World Cup 2023 Schedule : आगामी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तना यांच्यात महामुकाबला कधी होणार, असा प्रश्न तमाम क्रिकेटप्रेमींना पडला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना श्वास रोखून धरणारा असतो, हे सर्वश्रूत आहे. त्यामुळे ही रंगतदार लढत पाहण्यासाठी संपूर्ण क्रिडाविश्वातील चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आगामी होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामना कधी आणि कुठे होणार, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, यावर्षी होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात होणारा सामना १५ ऑक्टोबरला होऊ शकतो. या दिवशी रविवार असल्याने सामना या तारखेला ठेवण्यात आला आहे. हा सामना जगातील सर्वात मोठ्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. रिपोर्टनुसार, वर्ल्डकप २०२३ चा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात ५ ऑक्टोबरला होणार आहे. हा सामनाही नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे आणि १० नोव्हेंबरला याच मैदानात अंतिम सामनाही होणार आहे. बीसीसीआयच्या माध्यमातून लवकरच वर्ल्डकपचं शेड्यूल जाहीर केलं जाईल. सध्या सुरु असलेला आयपीएलचा हंगाम संपला की, वर्ल्डकपच्या शेड्यूलची घोषणा केली जाईल. त्यानंतर कोणता संघ कुठे खेळणार आहे, याबात माहिती दिली जाईल.

KL Rahul returns to nets after injury scare ahead BGT
KL Rahul : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! पर्थ कसोटी सामन्यापूर्वी ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीतून सावरला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
Pakistan Surpassed India And Holds Record of Most ODI Wins by Asian Team in Australia After AUS vs PAK match
पाकिस्तानने मोडला भारताचा मोठा विक्रम, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या विजयासह अशी कामगिरी करणारा पहिला ठरला आशियाई संघ

नक्की वाचा – IPL 2023: यशस्वी जैस्वालने मोडला विराट कोहलीचा मोठा विक्रम, आयपीएलमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच फलंदाज

अहमदाबादमध्ये सामना खेळवण्यात पाकिस्तानचा विरोध – रिपोर्ट

क्रिकबझच्या रिुपोर्टनुसार, पाकिस्तानचा संघ भारतात येऊन वर्ल्डकप खेळण्यासाठी तयार झाली आहे. परंतु, पाकिस्तानकडून काही समस्याही मांडण्यात आल्या असल्याचं बोललं जात आहे. अहमदाबादमध्ये सामना खेळण्यात पाकिस्तानला अडचण असल्याचं समोर आलं आहे. पीसीबीचे चीफ नजम सेठी यावर शंका उपस्थित करू शकतात. पीसीबीला पाकिस्तानच्या सामन्यांच्या वेन्यूमध्ये बदल हवा आहे. जर पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचला, त्यावेळी अहमदाबादमध्येच सामना खेळवला जाईल. आतापर्यंतच्या शेड्यूलनुसार, पाकिस्तानचे सामने अमहमदाबाद, हैद्राबाद, चेन्नई आणि बंगळुरुत होणार आहेत. याशिवाय कोलकाता, दिल्ली, इंदौर, धर्मशाला, गुवाहाटी, राजकोट, रायपुर आणि मुंबईत सामन्यांचं आयोजन होऊ शकतं. प्रत्येक संघ ९ लीग सामने खेळणार आहे.