IND vs PAK Match Updates: शनिवारी (२ सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपमधील तिसरा सामना अनिर्णित राहिला. कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडिया 50 ओव्हर्सही खेळू शकली नाही. ती 48.5 षटकांत 266 धावांवर बाद झाली. यानंतर पावसामुळे पाकिस्तानचा डाव सुरू होऊ शकला नाही. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर पंचांनी दोन्ही कर्णधारांशी बोलून सामना रद्द झाल्याचे घोषित केले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण दिला. अशा प्रकारे पाकिस्तानचे दोन सामन्यांतून तीन गुण झाले. त्यानी पहिल्याच सामन्यात नेपाळचा पराभव केला होता. दुसरीकडे, भारताच्या खात्यात एका सामन्यातून एक गुण आहे. आता सुपर-4 मध्ये पोहोचण्यासाठी 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सामन्यात नेपाळला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागेल. सुपर-4 मध्ये पोहोचणारा पाकिस्तान हा पहिला संघ आहे.
त्तत्पुर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडिया 50 ओव्हर्सही खेळू शकली नाही. 48.5 षटकांत सर्वबाद 266 धावा झाल्या. यानंतर पावसामुळे पाकिस्तानचा डाव सुरू होऊ शकला नाही. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर पंचांनी दोन्ही कर्णधारांशी बोलून सामना रद्द झाल्याचे घोषित केले.
इशान आणि हार्दिकने जिंकली मनं –
इशान किशन आणि हार्दिक पांड्याने भारतीय चाहत्यांची मने जिंकली. टीम इंडियासाठी हार्दिकने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 87 धावांची खेळी खेळली. इशानने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात 82 धावा केल्या. या दोघांशिवाय एकाही भारतीय फलंदाजाला 20 धावांचा आकडाही गाठता आला नाही. खरं तर बुमराह हा हार्दिक आणि इशाननंतर तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने शेवटच्या काही षटकांत फटकेबाजी करुन 16 धावांचे योगदान दिले आणि भारताला 266 धावांपर्यंत नेले. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 10 षटकात 35 धावा देत 4 बळी घेतले. नसीम शाह आणि हरिस रौफ यांना प्रत्येकी तीन बळी मिळवले.