Asia Cup 2023, India vs Pakistan Super 4 Score Updates: भारतीय संघाने पाकिस्तानवर २२८ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. एकदिवसीय इतिहासातील धावांच्या बाबतीत भारताचा पाकिस्तानवरचा हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी टीम इंडियाने २००८ च्या आशिया कपमध्ये बांगलादेशच्या मीरपूरमध्ये १४० धावांनी त्यांचा पराभव केला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या शतकी खेळीमुळे दोन गडी गमावून ३५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ आठ विकेट्सवर केवळ १२८ धावा करू शकला आणि सामना २२८ धावांनी गमावला. पाकिस्तान संघाला ३२ षटकात केवळ १२८ धावा करता आल्या. दुखापतग्रस्त हरिस रौफ आणि नसीम शाह फलंदाजीला आले नाहीत.
विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम –
सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७७ शतके झळकावण्यात यश मिळवले आणि सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनने ५९४ डावात ७७ शतके पूर्ण केली होती, तर कोहलीने ५६१ डावात हा पराक्रम केला आहे. कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ४७ शतके करणारा फलंदाज ठरला. त्याने सचिनचा विक्रमही मोडला. सचिनने आपल्या ४३५ व्या डावात ४७ वे एकदिवसीय शतक पूर्ण केले होते, तर कोहलीने २६७ व्या डावात हा पराक्रम केला.
कोहलीने केएल राहुलसोबत २०० हून अधिक धावांची केली भागीदारी –
या सामन्यात विराट कोहलीने केएल राहुलसोबत तिसऱ्या विकेटसाठी १९४ चेंडूत २३३ धावांची नाबाद भागीदारी केली. आशिया चषकात भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम भागीदारी ठरली. या सामन्यात विराट कोहलीने ९४ चेंडूत ३ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने नाबाद १२२ धावांची खेळी केली. विराट कोहलीने कोलंबोमध्ये चौथे शतक झळकावले. या सामन्यात केएल राहुलने ११ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचबरोबर भारताने पाकिस्तानविरुद्ध ५० षटकात २ बाद ३५६ धावा केल्या.
Pakistan vs India Super 4 Asia Cup 2023 Highlights Updates: आशिया चषक २०२३ भारत वि पाकिस्तान सुपर ४ अपडेट्स
आशिया चषकाच्या सुपर-4 मध्ये भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला. पावसाने व्यत्यय आणलेला सामना दोन दिवसांत संपला. रविवारी (10 सप्टेंबर) सामना सुरू झाला, मात्र पावसामुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. खेळ थांबला तोपर्यंत भारताने 24.1 षटकात 147 धावा केल्या होत्या. सोमवार हा सामन्याचा राखीव दिवस होता. पुढे खेळताना भारतीय संघाने 50 षटकात 356 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाला 32 षटकांत आठ गडी गमावून केवळ 128 धावा करता आल्या. नसीम शाह आणि हरिस रौफ दुखापतीमुळे फलंदाजी करू शकले नाहीत. अशा प्रकारे टीम इंडियाने 228 धावांनी विजय मिळवला.
कुलदीप यादवनेही भारताला सातवे यश मिळवून दिले. 30व्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने इफ्तिखार अहमदला बाद केले. त्यानेच इफ्तिखारचा झेल घेतला. हा पाकिस्तानी फलंदाज 35 चेंडूत 23 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
कुलदीप यादवनेही पाकिस्तानला सहावी विकेट मिळवून दिली. 28व्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने शादाब खानला . मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असताना शार्दुल ठाकूरने चौकारावर शादाबला झेलबाद केले. शादाबने 10 चेंडूत सहा धावा केल्या. पाकिस्तानने 28 षटकात 6 विकेट गमावत 111 धावा केल्या आहेत. इफ्तिखार अहमद १६ धावांवर तर फहीम अश्रफ एका धावेवर नाबाद आहे.
कुलदीप यादवनेही पाकिस्तानला सहावी विकेट मिळवून दिली. 28व्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने शादाब खानला बाद केले. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असताना शार्दुल ठाकूरने चौकारावर शादाबला झेलबाद केले. शादाबने 10 चेंडूत सहा धावा केल्या. पाकिस्तानने 28 षटकात 6 विकेट गमावत 111 धावा केल्या आहेत. इफ्तिखार अहमद १६ धावांवर तर फहीम अश्रफ एका धावेवर नाबाद आहे.
