IND vs NZ LIVE Score, Champions Trophy 2025 Final: भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे जेतेपद पटकावत ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. या विजयासह भारताने तिसऱ्यांदा या स्पर्धेचे जेतेपद आपल्या नावे केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली हा भारतीय संघ एकही सामना न गमावता हे जेतेपद आपल्या नावे केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ICC Champions Trophy 2025 Final IND Vs NZ LIVE Score Updates: भारत वि. न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील अंतिम सामना दुबईत खेळवला जात आहे. या सामन्याचे सर्व अपडेट्स जाणून घ्या.
IND vs NZ: रोहितने स्वीकारली ट्रॉफी
संपूर्ण भारतीय संघाला सुरूवातीला पांढरे कोट देण्यात आले आणि यानंतर आयसीसीचे चेअरमॅन जय शाह यांनी रोहित शर्माच्या हातात ट्रॉफी दिली आणि रोहितने संपूर्ण संघासह .या ट्रॉफीचा आनंद साजरा केला.
IND vs NZ: दोन्ही संघांना मेडल्स
भारत वि. न्यूझीलंड सामन्यानंतर दोन्ही संघांना मेडल्स देण्यात आले. सुरूवातीला उपविजेता न्यूझीलंड संघ आणि विजेता भारतीय संघ यांना मेडल्स देण्यात आले.
IND vs NZ: भारताने विजय मिळवताच भारतीय खेळाडूंचा जल्लोष
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे जेतेपद पटकावताच भारताच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. याचे काही फोटो बीसीसीआयने शेअर केले आहेत.
One Team
— BCCI (@BCCI) March 9, 2025
One Dream
One Emotion!
??????#TeamIndia pic.twitter.com/MbqZi9VGoG
रवींद्र जडेजाच्या विजयी चौकारासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ करंडक जिंकला आहे. जडेजाने ४९व्या षटकाती अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत संघाला ४ विकेट्सने मोठा विजय मिळवून दिला आहे. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात तिसऱ्यांदा हा करंडक पटकावणारा पहिला संघ ठरला.
IND vs NZ: हार्दिक पंड्या झेलबाद
भारताला १२ धावांची गरज असताना हार्दिक पंड्या पुल शॉट खेळता खेळता १८ धावा करत झेलबाद झाला. यासह भारताला विजयासाठी १६ चेंडूत ११ धावांची गरज आहे.
IND vs NZ: राहुल-हार्दिकच्या जोडीने सावरला भारताचा डाव
श्रेयस-अक्षरच्या चांगल्या भागीदारीनंतर केएल राहुल आणि हार्दिक पंड्या संघाचा डाव सावरत आहेत. भारताने ३६ षटकांत ५ बाद २३१ धावा केल्या आहेत.
IND vs NZ live: भारताचा निम्मा संघ तंबूत
मायकेल ब्रेसवेलच्या ४२व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अक्षर पटेल झेलबाद झाला. यासह भारताचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. आता भारताला ५१ चेंडूत ४९ धावांची गरज आहे.
IND vs NZ live: श्रेयस अय्यर झेलबाद
सँटनरच्या ३९व्या षटकातील चौथ्या चेंडूवर श्रेयस अय्यर झेलबाद झाला, रचिन रवींद्रने एक कमालीचा झेल टिपत भारताने चौथी मोठी विकेट गमावली. यासह भारतालाविजयासाठी ६० चेंडूत ६१ धावांची गरज आहे.
IND vs NZ live: श्रेयसचा झेल सुटला
फिलिप्सच्या ३७व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर श्रेयसने षटकार लगावला आणि चौथ्या चेंडूवर श्रेयस मोठा फटका मारण्यासाठी गेला अन् सीमारेषेजवळ काईल जेमिसनने टिपला. पण झेल पूर्ण करेपर्यंत त्याच्या हातातून चेंडू निसटला आणि श्रेयसला जीवदान मिळाला.
IND vs NZ live: ३५ षटकांत केल्या इतक्या धावा
भारताने ३५ षटकांत ३ बाद १६१ धावा केल्या आहेत. रोहित शर्माच्या विकेटनंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने संघाचा डाव सावरत आहेत. यासह भारताला ९० चेंडूत ९० धावांची गरज आहे.
भारतीय संघाला या लक्ष्याचा पाठलाग करताना मोठा धक्का बसला आहे. रोहित शर्मा २७व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर स्टंपिंग झाला, रोहित मोठा फटका खेळण्यासाठी पुढे गेला आणि फटका मारायला चुकताच चेंडू थेट लॅथमच्या हातात गेला आणि त्याने स्टंपिंग करत रोहितला बाद केलं. भारताने गेल्या १७ धावांत ३ मोठ्या विकेट गमावल्या. भारताला आता विजयासाठी १३८ चेंडूत १३० धावांची गरज आहे. रोहित शर्मा ८३ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ७६ धावा करत बाद झाला.
