Asia Cup 2023, India vs Pakistan Super 4 Score Updates: भारतीय संघाने पाकिस्तानवर २२८ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. एकदिवसीय इतिहासातील धावांच्या बाबतीत भारताचा पाकिस्तानवरचा हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी टीम इंडियाने २००८ च्या आशिया कपमध्ये बांगलादेशच्या मीरपूरमध्ये १४० धावांनी त्यांचा पराभव केला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या शतकी खेळीमुळे दोन गडी गमावून ३५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ आठ विकेट्सवर केवळ १२८ धावा करू शकला आणि सामना २२८ धावांनी गमावला. पाकिस्तान संघाला ३२ षटकात केवळ १२८ धावा करता आल्या. दुखापतग्रस्त हरिस रौफ आणि नसीम शाह फलंदाजीला आले नाहीत.
विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम –
सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७७ शतके झळकावण्यात यश मिळवले आणि सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनने ५९४ डावात ७७ शतके पूर्ण केली होती, तर कोहलीने ५६१ डावात हा पराक्रम केला आहे. कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ४७ शतके करणारा फलंदाज ठरला. त्याने सचिनचा विक्रमही मोडला. सचिनने आपल्या ४३५ व्या डावात ४७ वे एकदिवसीय शतक पूर्ण केले होते, तर कोहलीने २६७ व्या डावात हा पराक्रम केला.
कोहलीने केएल राहुलसोबत २०० हून अधिक धावांची केली भागीदारी –
या सामन्यात विराट कोहलीने केएल राहुलसोबत तिसऱ्या विकेटसाठी १९४ चेंडूत २३३ धावांची नाबाद भागीदारी केली. आशिया चषकात भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम भागीदारी ठरली. या सामन्यात विराट कोहलीने ९४ चेंडूत ३ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने नाबाद १२२ धावांची खेळी केली. विराट कोहलीने कोलंबोमध्ये चौथे शतक झळकावले. या सामन्यात केएल राहुलने ११ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचबरोबर भारताने पाकिस्तानविरुद्ध ५० षटकात २ बाद ३५६ धावा केल्या.
Pakistan vs India Super 4 Asia Cup 2023 Highlights Updates: आशिया चषक २०२३ भारत वि पाकिस्तान सुपर ४ अपडेट्स
केएल राहुल आणि विराट कोहली ही जोडी सध्या खेळपट्टीवर आहे. भारताने 35 षटकात 2 बाद 225 धावा केल्या आहेत. राहुल 63 धावांवर तर विराट 40 धावांवर खेळत आहे.
That's a solid ?- run partnership between @imVkohli & @klrahul ??
— BCCI (@BCCI) September 11, 2023
Keep going, lads!
Live – https://t.co/Jao6lKkWs5… #INDvPAK pic.twitter.com/xIVIToKzUm
लोकेश राहुलने आपले अर्धशतक 60 चेंडूत पूर्ण केले आहे. आतापर्यंत त्याने पाच चौकार आणि एक षटकार मारला आहे. त्याने विराटसोबत तिसऱ्या विकेटसाठी उत्कृष्ट भागीदारी केली आहे.
ASIA CUP 2023. 34.1: Shadab Khan to K L Rahul 4 runs, India 215/2 https://t.co/kg7Sh2t5pM #INDvPAK
— BCCI (@BCCI) September 11, 2023
केएल राहुलने पाकिस्तानच्या गोलंदाजांवर निशाणा साधला आहे. इफ्तिखारच्या षटकात राहुलने एक चौकार आणि एक षटकार ठोकला. राहुल 41 धावा करून खेळत आहे. कोहलीने 22 धावा केल्या आहेत. भारताची धावसंख्या 30.4 षटकात दोन गडी गमावून 185 धावा.
ASIA CUP 2023. 32.4: Iftikhar Ahmed to K L Rahul 4 runs, India 199/2 https://t.co/kg7Sh2t5pM #INDvPAK
— BCCI (@BCCI) September 11, 2023
विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यातील 50 धावांची भागीदारी पूर्ण झाली आहे. 30 षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन विकेट गमावून 175 धावा आहे.
50-run partnership comes up between @imVkohli and @klrahul ?