पाकिस्तानचा निम्मा संघ 96 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला कुलदीप यादवने पाचवा धक्का दिला. त्याने आघा सलमानला LBW पायचीत केले. सलमानला 32 चेंडूत केवळ 23 धावा करता आल्या. पाकिस्तानचा अर्धा डावही संपला आहे. त्याने 25 षटकात 5 विकेट्सवर 101 धावा केल्या आहेत. इफ्तिखार अहमद 11 तर शादाब खान 2 धावांवर नाबाद आहे.
https://twitter.com/StarSportsIndia/status/1701275660097036598?s=20
20 व्या षटकात 77 धावांवर पाकिस्तानची चौथी विकेट पडली. कुलदीप यादवने फखर जमानला बाद केले. फखर जमानने 50 चेंडूत 27 धावा केल्या. आता आगा सलमान आणि इफ्तिखार अहमद क्रीजवर आहेत.
16 षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 68 धावा आहे. फखर जमान 20 आणि आगा सलमान 10 धावांवर खेळत आहे. पाकिस्तानच्या फलंदाजांना धावा काढणे कठीण होत आहे. भारतीय गोलंदाज योग्य लाइन लेंथवर गोलंदाजी करत आहेत.
पाकिस्तानची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 50 धावा पार झाली आहे. आगा सलमान आणि फखर जमान क्रीजवर आहेत. हे दोघेही मोठी भागीदारी करून आपल्या संघाला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न करतील. 15 षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 65 धावा आहे.
47 धावांवर पाकिस्तानची तिसरी विकेट पडली. मोहम्मद रिझवान पाच चेंडूत दोन धावा करून बाद झाला. शार्दुल ठाकूरने त्याला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. आता फखर जमानसोबत आगा सलमान क्रिजवर आहे. 12 षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या 47/3 आहे.
कोलंबोमध्ये पावसानंतर खेळ सुरू झाला आहे. मोहम्मद रिझवान आणि फकर जमान क्रीजवर आहेत. शार्दुल ठाकूर भारताकडून 12 वे षटक टाकत आहे.
कोलंबोमध्ये पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. मैदान कव्हर्सने झाकले गेले आहे आणि खेळ सुरू होण्यास विलंब होणार आहे.
जर 20 षटकांचा सामना झाला, तर पाकिस्तानला 200 धावा कराव्या लागतील.
पावसामुळे सामना थांबवण्यात आला असून आता षटके कमी होऊ शकतात. सामन्याचा निकाल मिळविण्यासाठी पाकिस्तानला किमान 20 षटकांची फलंदाजी करावी लागणार आहे. पाकिस्तान संघाने 11 षटके खेळली आहेत. अशा स्थितीत पाकिस्तान संघ आणखी किमान नऊ षटके खेळेल तरच सामन्याचा निकाल लागेल.
डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानचे संभाव्य लक्ष्य
सामना 20 षटकांचा असेल तर 200 धावा
सामना 22 षटकांचा असेल तर 216 धावा
सामना 24 षटकांचा असेल तर 230 धावा
हा सामना 26 षटकांत खेळवला तर 244 धावा झाल्या होत्या.
पावसामुळे खेळ थांबला आहे. 357 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने 11 षटकात 2 गडी गमावून 44 धावा केल्या आहेत. बाबर आझम आणि इमाम उल हक बाहेर आहेत. फखर जमान आणि मोहम्मद रिझवान क्रीजवर आहेत. भारतासाठी वेगवान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. बुमराह आणि हार्दिकने प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.
भारताने दोन्ही रिव्ह्यू गमावले
भारतीय संघाने गोलंदाजीच्या 11 षटकांत दोन्ही रिव्ह्यू गमावले आहेत. हार्दिकच्या चेंडूवर विकेटच्या मागे झेल घेतल्याने रिझवानविरुद्ध अपील करण्यात आले. अंपायरने तो नाबाद घोषित केला आणि त्यानंतर भारतीय संघाने रिव्ह्यू मागितला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नसल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले. त्याच वेळी, जिथे चेंडू पॅडवर आदळला, तिथे चेंडू स्टंपच्या रेषेच्या बाहेर होता. अशा स्थितीत भारतीय संघाने दुसरा रिव्ह्यूही गमावला.
बाबर आझम झाला बोल्ड
हार्दिक पांड्याने आपल्या पहिल्याच षटकात भारताला मोठे यश मिळवून दिले. पाकिस्तानची दुसरी विकेट पडली. बाबर आझम 10 धावा करून बाद झाला. पाकिस्तानने 43 धावांत दोन विकेट गमावल्या आहेत. 10.4 षटकांचा खेळ पूर्ण झाला.
भारताने पहिला रिव्ह्यू गमावला
भारतीय संघाने पहिला रिव्ह्यू गमावला आहे. सिराजच्या चेंडूवर फखर जमानविरुद्ध एलबीडब्ल्यूचे जोरदार अपील होते. अंपायरने आऊट न दिल्याने भारतीय संघाने रिव्ह्यूची मागणी केली. चेंडू लेगस्टंपच्या बाहेर पडल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले. यासह भारताने पहिला रिव्ह्यू गमावला. आठ षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या ३०/१ आहे.
