India vs New Zealand ICC Cricket World Cup 2023 Highlights Match Updates: भारताने २० वर्षाचा दुष्काळ संपवत न्यूझीलंडवर चार गडी राखून रोमहर्षक विजय संपादन केला. मात्र, या दरम्यान विराट कोहलीचे शतक पाच धावांनी हुकले. या विजयासह टीम इंडिया गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहचली आहे. वर्ल्ड कप २०२३मध्ये आज भारताचा सामना न्यूझीलंडशी झाला. या आवृत्तीचा हा २१वा सामना होता. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात विराट कोहलीने शानदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. मात्र, त्याचे ४९वे शतक हुकले.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकांत सर्व गडी गमावून २७३ धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी भारताला २७४ धावांची गरज आहे. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक १३० धावा केल्या. रचिन रवींद्रने ७५ आणि ग्लेन फिलिप्सने २३ धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त केवळ विल यंग (१७ धावा) दुहेरी आकडा गाठू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने पाच आणि कुलदीप यादवने दोन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट त्याला मदत केली. या मैदानावर न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर या धावसंख्येचा पाठलाग करणे सोपे नसेल.

Live Updates

CWC 2023 India vs New Zealand Highlights Score Updates in Marathi: भारत विरुद्ध न्यूझीलंड हायलाईट्स स्कोअर

22:48 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: भारताने २० वर्षाचा दुष्काळ संपवला, चार गडी राखून विजय

विश्वचषक २०२३च्या २१व्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आता भारताचे १० गुण झाले आहेत. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २७३ धावा केल्या. भारताने सहा गडी गमावून लक्ष्य गाठले.

21:13 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: भारताची पाचवी विकेट पडली

भारतीय संघाचा निम्मा संघ १९१ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. सूर्यकुमार यादव ४ चेंडूत २ धावा करून धावबाद झाला. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यातील गैरसमजामुळे टीम इंडियाला हा फटका बसला आहे. आता विराट कोहली आणि रवींद्र जडेजा क्रीजवर आहेत.

१९२-५

21:12 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: विराट कोहलीचे अर्धशतक

विराट कोहलीने आपले अर्धशतक ६० चेंडूत पूर्ण केले आहे. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील ६९वे अर्धशतक आहे. बांगलादेशविरुद्ध शतक झळकावल्यानंतर कोहलीने आणखी एक उत्कृष्ट खेळी खेळली असून या सामन्यात टीम इंडिया कायम आहे. त्याने १२व्यांदा विश्वचषकात ५० हून अधिक धावांची इनिंग खेळली आहे. यासह तो २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.

21:09 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: भारताची चौथी विकेट पडली

१८२ धावांवर भारताची चौथी विकेट पडली. लोकेश राहुल ३५ चेंडूत २७ धावा करून बाद झाला. मिचेल सँटनरने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. आता विराट कोहली सूर्यकुमार यादवसोबत क्रीजवर आहे.

१८६-४

20:57 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: विराट-राहुलने सावरला डाव, दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी

श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि लोकेश राहुलने भारतीय डावाची धुरा सांभाळली. विराट कोहली आणि लोकेश राहुल यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे. दोघेही शानदार फलंदाजी करत असून टीम इंडियाची धावसंख्या २०० धावांच्या जवळ पोहोचली आहे. कोहली अर्धशतकाच्या जवळ पोहचला आहे.

भारत १८२-३

20:15 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: भारताला तिसरा धक्का, श्रेयस अय्यर बाद

विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. न्यूझीलंडला ही भागीदारी तोडण्यात यश आले. त्यामुळे आता सर्व मदार ही विराट कोहली आणि के.एल. राहुल यांच्यावर असणार आहे. श्रेयस अय्यर ३३ धावा करून बाद झाला,

भारत १२९-३

20:03 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: हवामान साफ ​​झाल्यानंतर खेळाला पुन्हा सुरुवात

धरमशालेतील धुके कमी झाले असून आता आकाश निरभ्र आहे. पुन्हा खेळाला सुरुवात झाली. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर खेळपट्टीवर आहेत. भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात १०० धावा पार झाली आहे.

