India vs Pakistan ICC Cricket World Cup 2023 Highlights Match Updates:  एकदिवसीय विश्वचषकाच्या १२व्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. उभय संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संपन्न झाला. विश्वचषकाच्या १२व्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. भारताने या स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला आहे. आता त्याने आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध पराभव केला. त्याचे आता तीन सामन्यांत सहा गुण झाले आहेत. टीम इंडियाचा पुढचा सामना १९ ऑक्टोबरला पुण्यात बांगलादेशशी होणार आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा संघ २० तारखेला बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकांत १९१ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात भारताने ३०.३ षटकांत ३ गडी गमावत १९२ धावा करून सामना जिंकला. टीम इंडियाने विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धची विजयी मालिका सुरू ठेवली आहे. त्याचा हा आठवा विजय आहे. आता या स्पर्धेत भारताचा त्याच्याविरुद्ध पराभव झालेला नाही.

पाकिस्तानचा संघ ऑलआऊट

पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध १९१ धावांवर गारद झाला आहे. ४३व्या षटकातील पाचव्या चेंडूवर रवींद्र जडेजाने हरिस रौफला एलबीडब्ल्यू केले. जडेजाचा चेंडू हारिसला थेट त्याच्या पॅडवर लागला. पुन्हा एकदा अंपायर मॉरिस इरास्मस यांनी आऊट घोषित केले नाही. कर्णधार रोहित शर्माने रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यू भारताच्या बाजूने आला आणि हरिस बाद झाला. त्याला सहा चेंडूत केवळ दोन धावा करता आल्या. शाहीन आफ्रिदी १० चेंडूत दोन धावा केल्यानंतर नाबाद राहिला.

टीम इंडियाच्या पाच गोलंदाजांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी समान विकेट्स घेत टीम इंडियाच्या गोलंदाजीत महत्वाची भूमिका बजावली. गोलंदाजांमध्ये शार्दुल ठाकूर हा एकमेव असा होता ज्याला एकही यश मिळाले नाही.

पाकिस्तानच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही

पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक ५० धावा केल्या. गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या मोहम्मद रिझवानचे यावेळी अर्धशतक हुकले. तो ४९ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. इमाम उल हकने ३६, अब्दुल्ला शफीकने २० आणि हसन अलीने १२ धावा केल्या. याशिवाय सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. सौद शकील ६ धावा करून कुलदीपचा शिकार झाला. मोहम्मद नवाज आणि  इफ्तिखार अहमद यांनी प्रत्येकी चार धावा करून बाद झाले, शादाब खान आणि हारिस रौफ यांनी प्रत्येकी दोन धावा केल्या.

सध्याच्या एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघांचा फॉर्म चांगला आहे. भारताने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवला आहे. त्याचवेळी पाकिस्तानने नेदरलँड आणि श्रीलंकेचा पराभव केला होता. आता रोहित शर्मा आणि बाबर आझम यांच्या नजरा विजयाची हॅट्ट्रिक करण्यावर असतील.

Live Updates

CWC 2023 India vs Pakistan Highlights Score Updates in Marathi :भारत विरुद्ध पाकिस्तान हायलाईट्स स्कोअर अपडेट्स

20:09 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: हिटमॅन रोहितसमोर पाकिस्तान निष्प्रभ, सात विकेट्सने उडवला धुव्वा

विश्वचषकाच्या १२व्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. भारताने या स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला आहे. आता त्याने आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध पराभव केला. त्याचे आता तीन सामन्यांत सहा गुण झाले आहेत. टीम इंडियाचा पुढचा सामना १९ ऑक्टोबरला पुण्यात बांगलादेशशी होणार आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा संघ २० तारखेला बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.

भारत १९२-३

https://twitter.com/cricketworldcup/status/1713203141305352510

19:59 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: समालोचक रवी शास्त्री यांनी रोहित शर्माचे केले कौतुक

समालोचक रवी शास्त्री यांनी रोहित शर्माचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, "अहमदाबादची खेळपट्टी ही फलंदाजीला पोषक होती. रोहितने गोलंदाजांचा योग्य वापर केला. त्यामुळेच आज टीम इंडियाला हा सहज मिळवू शकत आहे."

