IND vs PAK Match in T20 World Cup 2024 will be played in New York City : आयसीसी पुरुषांच्या टी-२० विश्वचषकाचा पुढचा हंगाम २०२४ मध्ये वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत खेळवला जाणार आहे. आगामी स्पर्धेसाठी सध्या काही महिने बाकी आहेत, मात्र त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची क्रिकेटप्रेमी नेहमीच वाट पाहत असतात. भारत आणि पाकिस्तान यांचा सामना मोठ्या स्पर्धेत झाला तर सामन्याचा उत्साह द्विगुणित होतो. आता भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना कोणत्या शहरात होणार ते निश्चित झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

द गार्डियनच्या वृत्तानुसार, यावेळी भारत आणि पाकिस्तानचे संघ न्यूयॉर्क शहरात आमनेसामने येणार आहेत. आगामी स्पर्धेसाठी दोन्ही संघांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. टी-२० विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघ युवकांमध्ये सातत्याने प्रयोग करत आहे. त्यामुळेच अनुभवी खेळाडू काही काळापासून टी-२० फॉरमॅटमध्ये भारतीय संघात सहभागी झाले नाहीत.

यूएसने पुष्टी केली आहे की, ते फ्लोरिडामधील सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क, टेक्सासमधील ग्रँड प्रेरी स्टेडियम आणि लॉंग आयलंडवरील आयझेनहॉवर पार्क, डाउनटाउन मॅनहॅटनपासून सुमारे २५ मैलांवर असलेली फक्त तीन ठिकाणांचा वापर केला जाईल. पहिली दोन समर्पित क्रिकेट मैदाने आहेत, तर तात्पुरते, ३४,००० आसनांचे स्टेडियम न्यूयॉर्कमधील स्पर्धेसाठी बांधले जाईल, ज्यामध्ये ताज्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार सुमारे ७,११,००० भारतीय रहिवासी आणि सुमारे १,००,००० पाकिस्तानी वंशाचे लोक आहेत.

हेही वाचा – IND vs SA 3rd T20 : सूर्या-कुलदीपच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा १०६ धावांनी केला पराभव, मालिका सोडवली बरोबरीत

टी-२० फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना –

टी-२० फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत एकूण १२ सामन्यात आमनेसामने आले आहेत. या काळात पाकिस्तान संघाविरुद्ध टीम इंडियाचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या नऊ सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवता आला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानी संघाला भारतीय संघाविरुद्ध तीन सामन्यांत यश मिळाले आहे. यापैकी दोन सामने भारताने मायदेशात जिंकले आहे. तसेच न्यूट्रल ग्राऊंवर भारताने सात, तर पाकिस्तानने दोन सामन्यात विजय मिळवला आहे.

हेही वाचा – IND vs AUS : सूर्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाडला चौकार-षटकारांचा पाऊस, शतकाच्या जोरावर रोहितच्या ‘या’ खास विक्रमाशी केली बरोबरी

अलीकडेच भारतीय संघाने पाकिस्तानचा केला होता पराभव –

नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघानविरुद्ध पाकिस्तानला दारुण पराभव पत्करला होता. दोन्ही संघांमधील हा सामना १४ ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकांत १९१ धावांवर आटोपला. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने ३०.३ षटकांत तीन गडी गमावून सहज गाठले. या सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला होता. संघासाठी डावाची सुरुवात करताना त्याने ६३ चेंडूत ८६ धावांची खेळी केली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs pakistan match in t20 world cup 2024 will be played in new york city vbm