India vs Pakistan ICC Cricket World Cup 2023 Highlights Match Updates: एकदिवसीय विश्वचषकाच्या १२व्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. उभय संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संपन्न झाला. विश्वचषकाच्या १२व्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. भारताने या स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला आहे. आता त्याने आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध पराभव केला. त्याचे आता तीन सामन्यांत सहा गुण झाले आहेत. टीम इंडियाचा पुढचा सामना १९ ऑक्टोबरला पुण्यात बांगलादेशशी होणार आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा संघ २० तारखेला बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकांत १९१ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात भारताने ३०.३ षटकांत ३ गडी गमावत १९२ धावा करून सामना जिंकला. टीम इंडियाने विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धची विजयी मालिका सुरू ठेवली आहे. त्याचा हा आठवा विजय आहे. आता या स्पर्धेत भारताचा त्याच्याविरुद्ध पराभव झालेला नाही.
पाकिस्तानचा संघ ऑलआऊट
पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध १९१ धावांवर गारद झाला आहे. ४३व्या षटकातील पाचव्या चेंडूवर रवींद्र जडेजाने हरिस रौफला एलबीडब्ल्यू केले. जडेजाचा चेंडू हारिसला थेट त्याच्या पॅडवर लागला. पुन्हा एकदा अंपायर मॉरिस इरास्मस यांनी आऊट घोषित केले नाही. कर्णधार रोहित शर्माने रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यू भारताच्या बाजूने आला आणि हरिस बाद झाला. त्याला सहा चेंडूत केवळ दोन धावा करता आल्या. शाहीन आफ्रिदी १० चेंडूत दोन धावा केल्यानंतर नाबाद राहिला.
टीम इंडियाच्या पाच गोलंदाजांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी समान विकेट्स घेत टीम इंडियाच्या गोलंदाजीत महत्वाची भूमिका बजावली. गोलंदाजांमध्ये शार्दुल ठाकूर हा एकमेव असा होता ज्याला एकही यश मिळाले नाही.
पाकिस्तानच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही
पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक ५० धावा केल्या. गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या मोहम्मद रिझवानचे यावेळी अर्धशतक हुकले. तो ४९ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. इमाम उल हकने ३६, अब्दुल्ला शफीकने २० आणि हसन अलीने १२ धावा केल्या. याशिवाय सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. सौद शकील ६ धावा करून कुलदीपचा शिकार झाला. मोहम्मद नवाज आणि इफ्तिखार अहमद यांनी प्रत्येकी चार धावा करून बाद झाले, शादाब खान आणि हारिस रौफ यांनी प्रत्येकी दोन धावा केल्या.
सध्याच्या एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघांचा फॉर्म चांगला आहे. भारताने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवला आहे. त्याचवेळी पाकिस्तानने नेदरलँड आणि श्रीलंकेचा पराभव केला होता. आता रोहित शर्मा आणि बाबर आझम यांच्या नजरा विजयाची हॅट्ट्रिक करण्यावर असतील.
CWC 2023 India vs Pakistan Highlights Score Updates in Marathi :भारत विरुद्ध पाकिस्तान हायलाईट्स स्कोअर अपडेट्स
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात शुबमन गिलचे पुनरागमन झाल्याचे रोहित शर्माने सांगितले. इशान किशनला बाहेर बसावे लागले. बाबर म्हणाला की, त्यालाही आधी गोलंदाजी करायची होती.
Rohit Sharma flips the coin and India have elected to field first ?
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 14, 2023
Shubman Gill returns to the playing XI ?#CWC23 | #INDvPAK ?: https://t.co/lXgEd1FCKN pic.twitter.com/RklSPsBuAW
CWC 2023. India won the toss and elected to field. https://t.co/RBULW3l3hQ #INDvPAK #CWC23
— BCCI (@BCCI) October 14, 2023
भारत-पाकिस्तान सामन्याआधी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मोठे विधान केले आहे. बाबर म्हणाला की, “इतिहासात मागे काय झाले, याचा आम्ही फारसा विचार करत नाही. सध्या आम्ही आजच्या सामन्यावर लक्ष केंद्रित करू इच्छितो. विक्रम हे नेहमी तोडण्यासाठी असतात आणि आज तो आम्ही मोडण्याचा प्रयत्न करू.”
Babar Azam has backed Pakistan to break their winless streak against India at #CWC23.