भारत १८०-३

https://twitter.com/Mufaadal_Vohra/status/1713189668487917628

19:56 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: भारताचा माजी सलामीवर फलंदाज वीरेंद्र सेहवागने पाकिस्तान संघाला मारला टोमणा

भारताचा माजी सलामीवर फलंदाज वीरेंद्र सेहवागने पाकिस्तान संघाला टोमणा मारला आहे. त्याने ट्वीटरवर ट्वीट करत लिहिले आहे की, "आमचे आदरातिथ्यचं असे आहे की पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंना बॅटिंग मिळाली.

भारत १७५-३

https://twitter.com/virendersehwag/status/1713167772698689885

19:53 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यासाठी अमित शाहांनी लावली हजेरी

भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब सामन्याचा आनंद लुटत होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भारत १७०-३

https://www.instagram.com/p/CyYayI5LnpJ/?igshid=NjIwNzIyMDk2Mg==

19:35 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: रोहित शर्माचे शतक हुकले!

रोहित शर्माच्या रूपाने भारताला तिसरा धक्का बसला. आजच्या सामन्यात त्याला शतक ठोकता आले नाही. रोहित ८६ धावा करून बाद झाला. शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर इफ्तिखार अहमदने झेल घेतला. रोहितने आपल्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार मारले.

भारत १५६-३

https://twitter.com/BCCI/status/1713193235965976990

19:08 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: रोहित शर्माचे दमदार अर्धशतक

रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक पूर्ण केले. भारताने १५ षटकात २ बाद १११ धावा केल्या आहेत. रोहित ६१ आणि श्रेयस अय्यर १६ धावांवर नाबाद आहे. भारताला विजयासाठी ३५ षटकात ८१ धावा करायच्या आहेत.

भारत ११२-२

https://twitter.com/BCCI/status/1713186227703476723

18:46 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: भारताला मोठा धक्का, विराट कोहली बाद

पाकिस्तानला भागीदारी तोडण्यात यश आले आहे. विराट कोहली मोठा फटका मारण्याचा नादात बाद झाला. दोघांमध्ये ५६ धावांची भागीदारी झाली. तो १६ धावा करून बाद झाला. १०व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हसन अलीने त्याला मोहम्मद नवाजकरवी झेलबाद केले. कोहलीने १८ चेंडूंचा सामना केला. या काळात त्याने तीन चौकार मारले.

भारत ७९-२

https://twitter.com/BCCI/status/1713180355614908919

18:37 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: रोहित शर्माने केली विशेष कामगिरी, वन डे मध्ये ३०० षटके पूर्ण

रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३०० षटकार पूर्ण केले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३०० षटकार मारणारा तो जगातील तिसरा फलंदाज ठरला. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या नावावर ३५१ षटकार आणि वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेलच्या नावावर ३३१ षटकार आहेत.

भारत ७७-१

https://twitter.com/BCCI/status/1713178412326821916

18:15 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: भारताला पहिला धक्का, शुबमन गिल बाद

शाहीन आफ्रिदीने पाकिस्तानला पहिले यश मिळवून दिले. तिसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने शुबमन गिलला बाद केले. गिल ११ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. त्याने चार चौकार मारले. गिलला शादाब खानने झेलबाद केले. भारताने तीन षटकात एका विकेटच्या मोबदल्यात २३ धावा केल्या आहेत. रोहित शर्माला साथ द्यायला विराट कोहली खेळपट्टीवर आला आहे.

भारत २३-१

https://twitter.com/BCCI/status/1713172279050510494

18:13 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: भारताची शानदार सुरुवात

पाकिस्तानविरुद्ध भारताचा डाव सुरू झाला आहे. कर्णधार रोहित शर्मासोबत शुबमन गिल क्रीझवर आला आहे. शाहीन आफ्रिदीच्या पहिल्याच षटकात रोहितने आक्रमक वृत्ती स्वीकारली. पहिल्याच चेंडूवर त्याने चौकार मारला. त्यानंतर त्याने एक धाव घेत शुबमन गिलला स्ट्राईक दिली. शुबमनने शाहीनलाही चौकार मारले. भारताने एका षटकात कोणतेही नुकसान न करता १० धावा केल्या आहेत. रोहित शर्मा पाच धावांवर तर शुबमन गिल चार धावांवर नाबाद आहे.

