Asia Cup 2023, India vs Pakistan Super 4 Match Highlights: भारतीय संघाने पाकिस्तानवर २२८ धावांनी मात देऊन एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय आणि विक्रम आपल्या नावी केला आहे. दोन दिवस सुरु असलेल्या या सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय सलामीवीर रोहित शर्मा व शुबमन गिलने १२१ धावा केल्या होत्या तर दुसऱ्या दिवशी २४ व्या षटकापासून सुरु झालेल्या सामन्यात सुरुवातीपासूनच विराट कोहली आणि के. एल. राहुलने तुफान फटकेबाजी केली होती. भारताने प्रथम फलंदाजी करताना दोन गडी गमावून ३५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाला ३२ षटकात केवळ १२८ धावा करता आल्या. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या नंतर आता रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरचं ट्वीट चर्चेत आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरंतर, आशिया चषकाच्या पहिल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर शोएब अख्तरने पाकिस्तानच्या स्तुतीचे पूल बांधले होते. रोहित शर्मा सुद्धा शाहीन आफ्रिदीला घाबरला आहे, त्याला बघताच रोहितच्या खेळाचा फॉर्म बदलतो असंही अख्तर म्हणाला होता. पण आता दुसऱ्या सामन्यात भारतीय खेळाडूंची लय पाहता पुन्हा अख्तरचा सूर बदलला होता. पहिल्या दिवसानंतर त्याने ट्वीट करून “पावसामुळे पाकिस्तान वाचल्याचे” स्पष्ट म्हटले होते. आणि मग दुसऱ्या दिवशी जी काही फटकेबाजी झाली त्यानंतर तर अख्तरनी भारतीय संघाचं कसब सर्वांसमोर मान्य केलं आहे.

शोएब अख्तरने भारत विरुद्ध पाकिस्तानस सुपर ४ सामन्याच्या निकालाआधीच ट्विट करायला सुरुवात केली होती. या तीनही ट्वीटचा सिक्वेन्स पाहून भारतीय चाहते चांगलेच मजा घेत आहेत. पहिल्या ट्वीटमध्ये तो म्हणाला, “बरसो रे मेघा”,दुसऱ्या ट्वीटमध्ये त्याने लिहिलं, “विराट कोहलीला बेस्ट का म्हटलं जातं हे त्यानं आज पुन्हा सिद्ध केलं आहे” आणि मग पराभवानंतर तिसऱ्या ट्वीटमध्ये तर त्याने भारताचं तोंडभरून कौतुक केलं आहे. पण कौतुक करतानाही तो म्हणाला की, “एका मॅचने पाकिस्तानला तुम्ही खेळातून काढू शकत नाही आणि भारतालाही नाही. भारत आता जिंकला असला तरी पाकिस्तान पुन्हा जोशाने समोर येऊ शकतो आणि येईलच.”

Video: शोएब अख्तर म्हणतो, “एक मॅच पाकिस्तानला..”

हे ही वाचा<< IND vs PAK: कोहलीचं शतक पाहून गौतम गंभीर काय म्हणाला? के. एल. राहुलचं कौतुक आणि विराटला…

दरम्यान, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात दुखापतग्रस्त हरिस रौफ आणि नसीम शाह फलंदाजीला आले नाहीत. यामुळे सुद्धा पाकिस्तानची बाजू थोडी दुबळी पडल्याचे म्हटले जात आहे. पण काल भारत फलंदाजी, गोलंदाजी आणि एकूणएक सगळ्याच बाजूंनी बेस्ट सिद्ध झाला यात काहीच वाद नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs pakistan match highlights video shoaib akhtar on virat kohli kuldeep against afridi babar in asia cup super 4 point table svs