More ➡️ https://t.co/LkGBMUifZg pic.twitter.com/zT1cMvRAhW
पाकिस्तान क्रिकेट संघाचे चाहते मानले जाणारे बशीर चाचा पाकिस्तान संघाचे सामने पाहण्यासाठी जगभरात संघासोबत फिरतात. मात्र, यावेळी ते भारतीय संघाला पाठिंबा देताना दिसत आहेत. भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान 'चाचा' एकच जर्सी घालतात, त्या जर्सीच्या अर्ध्या भागावर भारताचा तिरंगा आणि दुसऱ्या अर्ध्यावर पाकिस्तानचा ध्वज असतो. पाकिस्तानी चाहत्याचा पोशाख पाहून टीम इंडियाचे चाहतेही त्यांना खूप प्रेम देताना दिसत आहेत.
भारत आणि पाकिस्तानचे दोन्ही संघ आजच्या सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहचले. बाबर आझम आणि रोहित शर्माच्या नेतृत्त्वात उभय संघ आज भिडणार असून विश्वचषकातील तिसरा विजय नोंदवण्यासाठी सज्ज आहेत.
READY! ?
— BCCI (@BCCI) October 14, 2023
Follow the match ▶️ https://t.co/H8cOEm3quc#CWC23 | #TeamIndia | #INDvPAK | #MeninBlue pic.twitter.com/NEGucWYnhO
#WATCH | Team India arrives at Narendra Modi Stadium in Ahmedabad, Gujarat.
— ANI (@ANI) October 14, 2023
India will face Pakistan in the 12th match of #ICCCricketWorldCup23 here, today. pic.twitter.com/NlynPikv0T
भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी अनुष्का शर्मा अहमदाबादमध्ये पोहोचली, सचिन तेंडुलकर-दिनेश कार्तिकही एकत्र दिसले.
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी सचिन तेंडुलकर-अनुष्का शर्मा दिसले एकत्र, टीम इंडियाला पाठिंबा देण्यसाठी पोहचले अहमदाबादला
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी खूपच चांगली मानली जाते. येथे बॅटवर चेंडू स्कीट होऊन येतो, त्यामुळे या मैदानवर मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. क्रिकेट चाहत्यांना आज चौकार-षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळू शकते. पण नवीन चेंडूवर वेगवान गोलंदाज मदत मिळू शकते.
येथे आतापर्यंत एकूण २९ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २३७ धावांची आहे. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १६ सामने जिंकले आहेत. मात्र, विश्वचषकातील न्यूझीलंड-इंग्लंड सामन्यात न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी करत सामना मोठ्या फरकाने जिंकला होता.
भारत विरुद्ध पाकिस्तान आयसीसी क्रिकेट विश्वचषक सामन्यापूर्वी आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ११ हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी सज्ज आहेत.
#WATCH | Gujarat: Security beefed up outside Narendra Modi Stadium ahead of the India Vs Pakistan ICC Cricket World Cup match in Ahmedabad today pic.twitter.com/AR1d4lBoE7
— ANI (@ANI) October 14, 2023
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज एक लाखाहून अधिक प्रेक्षक सामना पाहणार आहेत. स्टेडियमबाहेर प्रेक्षकांची मोठी गर्दी दिसत आहे. संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात क्रिकेट चाहते टीम इंडियाचा जयघोष पाहायला मिळत आहे.
ICC CWC 2023: Sea of Blue outside Narendra Modi Stadium ahead of IND-PAK clash
— ANI Digital (@ani_digital) October 14, 2023
Read @ANI Story | https://t.co/pSwfwqu36b#ICCCricketWorldCup #INDvsPAK #NarendraModiStadium #Ahemdabad pic.twitter.com/bCs7SseViX
#WATCH | Ahmedabad, Gujarat: A cricket fan says, "Pakistan is scared of the name Virat Kohli…He will hit century today…" pic.twitter.com/Z7E9Jqv1Rf
— ANI (@ANI) October 14, 2023
नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ५०वा आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे. त्यामुळे ही क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणी असणार आहे.
Narendra Modi Stadium will be hosting its 50th international match today between India and Pakistan.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 14, 2023
– The biggest stadium in the world…!!! pic.twitter.com/UvsJJZYHbe

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने १९९२, १९९६, १९९९, २००३, २०११, २०१५ आणि २०१९ मध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे. भारतीय संघाला ही विजयी मालिका सुरू ठेवायची आहे. टीम इंडिया तिसर्यांदा विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. भारताने १९९६ (बंगळुरू) आणि २०११ (मोहाली) मध्ये विजय मिळवला होता.
भारतीय संघ १८ वर्षांनंतर अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामना खेळणार आहे. शेवटच्या वेळी २००५ मध्ये दोन्ही संघ येथे आमनेसामने आले होते, तेव्हा पाकिस्तानने तीन विकेट्सने विजय मिळवला होता. भारतीय संघालाही त्या पराभवाचा बदला घ्यायला आवडेल. यावेळी एक लाखाहून अधिक प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी अहमदाबादच्या स्टेडियमवर पोहोचतील.
One of the most anticipated matches at #CWC23 ?

Who's getting the win today? #INDvPAK pic.twitter.com/ggVfFCZZja

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने १९९२, १९९६, १९९९, २००३, २०११, २०१५ आणि २०१९ मध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे. भारतीय संघाने हीच विजयी मालिका पुढे सुरू ठेवत आठव्यांदा पराभवाची धूळ चारली.