भारत १०-०

17:35 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: भारताच्या गोलंदाजीपुढे पाकिस्तानचा १९१ धावांत गारद

एकदिवसीय विश्वचषकाच्या १२व्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकांत १९१ धावांवर गारद झाला. भारताला विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

https://twitter.com/BCCI/status/1713163965344473256

17:19 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: एकाच षटकात पाकिस्तानच्या पडल्या दोन विकेट्स

हार्दिक पांड्याने भारताला आठवे यश मिळवून दिले. त्याने ४०व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मोहम्मद नवाजला बाद केले. १४ चेंडूत ४ धावा करून नवाज जसप्रीत बुमराहकडे झेलबाद झाला. त्यानंतर पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रवींद्र जडेजाने हसन अलीला बाद केले. हसनने १९ चेंडूत १२ धावा केल्या. शुबमन गिलने त्याचा झेल घेतला. पाकिस्तानने ४१ षटकात ९ विकेट्स गमावत १८९ धावा केल्या आहेत. शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ क्रीजवर आहेत.

पाकिस्तान १८९-९

https://twitter.com/BCCI/status/1713158543032074539

16:57 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: भारताच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानची घसरगुंडी

पाकिस्तानचे सात फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. ३६व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने शादाब खानला क्लीन बोल्ड केले. शादाबला ५ चेंडूत केवळ २ धावा करता आल्या. आता हसन अली आणि मोहम्मद नवाज क्रीजवर आहे. बाबर आणि मोहम्मद रिझवान यांच्यातील भागीदारी नंतर पाकिस्तानला गळती लागली. टीम इंडिया सध्या मजबूत स्थितीत आहे.

पाकिस्तान १७१-७

https://twitter.com/BCCI/status/1713153299883708640

16:54 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: पाकिस्तानला सहावा धक्का, मोहम्मद रिझवान बाद

जसप्रीत बुमराहने या सामन्यात भारताला सहावे यश मिळवून दिले. ३३व्या षटकात कुलदीपने दोन विकेट्स घेतल्यानंतर बुमराहने पुढच्याच षटकात टीम इंडियाला मोठे यश मिळवून दिले. त्याने ३४व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद रिझवानला क्लीन बोल्ड केले. रिझवानचे अर्धशतक हुकले. ६९ चेंडूत ४९ धावा करून तो बाद झाला. पाकिस्तानने ३४ षटकात ६ विकेट्स गमावत १६८ धावा केल्या आहेत.

पाकिस्तान १६८-६

https://twitter.com/BCCI/status/1713151245480018204

16:45 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: पाकिस्तानच्या एकापाठोपाठ पडल्या विकेट्स, इफ्तिकार बाद

सौद शकीलला बाद केल्यानंतर कुलदीप यादवने इफ्तिखार अहमदलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. इफ्तिखार ४ चेंडूत ४ धावा करून क्लीन बोल्ड झाला. या सामन्यात कुलदीपला दुसरे यश मिळाले.

पाकिस्तान १६५-५

https://twitter.com/BCCI/status/1713150158161297794

16:40 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: पाकिस्तान चौथा धक्का, सौद शकील बाद

या सामन्यात कुलदीप यादवला पहिले यश मिळाले. त्याने ३३व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डावखुरा फलंदाज सौद शकीलला (LBW) पायचीत केले. कुलदीपचा चेंडू शकीलच्या पॅडला लागला. भारतीय खेळाडूंनी जोरदार अपील केले, पण पंचांनी त्याला नाबाद घोषित केले. कुलदीप आणि यष्टिरक्षक के.एल. राहुलचा सल्ला घेत कर्णधार रोहित शर्माने रिव्ह्यू घेतला. कुलदीपचा चेंडू यष्टीच्या बरोबरीने जात असल्याचे रिव्ह्यूमध्ये स्पष्टपणे दिसून आले. सौद शकील बाहेर आहे. त्याला १० चेंडूत केवळ ६ धावा करता आल्या.