— BCCI (@BCCI) September 11, 2023
Live – https://t.co/kg7Sh2t5pM… #INDvPAK pic.twitter.com/AU43J7C2ng
बाबर आझमने त्याचे दोन्ही डीआरएस गमावले आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या वतीने विराट कोहली आणि केएल राहुल ही जोडी समोर उभी आहे. टीम इंडियाने 29 षटकात 2 बाद 167 धावा केल्या आहेत.
ASIA CUP 2023. 30.2: Iftikhar Ahmed to K L Rahul 4 runs, India 185/2 https://t.co/kg7Sh2t5pM #INDvPAK
— BCCI (@BCCI) September 11, 2023
भारताची धावसंख्या 160 धावांच्या पुढे
भारताच्या धावसंख्येने दोन विकेट गमावून 160 धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि लोकेश राहुल क्रीजवर आहेत. दोघेही चांगली फलंदाजी करत असून दोघांमध्ये उपयुक्त भागीदारी आहे. कोहली आता चांगल्या गतीने धावा करत आहे आणि राहुल सावधपणे खेळत आहे. 29 षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 167 धावा आहे.
राखीव दिवसाचा खेळ एक तास ४० मिनिटे उशिराने सुरू झाला. कालचे नाबाद परतलेले फलंदाज विराट कोहली आणि केएल राहुल यांनी राखीव दिवशी खेळाला सुरुवात केली. शादाब खान पाकिस्तानसाठी पहिले षटक टाकण्यासाठी आला आहे.
Joke apart, Two Pure Talented Players In a single Frame.????????#INDvsPAK #Colombo #colomboweather #PAKvIND #IndiavsPak #AsiaCup2023 pic.twitter.com/6z1nSAUZmu
— محمدعمیراسلم جلال کھوکھر (@UmairAslamJalal) September 11, 2023
हरिस रौफ आज गोलंदाजी करणार नाही –
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफ आज गोलंदाजी करणार नाही. पाकिस्तान संघासाठी हा मोठा धक्का आहे. रौफने या सामन्यात पाच षटके टाकली असून 27धावा दिल्या आहेत. जर त्याने गोलंदाजी केली नाही तर त्याच्या जागी इफ्तिखार अहमद किंवा इतर कोणत्याही अष्टपैलू खेळाडूला गोलंदाजी करावी लागेल आणि याचा फायदा भारतीय फलंदाज घेऊ शकतात. रौफ पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि तो खेळल्यास त्याची दुखापत आणखी वाढू शकते. विश्वचषकापूर्वी रौफची दुखापत पाकिस्तानी संघ व्यवस्थापनला परवडणार नाही. यामुळे तो आज गोलंदाजी करणार नाही.
पंचांनी केली मैदानाची पाहणी, लवकरच खेळ सुरू होणार
सायंकाळी 4.20 वाजता पंचांनी मैदानाची पाहणी केली. मैदान कोरडे दिसत असून लवकरच खेळ सुरू होऊ शकेल. मैदानात फक्त दोनच भाग आहेत, जिथे थोडी ओलावा आहे. खेळपट्टीच्या काठावर आणि मिड-विकेट भागात मैदान ओले आहे. तरी देखील सामना 4.40 वाजत सुरु होणार आहे. भारतीय संघ २४. १ षटकापासून पुढे फलंदाजी करेल.
Good news: Play to resume at 4:40 IST. No reduction in overs. #TeamIndia #INDvPAK #AsiaCup https://t.co/KHAQ9Va5uq
— BCCI (@BCCI) September 11, 2023
पाऊस थांबला, पहिल्यांदाच मैदानात पंच दिसले
पुन्हा एकदा पाऊस थांबला आहे. मात्र, ढगाळ वातावरण आहे. मैदानातून कव्हर काढले जात आहेत. आज पहिल्यांदाच मैदानाचा मोठा भाग कव्हरशिवाय दिसला. मैदान कोरडे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते सुकवण्यात मैदानावरील कर्मचारी व्यस्त आहेत. भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडही मैदानावर दिसत आहेत.
मैदानातून कव्हर काढले जात आहेत. कोलंबोमध्ये सूर्यप्रकाश आहे. पंच लवकरच मैदानाची पाहणी करतील. सामना कधी सुरू होईल याविषयी अपडेट लवकरच येऊ शकेल.
सूर्यप्रकाश पडण्याची शक्यता वाढली
कोलंबोमधून चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे. पाऊस थांबला आहे. सूर्यप्रकाशही पडण्याची शक्यता आहे. जर पाऊस पडला नाही तर सामना 5 वाजेपर्यंत सुरू होऊ शकतो.