बुमराह आणि सिराज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत आहेत. दोघांनाही चांगला स्विंग मिळत आहे. ७ षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या एक विकेट गमावून २१ धावा आहे. बाबरला खातेही उघडता आलेले नाही.
पाकिस्तानची पहिली विकेट पडली
पाकिस्तानची पहिली विकेट पडली. बुमराहने भारताला पहिले यश मिळवून दिले. इमाम उल हक बाद झाला. इमाम उल हक 9 धावा करून बाद झाला. 4.3 षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या एक विकेट गमावून 17 धावा आहे.
पाकिस्तानच्या डावात चार षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. चार षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या एकही न गमावता 17धावा आहे. इमाम उल हक 9 धावा करून खेळत आहे. फखर जमानने खातेही उघडलेले नाही. बुमराह आणि सिराज तगडी गोलंदाजी करत आहेत.
पाकिस्तानचा डाव सुरू झाला आहे. पाकिस्तानसमोर 357 धावांचे मोठे आव्हान आहे. भारताकडून बुमराह आणि सिराज गोलंदाजीची सुरुवात करत आहेत. 2 षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या एकही बिनबाद 11 धावा आहे.
357 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची फलंदाजी सुरू झाली आहे. फकर जमान आणि इमाम उल हक क्रीजवर आहेत. जसप्रीत बुमराहने भारताकडून गोलंदाजीची सुरुवात केली आहे. सिराज दुसऱ्या टोकाला नवा चेंडू हाताळत आहे.
भारताने पाकिस्तानसमोर 357 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 50 षटकात 2 गडी गमावून 356 धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 122 आणि लोकेश राहुलने 111 धावा केल्या. दोन्ही फलंदाज शतके झळकावून नाबाद राहिले. या दोघांपूर्वी रोहित शर्मा 56धावा करून बाद झाला तर शुभमन गिल 58 धावा करून बाद झाला. पाकिस्तानकडून शादाब खान आणि शाहीन आफ्रिदीने प्रत्येकी एक विकेट घेतली.
विराट कोहलीने इतिहास रचला आहे. विराट कोहलीने वनडे क्रिकेटमधील 47 वे शतक झळकावले. यासह विराट कोहलीने 13000 धावाही पूर्ण केल्या आहेत. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 13000 धावा पूर्ण केल्या आहेत.
लोकेश राहुलने 100 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. त्याने पुनरागमन करत दमदार खेळी केली. राहुलने आतापर्यंत 10 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. हे त्याचे वनडेतील सहावे शतक आहे. विराट कोहलीही शतकाच्या जवळ पोहोचला आहे. 47 षटकांनंतर भारताची धावसंख्या 319/2 आहे.
भारताने 300 धावा पूर्ण केल्या
भारताच्या 300 धावा पूर्ण झाल्या आहेत. 5 षटकांचा खेळ बाकी. राहुल आणि कोहली दोघेही आपल्या शतकाच्या जवळ पोहोचले आहेत.
विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडला
विराट कोहलीने इफ्तिखारवर निशाणा साधला आहे. विराट कोहलीने इफ्तिखारच्या चार चेंडूंवर १३ धावा केल्या. 43 षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन विकेट गमावून 280 धावा आहे. विराट कोहली ७६ धावा करून खेळत आहे. राहुलने 82 धावांपर्यंत मजल मारली आहे.
भारताच्या धावसंख्येने दोन विकेट गमावून 250 धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि लोकेश राहुल आता वेगाने धावा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोन्ही फलंदाजांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली असून आता झटपट धावा करून शतक झळकावण्याचा प्रयत्न करतील. भारताच्या धावसंख्येने 250 धावांचा टप्पा ओलांडला असून दोघांनाही ती 300 धावांच्या पुढे नेण्याची इच्छा आहे
विराट कोहलीने 55 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने आतापर्यंतच्या खेळीत चार चौकार मारले आहेत. हे त्याचे वनडेतील 66 वे अर्धशतक आहे. त्याने लोकेश राहुलसोबत उत्कृष्ट शतकी भागीदारी केली आणि टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येकडे नेत आहे.
केएल राहुल आणि विराट कोहलीने भारताला मजबूत स्थितीत आणले आहे. 37 षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन विकेट गमावून 231 धावा आहे. विराट कोहलीही आपले अर्धशतक पूर्ण करण्याच्या जवळ आहे.
Pakistan vs India Super 4 Asia Cup 2023 Highlights Updates: आशिया चषक २०२३ भारत वि पाकिस्तान सुपर ४ अपडेट्स
भारतीय संघाने सुपरफोर सामन्यात पाकिस्तानविरुद्ध २२८ धावांनी मोठा विजय नोंदवला आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव केवळ १२८ धावांवरच रोखला.