IND vs NZ live: रोहित शर्माची मोठी कामगिरी
रोहित शर्मा ७४ धावा करत मैदानात कायम आहे आणि भारताचा डाव पुढे नेत आहे. यादरम्यान रोहित शर्माने भारतीय संघाचा कर्णधार म्हणून वनडेमध्ये २५००* धावांचा पल्ला गाठला आहे.
Milestone ? – 2500* ODI runs and counting as Captain of #TeamIndia
— BCCI (@BCCI) March 9, 2025
Keep going, Ro ?
Live – https://t.co/OlunXdzr5n #INDvNZ #ChampionsTrophy #Final pic.twitter.com/N1bTwfPBCa
विराट कोहली बाद
मायकेल ब्रेसवेलच्या २० षटकातील पहिल्याच चेंडूवर विराट कोहली पायचीत झाला. विराट अवघ्या २ धावा करत बाद झाल्याने भारताला लागोपाठ दोन धक्के बसले आहे. यासह भारताने २० षटकांत २ बाद १०८ धावा केल्या आहेत.
शुबमन गिल सँटनरच्या १९व्या षटकातील चौथ्या चेंडूवर झेलबाद झाला. ग्लेन फिलिप्सने पुन्हा एकदा एक कमालीचा झेल टिपला आणि संघाला पहिली मोठी विकेट मिळवून दिली. गिल ५० चेंडूत एका षटकारासह ३१ धावा करत बाद झाला.
Glenn Philips is just a flying machine ? pic.twitter.com/KeeQ403ZbX
— He7icopter (@he7icopter) March 9, 2025
रोहित शर्मा आणि गिलच्या भागीदारीच्या जोरावर भारताने १०० धावांचा टप्पा गाठला आहे. रोहित शर्मा ६८ धावा तर शुबमन गिल २७ धावा करून मैदानावर कायम आहे. यासह रोहित आणि गिलमध्ये १०० धावांची भागीदारी केली होती.
रोहित शर्माने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात झंझावाती अर्धशतक झळकावले आहे. रोहितने पहिल्यांदाच आयसीसीच्या अंतिम सामन्यात अर्धशतक केले आहे. रोहितने ४१ चेंडूत ५ चौकार, ३ षटकारांसह आपलं अर्धशतक पूर्ण केलं. रोहितने पहिल्याच षटकात दणदणीत षटकार लगावत आपले मनसुबे जाहीर केली. तर गिलनेही त्याला चांगली साथ दिली. यासह भारताने ११ षटकांत एकही विकेट न गमावता ६५ धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा आणि शुबमन गिलची जोडी मैदानात कायम आहे. यासह भारताने ५ षटकांत बिनबाद ३० धावा केल्या आहेत. रोहितने २१ धावा तर गिल ५ धावा करून मैदानात आहे.
न्यूझीलंडने दिलेल्या २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिलची सलामी जोडी मैदानात आहे. रोहित शर्माने किवी गोलंदाज काईल जेमिसनच्या पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर षटकाराने चांगली सुरूवात केली. यासह भारताने पहिल्याच षटकात ९ धावा केल्या आहेत. दुखापत झाल्यामुळे केन विलियमसन भारताच्या डावात फलंदाजीला उतरणार आहे.
भारतीय संघाला विजयासाठी न्यूझीलंड संघाने २५२ धावांचे आव्हान दिले आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना झटपट विकेट गमावले पण डॅरिल मिचेल आणि ब्रेसवेलच्या अर्धशतकाने किवी संघाने झुंज देण्याइतकी मोठी धावसंख्या उभारली आहे. आता भारतीय संघ कशी फलंदाजी करणार यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.
भारताच्या फिरकीपटूंनी उत्कृष्ट गोलंदाजी करत किवी संघाच्या फलंदाजांना धावा काढू दिल्या नाहीत. मधल्या षटकांमध्ये वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी कमालीची गोलंदाजी केली. तर न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने ६३ धावांची, ग्लेन फिलिप्सने ३४, रचिनने ३७ तर ब्रेसवेलने ५३ धावांची वादळी फलंदाजी केली. ब्रेसवेलने संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेण्यात मोलाची भूमिका बजावली.
तर भारताकडून वरूणने २, कुलदीपने २, जडेजाने १, शमीने १ विकेट घेतली. तर विराटच्या परफेक्ट थ्रो वर केएल राहुलने सँटनरला धावबाद केले.
IND vs NZ live: मोहम्मद शमीच्या खात्यात विकेट
मोहम्मद शमीच्या ४६व्या षटकातील चौथ्या चेंडूवर डॅरिल मिचेल रोहित शर्माकरवी झेलबाद झाला. मिचेलने या षठकात दोन चौकार लगावले होते पण अखेरीस तो झेलबाद झाला. मिचेल १०१ धावा करत ३ चौकार लगावत ६३ धावा करत बाद झाला.
IND vs NZ live: डॅरिल मिचेलचे अर्धशतक
डॅरिल मिचेलने ९१ चेंडूत ५० धावा करत अर्धशतक केले आहे. मिचेल एकटाच भारतीय संघाविरूद्ध खेळताना दिसत आहे. मिचेलने या अर्धशतकी खेळीत एक चौकार लगावला आहे आणि इतर सर्व धावा एकेरी दुहेरी धावा करत केल्या आहेत.