कोलंबोमध्ये सतत पाऊस पडत आहे. पाऊस केवळ 15 मिनिटे थांबला होता. मात्र पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला. मैदानात पुन्हा कव्हर्स आले आहेत. त्यामुळे खेळाडूंना मैदानात उतरण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
Delays persist for #PAKvIND Super 4 match on the reserve day. ?️?️ #AsiaCup2023 pic.twitter.com/t3s7kFzZDt
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 11, 2023
Asia Cup: कोलंबो येथील भारत-पाक सामन्यातील पावसाने करून दिली २००२ ची आठवण, जाणून घ्या काय झाले होते?
पाऊस थांबल्याने कव्हर्स काढण्यास सुरुवात झाली आहे. कालपासून आजपर्यंत कोलंबोमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. अशा स्थितीत मैदानाला खेळण्याच्या स्थितीत आणणे सोपे जाणार नाही. सामना उशिरा सुरू होणार आहे. यापूर्वी हा सामना 3 वाजता सुरू होणार होता.
पाकिस्तान संघाने हा सामना जिंकल्यास त्याचे चार गुण होतील आणि अंतिम फेरीतील त्याचे स्थान जवळपास निश्चित होईल. त्याचवेळी, पावसाने वाया गेल्यास, दोन्ही संघांवा प्रत्येकी एक गुण दिला जाईल आणि पाकिस्तानचे तीन गुण होतील. अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याचा त्याचा दावा बळकट होईल.
त्याचबरोबर भारतीय संघाने हा सामना जिंकल्यास त्याचे दोन गुण होतील. अंतिम फेरीत पोहोचण्याचा त्याचा दावा बळकट होईल. टीम इंडियाला १२ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध आणि १४ सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध खेळायचे आहे. पावसाने सामना वाया गेल्यास टीम इंडियाला एक गुण मिळेल आणि अशा परिस्थितीत त्याचा मार्ग कठीण होईल. या स्थितीत त्यांना त्यांचे पुढील दोन्ही सामने जिंकावे लागतील, कारण श्रीलंकेने यापूर्वीच एक सामना जिंकला आहे. जर संघ हरला तर त्याचे पुढील दोन सुपर फोर सामने टीम इंडियासाठी करो या मरो असे असतील.
सुपर फोरमधील पॉइंट टेबलची स्थिती –
एका सामन्यात दोन गुण आणि +1.051 निव्वळ धावगतीसह पाकिस्तान सुपर फोरच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. एका सामन्यात दोन गुण आणि +0.420 निव्वळ धावगतीसह श्रीलंका दुसऱ्या स्थानावर आहे. भारत तिसऱ्या तर, दोन्ही सामने गमावल्यानंतर बांगलादेश चौथ्या स्थानावर आहे.
सोमवारी पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळल्यानंतर भारतीय संघाला मंगळवारी, १२ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्धही सामना खेळायचा आहे. हा सामनाही ५०-५० षटकांचा असेल. अशा स्थितीत टीम इंडिया सलग तीन दिवस अॅक्शनमध्ये दिसणार आहे, जी वर्ल्ड कपपूर्वी भारतीय खेळाडूंसाठी अडचणीची ठरू शकते.
विराट कोहलीने आतापर्यंत 278 एकदिवसीय सामन्यांच्या 267 डावांमध्ये 12910 धावा केल्या आहेत. 13 हजार धावांच्या आकड्यापासून तो फक्त 90 धावा दूर आहे. जर आज सामना झाला आणि विराट फलंदाजीला आला तर तो शतक झळकावेल आणि 13 हजार धावांचा आकडा गाठेल अशी आशा चाहत्यांना असेल. अशी कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा आणि जगातील पाचवा फलंदाज ठरेल. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर (भारत), कुमार संगकारा (श्रीलंका), रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया), सनथ जयसूर्या (श्रीलंका) यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 13 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
रविवारी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपर-४चा सामना खेळला जात होता. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे भारतीय डावात व्यत्यय आला आणि सामना राखीव दिवसापर्यंत पुढे ढकलण्यात आला. सोमवारी, सामना भारतीय डावाच्या २४.१ षटकांपासून सुरू होईल आणि सामना ५०-५० षटकांचा खेळला जाईल.
