India Women’s vs Pakistan Women’s Highlights : महिला आशिया चषक टी-२० स्पर्धेतील भारताने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव केला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ७ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान पाकिस्तानचा संघ १०८ धावांवर गडगडला. प्रत्युत्तरात स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने पंधराव्या षटकात विजयाची नोंद केली. भारताकडून गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली. दीप्ती शर्माने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
Asia Cup 2024, INDW vs PAKW Highlights Today : महिला आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान संघ आतापर्यंत सहावेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये भारताने पाचवेळा आणि पाकिस्तानने एकदा सामना जिंकला आहे.
महिला आशिया चषक २०२४ स्पर्धेत भारताने विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. भारतीय महिला संघाने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. या विजयासह भारत अ गटातील गुणतालिकेत दोन गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
https://twitter.com/BCCIWomen/status/1814334951439122823
महिला आशिया चषकाचा दुसरा सामना शुक्रवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात डंबुला येथील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 19.2 षटकात 10 गडी गमावून 108 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने 14.1 षटकांत तीन गडी गमावून 109 धावा केल्या आणि सामना सात विकेट्सने जिंकला.
मानधना-शेफालीने दमदार 85 धावांची सलामी दिली -
भारताच्या विजयात संघाच्या सलामीच्या जोडीने महत्त्वाची भूमिका बजावली. दोघींमध्ये पहिल्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी झाली. भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना 31 चेंडूत 45 धावा करून बाद झाली. यादरम्यान तिने नऊ चौकार मारले. तर शेफाली वर्मा 29 चेंडूत 40 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. यादरम्यान तिने सहा चौकार आणि एक षटकार लगावला. त्याचवेळी दयालन हेमलथा 14 धावा करून बाद झाली. या सामन्यात हरमनप्रीत कौर पाच धावा केल्यानंतर नाबाद राहिली आणि जेमिमा रॉड्रिग्स तीन धावा केल्यानंतर नाबाद राहिली.
पाकिस्तानच्या संघाला १०८ धावांवर गुडाळले -
टीम इंडियाने पाकिस्तानला १०८ धावांवर ऑलआउट केले. निदा दारच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाकडून अमीनने सर्वाधिक 25 धावा केल्या. तिने 35 चेंडूंचा सामना करत 3 चौकार मारत 22 धावांची खेळी केली. फातिमा सनाने 16 चेंडूंचा सामना करताना त्याने नाबाद 22 धावा केल्या. सनाने एक चौकार आणि दोन षटकार मारले. हसनने 19 चेंडूंचा सामना करत 22 धावा केल्या. तिने 3 चौकार मारले.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली -
https://twitter.com/BCCIWomen/status/1814334951439122823
भारतीय गोलंदाजांची या सामन्यात चमकदार कामगिरी पाहायला मिळाली. दीप्ती शर्माने 4 षटकात 20 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. दीप्तीने 8 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर पाकिस्तानचा कर्णधार निदाची विकेट घेतली. त्याचबरोबर हसन 22 धावांच्या वैयक्तिक धावांवर बाद केले. तसेच रेणुका सिंग, श्रेयंका पाटील आणि पूजा यांनी २-२ विकेट्स घेतल्या.
तिसरी विकेट पडली
दयालन हेमलता यांच्या रूपाने भारतीय संघाला तिसरा धक्का बसला आहे. या सामन्यात तिने 11 चेंडूत 14 धावांची खेळी केली. भारतीय संघाने हा सामना जवळपास जिंकला आहे, पण जसजसे ते विजयाच्या जवळ आले, तसतसे त्यांनी विकेट गमावण्यास सुरुवात केली. भारताचा स्कोर 102/3
भारताची दुसरी विकेट पडली
पाकिस्तानने भारतीय संघाला दुसरा धक्का दिला आहे. शफाली वर्माला बाद केले. वर्माने या सामन्यात 40 धावा केल्या. या सामन्यात तिला आपले अर्धशतक पूर्ण करता आले असते, पण तसे होऊ शकले नाही. भारताचा स्कोर 100/2
भारताला पहिला धक्का बसला
भारताला पहिला धक्का स्मृती मानधनाच्या रूपाने बसला. तिल 85 धावांवर सैदाने बाद केला. ती 45 धावा करून बाद झाली. दयालन हेमलथा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आली आहे.
पॉवरप्लेनंतर भारताची धावसंख्या बिनबाद 57 धावा
पॉवरप्ले संपला आहे. भारतीय संघाची सलामीची जोडी दमदार कामगिरी करताना दिसत आहे. शेफाली वर्मा 35 धावांवर नाबाद तर मंधाना 22 धावांवर नाबाद खेळत आहे. सहा षटकांनंतर भारताची धावसंख्या 57 /0 आहे.
