दुबईत सुरु असलेल्या आशिया चषकात भारताने पाकिस्तानवर ९ गडी राखून मात केली. या स्पर्धेतला भारताचा पाकिस्तानवरचा हा दुसरा विजय ठरला आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या पाकिस्तानची सुरुवात अडखळती झाली. दरम्यान आजच्या सामन्यात धोनीचे DRS (Decision Review System) चे निर्णय किती अचूक असतात याची प्रचिती आली.

पहिल्या डावातील ८ व्या षटकात युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर इमाम उल हक पायचीत असल्याचं अपिल भारतीय गोलंदाजांनी केलं, मात्र हे अपिल मैदानावरील पंचांनी फेटाळून लावलं. मात्र धोनीने लगेचच कर्णधार रोहित शर्माच्या दिशेने इशारा करत, त्याला DRS घेण्यास सांगितलं. यावेळी तिसऱ्या पंचांच्या पाहणीत इमाम उल हक बाद असल्याचं समजताच, समालोचन कक्षातूनही धोनीवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. यानंतर ट्विटरवर क्रीडा प्रेमींनी धोनीच्या या DRS निर्णयाबद्दल त्याचं कौतुक करायला सुरुवात केली.

Story img Loader