पाकिस्तान १६२-४

16:21 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: पाकिस्तानला सर्वात मोठा फटका बसला

मोहम्मद सिराजने पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का दिला. त्याने ३० षटकांच्या चौथ्या चेंडूवर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमला क्लीन बोल्ड केले. ५८ चेंडूत ५० धावा करून तो बाद झाला. त्याने आपल्या खेळीत सात चौकार मारले. बाबरने रिझवानबरोबर चौथ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. पाकिस्तानने ३० षटकात ३ विकेट्स गमावत १५६ धावा केल्या आहेत. मोहम्मद रिझवान ४७ तर सौद शकील एका धावेवर नाबाद आहे.

पाकिस्तान १५६-३

https://twitter.com/BCCI/status/1713144258843275514

16:20 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: बाबर आझमचे अर्धशतक

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. बाबरने भारताविरुद्ध वन डेत पहिले अर्धशतक झळकावले. पाकिस्ताननेही आपल्या १५० धावा पूर्ण केल्या आहेत. २९ षटकांत २ बाद १५० धावा झाल्या आहेत. बाबर ५० आणि मोहम्मद रिझवान ४३ धावांवर नाबाद आहे.

पाकिस्तान १५०-२

https://twitter.com/TheRealPCB/status/1713143786594005372

15:34 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: मोहम्मद रिझवान थोडक्यात बचावला

मोहम्मद रिझवान १४व्या षटकात बाद होण्यापासून थोडक्यात बचावला. रवींद्र जडेजाचा दुसरा चेंडू थेट त्याच्या पॅडवर गेला. पंचांनी रिझवानला बाद घोषित केले. यावर त्याने कर्णधार बाबर आझमच्या सल्ल्यानुसार रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूमध्ये जडेजाचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाताना दिसला आणि रिझवान थोडक्यात बचावला.

पाकिस्तान ९८-२

15:29 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: विराट कोहली जुनी जर्सी घालून बाहेर आला, नंतर बदलली, फोटो व्हायरल

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना सुरू झाला आहे. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने एक चूक केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट पांढऱ्या पट्ट्या असलेल्या रंगाची एकदिवसीय जर्सी घालून मैदानात उतरला होता. त्यानंतर याकडे लक्ष गेले आणि तो पॅव्हेलियनकडे बोट दाखवतानाही दिसला. पुढच्याच षटकात त्याने पुन्हा तिरंगा पट्टी असलेली जर्सी घातली.

पाकिस्तान ९०-१

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1713116778002612518

15:17 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: फलंदाजीला येण्यासाठी मोहम्मद रिझवान घेतला खूप वेळ, विराट झाला नाराज

हार्दिक पांड्याने भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्याने १३व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पाकिस्तानी सलामीवीर इमाम हकला बाद केले. त्यानंतर फलंदाजीला येण्यासाठी मोहम्मद रिझवान घेतला खूप वेळ घेतला त्यामुळे विराटने त्याला प्रश्न विचारला आणि नाराजी व्यक्त केली.

पाकिस्तान ७५-२

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1713127029334536301

15:11 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: पाकिस्तानला दुसरा धक्का, इमाम-उल-हक बाद

या सामन्यात हार्दिक पांड्याने भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्याने १३व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पाकिस्तानी सलामीवीर इमाम हकला बाद केले. इमाम ३८ चेंडूत ३६ धावा करून बाद झाला. हार्दिकच्या आउटगोइंग चेंडूवर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. विकेटकीपर के.एल. राहुलने त्याचा झेल घेतला.

पाकिस्तान ७४-२

https://twitter.com/BCCI/status/1713126665721892963

15:09 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: बाबर आझम आणि इमामने डाव सावरला

बाबर आझम आणि इमाम उल हक यांनी दुसऱ्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी केली. बाबरने ११व्या षटकात हार्दिकच्या चेंडूवर दोन चौकार मारले. पाकिस्तानने १२ षटकात एका विकेटवर ६८ धावा केल्या आहेत. इमाम ३२ आणि बाबर १५ धावांवर नाबाद आहे. या विश्वचषकात बाबरची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. त्याने नेदरलँडविरुद्ध पाच आणि श्रीलंकेविरुद्ध १० धावा केल्या.

