India vs New Zealand ICC Cricket World Cup 2023 Highlights Match Updates: भारताने २० वर्षाचा दुष्काळ संपवत न्यूझीलंडवर चार गडी राखून रोमहर्षक विजय संपादन केला. मात्र, या दरम्यान विराट कोहलीचे शतक पाच धावांनी हुकले. या विजयासह टीम इंडिया गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहचली आहे. वर्ल्ड कप २०२३मध्ये आज भारताचा सामना न्यूझीलंडशी झाला. या आवृत्तीचा हा २१वा सामना होता. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात विराट कोहलीने शानदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. मात्र, त्याचे ४९वे शतक हुकले.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकांत सर्व गडी गमावून २७३ धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी भारताला २७४ धावांची गरज आहे. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक १३० धावा केल्या. रचिन रवींद्रने ७५ आणि ग्लेन फिलिप्सने २३ धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त केवळ विल यंग (१७ धावा) दुहेरी आकडा गाठू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने पाच आणि कुलदीप यादवने दोन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट त्याला मदत केली. या मैदानावर न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर या धावसंख्येचा पाठलाग करणे सोपे नसेल.

Live Updates

CWC 2023 India vs New Zealand Highlights Score Updates in Marathi: भारत विरुद्ध न्यूझीलंड हायलाईट्स स्कोअर

15:08 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: रचिन रवींद्रचा जडेजाने सोडला सोपा झेल

मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर एकाच षटकात रचिन रवींद्र दोनवेळा वाचला. एकदा त्याला अंपायरने बाद दिले होते जेव्हा के.एल. राहुलने त्याचा झेल पकडला होता तेव्हा त्याने लगेच डीआरएस घेत तो तो नाबाद आहे हे सिद्ध केले. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर पॉइंटच्या दिशेने त्याला मोठा फटका मारला आणि चेंडू थेट जडेजाच्या हातात गेला मात्र, त्यांच्या हातातून चेंडू निसटला. यानंतर रवींद्र जडेजाची पत्नी देखील नाराज झाली.

न्यूझीलंड ५४-२

14:47 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: मोहम्मद शमीने न्यूझीलंडला दिला दुसरा धक्का, विल यंग बाद

न्यूझीलंड संघाने आजच्या सामन्यात संथ सुरुवात केली आहे. आठ षटकांनंतर किवी फलंदाज धावांसाठी झुंजताना दिसत आहेत. मोहम्मद शमीने विश्वचषक २०२३मधील त्याच्या पहिल्याच सामन्यातील पहिल्याच चेंडूवर न्यूझीलंडला धक्का दिला. त्याने विल यंगला त्रिफळाचीत केले. त्याने केवळ १७ धावा केल्या. त्याआधी त्याचा साथीदार मोहम्मद सिराजने डेव्हन कॉनवेला बाद केलेे.

न्यूझीलंड १९-२

14:20 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: न्यूझीलंडला पहिला धक्का, डेव्हॉन कॉनवे बाद

बुमराहने पहिल्या षटकात एकही धाव दिली नाही. कॉनवे स्ट्राइकवर होता आणि बुमराहने त्याला ऑफसाईड द ऑफस्टंप चेंडू टाकले. वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीवरून स्विंग आणि सीम मिळत असल्याचे दिसत आहे. बुमराहने पहिल्या षटकात एकही धाव दिली नाही. यानंतर सिराजच्या दुसऱ्या षटकात पाच धावा आणि बुमराहच्या तिसऱ्या षटकात चार धावा आल्या. याचा दबाव किवी फलंदाजांवर आला आणि मोठा फटका मारण्याच्या नादात डेव्हॉन कॉनवे श्रेयस अय्यरकरवी मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला.

न्यूझीलंड ९-१

13:43 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: अशी असेल दोन्ही संघाची प्लेईंग-११

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड: डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.

13:38 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: टीम इंडियाने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

वर्ल्ड कप २०२३मध्ये आज भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. या आवृत्तीचा हा २१वा सामना आहे. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारताने हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर ऐवजी सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी यांना प्लेईंग-११मध्ये संधी मिळाली आहे.

13:13 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: टीम इंडिया आज न्यूझीलंडविरुद्ध घेणार बदला? जाणून घ्या

२००३च्या विश्वचषकापासून टीम इंडियाने आयसीसी टूर्नामेंटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सहा सामने खेळले आहेत. यापैकी पाच सामने किवी संघाने जिंकले. तर, २०१९ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील गट टप्प्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. याच न्यूझीलंडने २०१९च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव केला होता.

