India Women vs Pakistan Women t20 Highlights Score: बांगलादेश येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषक स्पर्धेतील तेरावा सामना आज भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. महिला आशिया चषकातील भारत पाकिस्तान महामुकाबल्यात पाकिस्तानने भारतावर १३ धावांनी मात केली. विशेष म्हणजे कालच थायलँडने पाकिस्तानचा पराभव केला होता आणि आज पाकिस्तानने भारताचा पराभव करत भारताला मोठा धक्का दिला. पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी १३८ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताचा संपूर्ण डाव १२४ धावात संपुष्टात आला. पाकिस्तानकडून नाशरा संधूने सर्वाधिक ३ गडी बाद करत भारताला बॅकफूटवर ढकलले. तर सादिका इक्बाल निदा दारने यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. फलंदाजीत निदा दार नाबाद ५६धावांची खेळी केली.

भारतीय संघ या स्पर्धेत तीन सामने जिंकला असून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तसेच त्यांनी पाकिस्तानला पराभूत केले तर ते उपांत्य फेरीत पोहोचतील. पाकिस्तानला मागील सामन्यात थायलंडने पराभूत करत चांगलाच धक्का दिला होता, त्यातून सावरत आणि स्पर्धेत आपले आव्हान कायम राखण्याच्या हेतूने ते मैदानात उतरणार आहेत. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या शफाली वर्मा आणि किरण नवगिरे या दोघींना अंतिम अकरातून वगळले आहे. तर स्नेह राणाच्या जागी राधा यादवची संघात एंट्री झाली आहे. पाकिस्ताननेही दोन बदल केले आहेत. कायनात इम्तियाज आणि डायना बेग यांच्याजागी आयमान अन्वर आणि सादिया इक्बाल यांची अंतिम अकरामध्ये निवड केली आहे.

पाकिस्तानची पॉवर प्लेमध्ये ३ बाद ३३ धावा अशी अवस्था झाली असताना कर्णधार बिसमाह मारूफ आणि निदा दार यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. या दोघींनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला शतकी मजल मारून दिली. त्यांच्यात ५८ चेंडूत ७६ धावांची भागीदारी झाली. कर्णधार बिस्मा महारूफने ३५ चेंडूत ३२ धावा केल्या. निदा दारच्या अर्धशतकी खेळीने पाकिस्तानने शंभरी गाठली. तिने ३७ चेंडूत ५६धावा केल्या. भारतीय महिलांनी पाकिस्तानला १५० च्या आत रोखले. दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकरने पाकिस्तानच्या सलामीवीरांना माघारी धाडत अडचणीत आणले. त्या दोघींनी मिळून पाकिस्तानचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्यांना साथ देत वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने एक गडी बाद केला.

Live Updates

India vs Pakistan Highlights Match Updates: भारत विरुद्ध पाकिस्तान हायलाइट्स अपडेट

16:09 (IST) 7 Oct 2022
IND vs PAK: पाकिस्तानचा भारतावर १३ धावांनी विजय

पाकिस्तानचा भारतावर १३ धावांनी विजय झाला.

भारत सर्वबाद १२४

16:04 (IST) 7 Oct 2022
IND vs PAK: रिचा घोष बाद

एका बाजूला गडी बाद होत असताना रिचा घोषने तीन षटकार आणि एक चौकार मारत सामना रंजक बनवला होता. पण ती बाद झाली. तिने १३ चेंडूत २६ धावा केल्या. भारताला विजयासाठी ९ चेंडूत १८ धावांची गरज आहेत.

भारत १२०-९

16:01 (IST) 7 Oct 2022
IND vs PAK: राधा यादव बाद

भारताला आठवा धक्का राधा यादव ३ धावा करून बाद झाली.

भारत ११०-८

15:56 (IST) 7 Oct 2022
IND vs PAK: कर्णधार हरमनप्रीत कौर बाद

भारतीय संघाची एकमेव आशा होती जिंकण्याची ती म्हणजे हरमनप्रीत कौर बाद झाली. त्यामुळे आता भारतीय संघ पराभवाच्या छायेत दिसत आहे.

भारत ९१-७

15:53 (IST) 7 Oct 2022
IND vs PAK: शेवटचे चार षटके महत्वाचे

भारताला सामना जिंकण्यासाठी २४ चेंडूत ४७ धावांची आवश्यकता आहे.

भारत ९१-६

15:52 (IST) 7 Oct 2022
IND vs PAK: दीप्ती शर्मा बाद

दीप्ती शर्मा बाद झाल्याने भारतीय संघ पुन्हा अडचणीत सापडला आहे. भारताच्या दृष्टीने कर्णधार हरमनला शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहणे गरजेचे आहे.

भारत ९१-६

15:39 (IST) 7 Oct 2022
IND vs PAK: कर्णधार हरमनप्रीत कौरवर संघाची मदार

एकापाठोपाठ एक गडी बाद झाल्याने आता संघाची मदार ही कर्णधार हरमनप्रीत कौरवर आहे.

भारत ७०-५

15:37 (IST) 7 Oct 2022
IND vs PAK: भारताचा निम्मा संघ तंबूत

दयालन हेमलता बाद

भारत ६५-५

15:35 (IST) 7 Oct 2022
IND vs PAK: पूजा वस्त्राकर धावबाद

पूजा वस्त्राकर धावबाद झाल्याने भारतीय संघ अडचणीत आला आहे.

