भारताचा कप्तान रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या नव्या इनिंगची दमदार सुरुवात केली आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ५ गडी राखून विजय नोंदवला. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडकडून सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि मार्क चॅपमन यांनी अर्धशतके ठोकली. या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकात ६ बाद १६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवने अर्धशतक ठोकले तर, रोहितने ४८ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात १० धावांची गरज असताना पदार्पणवीर व्यंकटेश अय्यर आणि ऋषभ पंत यांनी चौकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सूर्यकुमारला सामनावीर पुरस्कार मिळाला. या विजयासह भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
IND vs NZ 1st T20 : मुंबईकर सूर्या तळपला; रोहित-द्रविडनं उघडलं विजयाचं खातं!
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर भारतानं न्यूझीलंडला ५ गड्यांनी मात दिली.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-11-2021 at 18:44 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs new zealand first t20 match report adn