India vs Pakistan Live Telecast, Cricket World Cup 2023: भारत आणि पाकिस्तान याच्यात विश्वचषक २०२३ मधील सामना शनिवारी (१४ ऑक्टोबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन्ही संघांनी आत्तापर्यंतच्या त्यांच्या दोन्ही सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. मात्र आता या दोन्ही संघांची सर्वात मोठी कसोटी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाहिला मिळणार आहे. रोहित शर्माच्या संघाची नजर तिसऱ्या विजयाकडे असणार आहे. त्याचबरोबर बाबर आझमचा संघ भारताचा विजयी रथ रोखण्याचा प्रयत्न करताना दिसणार. विश्वचषकातील हा सर्वात मोठा सामना आपल्याला घरबसल्या कुठे आणि कधी विनामूल्य कसा पाहता येईल, जाणून घेऊया.

भारत आणि पाकिस्तान सामना कुठे पाहू शकता?

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना शनिवारी दुपारी २ वाजता सुरू होईल. जर तुम्हाला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना घरच्या घरी पाहायचा असेल, तर तो स्टार स्पोर्ट्स चॅनलवर थेट प्रक्षेपित केला जाईल. स्टार स्पोर्ट्स वन, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स हिंदी यांसारख्या स्टार स्पोर्ट्स चॅनेलसह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये तुम्ही त्याचे कॉमेंट्री ऐकू शकता. विश्वचषक २०२३ च्या सर्व सामन्यांची १८ वेगवेगळ्या भाषांमध्ये कॉमेंट्री केली जाईल. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आवडत्या भाषेत सामन्याचा आनंद घेऊ शकता.

BPL 2025 Mohammad Nawaz and Tanzim Hasan fight during Khulna Tigers vs Sylhet Strikers match
BPL 2025 : लाइव्ह मॅचमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये जुंपली, वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
Will Pakistan lose hosting rights of Champions Trophy cricket tournament
चँपियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान गमावणार? भारताच्या दबावाचा किती परिणाम?
Zee Marathi Makar Sankrant Celebration dance video
Video : ‘झुकेगा नहीं साला…’, अल्लू अर्जुनच्या गाण्यावर डॅडी अन् बाई आजीचा जबरदस्त डान्स! दोघांच्या हटके स्टाइलने वेधलं लक्ष
Babar Azam loses cool after South Africa pacer Wiaan Mulder hits his foot with wild throw Video
SA vs PAK: बाबर आझम आफ्रिकेच्या गोलंदाजावर संतापला, पायावर फेकून मारला चेंडू अन् मैदानात झाला वाद; VIDEO व्हायरल
Yashasvi Jaiswal Sledges Sam Konstas Ask Him For Big Shot Video Viral IND vs AUS Sydney Test
IND vs AUS: “ओए कॉन्टास, काय झालं रे..?” यशस्वी जैस्वालने कॉन्स्टासला चिडवलं, चुकीचं नाव घेत अशी घेतली फिरकी; VIDEO व्हायरल
Jasprit Bumrah stares down Sam Konstas After Usman Khwaja Wicket and Team India Aggressive Celebration Video viral
IND vs AUS: बुमराहचा जळता कटाक्ष अन् भारताचं आक्रमक सेलिब्रेशन! कॉन्स्टासने वाद घातल्यानंतर ख्वाजाच्या विकेटचा VIDEO व्हायरल

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना विनाशुल्क कुठे पाहू शकता?

भारत आणि पाकिस्तान संघातील सामना मोबाईलवर मोफत पाहायचा असेल, तर तुम्हाला फक्त डिज्नी प्लस हॉटस्टार अॅप डाउनलोड करावे लागेल. तुम्हाला सामना पाहण्यासाठी सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार नाही, उलट तुम्ही भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा विनामूल्य आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला सामन्याची कॉमेंट्री ऐकायची असेल, तर तुम्ही ऑल इंडिया रेडिओच्या प्रसार भारती या वाहिनीवरही कॉमेंट्री ऐकू शकता. याशिवाय लोकसत्ता डॉट कॉमवरील लाइव्ह ब्लॉगद्वारे तुम्ही मोबाईलवर सामन्याचे प्रत्येक अपडेट पाहू शकता.

हेही वाचा – IND vs PAK, World Cup 2023: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतासाठी आनंदाची बातमी, रोहित शर्माने शुबमनबद्दल दिली मोठी अपडेट

भारत आणि पाकिस्तानचा विश्वचषकासाठीचा संघ –

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव

पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली , शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम.

Story img Loader