भारत १२०-२

19:46 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: खराब हवामानामुळे सामना थांबला

धुक्याने संपूर्ण मैदान झाकले गेल्याने दृश्यमानता कमी झाली आहे, सामना काही काळासाठी थांबवण्यात आला आहे. १५.४ षटकात भारताची धावसंख्या १००/२ आहे. विराट कोहली सात धावांवर तर श्रेयस अय्यर २१ धावांवर नाबाद आहे. धरमशालाच्या मैदानात बरेच धुके आले आहे. त्यामुळे चेंडू दिसण्यात अडचण येत आहे. या कारणास्तव हा खेळ थांबवण्यात आला आहे.

भारत १००-२

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1716094207633625517

19:30 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: भारताला दुसरा धक्का, शुबमन गिल बाद

चांगल्या सुरुवातीनंतर भारताचे दोन्ही सलामीवीर खराब फटके मारून तंबूत परतले आहेत. रोहित पाठोपाठ शुबमन गिल देखील बाद झाला आहे. त्याने ३१ चेंडूत २६ धावा केल्या. आता सर्व मदार ही स्टार फलंदाज विराट कोहलीवर आहे.

भारत ७६-२

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1716090782048977026

19:25 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा बाद

७१ धावांवर भारताची पहिली विकेट पडली. रोहित शर्मा ४० चेंडूत ४६ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार आणि चार षटकार मारले. लॉकी फर्ग्युसनचा चेंडू त्याच्या बॅटच्या आतील काठाला लागला आणि स्टंपवर गेला. आता विराट कोहली शुबमन गिलबरोबर सध्या खेळपट्टीवर आहेत.

भारत ७१-१

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1716088836495950128

19:23 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: पॉवरप्लेमध्ये भारताने ६३ धावा केल्या

पॉवरप्लेमध्ये भारताने एकही विकेट न गमावता ६३ धावा केल्या आहेत. २७४ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने चांगली सुरुवात केली आहे. आता रोहित आणि गिल मोठी भागीदारी करून भारताला लक्ष्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करतील.

भारत ६३-०

19:08 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: शुबमन गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद केल्या २००० धावा पूर्ण

या सामन्यात भारतीय संघाने वेगवान सुरुवात केली आहे. रोहित शर्मा आक्रमक फलंदाजी करत आहे. दुसरीकडे, शुबमन गिल पण चांगली फटकेबाजी करत आहे. शुबमन गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा पूर्ण केल्या. त्याने बाबर आझम, विराट कोहली, हाशिम अमला, केविन पीटरसन, रासी वॅन डर दुसे यांना मागे टाकले. केवळ ३८ सामन्यांमध्ये त्याने ही कामगिरी केली आहे.

भारत ५२-०

https://twitter.com/BCCI/status/1716084603587567710

18:48 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: भारताची चांगली सुरुवात झाली

२७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी सुरू झाली आहे. रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही जोडी खेळपट्टीवर आहे. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने डावाची सुरुवात केली. चार षटकांनंतर भारताची धावसंख्या बिनबाद २६ धावा आहे.

भारत २६-०

18:07 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: न्यूझीलंडने २७३ धावा केल्या

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकांत सर्व गडी गमावून २७३ धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी भारताला २७४ धावांची गरज आहे. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक १३० धावा केल्या. रचिन रवींद्रने ७५ आणि ग्लेन फिलिप्सने २३ धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त केवळ विल यंग (१७ धावा) दुहेरी आकडा गाठू शकला.

18:05 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: न्यूझीलंडची नववी विकेट पडली, डॅरिल मिशेल बाद

२७३ धावांवर न्यूझीलंडची नववी विकेट पडली. डॅरिल मिशेल १२७ चेंडूत १३० धावा करून बाद झाला. मोहम्मद शमीने त्याला विराट कोहलीने झेलबाद केले. या सामन्यातील शमीचे हे पाचवे यश आहे.

