India vs New Zealand, Cricket World Cup 2023 Semi Final Highlights: एकदिवसीय विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत यजमान भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला आहे. चार वर्षांनंतर उपांत्य फेरीत पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने आले. गेल्या वेळी २०१९ मध्ये किवी संघाने कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न भंग करून अंतिम फेरीत धडक मारली होती. यावेळी भारताने न्यूझीलंडला हरवून मागील पराभवाचा बदला घेतला. आता भारतीय संघ १९ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये अंतिम सामना खेळणार आहे. भारताचा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चार गडी गमावून ३९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात किवी संघ सर्व विकेट्स गमावून केवळ ३२७ धावा करू शकला.
भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने चौथ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित ५० षटकांत चार गडी गमावून ३९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ ४८.५ षटकांत ३२७ धावांत ऑलआऊट झाला आणि सामना ७० धावांनी गमावला. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ११७ धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने १०५ धावांची खेळी केली. शुबमन गिलने नाबाद ८० धावांचे योगदान दिले. कर्णधार रोहितने ४७ आणि लोकेश राहुलने नाबाद ३९ धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने तीन आणि ट्रेंट बोल्टने एक विकेट घेतली.
न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने १३४ धावा केल्या. कर्णधार केन विल्यमसनने ६९ धावांची खेळी केली. ग्लेन फिलिप्सने ४१ धावांचे योगदान दिले. कॉनवे आणि रचिन हे दोन्ही किवी सलामीवीर १३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. भारताकडून मोहम्मद शमीने सात विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
पहिल्या डावात काय घडले?
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारताने शानदार सुरुवात केली. प्रथम रोहितने वेगाने धावा केल्या आणि त्यानंतर गिलने आक्रमक फलंदाजी केली. रोहितने वर्ल्ड कपमध्ये ५० षटकार पूर्ण केले आणि पॉवरप्लेमध्ये टीमची धावसंख्या ५० धावा पार केली. सौदीच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा वैयक्तिक ४७ धावांवर बाद झाला. मात्र, पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाला एका विकेटच्या नुकसानावर ८४ धावा करता आल्या. गिल आणि कोहलीने भारताची धावसंख्या १५० धावांच्या पुढे नेली. यादरम्यान गिलने ४१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. ६५ चेंडूत ७९ धावा केल्यानंतर गिलला वानखेडेच्या उकाड्याने त्रास झाला. त्याला पेटके येत होते आणि तो मैदानाबाहेर गेला होता.
विराट कोहलीने श्रेयस अय्यरच्या साथीने भारताची धावसंख्या २०० धावांच्या पुढे नेली. त्याने ५९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान, तो विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्याने सचिनचा ६७३ धावांचा विक्रम मागे टाकला. विराट आणि श्रेयसने शतकी भागीदारी करत भारताची धावसंख्या २५० धावांच्या पुढे नेली.
विराटने एकदिवसीय क्रिकेटमधील ५०वे शतक झळकावले आणि भारताची धावसंख्या ३०० धावांच्या पुढे नेली. तो ११७ धावा करून बाद झाला. यानंतर श्रेयस अय्यर आणखीनच आक्रमक झाला. राहुलच्या साथीने त्याने भारताची धावसंख्या ३५० धावांच्या पुढे नेली. यानंतर श्रेयसने ६७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि ७० चेंडूत चार चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने १०५ धावा करून तो बाद झाला. ४९व्या षटकात फलंदाजीला आलेला सूर्यकुमार एक धाव घेत बाद झाला. शेवटी लोकेश राहुलने शुबमन गिलच्या साथीने भारताचा डाव संपवला. राहुलने शेवटच्या षटकात शानदार फलंदाजी करत भारताची धावसंख्या ३९७ धावांपर्यंत नेली. ३९ धावा करून तो नाबाद राहिला. तर शुबमन गिल ८० धावा करून नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने तीन आणि ट्रेंट बोल्टने एक विकेट घेतली.