13:11 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: राहुल द्रविडने आयसीसीच्या खेळपट्टी रेटिंगवर व्यक्त केली नाराजी

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी द्रविडने ICCला खेळपट्टीवरून दिले सडेतोड उत्तर; म्हणाला, “…तर गोलंदाज का खेळत आहेत?”
13:09 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंडचे संघ स्टेडियममध्ये पोहोचले

भारत आणि न्यूझीलंडचे संघ धरमशाला येथील स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. दोन्ही संघांचे खेळाडू वॉर्मअप करत आहेत. धरमशाला येथे भारताचा हा पहिला विश्वचषक सामना आहे. भारतीय संघ व्यवस्थापनासमोर योग्य खेळाचे संयोजन निवडण्याचे मोठे आव्हान आहे. हार्दिक
पांड्याच्या दुखापतीमुळे टीम कॉम्बिनेशनबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत. सूर्यकुमार आणि शमी यांना आज संघात संधी मिळू शकते शकतात.

12:10 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: इशान किशनला मधमाशीने चावा घेतला होता

सराव सत्रादरम्यान सूर्यकुमार यादवच्या मनगटावर दुखापत झाली, दुसरीकडे, युवा फलंदाज इशान किशनला त्याच्या मानेच्या मागील बाजूस मधमाशीने दंश केला, ज्यामुळे त्याला सराव सत्र सोडावे लागले. सध्या तो बरा आहे. या वर्षी, इशानने १७ एकदिवसीय सामन्यांच्या १५ डावांमध्ये ३५.०७च्या सरासरीने ४५६ धावा केल्या आहेत, ज्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. या काळात त्याचा स्ट्राइक रेट ९३ पेक्षा जास्त राहिला.

11:53 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: २००३ नंतर भारत आणि न्यूझीलंड किती वेळा आमनेसामने आले?

या २० वर्षांत भारत आणि न्यूझीलंड एकूण ६ वेळा आयसीसी टूर्नामेंटमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. त्यापैकी एक सामना रद्द झाला आणि उर्वरित सर्व सामने न्यूझीलंडने जिंकले. एकदिवसीय विश्वचषकाबद्दल बोलायचे तर २०१९ मध्ये दोन्ही संघ उपांत्य फेरीत आमनेसामने आले होते, ज्यामध्ये न्यूझीलंडने १८ धावांनी विजय मिळवला होता.

२००७ टी२० विश्वचषक – न्यूझीलंड १० धावांनी जिंकला.

२०१६ टी२० विश्वचषक – न्यूझीलंड ४७ धावांनी जिंकला.

२०१९ एकदिवसीय विश्वचषक – रद्द.

२०१९ एकदिवसीय विश्वचषक – न्यूझीलंड १८ धावांनी जिंकला.

२०२१ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल – न्यूझीलंड ८ गडी राखून जिंकला.

२०२२ टी२० विश्वचषक – न्यूझीलंड ८ गडी राखून जिंकला.

11:49 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघाची आकडेवारी

भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत ११६ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने ५८ सामने जिंकले आहेत तर न्यूझीलंडने ५० सामने जिंकले आहेत, ७ सामन्यांचा निकाल लागला नाही तर एक सामना बरोबरीत राहिला आहे. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात झालेल्या ५५ ​​सामन्यांपैकी भारताने २९ जिंकले आहेत तर २६ सामने गमावले आहेत.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना १६ जून १९७५ रोजी खेळला गेला, ज्यामध्ये न्यूझीलंडने ४ गडी राखून विजय मिळवला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटची वन डे २४ जानेवारी २०२३ रोजी खेळली गेली, ज्यामध्ये भारताने ९० धावांनी विजय मिळवला.

एकूण सामने: ११६

भारत जिंकला: ५८

न्यूझीलंड जिंकला: ५०

रद्द: ७

बरोबरी सुटला: १

11:45 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: आजच्या सामन्यात पाऊस आणणार का व्यत्यय? जाणून घ्या.

IND vs NZ: भारत-न्यूझीलंड सामन्यात पाऊस बिघडवणार का खेळ? काय रंग दाखवणार धरमशालाची खेळपट्टी? जाणून घ्या
11:43 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: काय रंग दाखवणार धरमशालाची खेळपट्टी?

धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त मानली जाते. जोरदार वारा आणि ढगाळ आकाश यामुळे चेंडू खूप स्विंग होतो. असाच काहीसा प्रकार दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड यांच्यातील सामन्यातही पाहायला मिळाला. धरमशालामध्ये वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व निश्चित आहे. याबरोबरच या खेळपट्टीवर उसळीही चांगली आहे, त्यामुळे गोलंदाजांना अधिक मदत मिळते.

या मैदानावर आतापर्यंत एकूण ७ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी ३ वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने आणि ४ वेळा धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. टीम इंडियाने या मैदानावर ४ वन डे सामने खेळले आहेत, ज्यात २ जिंकले आहेत आणि २ सामन्यात पराभव झाला आहे.

11:38 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: हार्दिक पांड्याच्या जागी संघात कोणाला मिळणार संधी? जाणून घ्या.

IND vs NZ: हार्दिकच्या जागी कोणत्या खेळाडूची लागणार टीम इंडियात वर्णी? एका जागेसाठी तीन स्पर्धक, जाणून घ्या संभाव्य प्लेईंग-११
11:37 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने टीम इंडियाला दिले आव्हान

IND vs NZ: भारत-न्यूझीलंड सामन्याआधी कर्णधार टॉम लॅथमने टीम इंडियाला दिले आव्हान; म्हणाला, “जगातील कोणत्याही संघाला…”
11:34 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: टीम इंडियाला आणखी एक धक्का, हार्दिक पांड्यानंतर सूर्यकुमार यादवही जखमी

संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी नेटमध्ये सराव करताना जखमी झाला. वास्तविक, सरावादरम्यान सूर्यकुमार यादवच्या मनगटावर चेंडू लागला, त्यामुळे त्याला खूप वेदना झाल्या आणि सराव सत्र सोडावे लागले. टीम इंडियाचा एक्स फॅक्टर म्हणून सूर्यकुमार यादवकडे पाहिले जाते.

11:32 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना तुम्ही कुठे पाहू शकता? जाणून घ्या.

भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याचे ताजे अपडेट्स तुम्ही लोकसत्ता डॉट कॉमवरील लाइव्ह ब्लॉगवर वाचू शकता.

IND vs NZ: रोहित ब्रिगेड पाचवा विजय नोंदवण्यासाठी सज्ज! भारत वि. न्यूझीलंड कुठे पाहू शकता विनामूल्य सामना? जाणून घ्या
11:30 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी हार्दिक पांड्याबाबत दिले महत्त्वपूर्ण अपडेट

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी प्रशिक्षक राहुल द्रविडचे हार्दिक पांड्याबाबत सूचक विधान; म्हणाला, “संघाचा समतोल…”
11:24 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: आजचा सामना जो संघ जिंकेल तो गुणतालिकेत होईल अव्वल

वास्तविक, या विश्वचषकात न्यूझीलंड आणि भारत हे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत. हे असे दोन संघ आहेत ज्यांना २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला नाही. मात्र, या सामन्यानंतर एका संघाच्या वाटेला पराभवाचा आकडा जोडला जाईल. धरमशालामध्ये पावसाची शक्यता आहे. जर सामना रद्द झाला, तर त्या बाबतीत एक गुण दोन्ही संघांना दिला जाईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना गुणतालिकेत अव्वल संघ निश्चित करेल. जो संघ जिंकेल तो गुणतालिकेत आपले वर्चस्व वाढवेल.

11:22 (IST) 22 Oct 2023
IND vs NZ: २० वर्षाचा न्यूझीलंडविरुद्ध विजयाचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय संघ सज्ज

एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये अपराजित राहणाऱ्या भारतीय संघाचा पाचवा सामना न्यूझीलंडसोबत आहे. किवी संघानेही या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही आणि सलग चार सामने जिंकले आहेत. आता हे दोन्ही संघ रविवारी आमनेसामने येणार आहेत. अशा स्थितीत हा सामना अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. यजमान भारत संपूर्ण स्पर्धेत प्रत्येक सामना जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे, पण न्यूझीलंड संघाला कमी लेखता येणार नाही.

CWC 2023 India vs New Zealand Highlights Score Updates in Marathi: भारत विरुद्ध न्यूझीलंड हायलाईट्स स्कोअर

विश्वचषक २०२३च्या २१व्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आता भारताचे १० गुण झाले आहेत.