India vs New Zealand 3rd T20 Highlights Match Score: भारत आणि न्यूझीलंड मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज म्हणजे मंगळवारी २२ नोव्हेंबर रोजी मॅक्लीन पार्क नेपियर येथे खेळला गेला. टीम इंडिया सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे आणि हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ३ सामन्यांची टी२० मालिकेत १-० असा विजय मिळवत मालिका खिशात घातली. न्यूझीलंडचा आजच्या सामन्यातील कर्णधार टीम साऊदीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार केन विलियम्सन दुखापतीमुळे आजचा सामना खेळू शकला नाही. त्याच्या एवजी मार्क चॅपमनला संघात स्थान देण्यात आले. सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर त्यांनी १६० या सन्मानजनक धावसंख्या उभारली.
१६१ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर ईशान किशन, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर स्वस्तात माघारी परतले. ईशान आणि पंतने अनुक्रमे १० आणि ११ धावा केल्या. तर श्रेयस अय्यरला भोपळाही फोडता आला नाही. न्यूझीलंडचा आजच्या सामन्यातील कर्णधार टीम साऊदीने २ गडी बाद केले. त्यानंतर भारताचा ‘द- स्काय’ सूर्यकुमार यादव आणि कर्णधार हार्दिक पांड्या यांनी धुव्वाधार फलंदाजी करत पॉवर प्ले मध्ये ५७ धावा केल्या. पण मोठा फटका मारण्याच्या नादात सूर्यकुमार बाद झाला. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि शेवटी सामना तिथेच थांबविण्यात आला. नऊ षटकात ७६ धावांची गरज असताना टीम इंडियाच्या ७५ धावा झाल्या होत्या. त्यामुळे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार सामना बरोबरीत सुटला आणि १-०ने मालिका खिशात घातली.
न्यूझीलंडच्या त्या दोन खेळाडूंव्यतिरिक्त कोणालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ते दोन खेळाडू म्हणजेच डेव्हॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स होय. भारतीय गोलंदाजांनी त्यांच्यावर दबाव आणत शेवटच्या पाच षटकात ३० धावांत तब्बल ८ बाद केले. या दोघांच्या जोरावरच न्यूझीलंडला दीडशे धावांचा आकडा पार करता आला. हा सामना न्यूझीलंडसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण, यापूर्वी झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. त्यामुळे भारत या मालिकेत १-०ने आघाडीवर आहे.
न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना सलामीवीर डेवॉन कॉनवे याने सर्वाधिक धावा चोपल्या. यावेळी त्याने ४९ चेंडूत ५९ धावा केल्या. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ५ चौकारांचीही बरसात केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा १२०.४१ इतका होता. त्याच्याव्यतिरिक्त ग्लेन फिलिप्स यानेही ३३ चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५४ धावा चोपल्या. या दोघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मार्क चॅम्पमनने १२, डॅरिल मिचेलने १० आणि मिचेल सँटनरने १ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडच्या ३ फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.
टीम इंडियाकडून गोलंदाजी करताना दोनच गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना नाकीनऊ आणले. यामध्ये अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. दोघांनीही प्रत्येकी ४ गडी बाद करत आपल्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला. डावखुरा गोलंदाज अर्शदीपने ४ षटकात ३७ धावा देत ४ बळी घेतले. त्याला, हर्षल पटेल याने १ गडी बाद करत मोलाची साथ दिली.
India vs New Zealand 3rd T20I Highlights Updates: भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी२० सामना हायलाइट्स अपडेट्स
पावसामुळे सामना येथेच थांबविण्यात आला असून डकवर्थ लुईस नियमानुसार सामना बरोबरीत सुटला. टीम इंडियाने तीन टी२० मालिका १-० ने जिंकली.
भारत ७५-४
https://twitter.com/BCCI/status/1595001084808134656?s=20&t=BrWWY-HKYCvJYEiSCp1FuA
भारत-न्यूझीलंड सामन्यात पुन्हा पावसाने खोडा घातला. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार नऊ षटकात ७६ धावांची गरज आहे आणि भारताने देखील ७५ धावाच केल्या आहेत. जर पाऊस थांबला नाही तर सामना बरोबरीत सुटेल.
भारत ७५-४
सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र सूर्यकुमार यादव मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला त्याला ईश सोधीने १३ धावांवर बाद केले.
भारत ६०-४
टीम इंडियाने पॉवर प्ले मध्ये अडखळत सुरुवात केली. ईशान किशन, पंत आणि अय्यर हे तीन फलंदाज एकापाठोपाठ एक बाद झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या नी सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
भारत ५८-३
न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने श्रेयस अय्यरला भोपळाही न फोडू देता तंबूत पाठवले. भारताची खराब सुरुवात झाली.