शफाली-स्मृतीकडून टीम इंडियाच्या डावाला दमदार सुरुवात
भारताचा डाव सुरू झाला आहे. शफाली वर्मा आणि स्मृती मानधना क्रीजवर आहेत. दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. तीन षटकानंतर भारताची धावसंख्या 28/0 आहे.
पाकिस्तानने भारतासमोर १०९ धावांचे लक्ष्य ठेवले
महिला आशिया अंतर्गत भारत आणि पाकिस्तानचे संघ त्यांचा पहिला सामना खेळत आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तान संघाने 19.2 षटकांत 10 गडी गमावून 108 धावा केल्या. या सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. संघाला पहिला धक्का गुल फिरोजाच्या रूपाने बसला तिला केवळ पाच धावा करता आल्या. यानंतर मुनिबा अलीही 11 धावा करून बाद झाला. पाकिस्तानकडून सिद्रा अमीनने सर्वाधिक 25 धावांची खेळी खेळली.
https://twitter.com/BCCIWomen/status/1814315506251481428 तिने तीन चौकार मारले. मात्र, रेणुका सिंहने तिला राधा यादवकरवी झेलबाद केले. या सामन्यात आलिया रियाझने सहा धावा, निदा दारने आठ धावा, इरम जावेदने शून्य धावा, तुबा हसनने 22 धावा, सईदा अरुब शाहने दोन धावा, नशरा संधूने शून्य धावा, सादिया इक्बालने शून्य धावा आणि फातिमा सना हिने नाबाद २२ धावा केल्या. या सामन्यात भारताकडून दीप्ती शर्माने तीन तर रेणुका, पूजा आणि श्रेयंकाने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
पाकिस्तानच्या 9 विकेट पडल्या
पाकिस्तान संघाच्या 9 विकेट पडल्या आहेत. पाकिस्तान संघाने एकाच षटकात तीन विकेट गमावल्या आहेत. दीप्ती शर्माच्या या षटकात तिने दोन विकेट्स घेतल्या आणि एक फलंदाज धावबाद झाला. पाकिस्तानचा डाव अचानक अडचणीत आला आहे.
पाकिस्तानला सातवा धक्का बसला
दीप्ती शर्माने पाकिस्तानला सातवा धक्का दिला. त्याने तुबा हसनला राधा यादवकरवी झेलबाद केले. तिला तीन चौकारांच्या मदतीने 22 धावा करता आल्या. त्याचवेळी राधाने नवव्या क्रमांकाची फलंदाज सईदा अरुब शाहला धावबाद केले. त्यानंतर तिला केवळ दोन धावा करता आल्या. शाह यांच्या रूपाने पाकिस्तानला आठवा धक्का बसला.
तुबा हसन थोडक्यात बचावली
दीप्ती शर्माने 14व्या षटकात सहा धावा दिल्या. तुबा हसन ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर थोडक्यात बचावली. शेवटच्या चेंडूवर तुबा हसमने लाँग ऑनवर षटकार ठोकला. पाकिस्तान धावसंख्या 6 बाद 67 धावा आहे. तुबा हसन - 7(8) फातिमा सना 0 (3) धावांवर आहे
रेणुकाने एका षटकात दोन विकेट्स घेतल्या
रेणुकाने पाकिस्तानविरुद्ध एकाच षटकात दोन बळी घेतले आहेत. त्याने सामन्याच्या 13व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर दोन विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तानने आता 6 विकेट गमावल्या आहेत. त्याची धावसंख्या केवळ 62 धावा आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाज पाकिस्तानवर पूर्णपणे वर्चस्व गाजवताना दिसत आहेत.
https://twitter.com/CricinfoHindi/status/1814306889452134576
पाकिस्तानला तिसरा धक्का बसला
श्रेयंका पाटीलने पाकिस्तानला तिसरा धक्का दिला. त्याने 41 धावांवर आलिया रियाझला बाद केले. तिला केवळ सहा धावा करता आल्या. कर्णधार निदा दार पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आली आहे. तिला साथ देण्यासाठी सिद्रा अमीन क्रीझवर हजर आहे.
पॉवरप्ले संपला आहे. पाकिस्तानने पहिल्या सहा षटकांत दोन गडी गमावले. सध्या सिद्रा अमीन आणि आलिया रियाझ क्रीजवर आहेत. पाकिस्तानचा स्कोर ३७/२ आहे.
https://twitter.com/CricinfoHindi/status/1814299497822097831
पाकिस्तानला दुसरा धक्का बसला
पूजा वस्त्राकरनेही पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. तिने मुनिबा अलीला जेमिमाह रॉड्रिग्जकरवी झेलबाद केले. तिला केवळ 11 धावा करता आल्या. आलिया रियाझ चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आली आहे.