पाकिस्तान ६०-१

15:07 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: पाकिस्तानच्या डावाची १० षटके पूर्ण झाली

पाकिस्तानच्या डावातील १० षटके पूर्ण झाली आहेत. त्यांनी एका विकेटच्या मोबदल्यात ४९ धावा केल्या आहेत. अब्दुल्ला शफिकला बाद केल्यानंतर कॅप्टन बाबर आझम इमाम उल हकसोबत पुढे डाव सावरत आहे. इमाम ३२ धावांवर तर बाबर १५ धावांवर नाबाद आहे.

पाकिस्तान ५०-१

14:47 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: पाकिस्तानला पहिला धक्का, अब्दुल्ला शफिक बाद

मोहम्मद सिराजने भारताला पहिले यश मिळवून दिले. डावाच्या आठव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने अब्दुल्ला शफिकला बाद केले. शफिकला त्याचा चेंडू लेग साइडने खेळायचा होता, पण तो फटका मारायला चुकला आणि चेंडू थेट त्याच्या पॅडवर जाऊन लागला. शफिकचा पाय यष्टीच्या समोर होता. सिराजच्या आवाहनावर पंचांनी शफिकला बाद घोषित केले. २४ चेंडूत २० धावा करून तो बाद झाला. शफिकने इमाम उल हकसह पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. शफिक बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम क्रीझवर आला आहे. पाकिस्तानची धावसंख्या आठ षटकांत एका विकेटवर ४१ धावा आहे.

पाकिस्तान ४२-१

https://twitter.com/BCCI/status/1713120564821536892

14:43 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: दोन्ही सलामीवीरांनी दिली पाकिस्तानला चांगली सुरुवात

पाकिस्तान संघाने सहा षटकात एकही बिनबाद २८ धावा केल्या आहेत. इमाम उल हक १४ आणि अब्दुल्ला शफीक १३ धावांवर नाबाद आहे. भारताने शेवटच्या दोन षटकांत कसून गोलंदाजी केली. या कालावधीत त्याने केवळ पाच धावा दिल्या आहेत. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज फॉर्ममध्ये परतताना दिसत आहेत. टीम इंडिया पहिल्या विकेटच्या शोधात आहे.

पाकिस्तान २८-०

14:25 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: पाकिस्तानच्या सलामीवीरांची आश्वासक सुरुवात

भारताविरुद्ध पाकिस्तानने दमदार सुरुवात केली आहे. त्याने तीन षटकात एकही बिनबाद २४ धावा केल्या आहेत. सर्व धावा चौकारांच्या जोरावर आल्या आहेत. इमाम उल हक १२ आणि अब्दुल्ला शफीक १० धावांसह खेळत आहे. इमामने मोहम्मद सिराजच्या षटकात तीन चौकार मारले.

पाकिस्तान २४-०

14:10 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: पाकिस्तानच्या डावाला सुरुवात

गोलंदाजीसाठी भारतीय खेळाडू मैदानात उतरले आहेत. पाकिस्तानचे सलामीवीर इमाम उल हक आणि अब्दुल्ला शफीक हे फलंदाजीसाठी क्रीझवर आले आहेत. दोन्ही सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली आहे.

पाकिस्तान १६-०

13:41 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: नाणेफेक जिंकणाऱ्या संघांचा विक्रम

अहमदाबादमधील मागील पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी दोन आणि नंतर फलंदाजी करणाऱ्या संघांनी तीन सामने जिंकले आहेत. या विश्वचषकात येथे एक सामना खेळला गेला, ज्यामध्ये न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धचा पाठलाग करून सामना जिंकला.

13:40 (IST) 14 Oct 2023
IND vs PAK: दोन्ही संघांचे प्लेइंग-११

भारत: शुबमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

https://twitter.com/BCCI/status/1713103610375217463

पाकिस्तान: अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ.

https://twitter.com/TheRealPCB/status/1713103943897936379

CWC 2023 India vs Pakistan Highlights Score Updates in Marathi :भारत विरुद्ध पाकिस्तान हायलाईट्स स्कोअर अपडेट्स

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने १९९२, १९९६, १९९९, २००३, २०११, २०१५ आणि २०१९ मध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे. भारतीय संघाने हीच विजयी मालिका पुढे सुरू ठेवत आठव्यांदा पराभवाची धूळ चारली.

Story img Loader