World Cup 2023 India vs New Zealand Semi Final Highlights Match Updates: भारत वि न्यूझीलंड स्कोअर
भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने चौथ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित ५० षटकांत चार गडी गमावून ३९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ ४८.५ षटकांत ३२७ धावांत ऑलआऊट झाला आणि सामना ७० धावांनी गमावला. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ११७ धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने १०५ धावांची खेळी केली. शुबमन गिलने नाबाद ८० धावांचे योगदान दिले. कर्णधार रोहितने ४७ आणि लोकेश राहुलने नाबाद ३९ धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने तीन आणि ट्रेंट बोल्टने एक विकेट घेतली.
मोहम्मद शमीने यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत तिसऱ्यांदा पाच विकेट्स पटकावत विजयाचं पारडं भारतीय संघाच्या दिशेने झुकवलं.
कुलदीप यादवने शेवटच्या ओव्हरमध्ये मार्क चॅपमनला बाद करत न्यूझीलंडला आणखी एक धक्का दिला. फिलीप्स आणि चॅपमन लागोपाठ बाद झाल्याने न्यूझीलंडसमोरचं लक्ष्य आणि धावगतीचं समीकरण कठीण झालं आहे.
स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध ग्लेन फिलीप्सला जसप्रीत बुमराहने परतीचा रस्ता दाखवला. बुमराहच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा फिलीप्सचा प्रयत्न रवींद्र जडेजाच्या हातात जाऊन विसावला. सीमारेषेजवळ शरीराचं संतुलन राखत जडेजाने उत्तम झेल टिपला. फिलीप्सने ४१ धावांची खेळी केली.
चायनामन स्पिनर कुलदीप यादवने टिच्चून मारा करत डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलीप्स जोडीला आपल्या ओव्हरमध्ये रोखलं. कुलदीपने नवव्या षटकात केवळ दोन धावा देत न्यूझीलंडच्या फलंदाजांना वेसण घातली.
डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलीप्स जोडीने मोहम्मद सिराजच्या आठव्या ओव्हरमध्ये २० धावा काढल्या. या दोघांनी या ओव्हरमध्ये दोन षटकार आणि एक चौकार लगावला.
३६ षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ४ गड्यांच्या मोबदल्यात २३१ धावा आहे. डॅरेल मिचेल १०५ आणि ग्लेन फिलिप्स ६ धावांवर खेळत आहे . न्यूझीलंडला आता विजयासाठी ८४ चेंडूत १६७ धावा करायच्या आहेत. म्हणजे इथून जवळपास प्रत्येक षटकात किवी संघाला १२ धावा करायच्या आहेत.
मोहम्मद शमीने टीम इंडियासाठी आश्चर्यकारक पुनरागमन केले आहे. पहिल्या दोन विकेट्स गमावल्यानंतर सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवलेल्या न्यूझीलंडला शमीला दोन धक्के दिले. प्रथम कर्णधार केन विल्यमसन ६९ धावांवर कुलदीप यादवकडे झेलबाद झाला. त्यानंतर टॉम लॅथमला खाते न उघडताच एलबीडब्ल्यू होऊन परतावे लागले.
३२ षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या तीन बाद २२० धावा आहे. डॅरिल मिशेल ८५ चेंडूत ८ चौकार आणि ५ षटकारांसह १०० धावांवर खेळत आहे. तर केन विल्यमसन ७३ चेंडूत ६९ धावांवर बाद झाला आहे. त्याने ८ चौकार आणि १ षटकार मारला आहे. दोघांमध्ये १७४ धावांची भागीदारी झाली आहे.