भारत ६३-४

15:31 (IST) 7 Oct 2022
IND vs PAK: निम्म्या षटकानंतर भारत मागे

५४ चेंडूत भारताला ७९ धावांची गरज आहे. अजूनही हरमनप्रीत कौर फलंदाजीसाठी मैदानात आली नाही. मंधानानंतर ती येणार असे वाटत पूजा वस्त्राकर खेळपट्टीवर आली आहे.

भारत ५९-३

15:23 (IST) 7 Oct 2022
IND vs PAK: भारताला मोठ्या षटकांची गरज

भारताला हा सामना जिंकण्यासाठी मोठ्या षटकांची गरज आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांच्यात मोठे षटके खेळण्याची क्षमता आहे.

भारत ५०-२

15:13 (IST) 7 Oct 2022
IND vs PAK: पॉवर प्ले मध्ये भारताची अडखळत सुरुवात

पहिल्या पॉवर प्ले मध्ये भारतीय संघाची अडखळत सुरुवात झाली आहे. स्मृती मंधाना अजूनही खेळपट्टी टिकून आहे.

भारत ३०-२

15:08 (IST) 7 Oct 2022
IND vs PAK: पॉवर प्ले मध्ये भारताला दुसरा धक्का

जेमिमा रॉड्रिग्स २ धावा करून बाद भारताला मोठा धक्का

भारत २९-२

14:59 (IST) 7 Oct 2022
IND vs PAK: एस. मेघना बाद, भारताला पहिला धक्का

एस मेघना फटकेबाजीच्या नादात बाद झाली. १४ चेंडूत १५ धावा केल्या.

भारत २३-१

14:49 (IST) 7 Oct 2022
IND vs PAK: स्मृती मंधाना आणि सभिनेनी मेघना मैदानात

भारतीय महिला संघाची सलामीची जोडी स्मृती मंधाना आणि सभिनेनी मेघना यांनी भारतीय डावाला सुरुवात केली.

भारत ५-०

14:35 (IST) 7 Oct 2022
IND vs PAK: पाकिस्तानचे भारतासमोर १३८ धावांचे लक्ष

निदा दारच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने भारतापुढे ठेवले १३८ धावांचे आव्हान ठेवले.

पाकिस्तान १३७-६

14:33 (IST) 7 Oct 2022
IND vs PAK: पाकिस्तानला सहावा धक्का

आयेशा नसीम ९ धावांवर बाद

पाकिस्तान १३५-६

14:25 (IST) 7 Oct 2022
IND vs PAK: पाकिस्तानचा निम्मा संघ तंबूत

आलिया रियाज ७ धावा करून माघारी परतली. पूजा वस्त्राकरने बाद केले.

पाकिस्तान १२१-५

14:21 (IST) 7 Oct 2022
IND vs PAK: निदा दारचे अर्धशतक

निदा दारने अर्धशतक झळकावले.

पाकिस्तान ११७-४

14:15 (IST) 7 Oct 2022
IND vs PAK: कर्णधार बिस्मा महारूफ बाद

भारताची रेणुका सिंगला जोडी फोडण्यात मिळाले यश. तिने कर्णधार बिस्मा महारूफला ३२ वर बाद केले.

पाकिस्तान १०९-४

14:08 (IST) 7 Oct 2022
IND vs PAK: पाकिस्तानची १०० पार

निदा दार आणि बिस्मा महारूफ यांनी डाव सावरत पाकिस्तानने १०० पार केली.

पाकिस्तान १००-३

14:00 (IST) 7 Oct 2022
IND vs PAK: निदा दार आणि बिस्मा महारूफ अर्धशतकी भागीदारी

निदा दार आणि बिस्मा महारूफ यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. ३९ चेंडूत ५१ धावांची भागीदारी झाली.

पाकिस्तान ८४-३

13:51 (IST) 7 Oct 2022
IND vs PAK:निदा दार आणि बिस्मा महारूफ यांनी डाव सावरला

निदा दारची फटकेबाजी, १०व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर राजेश्वरी गायकवाडने लाँग ऑनच्या दिशेने चौकार मारला. निदा दार आणि बिस्मा महारूफ यांनी डाव सावरला.

पाकिस्तान ६४-३

13:44 (IST) 7 Oct 2022
IND vs PAK: पहिल्या दहा षटकात पाकिस्तानची धावसंख्या संथ

पहिल्या दहा षटकात पाकिस्तानची धावसंख्या फार संथ गतीने झाली आहे. सहाच्या धावगतीने आतापर्यंत त्यांनी धावा केल्या आहेत.

पाकिस्तान ६१-३

13:39 (IST) 7 Oct 2022
IND vs PAK: पॉवर प्ले मध्ये पाकिस्तानच्या तीन गडी बाद

पॉवर प्ले मध्ये पाकिस्तानच्या तीन गडी बाद झाले आहेत,

पाकिस्तान ५३-३

13:38 (IST) 7 Oct 2022
IND vs PAK: पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

India vs Pakistan Highlights Match Updates: भारत विरुद्ध पाकिस्तान हायलाइट्स अपडेट

महिला आशिया चषकातील भारत पाकिस्तान महामुकाबल्यात पाकिस्तानने भारतावर १३ धावांनी मात केली.

Story img Loader