लौकिकाला साजेसा खेळ करत बलाढय़ ऑस्ट्रेलियाने जागतिक हॉकी लीग स्पर्धेत भारतीय महिला संघावर ४-२ असा शानदार विजय मिळवला.
तिसऱ्याच मिनिटाला जोली केनीने शिताफीने गोल करत ऑस्ट्रेलियाला झटपट आघाडी मिळवून दिली. दोनच मिनिटांत वंदना कटारियाने एकहाती गोल करत भारताला बरोबरी करुन दिली. या गोलचा आनंद साजरा करेपर्यंत जोली केनीने बचावपटू दीपिकाला भेदत आणखी एक गोल केला. मध्यंतरानंतर लगेचच पूनम राणीच्या गोलसह भारताने बरोबरी केली. दोनच मिनिटांत जोलीने गोलची हॅट्ट्कि केली. ४४व्या मिनिटाला पेनल्टीवर जोलीने चौथा गोल केला. ढिसाळ बचाव आणि पेनल्टी कॉर्नरचा उपयोग करुन घेण्यात आलेले अपयश भारताच्या पराभवाचे कारण ठरले.

Story img Loader