डॅरिल मिशेलनंतर केन विल्यमसननेही अर्धशतक झळकावले आहे. विल्यमसनने ५८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या दरम्यान त्याच्या बॅटमधून ६ चौकार आणि १ षटकार आला. तर डॅरिल मिचेल ६१ चेंडूत ६४ धावांवर खेळत आहे. मिचेलने आतापर्यंत ५ चौकार आणि ३ षटकार मारले आहेत. २७ षटकानंतर न्यूझीलंडने २ गडी गमावून १७४ धावा केल्या आहेत.
https://twitter.com/unknown_khabari/status/1724803202535784784
१८व्या षटकात केन विल्यमसनचा थोडक्यात बचावला. वास्तविक, कुलदीपच्या षटकात धावबाद होण्याचे अपील करण्यात आली होती. विल्यमसनलाही वाटले की तो बाद झाला आहे, पण टीव्ही रिप्लेने दाखवले की केएल राहुलचा हात आधी स्टंपला लागला होता. यामुळे विल्यमसन बचावला. १८ षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात ११४ धावा आहे. विल्यमसन ३० आणि मिचेल ३३ धावांवर खेळत आहे.
किवी फलंदाज फिरकीविरुद्ध खूपच आरामात खेळताना दिसत आहेत. कुलदीप यादवने १६ वे षटक टाकले. या षटकात एकूण सहा धावा आल्या. १६ षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात ९३ धावा आहे. मिचेल २१ आणि विल्यमसन २५ धावांवर खेळत आहे.
१३ षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात ७२ धावा आहे. डॅरिल मिशेल तीन चौकारांच्या मदतीने १४ तर केन विल्यमसन दोन चौकारांसह ११ धावांवर खेळत आहेत. दोघांमध्ये ३३ धावांची भागीदारी झाली आहे.
https://twitter.com/Sauravfied_18/status/1724789700077203746
भारताच्या ३९७ धावांच्या डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाला दुसरा धक्का बसला आहे. या विश्वचषकात ३ शतके झळकावणाऱ्या रचिन रवींद्रला मोहम्मद शमीने आपल्या एका शानदार चेंडूवर केएल राहुलच्या हाती विकेटच्या मागे झेलबाद केले.
https://twitter.com/tamilcricup96/status/1724783190240539115
सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर न्यूझीलंडने पहिली विकेट गमावली आहे. ३० धावांवर न्यूझीलंडची पहिली विकेट पडली. डेव्हॉन कॉनवे १५ चेंडूत १३ धावा करून बाद झाला. केएल राहुलने विकेटच्या मागे कॉनवेचा अप्रतिम झेल घेतला.
भारतीय गोलंदाज योग्य लाइन लेंथवर गोलंदाजी करत आहेत. चार षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या एकही विकेट न पडता २३ धावा आहे. रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे चौकार लगावण्यासाठी झुंज देत आहेत.
प्रथम फलंदाजी करताना भारताने चार गडी गमावून ३९७ धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ११७ धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने १०५ धावांची खेळी केली. शुभमन गिलने नाबाद ८० धावा केल्या. कर्णधार रोहितने ४७ आणि लोकेश राहुलने ३९ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने तीन विकेट्स घेतल्या त्याला ट्रेंट बोल्टने एक विकेट घेत साथ दिली.
भारत ३९७-४
भारताची चौथी विकेट ३८२ धावांवर पडली. सूर्यकुमार यादव एक धाव काढून बाद झाला. टीम साऊदीने त्याला ग्लेन फिलिप्सकरवी झेलबाद केले. आता शुबमन गिल पुन्हा फलंदाजीला आला आहे. त्याच्यासोबत लोकेश राहुल क्रीझवर आहे.
भारत ३८२-४
भारताची तिसरी विकेट ३८१ धावांवर पडली. श्रेयस अय्यर ७० चेंडूत १०५ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार आणि आठ षटकार मारले. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारताची धावसंख्या ४०० धावांच्या जवळ पोहोचली आहे.
भारत ३८०-३
श्रेयस अय्यरने ६७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. त्याने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावून टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले आहे.भारताच्या धावसंख्येने दोन गड्यांच्या मोबदल्यात ३५० धावांचा टप्पा पार केला आहे. ४८ षटकांनंतर भारताची धावसंख्या ३६६/२ आहे.