न्यूझीलंड २७३-९

17:57 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: मोहम्मद शमीने घेतल्या सलग दोन विकेट्स

मोहम्मद शमीने लागोपाठ दोन चेंडूत विकेट्स घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीची खालची फळी उद्ध्वस्त केली आहे. सँटनरनंतर त्याने हेन्रीलाही यॉर्करवर त्रिफळाचीत केले. हेन्रीला खातेही उघडता आले नाही आणि तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. आता लॉकी फर्ग्युसन डॅरिल मिशेलबरोबर खेळपट्टीवर आहे.

न्यूझीलंड २६०-८

https://twitter.com/BCCI/status/1716066965792657581

17:55 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: न्यूझीलंडची सातवी विकेट पडली

२६० धावांवर न्यूझीलंडची सातवी विकेट पडली. मिचेल सँटनर २ चेंडूत १ धाव काढून बाद झाला. मोहम्मद शमीने त्याला अचूक यॉर्कर मारत क्लीन बोल्ड केले.

न्यूझीलंड २६०-७

https://twitter.com/BCCI/status/1716066582701679093

17:53 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: न्यूझीलंडची सहावी विकेट पडली

२५७ धावांवर न्यूझीलंडची सहावी विकेट पडली. मार्क चॅपमन ८ चेंडूत ६ धावा करून बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला विराट कोहलीने झेलबाद केले. आता मिचेल सँटनर डॅरिल मिशेलसोबत क्रीजवर आहे. जसप्रीत बुमराहने त्याला बाद केले.

न्यूझीलंड २५७-६

17:36 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: कुलदीप यादवने फिलिप्सला केले बाद

न्यूझीलंडचा निम्मा संघ २४३ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. कुलदीप यादवने ग्लेन फिलिप्सला रोहित शर्माकरवी झेलबाद केले. त्याने २६ चेंडूत २३ धावा केल्या.

न्यूझीलंड २४३-५

https://twitter.com/BCCI/status/1716062632539738515

17:18 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: डॅरिल मिशेलचे अप्रतिम शतक

डॅरिल मिशेलने १००च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत १०० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याचे वनडे कारकिर्दीतील हे पाचवे शतक होते. मिशेलने आतापर्यंत शानदार फलंदाजी केली आहे. ४१ षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ४ गड्यांच्या मोबदल्यात २२२ धावा आहे.

न्यूझीलंड २२३-४

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1716057239113683197

17:05 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: न्यूझीलंडची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

न्यूझीलंडच्या धावसंख्येने चार गड्यांच्या मोबदल्यात २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. डॅरिल मिशेल शतकाच्या जवळ आहे. किवी संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे. जर भारताला त्यांना ३०० धावांच्या आता रोखायचे असेल तर लवकर बाद करणे आवश्यक आहे.

न्यूझीलंड २१५-४

17:02 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: रवींद्र-मिशेल यांच्यात विक्रमी भागीदारी

रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांच्यात विक्रमी भागीदारी झाली. या जोडीने विश्वचषकातील भारत आणि न्यूझीलंड सामन्यात सर्वात मोठी भागीदारी केली आहे. १९८७ मध्ये सुनील गावसकर आणि के. श्रीकांत यांनी १३६ धावांची भागीदारी केली होती. आता या दोघांनी हा विक्रम मोडला आहे.

न्यूझीलंड २१०-४

16:58 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: न्यूझीलंडची चौथी विकेट पडली, टॉम लॅथम बाद

२०५ धावांवर न्यूझीलंडची चौथी विकेट पडली. कुलदीप यादवने टॉम लॅथमला बाद केले. लॅथमने सात चेंडूंत पाच धावा केल्या. कुलदीपने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. आता ग्लेन फिलिप्स मिशेलसोबत क्रीजवर आहे.

न्यूझीलंड २०५-४

https://twitter.com/BCCI/status/1716053132416004486

16:46 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: भारताचे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात गचाळ क्षेत्ररक्षण

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात आज टीम इंडियाने गचाळ क्षेत्ररक्षण केले आहे. आधी जडेजाने रचिन रवींद्रचा झेल सोडला. त्यानंतर यष्टीरक्षक के.एल. राहुलने डॅरिल मिशेलचा झेल सोडला. यादोघांनीही याचा फायदा घेत अर्धशतके झळकावली. त्यानंतर पुन्हा एकदा कुलदीपच्या गोलंदाजीवर बुमराहने लॉंग ऑफवर मिशेलचा झेल सोडला. त्यामुळे न्यूझीलंड मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे.