UPDATE – Play has been called off due to persistent rains ?️
— BCCI (@BCCI) September 10, 2023
See you tomorrow (reserve day) at 3 PM IST!
Scorecard ▶️ https://t.co/kg7Sh2t5pM #TeamIndia | #AsiaCup2023 | #INDvPAK pic.twitter.com/7thgTaGgYf
आज सामना सुरू असताना काही तास पाऊस थांबला होता, मात्र मैदान ओले असल्याने त्याची दुरुस्ती करण्यास ग्राउंड स्टाफला वेळ लागला. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. काही तासांनी पाऊस थांबला. मात्र, आऊटफील्ड ओले होते. रात्री ८.३० वाजता अंपायर्सनी पाहणी करण्याचा निर्णय घेतला होता. रात्री नऊ वाजता खेळ सुरू होणार असल्याची चर्चा होती. मात्र, साडेनऊ वाजता पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला आणि अंपायर्सनी सामना राखीव दिवशी हलविण्याचा निर्णय घेतला.
2000 ODI runs and counting for @klrahul ?
— BCCI (@BCCI) September 10, 2023
Live – https://t.co/Jao6lKkWs5… #INDvPAK #AsiaCup2023 pic.twitter.com/We2YfX06gA
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारताने २४.१ षटकांत २ गडी गमावून १४७ धावा केल्या. सध्या के.एल. राहुल २८ चेंडूत १७ धावा आणि विराट कोहली १६ चेंडूत ८ धावा करत फलंदाजी करत आहे. तिसर्या विकेटसाठी दोघांमध्ये आतापर्यंत ३८ चेंडूत २४ धावांची भागीदारी झाली आहे.
1⃣0⃣0⃣-run partnership! ?
— BCCI (@BCCI) September 10, 2023
Captain Rohit Sharma & Shubman Gill continue to score at a brisk pace ? ?
Follow the match ▶️ https://t.co/kg7Sh2t5pM#TeamIndia | #AsiaCup2023 | #INDvPAK pic.twitter.com/QnKhxZkdea
आशिया चषक स्पर्धेतील सामने हे, १४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आयसीसी विश्वचषक २०२३ मधील भारत-पाकिस्तान सामन्याआधीची तालीम असणार आहेत. त्यात हा सामना या दोन संघांसाठी सरावासाठी खूप मोठी संधी असणार असेल. तसेच, चाहत्यांसाठी हे हाय व्होल्टेज सामने म्हणजे क्रिकेट आणि मनोरंजनाचा अतिरिक्त डोस असेल, यात काहीच शंका नाही.
कोलंबोमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. अशा स्थितीत मैदानाला झाकण लावण्यात आले आहे. आता हा सामना राखीव दिवशी पोहोचला आहे. आजचा सामना पूर्ण होऊ शकला नाही. यामुळे हा सामना आता सोमवारी राखीव दिवशी खेळवला जाणार आहे.

प्रेमदासा स्टेडियममधील मैदान सुकवण्यासाठी ग्राउंड स्टाफ वेगवेगळी शक्कल लढवत आहे. एका ढकलगाडीला पंखे लावून ते सुकवत आहेत. त्याआधी जिथे पाणी जास्त होते तिथे आधी सुकलेली माती टाकली आणि त्यानंतर आता पंख्यांनी ती जागा वाळवली जात आहे. एवढे नवीन तंत्रज्ञान असूनही हा देसी जुगाड करत असल्याने सोशल मीडियावर जोरदार मीम्स तयार होत आहेत. त्यात भारताचा मोहम्मद कैफ म्हटला की, “कितीही टेक्नॉलॉजी येऊ द्या, शेवटी देशी जुगाडच धावून येतो..”
The pitch and ground are dried by fans in the ground.#FakharZaman #NaseemShah #ShadabKhan #INDvsPAK #PakistanCricket #BabarAzam? #Colombo pic.twitter.com/wIuifrCNe6
— cric.pakistan ? (@mbinasif_1) September 10, 2023
There will be a pitch inspection right now at Premadasa Stadium in Colombo #IndiavsPak pic.twitter.com/SVZewCllHT
— Vikrant Gupta (@VikrantGupta73_) September 10, 2023
रात्री ८ वाजता अंपायर्स पुन्हा खेळपट्टीची पाहणी करतील. मैदान ओले आहे आणि अशा परिस्थितीत अंपायर्सना कोणताही धोका पत्करायचा नाही. आज २० षटकांचा सामना आयोजित करण्याची कट ऑफ वेळ रात्री १२ वाजता आहे. १०:३० ते १२ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच ९० मिनिटांनी वाढवण्यात आली आहे. अशा स्थितीत टीम इंडिया फलंदाजी करू शकणार नाही आणि डकवर्थ लुईस नियमाचा वापर केला जाईल. अंपायर्सनी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि त्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्याशीही चर्चा केली. ९ वाजता सुरू झाला तर ३४-३४ षटकांचा सामना होईल. म्हणजेच टीम इंडिया आणखी १० षटके खेळणार आहे.
