आशिया चषकात भारताने पाकिस्तानवर ९ गडी राखून मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. नाणेफेक जिंकून सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय पाकिस्तानवर चांगलाच उलटला. पाकचे पहिले ३ फलंदाज झटपट माघारी परतले. १४ व्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर पाकच्या फखार झमानने स्विपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात फखर झमान अक्षरशः मैदानावर झोपला. यावेळी फखारच्या पॅडवर बॉल आदळल्यामुळे भारतीय क्षेत्ररक्षकांनी पायचीतचं अपील केलं, जे पंचांनीही उचलून धरलं. या घटनेनंतर फखारचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

आशिया चषकात आतापर्यंत भारतीय संघ एकही सामना हरलेला नाहीये. यापुढे भारताचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. भारताकडून सलग दोन पराभव स्विकारल्यानंतर पाकिस्तानला पुढचा सामना बांगलादेशशी खेळायचा आहे. या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत भारताशी खेळणार आहे. त्यामुळे अंतिम फेरीत भारत विरुद्ध पाकिस्तान लढत पुन्हा रंगते का याकडे सर्व क्रीडाप्रेमींची नजर असणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs Pak : DRS चा निर्णय घेताना धोनीची चतुराई, पाकिस्तानचा इमाम उल हक तंबूत

Story img Loader