्यात आली.

भारत०-०

12:02 (IST) 20 Nov 2022
IND vs NZ: भारत-न्यूझीलंड दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानात

भारत-न्यूझीलंड दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानात आले आहेत.

11:54 (IST) 20 Nov 2022
IND vs NZ: मालिकेच्या ट्रॉफीचे अनावरण

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले आहे.

11:47 (IST) 20 Nov 2022
IND vs NZ: न्यूझीलंड प्लेईंग-११

न्यूझीलंड संघाने देखील आपले महत्वाचे खेळाडू कायम ठेवत पूर्ण ताकदीने या सामन्यात उतरताना दिसत आहे.

11:45 (IST) 20 Nov 2022
IND vs NZ: टीम इंडिया प्लेईंग-११

भारत-न्यूझीलंड दुसऱ्या टी२० सामन्यात संजू सॅमसन, शुबमन गिल आणि उमरान मलिक यांना संघात स्थान मिळाले नाही.

11:42 (IST) 20 Nov 2022
IND vs NZ: न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.

11:20 (IST) 20 Nov 2022
IND vs NZ: भारतीय संघाने सामन्याआधी केला सराव

माउंट मांउगानुईच्या स्टेडीयममध्ये टीम इंडिया दाखल झाली असून कार्यवाही प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नेतृत्वाखाली सरावाला सुरुवात देखील केली आहे.

11:06 (IST) 20 Nov 2022
IND vs NZ: कशी असेल माउंट मांउगानुईची खेळपट्टी

न्यूझीलंडमध्ये अनेकदा मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळत असले तरी माउंट मांउगानुईची खेळपट्टी थोडी वेगळी आहे. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या केवळ १६२ धावांची आहे. येथे मागील ७ सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ५ वेळा विजय मिळवला आहे. बहुतांश प्रसंगी हा विजय मोठ्या धावांच्या फरकाने मिळाला आहे. म्हणजेच या विकेटवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणे फायदेशीर ठरू शकते, असे म्हणता येईल. पण पावसाळी वातावरणामुळे दोन्ही संघाचे कर्णधार पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

10:51 (IST) 20 Nov 2022
IND vs NZ: माउंट मांउगानुई येथील टोरंगा मैदानात पावसाने घेतली विश्रांती

भारत-न्यूझीलंड दुसऱ्या टी२० सामन्यात मुसळधार पाऊस पडू शकतो AccuWeather नुसार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. माउंट मांउगानुई येथे तापमान १५-२१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची आहे. , दिवसभर ढगाळ वातावरण असेल. सकाळी हलक्या पावसाची शक्यता आहे, सध्या पाऊस थांबला आहे आणि स्टेडीयममध्ये प्रेक्षक येण्यास सुरुवात झाली आहे.

10:43 (IST) 20 Nov 2022
IND vs NZ: युवा टीम इंडिया न्यूझीलंड भिडण्यास सज्ज

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (२० नोव्हेंबर) होणार आहे. माउंट मांउगानुई येथे दोन्ही संघ आमनेसामने येतील. वेलिंग्टनमध्ये पावसामुळे पहिला सामना रद्द झाला होता. आजच्या सामन्यात हार्दिक ब्रिगेड विजयी सुरुवात करण्याच्या इराद्याने उतरेल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (२० नोव्हेंबर) होणार आहे. माउंट मांउगानुई येथे दोन्ही संघ आमनेसामने येतील.