रोहित शर्माने न्यूझीलंडविरूद्ध नाणेफेक गमावत वनडे क्रिकेट इतिहासातील मोठ्या विक्रमाची नोंद केली.
रोहित शर्माचा नाणेफेक गमावण्याचा सिलसिला सुरू, ब्रायन लाराच्या ‘त्या’ मोठ्या विक्रमाची केली बरोबरी
ग्लेन फिलीप्सने न्यूझीलंडकडून पहिला षटकार खेचला आणि तो मैदानात चांगलाच सेट झाला होता. रोहितने ३८वे षटक टाकण्याची जबाबदारी वरूण चक्रवर्तीला दिली. वरूणने षटकातील पाचव्या चेंडूवर ग्लेन फिलिप्सला क्लीन बोल्ड करत न्यूझीलंडच्या धावांवर पुन्हा दबाव टाकला.
WHAT A BEAUTY FROM VARUN CHAKRAVARTHY. ??pic.twitter.com/YPtuYO6w8Y
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 9, 2025
IND vs NZ live: रोहित-गिलने सोडला झेल
अक्षरच्या ३५व्या षटकात रोहितने मिड विकेटवर आणि जडेजाच्या ३६व्या षटकात गिलने सीमारेषेवर झेल सोडला. दोन्ही झेल इतके सोपे नव्हते पण दोघांनीही चांगला प्रयत्न केला. अशारितीने न्यूझीलंडने ३६ षटकांत ४ बाद १५६ धावा केल्या आहेत.
जडेजाच्या २४व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर टॉम लॅथमला पायचीत केलं. लॅथम फिरकीविरूद्ध खेळताना स्वीप मारत धावा करतो, पण या सामन्यात त्याने एकदाही स्वीप शॉट मारला नव्हता. पण त्याने जडेजाच्या गोलंदाजीवर स्वीप मारत धावा करण्याचा प्रयत्न केला पण लॅथम पायचीत झाला. यासह न्यूझीलंडने १५ षटकांत ४ बाद ११४ धावा केल्या आहेत.
Ravindra Jadeja picks up his first wicket as Tom Latham is given out LBW!
— BCCI (@BCCI) March 9, 2025
Live – https://t.co/OlunXdyTfP #INDvNZ #ChampionsTrophy #Final pic.twitter.com/6gWZ07L7cG
न्यूझीलंड संघाने २० षटकांत ३ बाद १०१ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडने ११ ते २० षटकांत २ विकेट्स गमावत अवघ्या ३२ धावा केल्या. भारतीय संघाचे फिरकीपटू पुन्हा एकदा भेदक गोलंदाजी करत आहेत आणि किवी संघाच्या धावांवर चांगला अंकुश ठेवला आहे. कुलदीपने रचिन आणि विलियमसन तर वरूणने संघाला ब्रेकथ्रू मिळवून देत विल यंगची विकेट घेतली.
IND vs NZ Live: रोहित शर्मा – विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड
रोहित शर्मा विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलकरता मैदानावर पाऊल ठेवताच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
IND vs NZ: रोहित-विराटचा वर्ल्ड रेकॉर्ड, ICC स्पर्धेत ‘ही’ कामगिरी करणारे जगातील पहिले फलंदाज
IND vs NZ Live: कुलदीपच्या खात्यात दुसरी विकेट
कुलदीप यादवने १३व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर विलियमसनला आपल्याच गोलंदाजीवर क्लीन बोल्ड करत संघाला दुसरी मोठी विकेट मिळवून दिली. यासह भारताला दुसरी मोठी विकेट मिळाली. कुलदीपने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फारशी चांगली कामगिरी केली नव्हती, पण अंतिम फेरीत त्याने पहिल्याच दोन षटकात विकेट घेत तो का संघाचा महत्त्वाचा गोलंदाज आहे हे त्याने दाखवून दिले. यासह न्यूझीलंडने १३ षटकांत ३ बाद ७७ धावा केल्या आहेत.
IND vs NZ Live: रचिन रवींद्र क्लीन बोल्ड
कुलदीप यादवच्या ११व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने घातक दिसणाऱ्या रचिनला फिरकीच्या जाळ्यात अडकवत क्लीन बोल्ड केलं. यासह भारताला दुसरी महत्त्वाची विकेट मिळाली. रचिन ३७ धावा करत बाद झाला.
IND vs NZ Live: भारताच्या खात्यात पहिली विकेट
वरूण चक्रवर्तीच्या आठव्या षटकात त्याने भारताला पहिली विकेट मिळवून दिली. वरूणने पाचव्या चेंडूवर विल यंगला पायचीत करत आपल्या फिरकीच्या जोरावर संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. यासह न्यूझीलंडने आठ षटकात १ बाद ५८ धावा केल्या आहेत.
IND vs NZ Final LIVE Score, ICC Champions Trophy 2025: भारत वि. न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलचे लाइव्ह अपडेट्स