भारत २१-३
मोठे फटके मारण्याच्या नादात डावखुरा फलंदाज ऋषभ पंत ११ धावा करून बाद झाला. त्याला टीम साऊदीने बाद केले.
भारत २१-२
न्यूझीलंडने ठेवलेल्या १६१ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेला टीम इंडियाचा सलामीवीर ईशान किशन १० धावा करून बाद झाला.
भारत १३-१
https://twitter.com/BCCI/status/1594983182549811200?s=20&t=vPMV3UPBWaqYvMq38hcswQ
ईशान किशन आणि ऋषभ पंत १६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आले आहे. येताच किशनने एक षटकार देखील मारला.
भारत ६-०
शेवटच्या पाच षटकात भारताने तुफान गोलंदाजी करत न्यूझीलंडचा संपूर्ण संघ बाद केला. अवघ्या ३० धावत न्यूझीलंडने ८ गडी गमावले. यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यात त्याला अपयश आले.
न्यूझीलंड सर्वबाद १६०
https://twitter.com/BCCI/status/1594977107301797888?s=20&t=SLOe3N-WkGLWeFcodFD8iA
अॅडम मिल्नेला मोहम्मद सिराजने धावबाद केले. त्याला भोपळाही फोडता आला नाही.
न्यूझीलंड १४९-९
अर्शदीप सिंगने एकाच षटकात डॅरिल मिशेल आणि ईश सोधी यांना एकापाठोपाठ सलग दोन चेंडूवर बाद करत न्यूझीलंडला मोठा धक्का दिला.
न्यूझीलंड १४९-८
मोहम्मद सिराजने दमदार गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या धावगतीला ब्रेक लावला. मिचेल सँटनर अवघी एक धाव काढून बाद झाला.
न्यूझीलंड १४९-६
भारताची शानदार गोलंदाजी सुरूच आहे. डावखुरा फलंदाज जिमी निशमला सिराजने भोपळाही फोडू दिला नाही. तो शून्यावर बाद झाला.
न्यूझीलंड १४७-५
टीम इंडियाने फिलिप्स पाठोपाठ डेव्हॉन कॉनवेला बाद करत संघाला सामन्यात परत आणले. डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंगने त्याला ५९ धावांवर बाद केले.
न्यूझीलंड १४६-४
https://twitter.com/BCCI/status/1594972357118296066?s=20&t=ZuuAuBBifU7WiJGwZiGBqA
अखेर भारतीय गोलंदाजांना जोडी फोडण्यात यश मिळाले. मोहम्मद सिराजने ग्लेन फिलिप्स ५४ धावांवर बाद केले.
न्यूझीलंड १३०-३
https://twitter.com/BCCI/status/1594970685625225216?s=20&t=jgOzCt3HjNaDwECwWILMPA
डेव्हॉन कॉनवे पाठोपाठ ग्लेन फिलिप्सने शानदार फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केले. भारतीय गोलंदाजांचा अक्षरशः या दोघांनी घाम काढला. लवकरच ही भागीदारी तोडली नाही तर न्यूझीलंड मोठी धावसंख्या उभारण्याच्या शक्यता नाकारता येत नाही.
न्यूझीलंड १२७-२
https://twitter.com/ICC/status/1594969516785680385?t=JbhiiyvKwU6j7n_TLRwp5A&s=08
न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज डेव्हॉन कॉनवेने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने ग्लेन फिलिप्सला हाताशी धरत ५० धावांची भागीदारी देखील पूर्ण केली. भारताला विकेट्सची गरज आहे. जर हे दोघे असेच खेळत राहिले तर टीम इंडियाला महागात पडू शकते.
न्यूझीलंड १०८-२
https://twitter.com/ddsportschannel/status/1594967598126374913?t=KmbAF0WMq93qUjX7GAcRbg&s=08
न्यूझीलंडच्या दोन विकेट्स पडल्या तरी देखील एका बाजूला सलामीवीर शानदार फटकेबाजी करत आहेत. पहिल्या न्यूझीलंड डावाची निम्मे षटके संपली असून धावगती देखील चांगली आहे.
न्यूझीलंड ७४-२
https://twitter.com/BCCI/status/1594963132543565824?s=20&t=7BtzcRdKLvK8u-7eolUWww
फिन ऍलनच्या स्वरुपात पहिली विकेट लवकर गमावल्यानंतर डेव्हॉन कॉनवे आणि मार्क चॅपमन यांनी न्यूझीलंडचा डाव सावरत चांगली फलंदाजी केली. पॉवर प्ले मध्ये दोघांनी फटकेबाजी करत संघाची धावगती पुढे नेली. पण मोहम्मद सिराजने भागीदारी तोडत मार्क चॅपमनला बाद केले.