कोणत्या देशात किती शतकं?
भारत-२४
बांगलादेश-६
ऑस्ट्रेलिया- ५
श्रीलंका-५
वेस्ट इंडिज-४
दक्षिण आफ्रिका-३
झिम्बाब्वे-१
न्यूझीलंड-१
इंग्लंड-१
भारताची दुसरी विकेट ३२७ धावांवर पडली. विराट कोहली ११३ चेंडूत ११७ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि दोन षटकार मारले. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारताला ४०० धावा करण्याची संधी आहे. आता लोकेश राहुल श्रेयस अय्यरसोबत क्रीजवर आहे. या दोघांनाही शेवटच्या षटकांमध्ये झंझावाती पद्धतीने धावा करायच्या आहेत.
भारत ३४७-२
श्रीलंका-१०
वेस्ट इंडिज-९
ऑस्ट्रेलिया- ८
न्यूझीलंड-६
दक्षिण आफ्रिका- ५
बांगलादेश-५
पाकिस्तान-३
इंग्लंड-३
झिम्बाब्वे-१
एकूण-५०
विराट कोहलीने वन डे कारकिर्दीतील ५०वे शतक पूर्ण केले आहे. यासह त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. भारताच्या धावसंख्येने ३०० धावा ओलांडल्या आहेत. आता कोहली आणि श्रेयसला तुफानी फलंदाजी करून भारताची धावसंख्या ४०० धावांच्या पुढे नेण्याची इच्छा आहे.
भारत ३१६-१
https://twitter.com/BCCI/status/1724753722910351385
https://twitter.com/brainybeauty_/status/1724754377796403477?s=20
विराट कोहली आपल्या शतकाच्या जवळ पोहोचला आहे. जर त्याने शतक पूर्ण केले तर तो सचिनला मागे टाकेल आणि वन डेमध्ये सर्वाधिक ५० शतके करणारा खेळाडू बनेल. त्याचवेळी श्रेयस अय्यर आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर वेगाने धावा करत आहे. कोहलीसोबत उत्कृष्ट शतकी भागीदारी करत त्याने भारताची धावसंख्या ४० षटकात एका विकेटवर २८७ धावांपर्यंत नेली.
भारत २९०-१
भारताच्या धावसंख्येने एक विकेट गमावून २५० धावा पार केल्या आहेत. विराट आणि श्रेयसमध्ये शतकी भागीदारीही झाली आहे. तर श्रेयस अय्यरने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. विराट कोहली त्याच्या शतकाच्या जवळ आहे. आता भारताच्या नजरा ४०० धावांचे लक्ष्य गाठण्यावर आहेत.
भारत २५०-१
विराट कोहलीने या विश्वचषकात ६७३ हून अधिक धावा केल्या आहेत आणि विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. तोही आपल्या शतकाच्या जवळ पोहोचला आहे. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारताची धावसंख्या २५० धावांच्या जवळ पोहोचली आहे.
भारत २६३-१
विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे. दोघेही चांगली फलंदाजी करत आहेत. भारत मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे. ३२ षटकांनंतर भारताची धावसंख्या २२६/१आहे.
भारताच्या धावसंख्येने १ विकेट गमावत २०० धावा पार केल्या आहेत. विराट कोहली आणि श्रेयस यांच्यात चांगली भागीदारी झाली आहे. दोघेही चांगल्या गतीने धावा करत आहेत आणि भारत मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे.
भारत २०१-१
एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये विराट कोहलीने आपले सहावे अर्धशतक झळकावले आहे. न्यूझीलंडविरुद्ध विराट कोहलीने ५९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याच्या या शानदार खेळीमुळे टीम इंडिया मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे. भारतीय संघाने २८ षटकानंतर १ बाद १९७ धावा केल्या आहेत.
World Cup 2023 India vs New Zealand Semi Final Highlights Match Updates: भारत वि न्यूझीलंड स्कोअर
भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने चौथ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.