पूजाने गुल फिरोझाला बाद केले
रेणुका ठाकूरने पहिले षटक टाकले ज्यात तिने 4 धावा दिल्या. दुसऱ्याच षटकात पूजा वस्त्राकरने गुल फिरोझाला बाद केले. चौथ्या चेंडूवर फिरोजाने मिडऑनला शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण हरमनप्रीत कौरने तिला झेलबाद केले.
गुल फिरोजा आणि मुनिबा अली पाकिस्तानसाठी सलामीला आले आहेत. गुल फिरोजा स्ट्राइकवर आहेत. तर रेणुका सिंग पहिले षटक टाकत आहे.
पाकिस्तानची कर्णधार निदा दारने नाणेफेकनंतर विकेट कोरडी असल्याचे सांगितले. आम्ही कराचीत खूप मेहनत घेतली होती. टी-२० विश्वचषकापूर्वी आमच्यासाठी ही चांगली संधी आहे. पाकिस्तानने सिद्रा अमीन, गुल फिरोझा आणि मुनिबा अली यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवले आहे. सादिया इक्बाल आणि नशरा संधू संघासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात.
भारतीय प्लेइंग इलेव्हन: स्मृती मानधना, शफाली वर्मा, दयालन हेमलता, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग.
https://twitter.com/BCCIWomen/status/1814286176091873531
पाकिस्तान महिला (प्लेइंग इलेव्हन): सिद्रा अमीन, गुल फिरोझा, मुनिबा अली (यष्टीरक्षक), निदा दार (कर्णधार), आलिया रियाझ, इरम जावेद, फातिमा सना, तुबा हसन, सादिया इक्बाल, नशरा संधू, सय्यदा अरुब शाह.
पाकिस्तानच्या महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरेल.
भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानी संघ शिकण्यासाठी उतरणार आहे.
पाकिस्तानची कर्णधार निदा दार म्हणाली, 'आम्हाला भारताविरुद्ध खेळायचे आहे. कारण त्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळेल. टी-२० मध्ये त्यांचा दृष्टिकोन चांगला आहे. हे आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.'
पाकिस्तान संघात अनेक बदल झाले
पाकिस्तान संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. या मालिकेसाठी त्यांनी सहा खेळाडूंना वगळले आहे. इरम जावेद, ओमामा सोहेल आणि सय्यद अयुब शाह यांना यंदा प्रथमच संघात संधी मिळाली आहे.
पाकिस्तान संघ : निदा दार (कर्णधार), इरम जावेद, सादिया इक्बाल, आलिया रियाझ, डायना बेग, फातिमा सना, गुल फिरोज, मुनिबा अली, सिद्रा अमीन, नाझिहा अल्वी, सय्यदा अरुब शाह, नशरा सुंधू, तस्मिया रुबाब, ओमिमा सोहेल, तोबा हसन.
भारतीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (डब्ल्यूके), उमा छेत्री (डब्ल्यूके), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना , राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन - ट्रॅव्हल रिझर्व्ह: श्वेता सेहरावत, सायका इशाक, तनुजा कंवर, मेघना सिंग
गेल्या एका वर्षात भारतीय महिला क्रिकेट संघाने १७ टी-२० सामने खेळले आहेत, त्यापैकी १० जिंकले आहेत. संघाला ५ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला असून २ सामने अनिर्णित राहिले आहेत. दुसरीकडे, पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने गेल्या वर्षभरात १९ टी-२० सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. भारतापेक्षा जास्त सामने खेळूनही पाकिस्तानच्या महिलांनी केवळ सात सामने जिंकले आहेत आणि १२ गमावले आहेत.
आशिया कपमध्ये 8 संघ सहभागी होत आहेत
आशिया चषक स्पर्धेत 8 संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात भारत, पाकिस्तान, यूएई आणि नेपाळ आहेत. तर ब गटात मलेशिया, थायलंड, बांगलादेश आणि श्रीलंका आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान हेड टू हेड रेकॉर्ड –
भारतीय आणि पाकिस्तानी महिला संघ १४ टी-२० सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. या १४ सामन्यांपैकी भारताने ११, तर पाकिस्तानने ३ जिंकले आहेत. या प्रतिस्पर्ध्यामध्ये भारताचे वर्चस्व कायम आहे. महिला आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये ६ सामने झाले आहेत. भारताने ५ सामने जिंकले आहेत. २०२२ मध्ये पाकिस्तानने एकमेव सामना जिंकला होता. आशिया चषक टी-२० मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध पाचपैकी चार विजय हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मिळवले आहेत. २०१२ च्या स्पर्धेत मिताली राजने भारताला पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिला होता.