न्यूझीलंड ४६-२
https://twitter.com/ICC/status/1594959588801056768?t=vTP117CXvQqaeYPXq7J6pw&s=08
मार्क चॅपमनला मोहम्मद सिराजने १२ धावांवर बाद केले.
न्यूझीलंड ४४-२
https://twitter.com/BCCI/status/1594958196422344704?s=20&t=eru6Zk1RKQEyurimSQQugA
टीम इंडियाचा गोलंदाज अर्शदीप सिंगच्या दुसऱ्या षटकात न्यूझीलंडचा सलामीवीर डावखुरा फलंदाज डेव्हॉन कॉनवेने एक षटकार आणि दोन चौकार मारले. तर मार्क चॅपमन याने एक चौकार मारला. त्या षटकात १९ धावा चोपल्या.
न्यूझीलंड ३७-१
न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर फिन ऍलन अवघ्या ३ धावा करून बाद झाला.
न्यूझीलंड ९-१
https://twitter.com/BCCI/status/1594953635519410176?s=20&t=N6OxPynyX7A7Dsg275Kmaw
थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होणार आहे. न्यूझीलंडचे दोन्ही सलामीवीर मैदानात आले. फिन ऍलन आणि डेव्हॉन कॉनवे न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात करतील.
https://twitter.com/BCCI/status/1594950652081438720?s=20&t=uQZ6-5rBj8Hc6rCFVJrxIg
न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन दुखापतीमुळे आजचा सामना खेळू शकणार नाही. त्याच्या ऐवजी मार्क चॅपमनचा संघात समावेश करण्यात आला आहे. टीम साऊदीकडे आजच्या सामन्यात नेतृत्वाची धुरा देण्यात आली आहे.
https://twitter.com/ddsportschannel/status/1594942603937521665?s=20&t=i5Avmx_qHUSpTRx6V2IxNA
भारतीय संघाने वॉशिंग्टन सुंदर ऐवजी हर्षल पटेलला संघात स्थान दिले आहे.
https://twitter.com/ddsportschannel/status/1594942878081392641?t=zZTQvMLsK6c8We7LNNH1cg&s=08
न्यूझीलंडने तिसऱ्या टी२० सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
https://twitter.com/ddsportschannel/status/1594941527058677761?t=bVMKf2yNjrfXTtFgTTsgRw&s=08
नेपियरचे मॅक्लीन पार्क हे टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी एक आदर्श मैदान आहे परंतु येथील आकडेवारी आणि परिस्थितीने इतिहासात बरेच चढ-उतार पाहिले आहेत. गेल्या काही तासांपासून खेळपट्टी कव्हरमध्ये झाकलेली होती त्यामुळे खेळपट्टी बेल्टरसारखे दिसत आहे, खेळपट्टीत जास्त ओलावा नाही. मैदानाच्या सीमा लहान आहेत. बाऊन्स स्पॉन्जी असू शकते आणि ते फिरकीपटूंना मदत करेल.
भारतीयप्रमाणवेळेनुसार दुपारी १२.०० वाजता नाणेफेक होणार असून १२.३० वाजता सामन्याला सुरुवात होईल अशी माहितीसमोर आली आहे. महत्वाची बाब म्हणजे एकही षटकाचा खेळ कमी होणार नाही. पूर्ण २० षटकांचा सामना होणार आहे.
https://twitter.com/BLACKCAPS/status/1594939711772319745?t=egBEoADB8JN842AXePbV2g&s=08
मॅक्लीन पार्क नेपियरमध्ये हवामान हळूहळू अनुकूल होत असून खेळपट्टीवरील कव्हर्स काढण्यात आले आहेत.
https://twitter.com/ddsportschannel/status/1594938567960461312?t=RcYxaUW9g7dNC_gW8b8PTg&s=08
नेपियरमध्ये पाऊस थांबला असून दोन्ही संघाचे खेळाडू सामन्याआधी सराव करताना दिसत आहेत. खेळपट्टी आणि मैदान थोडे ओलसर असल्याने मैदानातील कर्मचारी मैदान सुकवण्याचे पूर्ण प्रयत्न करत आहेत.
India vs New Zealand 3rd T20I Highlights Updates: भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी२० सामना हायलाइट्स अपडेट्स
नऊ षटकात ७६ धावांची गरज असताना टीम इंडियाच्या ७५ धावा झाल्या होत्या. त्यामुळे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार सामना बरोबरीत सुटला आणि १-०ने मालिका खिशात घातली.