आज प्रेमदासा स्टेडियममध्ये रोहित शर्मा आणि शुबमन गिलचे तुफान पाहायला मिळाले होते. शुबमनने शाहीनच्या दोन षटकांत प्रत्येकी तीन चौकार मारले होते. त्याचवेळी पाकिस्तानी गोलंदाजांची लय बिघडली. रोहित आणि शुबमन यांनी पहिल्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी शादाब खानने मोडली. त्याने कर्णधार रोहितला बाद केले. हिटमॅनने आपले ५०वे अर्धशतक झळकावले. त्याने ४९ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ५६ धावांची खेळी केली. त्याचवेळी शुबमनने एकदिवसीय कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावले. शाहीन आफ्रिदीने त्याला सलमानकडे झेलबाद केले. शुबमन ५२ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने ५८ धावा करून बाद झाला.
सायंकाळी ७.३० वाजता अंपायर्स खेळपट्टीची पाहणी करतील. मैदान ओले आहे आणि अशा परिस्थितीत अंपायर्सना कोणताही धोका पत्करायचा नाही. आज २० षटकांचा सामना आयोजित करण्याची कट ऑफ वेळ रात्री १२ वाजता आहे. १०.३० ते १२ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच ९० मिनिटांनी वाढवण्यात आली आहे. अशा स्थितीत टीम इंडिया फलंदाजी करू शकणार नाही आणि डकवर्थ लुईस नियमाचा वापर केला जाईल. अंपायर्सनी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि त्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्याशीही चर्चा केली.
पाऊस थांबला आहे. कव्हर काढले जात आहेत. पावसामुळे आऊटफिल्ड ओले आहे, ते कोरडे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. षटके कापण्याची कट ऑफ वेळ संध्याकाळी ६.२२ होती, म्हणजेच आता षटके कापण्यास सुरुवात होईल. अशा परिस्थितीत डकवर्थ लुईस नियमाचा वापर केला जाईल. आजच सामन्याचा निकाल लावण्याचा सामना अधिकारी प्रयत्न करतील. सामना होऊ शकला नाही तरच सामना उद्या राखीव दिवशी जाईल. आज २० षटकांच्या सामन्याची कट ऑफ वेळ रात्री १०.३० आहे. यानंतर आजचा सामना होणार नाही. सामन्याचा निकाल मिळविण्यासाठी किमान २० षटकांचा सामना होणे आवश्यक आहे.
पाकिस्तान हे लक्ष्य साध्य करू शकतो
२० षटकात १८१ धावा
२१ षटकांत १८७ धावा
२२ षटकात १९४ धावा
२३ षटकात २०० धावा
२४ षटकात २०६ धावा
सामना अधिकारी आजचा सामना संपवण्याचा प्रयत्न करतील. जर आज अजिबातचं सामना होऊ शकला नाही, तर जिथ थांबला होता तिथंपासून उद्या राखीव दिवशी सामना सुरू होईल. आज जर डकवर्थ लुईस नियम आला आणि भारतीय संघ पुन्हा फलंदाजी करू शकला नाही, तर पाकिस्तानला लक्ष्य दिले जाईल.
कोलंबोमध्ये पाऊस थांबला आहे. कव्हर काढत असून मैदानातील काही भाग वाळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पाऊस इतका जोरात होता की जमीन ओली झाली. याचे निराकरण करण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. संध्याकाळी ६.२२ पासून ओव्हर्स कापण्यास सुरुवात होईल.
पाकिस्तान हे लक्ष्य साध्य करू शकतो-

भारतीय संघाने सुपरफोर सामन्यात पाकिस्तानविरुद्ध २२८ धावांनी मोठा विजय नोंदवला आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव केवळ १२८ धावांवरच रोखला.