IND vs NZ Highlights: भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे जेतेपद पटकावत ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. या विजयासह भारताने तिसऱ्यांदा या स्पर्धेचे जेतेपद आपल्या नावे केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली हा भारतीय संघ एकही सामना न गमावता हे जेतेपद आपल्या नावे केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Live Updates

ICC Champions Trophy 2025 Final IND Vs NZ LIVE Score Updates:  भारत वि. न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील अंतिम सामना दुबईत खेळवला गेला. या सामन्याचे हायलाईट्स वाचा…

15:11 (IST) 9 Mar 2025

IND vs NZ Live: सातव्या षटकात बाद होता होता वाचला रचिन

वरूण चक्रवर्तीच्या आठव्या षटकातील पहिल्या चेंडूवर पंचांनी बाद दिले, पण रचिनने रिव्ह्यू घेतला आणि चेंडू बॅटला न लागल्याचे दिसून आले त्यामुळे त्याला नाबाद देण्यात आले. तर दुसऱ्या चेंडूवर सीमारेषेजवळ श्रेयस अय्यरने झेल सोडला.

15:06 (IST) 9 Mar 2025

IND vs NZ Live: शमीने सोडला कॅच

मोहम्मद शमीने सातव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रचिनचा झेल सोडला आणि त्याच्या हाताला चेंडू लागल्याने दुखापतही झाली. यासह न्यूझीलंडने ७ षटकांत ५१ धावा केल्या आहेत.

14:53 (IST) 9 Mar 2025

IND vs NZ Live: हार्दिकच्या एका षटकात १६ धावा

रचिन रवींद्रने २ चौकार आणि एका षटकारासह चौथ्या षटकात १६ धावा केल्या आहेत. हार्दिक पंड्याच्या षटकात रचिनने धावा केल्या. यासह न्यूझीलंडने ४ षटकांत बिनबाद २६ धावा केल्या.

14:32 (IST) 9 Mar 2025
IND vs NZ Live: अंतिम सामन्याला सुरूवात

भारत वि. न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ अंतिम सामन्याला सुरूवात झाली आहे. न्यूझीलंडकडून विल यंग आणि रचिन रवींद्रची जोडी मैदानात आहे. तर भारताकडून मोहम्मद शमीने गोलंदाजीला सुरूवात केली आहे.

14:29 (IST) 9 Mar 2025

IND vs NZ Live: राष्ट्रगीत

भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानात दाखल झाले आहेत. प्रथम न्यूझीलंड आणि नंतर भारताचं राष्ट्रगीत वाजवण्यात आले.

14:17 (IST) 9 Mar 2025

IND vs NZ Live: भारत-न्यूझीलंड फायनलवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रींचे वक्तव्य

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ फायनल भारत वि. न्यूझीलंड यांच्यात दुबईमध्ये होत आहे. या अंतिम सामन्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

14:10 (IST) 9 Mar 2025
India Playing XI For Final: भारत (प्लेइंग इलेव्हन):

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती

14:09 (IST) 9 Mar 2025

IND vs NZ: न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन):

विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विलियमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, विल्यम ओरूर्क, नाथन स्मिथ

14:05 (IST) 9 Mar 2025
IND vs NZ: नाणेफेक

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ अंतिम सामन्याची नाणेफेक न्यूझीलंड संघाने जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडच्या संघात एक बदल करण्यात आला असून मॅट हेन्री संघातून बाहेर झाला आहे.

13:24 (IST) 9 Mar 2025

IND vs NZ Head to Head: भारत वि. न्यूझीलंड हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत ११९ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान भारताने ६१ सामने जिंकले असून न्यूझीलंडने ५० सामने जिंकले आहेत. तर ७ सामने रद्द झाले आहेत आणि १ सामना बरोबरीत सुटला आहे.

13:08 (IST) 9 Mar 2025
IND vs NZ: टीम इंडिया १२ वर्षांचा वनडे जेतेपदाचा दुष्काळ संपवणार का?

भारतीय संघ १२ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदावर नाव पटकावणार का याकडे सर्वांच्या नजरा आहेत. भारताने २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली होती, पण त्यानंतर भारताने वनडे आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे आजच्या अंतिम सामन्यात संघ विजेतेपदासाठी भिडणार आहे.

12:39 (IST) 9 Mar 2025

New Zealand Full Squad for Final: भारतीय संघ

मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉन्वे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ’रूक, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग, ​​जेकब डफी.

12:38 (IST) 9 Mar 2025

India Full Squad for Final: भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुमबन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.

12:34 (IST) 9 Mar 2025

IND vs NZ live: चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामना

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या विजेतेपदाची लढत भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ भिडणार आहेत. सामन्याची नाणेफेक दुपारी २:०० वाजता होईल आणि सामना दुपारी २:३० वाजता सुरू होईल.

IND vs NZ Final LIVE Score, ICC Champions Trophy 2025: भारत वि. न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलचे हायलाईट्स