न्यूझीलंड १९१-३

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1716047860415005118

16:41 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: भारताला भागीदारी तोडण्यात यश, रचिन रवींद्र बाद

रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांच्यात विक्रमी भागीदारी झाली आहे. या जोडीने विश्वचषकातील भारत आणि न्यूझीलंड सामन्यात सर्वात मोठी भागीदारी केली आहे. तीच भागीदारी तोडण्यात अखेर टीम इंडियाला यश आले. मोहम्मद शमीने रचिन रवींद्रला शुबमन गिलकरवी झेलबाद करत ७५ धावांवर तंबूत पाठवले.

न्यूझीलंड १८०-३

https://twitter.com/BCCI/status/1716049031703806435

16:25 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: न्यूझीलंडची धावसंख्या १५० धावांच्या पार

न्यूझीलंडच्या धावसंख्येने दोन विकेट्स गमावून १५० धावा केल्या आहेत. डॅरिल मिशेल आणि रचिन रवींद्र जबरदस्त फॉर्मात आहेत. दोघेही आक्रमक फलंदाजी करत असून न्यूझीलंडचा संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे.

न्यूझीलंड १६६-२

16:09 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: डॅरिल मिचेलचे अर्धशतक

रचिन रवींद्रनंतर डॅरिल मिशेलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने ६० चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. त्याच्या या शानदार खेळीमुळे न्यूझीलंडचा संघ चांगल्या स्थितीत पोहोचला आहे. भारतीय संघाला विकेट्सची गरज आहे.

न्यूझीलंड १३८-२

https://twitter.com/SkyCricket/status/1716041815751639355

16:00 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: रवींद्र-मिशेल यांच्यात शतकी भागीदारी

रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांच्यात शतकी भागीदारी झाली आहे. दोन्ही फलंदाज चांगल्या गतीने धावा करत आहेत. रवींद्रने आपले अर्धशतक पूर्ण केले असून मिशेल त्याच्या जवळ आहे. या जोडीविरुद्ध भारतीय गोलंदाज निष्प्रभ ठरले आहेत. २६षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या १२८/२ आहे.

न्यूझीलंड १२८-२

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1716039693270495399

15:51 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: रचिन रवींद्रचे शानदार अर्धशतक

क्षेत्ररक्षणात अव्वल असलेला रवींद्र जडेजाने रचिन रवींद्रचा झेल सोडला आणि त्याचा फायदा त्याने घेतला. त्याने त्याचे अर्धशतक पूर्ण केले असून डॅरिल मिशेलबरोबर अर्धशतकी भागीदारी देखील केली आहे. रचिन रवींद्रने ५६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. संपूर्ण स्पर्धेत त्याने शानदार फलंदाजी केली असून या सामन्यातही तो जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. त्याच्या या शानदार खेळीमुळे न्यूझीलंड संघ चांगल्या स्थितीत आहे.

न्यूझीलंड ११८-२

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1716035131885171179

15:16 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: क्षेत्ररक्षण करताना रोहित शर्माच्या बोटाला झाली दुखापत

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना पॉवरप्लेमध्ये दोन गडी गमावून ३४ धावा केल्या. रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल सध्या खेळपट्टीवर खेळत आहेत. भारताकडून वेगवान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. शमी आणि सिराजने प्रत्येकी एक विकेट घेतली आहे. मात्र, त्या दरम्यान क्षेत्ररक्षण करताना भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या बोटाला दुखापत झाली आणि तो ड्रेसिंगरूममध्ये परतला. त्याच्याजागी के.एल. राहुलने संघाचे धुरा सांभाळली. आता सध्या रोहित पुन्हा मैदानावर परतला आहे.

न्यूझीलंड ६१-२

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1716023206497366058

CWC 2023 India vs New Zealand Highlights Score Updates in Marathi: भारत विरुद्ध न्यूझीलंड हायलाईट्स स्कोअर

विश्वचषक २०२३च्या २१व्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आता भारताचे १० गुण झाले आहेत.

Story img Loader